आरोग्य परामर्श

* डॉ. आमोद मनोचा, मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, साकेत, दिल्ली

प्रश्न : माझे वय ६५ आहे. २०१० मध्ये मला माझ्या पाठीत आणि पायांमध्ये तीव्र वेदना होत होत्या. उपचारासाठी ५ वेळा मणक्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेने मला पायाच्या दुखण्यापासून आराम मिळाला असला तरी पाठदुखीचा त्रास अजूनही सतावत आहे. अगदी मला उठणे-बसणे ही अवघड झाले आहे. कृपया मला याचा उपाय सांगा?

उत्तर : योग्य उपचारांसाठी समस्येचे कारण जाणून घेणे महत्वाचे आहे. त्यामुळे सर्वप्रथम हे तपासा. मणक्याच्या सांध्यातील वेदना दूर करण्यासाठी रेडिओ फ्रिक्वेन्सी अॅब्लेशन आरएफए हा एक चांगला पर्याय मानला जातो. दिल्लीत अशी अनेक रुग्णालये आहेत, जिथे हे तंत्रज्ञान वापरले जाते. या उपचाराच्या मदतीने तुम्हाला १८ ते २४ महिन्यांत वेदनांपासून पूर्ण आराम मिळेल. मणक्याच्या ज्या नसांमध्ये वेदना होतात त्यांच्याजवळ विशिष्ट प्रकारच्या सुया लावल्या जातात. विशेष उपकरणांच्या साहाय्याने रेडिओ लहरींद्वारे निर्माण होणाऱ्या विद्युत प्रवाहाचा वापर करून या नसांजवळील एक छोटा भाग गरम केला जातो. हे मज्जातंतूं मधून मेंदूकडे जाणाऱ्या वेदना कमी करते, ज्यामुळे तुम्हाला वेदनापासून आराम मिळेल. या उपचाराचे अनेक फायदे आहेत जसे की तुम्हाला हॉस्पिटलमधून लवकर डिस्चार्ज मिळेल, तुमची रिकव्हरी जलद होईल आणि तुम्ही लवकरच काम सुरू करू शकाल.

प्रश्न : मी ३५ वर्षांचा आहे. गेल्या काही दिवसांपासून माझे खांदे अचानक दुखायला लागतात. मला औषधे घेणे अजिबात आवडत नाही. यातून सुटका मिळवण्यासाठी कृपया दुसरा एखादा मार्ग सुचवा?

उत्तर : काळ बदलला आहे तसंच लोकांची जीवनशैलीही बदलली आहे, त्यामुळे तरुण आणि कमी वयाचे लोक ही शरीराच्या विविध भागातील वेदनेने त्रस्त आहेत. त्याचवेळी बहुतेक लोक या वेदनांकडे दुर्लक्ष करत राहतात, ज्यामुळे वेळोवेळी समस्या गंभीर होत जाते. तुम्ही ही म्हण तर ऐकली असेलच की उपचारापेक्षा रोगाचा प्रतिबंध करणे चांगले आहे. होय, जर तुम्ही प्रतिबंध करण्याच्या पद्धतींचे पालन केले तर आजार तुम्हाला स्पर्शही करणार नाहीत. वाढत्या वयाबरोबर वाढत्या वेदना टाळण्यासाठी निरोगी आणि सक्रिय जीवनशैलीचे अनुसरण करा. सकस आहार घ्या, दारू आणि धूम्रपानापासून दूर राहा, रोजच्या व्यायामासाठी वेळ काढा, तणावापासून दूर राहा, वजन नियंत्रणात ठेवा. असे केल्याने तुम्हाला दीर्घायुष्यासाठी निरोगी शरीर मिळू शकेल.

प्रश्न : मी ७० वर्षांचा आहे. अनेकदा माझे सांधे दुखतात. उपचार चालू आहेत, पण विशेष फायदा होत नाही. कुटुंबीयांचे म्हणणे आहे की या वयात वेदना होणे हे सामान्य आहे, मात्र मला हे दुखणे सहन करणे कठीण होत आहे. यातून सुटका मिळवण्याचा दुसरा कुठला मार्ग आहे का?

उत्तर : या वयात शरीर अनेक आजारांना बळी पडते. या वयात प्रत्येकजण वेदनांची तक्रार करू लागतो, परंतु याचा अर्थ असा नाही की आपण त्यापासून मुक्त होऊ शकत नाही. तुझा उपचार सुरू असल्याचे तू सांगितलेस. प्रत्येक उपचाराची एक प्रक्रिया असते, जिचा प्रभाव होण्यास वेळ लागतो. तथापि आज वेदना दूर करण्यासाठी अनेक नॉन-इनवेसिव्ह पर्याय उपलब्ध आहेत, जसे की रेडिओफ्रिक्वेन्सी उपचार, सांधे बदलणे, पुनरुत्पादक औषध इ. तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन तुम्ही गरजेनुसार योग्य पर्याय निवडू शकता. यासोबतच तुमची जीवनशैली आणि आहार सुधारा. चांगले अन्न खा, व्यायाम करा, आठवडयातून दोनदा सांध्यांची मसाज करा, मद्यपान आणि धुम्रपान टाळा, नियमित सांधे तपासणी करा.

प्रश्न : मी २५ वर्षांचा आहे. मी एक फोटोग्राफर आहे, त्यामुळे मला दिवसभर उभे राहून फोटोशूट करावे लागते. कधी-कधी बाहेरही जावं लागतं, जिथे विश्रांतीसाठी वेळ मिळत नसतो. अशा परिस्थितीत माझे शरीर दुखण्याने जणू मोडू लागते आणि डोकेदुखीही होते, त्यामुळे मला वेदनाशामक औषध घ्यावे लागते. वेदनाशामक औषधाने माझ्या तब्येतीवर परिणाम तर होणार नाही ना अशी मला भीती वाटते, कृपया मला या समस्येपासून मुक्त होण्यासाठी उपाय सांगा?

उत्तर : अशा प्रकारच्या व्यस्त जीवनशैलीमुळे तरुणाई अनेकदा अशा समस्यांच्या गर्तेत सापडते. दिवसभर एकाच आसनात उभे राहिल्याने किंवा बसल्याने मज्जातंतूंवर दाब पडतो, त्यामुळे वेदना होण्याची तक्रार असते. थकवा, भूकेले राहणे, कमी पाणी पिणे आणि विश्रांती न मिळाल्याने डोकेदुखीची समस्या उद्भवते. याला आपणच जबाबदार असतो. कामाला महत्त्व देण्याच्या प्रवुत्तीमुळे ते स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देऊ शकत नाहीत. समस्येपासून मुक्ती मिळवायची असेल तर सर्वप्रथम शरीराला विश्रांती द्यायला शिका. कामाच्या दरम्यान थोडा वेळ काढून शरीर  ताणून घ्या, वेळेवर अन्न खा, पुरेसे पाणी प्या आणि अधूनमधून बसून शरीराला विश्रांती द्या. याशिवाय व्यायाम, पौष्टिक आहार इत्यादींचा नित्यक्रमात समावेश करा. समस्या वाढत राहिल्यास डॉक्टरांचा सल्ल घ्या. यास  लाइटली घेणे आपल्याला जड जाऊ शकते. कोणत्याही समस्येसाठी कधीही स्वत:च औषधोपचार करू नका. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषध घ्या.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें