* अर्चना गौतम
सोडून मला एकाकी,
तू नेलास दिवाळीचा,
सर्व हर्षोल्हास,
हास्य अन् प्रकाश,
सजलेल्या दारी,
तोरणांचे दीप उजळती,
अंगणी जळे
रांगोळीतील पणती.
तुला करत नाही,
का घायाळ,
माझ्या विरहाचा जाळ.
तुळशीभोवती,
दीप उजळताना,
सतवत नाहीत का,
माझ्या स्मृती,
तुझ्या मना,
अंधकाराने वेढलेले,
माझे हृदय,
प्रकाशाविना आहे शापित,
सांग एकदा तरी,
कसे उजळू मनाचे दीप.