बेस्ट हेअर कलर ट्रेंड्स

* सोमा घोष

स्टायलिश हेअर कट आणि हेअर कलर करणं प्रत्येक मुलीला आवडतं. चॉकलेटी, लाल आणि ब्लॉन्ड कायमच ट्रेंडमध्ये राहिलेत, परंतु आता हे ट्रेंड्स दरवर्षीप्रमाणे बदलत आहेत, त्यानुसार मुलींची आवडदेखील बदलत राहते. हीच आवड पाहता स्टायलिस्ट नवनवीन हेअर ट्रेंड्सची फॅशन आहे. हे फक्त तुमच्या व्यक्तिमत्त्वानुसार बदलत नाहीत तर एक वेगळया प्रकारचा कॉन्फिडन्सदेखील देतात म्हणून हे हेअर कलर्स कायमच ट्रेंड्समध्ये असतात. हेअर कलर अनेकदा ऋतू आणि खास प्रसंगी केले जातात. तुमचा हेअर कलर पाहता कोणी देखील तुम्ही कशा प्रकारच्या आहात याचा अंदाज लावतात. योग्य हेअर कलर मिळवण्यासाठी तुम्ही खास तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता. यामुळे तुमचा हेअर कलर तुमच्यासाठी डिझास्टर बनणार नाही.

हेअर कलरच्या  ट्रेंड्सना पकडणं कठीण आहे. यासाठी अलीकडच्या मुलींच्या गरजा लक्षात ठेवाव्या लागतात. स्त्रिया अनेकदा स्वयंपाक घरात असतात आणि कोणत्याही पदार्थाला वेगळा स्वाद देण्यासाठी गरम मसाल्याचा वापर करतात.

बॅलन्स हेअर कलर

काहींना नेहमीच एक बॅलन्स हेअर कलर हवा असतो. काहीना भडक रंग आवडतात, तर काहींना हलके रंग आवडतात. त्यानुसार हे कलर्स मिळतात. दालचिनी, जायफळपासून ते केशर, मोहरी आणि कोकम इत्यादी सर्वांचे हेअर कलर ट्रेंडमध्ये आहेत.

पांढरे केस असणाऱ्या स्त्रियादेखील सहजपणे कलर लावून गॉर्जियस लुक मिळू शकतात. यामध्ये संपूर्ण केसांना रंगविण्याची गरज नसते. लांब स्ट्रिप्स ग्रे केसांवरती छान दिसतो, तर जायफळचा रंग पांढऱ्या केसांवर केल्याने त्याचा रिझल्ट ब्राऊन आणि लाईट ब्राऊन येतो.

हेअर कलर की स्टायलिंग

कॉपर कलर इंडियन लुकमध्ये अधिक चांगला समजला जात नाही, कारण तो वॉर्म कलर आहे परंतु याला हायलाईट म्हणून वापरल्यामुळे याचा लुक खूपच सुंदर येतो. सोनेरी रंगदेखील खूपच प्रसिद्ध आहे आणि सर्व वयातील मुलींना तो सूट करतो. सोनेरी रंग वेणीमध्ये वापरल्याने एक एलिगेंट लुक येतो. याला सर्व मुली सहजपणे करू शकतात. याला हेअर कलरची स्टायलिंग करणेदेखील सहजपणे होतं.

मोकळे केस, वेणी, मेसी बन, अंबाडा इत्यादी कोणत्याही प्रकारच्या हेअर स्टाईल इन हेअर कलरमध्ये छान दिसतात. हेअर कलरसाठी सॅलोनमध्ये जावं लागतं, परंतु स्टायलिंग घरच्या घरी करू शकता. तीन-चार महिन्यापर्यंत याचा लुक खूपच खुलून दिसतो.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें