सौंदर्याचा मेडिकल डोस महिलांहून पुढे आहेत पुरूष

* डॉ. मानव विकास

आता महिलांमधील लोकप्रिय चिकित्सकीय ब्युटी उपचार आता चाळीशी पार केलेल्या पुरुषांनाही आकर्षित करत आहे. कारण आता सौंदर्यावर केवळ महिलांचीच मक्तेदारी नाही, तर पुरुषही आपल्या सौंदर्याची विशेष काळजी घेत आहेत.

सर्वाधिक लोकप्रिय ट्रीटमेंट

बोटोक्स : बोटोक्सचे इंजेक्शन मसल्स म्हणजेच मांसपेशींमध्ये दिलं जातं. त्यामुळे वय कमी दिसू लागते, कारण हे त्वचेवर निर्माण झालेल्या रेषा व सुरकुत्यांना नष्ट करण्याचे काम करते. २८ वर्षांपासून ते ६५ वर्षांपर्यंतचे लोक याचा वापर करतात.

फिलर्स : हेही एक प्रकारचे इंजेक्शनच आहे. त्याचा वापर त्वचा कसरदार करण्यात व सुरकुत्या नष्ट करण्यासाठी केला जातो. हे इंजेक्शन त्वचेच्या केवळ वरच्या स्तराला स्पर्श करतं. हे बोटोक्सप्रमाणे त्वचेच्या आत जात नाहीत.

लाइपोसक्शन : ही ट्रीटमेंट चरबीच्या त्रासापासून मुक्तता करते. लठ्ठपणाने त्रस्त लोक या तंत्राचा आधार घेतात.

लेर थेरपी : ही ट्रीटमेंट त्वचेवरील डाग व खड्डे नष्ट करण्यासाठी उपयुक्त आहे. चेहऱ्यावरील नको असलेले केस हटवण्यासाठीही या थेरपीचा वापर केला जातो.

वेगाने वाढणारी लोकप्रियता

डॉ. सुनील चौधरी सांगतात की, सौंदर्याच्या या वैद्यकिय पद्धती यापूर्वीही उपलब्ध होत्या, परंतु तेव्हा यांचा वापर मॉडेल, अॅक्टर किंवा अन्य हाय प्रोफाइल लोकच करत असत किंवा मग केवळ महिला. पण आज या तंत्राद्वारे सुंदर बनण्याच्या शर्यतीत सर्वात जास्त चाळीशी पार केलेले पुरुष सहभागी आहेत.

योग्य सेंटरची निवड

सौंदर्याबाबत वाढते पुरुषांचे आकर्षण चांगले आहे. परंतु कुठूनही ट्रीटमेंट घेण्याची घाई करणे वाईट आहे. सौंदर्याच्या मोहात अशा चुका करू नका, ज्या आरोग्यावर दुष्पपरिणाम करतील. अनेक लोक जाहिरात वाचून अशा ब्यूटी सेंटरमध्ये जातात, जिथे कोणी कॉस्मॅटिक सर्जन किंवा डर्मेटोलॉजिस्टच नसतो.

केवळ कॉस्मॅटिक सर्जन किंवा डर्मेटोलॉजिस्टलाच या ट्रीटमेंट देण्याचा अधिकार आहे. या ट्रीटमेंट्समध्ये अनेक प्रकारच्या बारकाव्यांची काळजी घ्यावी लागते.

साइड इफेक्ट : या ब्युटी ट्रीटमेंट्स पूर्णपणे नुकसानरहित नाहीत. यांचे साइड इफेक्टही होतात. जे लोक वाढत्या वयात कधीतरी अर्थात २-३ वेळाच हे उपचार घेतात, ते धोक्यापासून दूर राहतात, पण जे लोक कमी वय अर्थात, १८ ते २० वर्षांपासून याचा आधार घेतात, त्यांना अनेक प्रकारचे साइड इफेक्ट्स होतात. अनेकदा ज्या भागाला ट्रीटमेंट दिलेली असते, त्याच्या आजूबाजूची त्वचा संक्रमित होते. त्वचा लालसर होते, ती रूक्ष होते, तिच्यावर छोटे-छोटे फोड येतात.

सावधगिरी : एखाद्या कॉस्मॅटिक सर्जनच्या सल्ल्यानेच अशी एखादी ब्यूटी ट्रीटमेंट घ्या. कमी किमतीला बळी पडू नका. ओळखीच्या ठिकाणावरूनच ट्रीटमेंट घ्या. डॉक्टरला आपली मेडिकल हिस्ट्री जरूर सांगा. कार्डियोव्हॅस्क्यूलर आणि न्यूरोमस्क्यूलरसारख्या आजारांना बळी पडला असाल तर कोणत्याही ट्रीटमेंटपासून दूर राहा. एक्स्पर्ट डाएटमध्ये जे बदल सुचवलेले आहेत, त्यांचे पालन करा.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें