सौंदर्य समस्या

* एअरब्रश मेकअप एक्सपर्ट,इशिका तनेजा

  • मला घरात नियमितपणे स्क्रबिंग करायचे आहे, पण मी असे ऐकलेय की ते योग्य पध्दतीने केले नाही, तर त्वचेवर विपरित परिणामही होऊ शकतो. स्क्रबिंगची योग्य क्रिया काय आहे?

तुम्ही बरोबरच ऐकलेय. स्क्रब करण्याची योग्य पध्दत ही आहे की आपल्या त्वचेवर हलका दाब देत स्क्रबिंग करावे. खास करून फेशियल त्वचेवर हे खूप आवश्यक आहे. कारण ती जास्त संवेदशील असते. म्हणून याला स्क्रब करताना जास्त काळजी घ्यावी लागते. स्किन ड्राय झाल्यावर तिला स्पेशल केअरसोबतच एक्सफॉलिएटेड करण्याची गरज असते.

कधीही आपल्या चेहऱ्यावर सरळ स्क्रबचा वापर करू नका. आधी आपली त्वचा ओली करा. मग थोड्याशा प्रमाणात स्क्रब घेऊन चेहऱ्यावर लावण्यापूर्वी त्यात थोडे पाणी मिसळा. त्यामुळे स्क्रब सौम्य होतो आणि तो चेहऱ्यावर सहजपणे लावता येऊ शकतो.

  • मी नोकरदार महिला आहे आणि मला कामासाठी जास्त करून उन्हात राहावे लागते. त्यामुळे मला पिग्मेंटेशनची समस्या निर्माण झाली आहे. मी या पिग्मेंटेशनला कसे रोखू कृपा करून मला सल्ला द्या?

स्किन पिग्मेंटशनच्या कारणांमध्ये सन डॅमेज, हार्मोनल डिसऑर्डरपासून ते आनुवंशिक कारणे कारणीभूत असतात. बहुतेक प्रकरणांत सन एक्सपोजर त्वचेच्या पिग्मेंटेंशनचे कारण बनते. आपण पिक टाइमच्या वेळी सन एक्सपोजरपासून दूर राहा. आपला चेहरा आणि हाताला ३० ते ४० एसपीएफ असलेले सनस्क्रीन किमान अर्धा तास आधी लावून मगच उन्हात बाहेर पडावे.

जर आपली त्वचा रेडिएशनबाबत जास्त सेंसिटिव्ह असेल, तर आपल्ण बाहेर जाण्यापूर्वी लावता तेवढेच घरातही सनस्क्रीन लावणे आवश्यक आहे. घरातील आर्टिफिशियल लाइटही त्वचेवर प्रभाव पाडते. कारण यातही काही प्रमाणात रेडिएशन असते. सामान्यपणे घरात असताना एसपीएफ १५ पर्यंतचे सनस्क्रीन लावणे उत्तम असते.

  • बहुतेकदा मेकअप करण्यापूर्वी फाउंडेशन लावण्याचा सल्ला दिला जातो. कृपया सांगा की फाउंडेशन लावण्याची योग्य पध्दत काय आहे?

मेकअपची सुरुवात फाउंडेशन लावून केली जाते आणि ते लावण्यापूर्वी चेहरा चांगल्याप्रकारे स्वच्छ व मॉइश्चराइज करणे आवश्यक असते. आपल्या चेहऱ्याच्या वेगवेगळ्या भागांत फाउंडेशनचे ठिपके लावा. समस्या असलेल्या त्वचेला (असमान त्वचेचा टोन) चांगल्याप्रकारे लावा. नैसर्गिक लुकसाठी ब्लॅडिंग करणे आवश्यक आहे.

  • माझे हात खूप कोरडे आहेत. कोणाशी हात मिळवल्यानंतर मला खूप लाज वाटते. माझे हात मऊ होण्यासाठी मी काय करू?

हातांमध्ये ऑइल ग्लँड्स कमी असतात. म्हणून हात विशेषत: बदलत्या मोसमात रूक्ष होतात. घरातील कामे उदा. कपडे, भांडी इ. धूत राहिल्यामुळेही हातांची त्वचा खराब होते. अशा वेळी हातांना नियमितपणे एक्सफोलिएट आणि मॉइश्चराइज करत राहिले पाहिजे. त्याबरोबरच १ मोठा चमचा लिंबाचा रस, एक छोटा चमचा साखरेत थोडेसे पाणी मिसळून पेस्ट बनवा.

हे मिश्रण हातांना ५ मिनिटे लावून ठेवा. मग हात कोमट पाण्याने स्वच्छ करा. याबरोबरच १/३ कप ग्लिसरीन आणि २/३ कप गुलाबपाणी एकत्र मिसळून ते बाटलीत भरून फ्रीजमध्ये ठेवा. तुम्ही जेव्हा एखादे काम कराल, त्यानंतर हात कोरडे वाटल्यास या मिश्रणाने त्यांना मसाज करा.

  • मी माझ्या केसांबाबत खूपच जागरूक आहे. त्यामुळे त्यांना नियमित तेलाने मालीश करण्याची इच्छा असते, पण वर्किंग असल्यामुळे नेहमी शक्य होत नाही. मला हे जाणून घ्यायचे आहे की, केस धुतल्यानंतर किती तासांनंतर ऑयलिंग केले पाहिजे?

जर आपल्याला आपले केस निरोगी व आकर्षक बनवायचे असतील, तर खरोखरच त्यांना ऑयलिंग करणे आवश्यक आहे. त्यासाठी तेल केस धुण्यापूर्वी लावा, केस धुतल्यानंतर नव्हे. तेल लावल्यामुळे धूळमातीचे कण केसाला चिकटतात. म्हणून केस धुण्याच्या अर्धा तास आधी केसांना ऑयलिंग करत, हळूहळू हेडमसाज करणे, ही चांगली पध्दत आहे. आठवड्यातून २-३ दिवस तेलाने मालीश करा. त्यामुळे केसांना पोषण मिळते.

  • मी सूर्यकिरणांपासून संरक्षण करण्यासाठी सनस्क्रीन लोशन लावते, पण ते लावल्यानंतर मला खूप घाम येतो आणि त्यामुळे सनस्क्रीन निघून जाते. मला सनस्क्रीन लावायची इच्छा असते, पण समस्या निर्माण होऊ नये, म्हणून मला काय केले पाहिजे?

जर सनस्क्रीन लोशन लावल्यानंतरही आपल्याला घाम येत असेल, तर चिकटपणापासून संरक्षण करण्यासाठी सनस्क्रीनसोबत कॅलमाइन लोशन मिक्स करा. पाण्याच्या संपर्कात येण्याने किंवा घामामुळे एसपीएफयुक्त सनस्क्रीनचा प्रभाव नष्ट होऊ लागतो. त्यामुळे अल्ट्राव्हायोलेट किरण त्वचेला सहजपणे नुकसान पोहोचवू शकतात.

म्हणून सनस्क्रीनचा मोठा थर त्वचेवर लावणे खूप आवश्यक आहे.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें