हे व्यसन तुम्हाला उद्धवस्त करू नये

* गृहशोभिका टीम

लोक झोपेपर्यंत मोबाईलला चिकटून असतात, पण त्यांचे हे व्यसन त्यांना महागात पडू शकते, कारण अमेरिकन जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार, आठवडयातून २० तासांपेक्षा जास्त वेळ टीव्ही किंवा मोबाईल पाहण्याने पुरुषांच्या शुक्राणूंची निर्मिती ३५ टक्के पर्यंत कमी होऊ शकते. अहवालात असेही नमूद आहे की, दिवसातून ५ तासांपेक्षा जास्त वेळ टीव्ही पाहणाऱ्यांच्या शरीरातील शुक्राणूंच्या संख्येत मोठी घट झालेली दिसून आली.

याउलट, जे लोक दिवसभर कार्यालयात रोजचे काम करायचे त्यांच्या शरीरात अशी कोणतीही कमतरता दिसून आली नाही. अशा लोकांच्या शक्राणूंची संख्या किंवा त्यांच्या शरीरातील टेस्टोस्टेरॉन हार्मोनची पातळी कमी झाली नाही. याचे एक कारण हेही असू शकते की, असे लोक खूप जास्त टीव्ही पाहतात. जास्त व्यायाम करत नाहीत आणि पौष्टिक आहार घेत नाहीत. त्यामुळे या दोन्ही सवयी त्यांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम करतात.

वंध्यत्वाचे प्रमुख कारण

टीव्ही किंवा मोबाईलवर चित्रपट पाहणाऱ्यांचा मेंदू एकप्रकारे काम करणे बंद करतो. अति जंक फूड खाल्ल्याने आणि आळसावलेल्या जीवनशैलीमुळे आजकाल अनेक लोक लठ्ठ होत आहेत आणि हेच वंध्यत्वाचे प्रमुख कारण ठरत आहे. लठ्ठपणामुळे स्त्री आणि पुरुष दोघांमधली कामवासना कमी होत जाते.

लठ्ठपणामुळे सेक्स करण्याची इच्छा तर कमी होतेच, सोबतच समागमावेळी शीघ्रपतनाचीही समस्याही निर्माण होते. यामुळे लैंगिक कार्यक्षमतेवर परिणाम होतो, कारण पुरुषाच्या जननेंद्रियात पुरेशी उत्तेजना निर्माण होत नाही.

व्यसनी लोकांच्या शुक्राणूंच्या संख्येत, कॅन, पाकिटबंद पदार्थ आणि उच्च चरबीयुक्त पदार्थांमुळे अॅसिडिटी म्हणजेच आम्लता खूप जलद आणि मोठया प्रमाणावर वाढते, ज्यामुळे शरीराची पीएच पातळी बदलते. आळसावलेल्या जीवनशैलीसह रासायनिक पदार्थ आणि आम्लयुक्त आहार यामुळे शुक्राणूंच्या पेशींचा आकार आणि त्यांची हालचाल बिघडते किंवा शुक्राणू मरतात.

हृदयासाठी धोकादायक

‘ब्रिटिश जर्नल ऑफ स्पोर्ट्स मेडिसीन’मध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, १८ ते २२ वर्षे वयोगटातील २०० विद्यार्थ्यांच्या शुक्राणूंचे नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत गोळा करण्यात आले होते, त्यांच्या विश्लेषणातून असे दिसून आले की, आळसावलेली जीवनशैली आणि शुक्राणूंची संख्या कमी होणे यांचा एकमेकांशी थेट संबंध आहे.

अहवालानुसार, जास्त टीव्ही पाहणाऱ्यांमधील शुक्राणूंची सरासरी संख्या ३७ एमएन मायक्रॉन प्रति मिली होती. जेव्हा की, त्या विद्यार्थ्यांमधील शुक्राणूंची संख्या ५२ एमएन मायक्रॉन प्रति मिली होते, जे खूप कमी टीव्ही बघायचे. आळसावलेली जीवनशैली आणि टीव्ही पाहण्याची सवय लागलेल्या लोकांमधील शुक्राणूंच्या संख्येत सामान्यच्या तुलनेत ३८ टक्के घट दिसून आली.

या अहवालामुळे हेही सिद्ध झाले आहे की, जास्त टीव्ही पाहिल्याने फुफ्फुसात रक्ताच्या गुठळया होण्याची आणि हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू होण्याची शक्यता ४५ टक्के वाढते. टीव्ही किंवा मोबाईल स्क्रीनसमोर आणखी तासभर अधिक घालवल्यास ही शक्यता आणखीनच वाढते.

प्रजननक्षमतेवर परिणाम

काही अहवाल असे सूचित करतात की, दर आठवडयाला सरासरी १८ तास व्यायाम करून शुक्राणूंची गुणवत्ता वाढवता येते, परंतु जास्त व्यायामामुळे शुक्राणूंच्या गुणवत्तेवरही परिणाम होतो. असे आढळून आले आहे की, शारीरिकदृष्टया सक्रिय लोक जे मध्यम व्यायाम करतात किंवा आठवडयातून १५ तास खेळ खेळतात त्यांच्या शुक्राणूंची संख्या कमी शारीरिकरित्या सक्रिय असलेल्या लोकांपेक्षा ३-४ पट जास्त असते.

टीव्ही किंवा मोबाईलसमोर तासनतास एकटक पाहण्याचा थेट संबंध शरीरातील उष्णता वाढण्याशी आहे. थंड वातावरणात शुक्राणूंची वाढ चांगली होते, तर शरीर खूप गरम असल्यास त्यांची वाढ चांगली होत नाही. जास्त व्यायाम करणे आणि सतत टीव्ही पाहणे, दोन्ही शरीरात मुक्त रॅडिकल्सचे उत्पादन आणि उत्सर्जन वाढवतात, ज्यामुळे शुक्राणूंच्या पेशी मरतात, ज्याचा थेट परिणाम प्रजनन क्षमतेवर होतो. म्हणूनच डॉक्टर सल्ला देतात की, तुम्ही सर्वकाही करा, परंतु प्रत्येक गोष्टीची मर्यादा ठेवा.

तुम्ही टीव्ही, मोबाईल पाहा, पण तुम्ही ज्या कोणत्या प्रकारे वेळ घालवाल त्यावेळी सकस आहार घ्या आणि जीवनाचा चांगल्या प्रकारे आनंद घ्या.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें