सौंदर्य समस्या

* समस्यांचे निराकरण ब्यूटी एक्सपर्ट, इशिका तनेजा

  • केस मुलायम आणि रेशमी ठेवण्यासाठी काय केले पाहिजे?

केसांची देखभाल करण्यासाठी तुम्ही क्रिमी शॅम्पूचा वापर केला पाहिजे. तसेच क्रिमी कंडीशनर नक्की लावा. याच्यासाठी केस शॅम्पूने व्यवस्थित धुवून घ्या. यानंतर लेंथवर कंडीशनर लावून काही मिनिटे तसेच ठेवा. मग केस पाण्याने धुवा. केस कॅराटीन नावाच्या प्रोटीनने बनतात. यांच्या वाढीसाठी आपल्या रोजच्या आहारात प्रोटीनचा समावेश करा जसे की दूध, दही, मोड आलेली कडधान्ये, अंड, मासे इत्यादी. यामुळे केसांना पोषण मिळते. आठवडयातून एकदा हेअर पॅक लावा. यासाठी पिकलेले केळे, २ चमचे दूधासह मिक्सरमध्ये स्मॅश करून पेस्टमध्ये आवाकाडो, मध आणि वाटलेली पुदीन्याची पाने एकत्र करा. हे मिश्रण लेपप्रमाणे केसांवर लावा आणि काही तासांनी केस पाण्याने धुवा.

  • माझे डोळे थोडे मोठे आहेत. जेव्हा कधी मी आय मेकअप करते, तेव्हा माझे डोळे बाहेर आल्यासारखे वाटतात. मला जाणून घ्यायचे आहे की, डोळयांचा मेकअप कसा असावा जेणेकरून माझी समस्या सोडवता येईल?

डोळे मोठे असल्याने चेहरा आकर्षक दिसतो, पण असे वाटते की तुमचे डोळे थोडे जास्त मोठे आहेत. तुम्हाला तुमच्या डोळयांना सुंदर आकार द्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या पापण्यांवर गडद रंगांच्या आयशॅडोचा वापर केला पाहिजे किंवा ब्राऊन शेडचा आयशॅडो चांगला आणि नैसर्गिक दिसेल. डोळयांच्या अगदी जवळून एक पातळ आयलायनरची रेघ बाहेरपर्यंत ओढा. ही रेघ शेवटी बाहेरच्या बाजूने जाड दिसली पाहिजे. तुम्हाला तुमची समस्या कायमस्वरुपी सोडवायची असेल तर परमनंट आयलायनर लावा. परमनंट आयलायनरमुळे तुमच्या डोळयांना योग्य आकार मिळेल. मग तुमचे डोळे प्रत्येकक्षणी सुंदर आणि आकर्षक दिसतील.

  • जास्त स्टीम घेतल्यामुळे माझी त्वचा सैल झाली आहे आणि तेज कमी झाले आहे. मला काय केले पाहिजे जेणेकरून त्वचा पूर्ववत होईल आणि सतेज दिसेल?

जास्त वेळा सातत्याने स्टीम घेतल्याने असे होणे स्वाभाविक आहे. आता त्वचा पूर्ववत करण्यासाठी ए.एच.ए क्रिमने चेहऱ्यावर मसाज करा. तसेच अंडयाचा पांढरा बलक चेहऱ्यावर ६-७ मिनिटे लावून मग चेहरा पाण्याने धुवून घ्या. यासह अॅलोवेरा जेल चेहऱ्यावर लावा. उत्तम आणि चांगल्या परिणामांसाठी तुम्हाला एका चांगल्या कॉस्मॅटीक क्लिनिकने लेझर आणि यंग स्किन मास्कच्या काही सिटिंग्स केल्या पाहिजेत.

  • मला कानातले घालायला खूप आवडतात. ते माझ्या चेहऱ्यावर खुलुन दिसतात. पण जेव्हा कधी मी कानातले घालते, तेव्हा माझ्या कानाजवळ पुरळ ऊठू लागले. यामुळे सूजही येते. कृपया माझ्या या समस्येवर उपाय सांगा.

अशाप्रकारची समस्या तेव्हा येते जेव्हा स्किन सेंसेटीव्ह किंवा अॅलर्जिक असेल. तुम्ही नेहमी सोने किंवा चांदीचे कानातले घालणे अधिक योग्य ठरेल. कारण इतर धातूंच्या तुलनेत यापासून अॅलर्जी होण्याची शक्यता कमी असते.

  • माझ्या चेहऱ्यावरचा रंग २ प्रकारचा आहे. काही ठिकाणी काळपट झालेला आहे तर काही ठिकाणी उजळलेला. सनस्क्रिनचा काहीच उपयोग झाला नाही. कृपया काही उपाय सांगा ज्यामुळे रंग एकसमान होईल?

तात्पुरता रंग एक समान करण्यासाठी तुम्ही मेकअप म्हणून कंन्सिलरचा वापर करा. याव्यतिरिक्त कच्च्या पपईचे तुकडे काळपट झालेल्या जागेवर लावा. कच्च्या पपईत पॅपिन नामक एंजाइम आढळते, जे रंग उजळवण्यास मदत करते.

  • मी जेव्हा कधी लिपस्टीक लावते, तेव्हा माझ्या ओठांवर पापुद्रे येतात. कृपया मला लिपस्टीक लावण्याची योग्य पद्धत सांगा?

कधी-कधी काही लिपस्टीक सूट करत नसातील तर अशी समस्या उद्भवू शकते. अशावेळी तुम्ही ब्रँड बदलून पाहू शकता. तसेच चांगल्या गुणवत्तेच्या मॉइश्चरायझिंग लिपस्टीकचा वापरून पाहू शकता. ओठांवरील मृत त्वचा काढण्यासाठी स्क्रबिंग गरजेचे आहे. यासाठी बदाम तेलाचे काही थेंब, साखर एकत्र करून टूथब्रशने ओठांवर हळूवारपणे स्क्रब करा. घरगुती उपाय म्हणून ओठांना हायड्रेट आणि नरीश करण्यासाठी बीटाच्या रसात मध मिसळून ओठांवर लावा. असे केल्यास ओठांवर रंग येईल आणि ते सॉफ्ट होतील.

  • मी २२ वर्षांची नोकरी करणारी मुलगी आहे. स्लिव्हलेस कपडे घालत असल्यामुळे अंडरआर्मचे केस लवकर लवकर रिमूव्ह करावे लागतात. त्यासाठी फिमेल रेारचा वापर करते. यामुळे अंडरआर्म काळपट होत आहे. यासाठी काय करू?

रेझरच्या नियमित वापरामुळे केसांची वाढ कठीण होते म्हणून त्वचा काळी पडते. सर्वप्रथम तुम्ही रेझरचा वापर बंद करा. या केसांपासून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही वॅक्सिंगचा वापर करू शकता किंवा पल्सड लाइट तंत्राद्वारे कायमस्वरुपी केस कमी करण्याचा उपचार करून घेऊ शकता. हे एक इटालियन तंत्र आहे. हा नको असलेले केस काढण्याचा सर्वात वेगवान, वेदनाहिन आणि सुरक्षित पर्याय आहे. लेझर अंडरआर्मवर परिणामकारक ठरते. यामुळे २ ते ३ सिटींग्जमध्ये केस निघून जातील. डार्क अंडरआर्मचा तुम्ही ब्लीचद्वारे लाइट करू शकता, पण ब्लीच नेहमी वॅक्सिंग पूर्वी करावे.

 

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें