ओठ फुटण्यापासून असे सांभाळा

* डॉ. भारत खुशालानी

बऱ्याचदा लोक ओठ फुटण्याच्या समस्येला फार गांभीर्याने घेत नाहीत. घरातील उष्ण कोरडया हवेमुळेही ओठ हलकेसे फुटतात, पण जेव्हा ओठ गंभीर प्रकारे फुटतात, तेव्हा ते एखादा रोग किंवा आजार असल्याचे दर्शवतात. असे कुपोषण किंवा निर्जलीकरण म्हणजेच डिहायड्रेशन यामुळेही होऊ शकते. हे त्वचेच्या दाहामुळेही होऊ शकते.

त्वचेचा दाह ही कोरडया त्वचेची एक अशी स्थिती आहे जी उष्णतेमुळे कधीकधी उत्तेजित होते. त्वचेवर काही उत्पादनांचा वापर केल्यानेही त्वचा संवेदनशील होऊ शकते. खूप वेळपर्यंत सूर्याच्या प्रखर किरणांच्या संपर्कात आल्यामुळेही त्वचेचे नुकसान होते, ज्यामुळे ओठ सुकतात आणि फुटू लागतात.

समस्येचे कारण

हर्पीस व्हायरसमुळे त्वचा कोरडी होते. या व्हायरसने निर्माण केलेले हे ‘थंड घाव’ खूप संसर्गजन्य असतात. जर या व्हायरसची लागण झालेल्या व्यक्तिचा कप दुसऱ्या कोणा व्यक्तिने वापरला तर त्याला हा रोग होण्याची पुरेपुर शक्यता असते. जेव्हा ओठांवर अशा थंड घावांची स्थिती निर्माण होते, तेव्हा डॉक्टर त्यावर बेंजोकोन जेल लावायला सांगू शकतात.

हे एक लोकल अॅनेस्थेटिक असून सर्वसाधारणपणे कॉमन पेन रिलीफसाठी वापरले जाते. तोंडाच्या अल्सरसाठी मिळणाऱ्या अॅनेस्थेटिक उत्पादनांत आणि मलमांत हा घटक सक्रिय असतो. थंड घाव ठीक होईपर्यंत त्वचेचे रक्षण करण्यासाठी हे मलम वापरत राहणे योग्य ठरते.

नवीन उत्पादनांच्या वापरामुळे ओठांची जळजळ होऊ शकते. त्यामुळे अशी नवीन उत्पादने टाळली पाहिजेत. त्वचा विशेषज्ञांनुसार टूथपेस्ट हेसुद्धा ओठांच्या समस्येचे कारण होऊ शकते. त्यामुळे आपण असा फॉर्म्युला असलेली टूथपेस्ट वापरली पाहिजे ज्यात त्वचेला उत्तेजित करणारे घटक नसतील. ओठ ठीक होईपर्यंत बेकिंग सोडयाचा वापरही करू शकता. सूर्य प्रकाशात, हिवाळयात किंवा उन्हाळयात बाहेर पडताना नेहमी आपल्या ओठांना सनस्क्रीन लावून सुरक्षित ठेवा.

अशाप्रकारे करा देखभाल

ऑनलाइन मिळणाऱ्या मधमाशीच्या मेणाच्या डब्या गंभीररित्या फुटलेल्या ओठांवर उपचार करण्यासाठीही सर्वात जुन्या आणि प्रभावशाली पद्धतींपैकी एक आहेत. हे मेण ओठांना फुटण्यापासून रोखते आणि ओठांना आर्द्रता प्रदान करते.

आपल्या ओठांची त्वचा खूप पातळ असते, त्यामुळे शरीराच्या इतर भागांपेक्षा ती अधिक संवेदनशील असते. खरंतर ओठांवरील बाह्य स्तर हा इतका पातळ असतो की ओठ लाल दिसू लागतात, कारण ओठांचा पातळ थर हा त्वचेच्या खालील रक्तवाहिन्यांना दृश्यमान करतो आणि ओठांची त्वचा ही अतिशय पातळ असल्याने ती कोरडी आणि थंड हवा आणि प्रखर सूर्यप्रकाश यांपासून आपल्याला संरक्षण देऊ शकत नाही.

ब्रँडेड उत्पादने वापरा

जीभ ही ओठांच्या नजीक असल्याने, ती नकळतच स्वयं आपले कार्य करते. जेव्हा आपले ओठ सुकतात, तेव्हा आपोआपच आपली जीभ ओठांवरून फिरली जाते. जेव्हा जीभ ओठांना लागते, तेव्हा लाळेमुळे ओठ ओले होतात. पण काही वेळानंतर या लाळेचे बाष्प होऊन ती उडून जाते आणि मग ओठ पहिल्याहून अधिकच सुकतात. अशावेळी सुगंधी लीप बामचा वापर टाळा, कारण ते ओठांना अधिकच त्रासदायक ठरू शकतात.

ओठांना फुटण्यापासून वाचवण्यासाठी काही महत्त्वपूर्ण पावले उचलता येतील, उदाहरणार्थ :

* सर्वप्रथम आपल्या ओठांना मॉइश्चराइझ करा, कारण कोरडेपणा राहिला नाही तर ओठ फुटणारच नाहीत.

* चुकूनसुद्धा ओठांवरून जीभ फिरवू नका.

* निर्जलीकरण म्हणजेच डिहायड्रेशन हे पाण्याच्या कमतरतेमुळे होते आणि हेसुद्धा ओठ फुटण्याचे एक संभावित कारण आहे. त्यामुळे स्वत:ला हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. शक्य होईल तेवढे मसालेदार आणि चिवडा-फरसाण अशा पदार्थांपासून दूर रहा. याशिवाय तोंडाने श्वास घेण्याचा जास्त प्रयत्न करू नका.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें