ऑनलाइन शॉपिंग की बाजारातील चमकदमक

– शैलेंद्र सिंह

फेस्टिव्हल सीजनमध्ये बाजारात, मॉल्समध्ये आणि ऑनलाइन मार्केटमध्ये विविध प्रकारच्या ऑफर्स येऊ लागतात. त्यामुळे हे ठरवणं अवघड होऊन बसते की शॉपिंग नक्की कोणत्या प्रकारे करावी. इतके प्रश्न मनात उठत असतानाही बाजारात जाऊन प्रत्यक्ष खरेदी करणाऱ्यांची संख्याच सर्वाधिक आहे. मॉल्समध्ये जाऊन खरेदी करण्याची क्रेझही वाढत आहे. तर काही असेही लोक आहेत, जे फक्त ऑनलाइन शॉपिंग करणेच पसंत करतात. या लोकांना बाजारातील आणि मॉल्समधील गर्दी टाळण्यासाठी हा उत्तम पर्याय वाटतो.

खरंतर आजच्या बदलत्या काळात प्रत्येकाकडे वेळेची कमतरता आहे. अशावेळी वेळ वाचवत फेस्टिव्हल शॉपिंगचा फॉर्म्युला तयार केला जातो. आजच्या तरूण-तरूणी हॉस्टेल आणि कॉलेजमध्ये राहतात. त्यांना आपल्यासाठी काहीतरी डिफरंट शॉपिंग करायची असते. त्यांना ऑनलाइन सर्च करून शॉपिंग करायला सर्वाधिक आवडते.

अशा तरूण वर्गाची स्वत:ची अशी काही मते असतात. फाइन आर्टस्मध्ये बीएफए करणारी वर्तिका सिंह सांगते, ‘‘ऑनलाइन शॉपिंगचा ट्रेंड आता बदलला आहे. पूर्वी लोकांचा यावर विश्वास नव्हता. त्यांना वाटत होते की जी वस्तू स्क्रिनवर दाखवली आहे, प्रत्यक्षात वेगळीच वस्तू आपल्याला दिली जाईल. परंतु आता असे नाही. ऑनलाइन खरेदी केलेली वस्तू बदलणे सोपे आहे. इथे फॅशनचे नवीन ट्रेंड्स पाहायला मिळतात. नवनवीन डिझाइन्स पाहण्यासाठी फक्त मोबाइलवर सर्च करावे लागते.

अनुज सिंह म्हणतात, ‘‘ऑनलाइन शॉपिंगमध्ये आता काही खास वस्तू मिळू लागल्या आहेत. त्यामुळे काही खास वस्तू खरेदी करायच्या असतील तर ऑनलाइन शॉपिंग हा बेस्ट ऑप्शन आहे.’’ आता ऑनलाइन खरेदी पूर्वीसारखी राहिलेली नाही. इथेही ग्राहकांसोबत गुड विल बनवले जाण्याचे काम केले जाते. काही स्पेशल वस्तू ऑनलाइन पोर्टलद्वारे विकल्या जातात, ज्या बाजारात उपलब्ध नाहीत. बाजारात केलेली खरेदी दुसऱ्यांच्या सामानासोबत मॅच होऊ शकते, पण ऑनलाइन केलेली खरेदी मॅच होत नाही. मात्र हे खरे आहे की ऑनलाइन केली जाणारी खरेदी विचारपूर्वक करावी लागते.’’

खुणावते बाजारातील चमकदमक

शॉपिंग करणे हे खूपच आनंददायी काम असते. शॉपिंग करताना आपल्याला समाधान मिळते. रेडिओ जॉकी पारुल गोस्वामी सांगते, ‘‘प्रत्येक बाजारात काही खास ट्रेडिशनल दुकाने असतात, जिथे ग्राहकांना आरामात बसवले जाते. मग खूप आपलेपणाने त्यांना वस्तू दाखवल्या जातात. ग्राहक शॉपिंगमुळे कंटाळून जाऊ नये म्हणून त्यांना अधूनमधून चहा, कॉफी किंवा पाणीही दिले जाते. इथे ग्राहक आणि दुकानदार यांचा एकमेकांवर विश्वास असतो.’’

असे वातावरण गुजरात, राजस्थान तसेच उत्तरप्रदेशच्या काही शहरांत पाहायला मिळते, जिथे लोक आपल्या पसंतीच्या जुन्या दुकानातच फेस्टिव्हलची शॉपिंग करतात. बहुतेक लोक हे बाजारात, जुन्या दुकानांतून खरेदी करतात कारण तिथे स्वस्त, विश्वासार्ह, चांगले सामान मिळते.

रेणू श्रीवास्तव म्हणतात, ‘‘बाजारातील खरेदीत शॉपिंग आणि फेस्टिव्हल या दोन्हींची मजा घेता येते. अशात पहिली पसंत ही बाजारातील खरेदीलाच आहे. पण कधी नाईलाजाने ऑनलाइन किंवा मॉलमध्ये खरेदीला जावे लागते.’’

फेस्टिव्हल शॉपिंगमध्ये बाजारातील चमकदमक लोकांना मोहात पाडते.

बाजारातील जोश काही औरच असतो. नेहा सिंह म्हणते, ‘‘बाजारातील शॉपिंग सर्वात जास्त आवडते. इथे शॉपिंग करताना फेस्टिव्हलचा फील येतो. खरंतर आपण ऑनलाइन शॉपिंग ही वेळ वाचवण्यासाठी करत असतो, पण फेस्टिव्हलच्या दरम्यान बाजारातील खरेदीच पसंत केली जाते. इथे सर्वाधिक आवडते ते म्हणजे बाजार विविधरंगी रंगांनी आणि रोषणाईने सजलेला असतो.’’

शॉपिंग सोबत स्ट्रीट फूडचा आस्वाद

बाजारात शॉपिंगच्या क्रेझसोबत दुसरे मोठे कारण म्हणजे इथे शॉपिंग सोबतच स्ट्रीट फूडचा आस्वादही घेता येतो. मोनिका खन्ना म्हणते, ‘‘बाजारात आपण परिवार किंवा मित्रांबरोबर शॉपिंग करू शकतो. शॉपिंगबरोबरच स्ट्रीट फूडवरही ताव मारता येतो. कुठलाही बाजार असो तिथे चाट, भजी असले चटपटीत पदार्थ खायला मिळतातच. शॉपिंग बॅग हातात सांभाळत चाट-पकोडे वगैरे खाण्यात काही औरच मजा असते आणि याने शॉपिंगचा आनंद द्विगुणीतच होतो. शॉपिंगला निघतानाच ठरवले जाते की आज काय खायचं.’’

मॉल्सची वाढती क्रे

मॉल्समध्ये शॉपिंग करण्याची क्रेझ वाढते आहे. हा बाजारातील शॉपिंगला पर्याय म्हणून उभा राहत आहे. इथे अनेकदा बाजारात स्वस्त शॉपिंगसुद्धा होते. शॉपिंगमध्ये खूप ऑफर्स असतात. जास्त खरेदीवरही ऑफर्स असतात. मॉल्समध्ये नेहमी सेलचा खेळ दिसून येतो. इथल्या खरेदीदारांना हेच आवडते.

रिया अरोरा म्हणते, ‘‘माझा ऑनलाइन शॉपिंगवर विश्वास नाही. तिथे दाखवतात काही वेगळे आणि पाठवतात भलतेच. त्यामुळे मला ऑनलाइनच्या तुलनेत मॉल्स आणि बाजारात शॉपिंग करायला आवडते. इथे वस्तू व्यवस्थित पाहून निवडता येते.’’

श्वेता शुक्ला म्हणते, ‘‘जसा वेळ आणि गरज असते त्याप्रमाणे शॉपिंग करते. मॉल्सची एक आपली सुविधा असते. हे खरे आहे की इथे स्ट्रीट फूड मिळत नाही पण खाण्याचे इतर सर्व प्रकार इथे मिळतात.’’

विनय तिवारी म्हणतात, ‘‘मॉल्समध्ये शॉपिंग करताना इतक्या ऑफर्स असतात की इथे शॉपिंग करताना सर्व बजेट कोलमडून जाते. बाजारातील शॉपिंगमध्ये हा धोका नसतो. तिथे जे खरेदी करायला आलो आहोत त्याचीच खरेदी केली जाते.’’

निलम सिंह यांना असे वाटते की बाजारातील खरेदी अधिक योग्य असते. सर्वाधिक लोक हे बाजार आणि मॉलमधील खरेदीलाच खरी फेस्टिव्हल शॉपिंग मानतात. हे लोक मानतात की फेस्टिव्हलची रंगत अनुभवत आपले कुटुंबीय आणि मित्र परिवार यांच्यासोबत केलेल्या शॉपिंगला कशाचीच सर येऊ शकत नाही. जी मजा फिरत फिरत, वस्तूला पारखून घेऊन खरेदी करण्यात आहे ती आणखी कुठेच नाही.

देशी बाजारात खरेदी करायलाही लोकांना आवडते. आईपी सिंहसारख्या अनेक लोकांना वाटते की देशी बाजार आणि सिजनल शॉप्समध्ये केलेली खरेदी अधिक चांगली असते. इथे वस्तू स्वस्त दरात मिळतात. अनेकदा त्या वस्तू फेस्टिव्हलच्या ट्रेडिशनल रुपानुसार असतात. मातीच्या पणत्या आणि इतर वस्तूही इथे सहज मिळतात. शिवाय मनाला एक समाधानही मिळते की आपल्या खरेदीमुळे कुणा गरजवंताला मदतही होते.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें