‘व्हॅलेंटाईन डे’ निमित्ताने ‘ही अनोखी गाठ’मधील ‘मी रानभर’ प्रेमगीत प्रदर्शित झी

 * नम्रता पवार

स्टुडिओज आणि महेश मांजरेकर मुव्हिज निर्मित, महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘ही अनोखी गाठ’ या चित्रपटातील पहिले गाणे व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने प्रदर्शित झाले आहे. ‘मी रानभर’ असे बोल असणारे हे गाणे श्रेयस तळपदे आणि गौरी इंगवले यांच्यावर चित्रित झाले असून बेला शेंडेचा या प्रेमगीताला सुमधूर आवाज लाभला आहे. तर हितेश मोडक यांचीही या गाण्यासाठी साथ लाभली आहे. हितेश मोडक यांचेच संगीत लाभलेल्या या गाण्याला वैभव जोशी यांचे बोल लाभले आहेत. मुळात गौरी एक उत्कृष्ट नर्तिका असल्याने तिचे बहारदार नृत्य पाहाण्याची संधी प्रेक्षकांना या गाण्यातून मिळणार आहे.

या गाण्याबद्दल महेश मांजरेकर म्हणतात, ” प्रेमदिनाच्या निमित्ताने हे प्रेमगीत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. खूप सुंदर, भावपूर्ण बोल आणि संगीत लाभलेल्या या गाण्याला गायकही तितकेच दर्जेदार लाभले आहेत. त्यामुळे या गाण्यात अधिक रंगत येत आहे. नवीन नात्याची सुरूवात या गाण्यातून दिसत आहे. हे नाते कसे बहरतेय, याचे सुंदर चित्रण यातून सादर होत आहे.’’ झी स्टुडिओजचे बिझनेस हेड मंगेश कुलकर्णी म्हणतात, ” अनोखी प्रेमकहाणी असणाऱ्या या चित्रपटात हे गाणे अतिशय चपखल बसत आहे. प्रेमाच्या तरल, हळुवार भावना यातून व्यक्त होत आहेत. श्रवणीय असे हे गाणे प्रेमीयुगुलांना नक्कीच आवडेल.’’

दरम्यान, १ मार्च रोजी ‘ही अनोखी गाठ’ चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

 

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें