Diwali Special: वेगळ्या लुकसाठी, अशी प्रकाशयोजना करा

– सुमन वाजपेयी

घरी प्रकाश अशा प्रकारे करायला हवा की भिन्न लुकसह, त्याचा प्रत्येक कोपरादेखील लखलखीत व्हावा. आजकाल बाजारात प्रकाशयोजनेचे एवढे पर्याय उपलब्ध आहेत की आपण आपली छोटीशी सर्जनशीलता वापरून आपले घर प्रकाशाने भरू शकता.

आजकाल एलईडी दिवे लावण्याचा ट्रेंड आहे. याबरोबरच पारंपारिक दिवे लावण्याची फॅशनदेखील आहे, त्यामुळे इंडो-वेस्टर्न टच लाइटिंगमध्येही दिसून येत आहे. मार्केटमध्ये नवीन पद्धतीचे दिवे दिसून येतात, मेणबत्त्यांची विविधतादेखील एवढी आहे की आपण त्यांपासून आपल्या घराच्या प्रत्येक खोलीला नवीन शैलीने सजवू शकता.

घरात जे काही दिवे, मेणबत्त्या आणि विद्युत दिवे लावाल ते उत्तम असावेत परंतु फारच हेवी शेडचे नकोत आणि त्यांचा प्रकाश इतका तीक्ष्ण नसावा की डोळयांना बोचेल. प्रकाश तेव्हाच चांगला वाटतो जेव्हा तो डोळयांना बोचणार नाही आणि घराला चमक देईल. घराच्या एखाद्या कोपऱ्याला हायलाइट करण्यासाठी ट्रेक लाईट्स, तर स्टाईलिश लुकसाठी परी दिव्यांचा विकल्प निवडला जाऊ शकतो.

खास लुकसाठी एलईडी दिवे

एलईडी दिव्यांमध्ये २ रंगांचे संयोजन पाहावयास मिळते. आपण आपल्या ड्रॉईंगरूमच्या भिंतीच्या रंगांशी जुळण्यानुसार किंवा कॉन्ट्रास्टनुसार रंग संयोजन निवडू शकता. दिवाळीत हिरवा आणि पिवळा रंग किंवा लाल आणि केशरीसारखे रंग चांगले वाटतात. जर आपण हे दिवे प्रकाशित करून ठेवले नाहीत तर ते सामान्य निवासस्थानासारखे दिसतील, परंतु प्रकाशित केल्यावर एक अद्भूत हिरवा आणि पिवळा प्रकाश तुमच्या खोलीत चमकेल.

आपल्या लिव्हिंग रूममध्ये ३-४ फूट उंचीचे म्यूजिकल लाइट ट्री लावा. यात लहान एलईडी बल्ब असतात, जे सामान्यत: कृत्रिम फुले व पानांनी सजवलेले असतात. इलेक्ट्रिक कलश लाइट्स म्हणजेच कलशच्या आकाराचे हे दिवे बसवून घरात पारंपारिक लुक तयार केला जाऊ शकतो. बऱ्याच रंगांमध्ये उपलब्ध, आपण हे दिवे घराच्या मुख्य गेटवर किंवा खिडकीवरदेखील लावू शकता. २ मीटर लांब असल्याने मोठा भाग याद्वारे व्यापला जातो.

दिवाळीच्यावेळी इको फ्रेंडली एलईडी दिवेही लावले जाऊ शकतात. सिंगल कलरच्या एलईडी दिव्यांपासून ते मल्टीकलर आणि डिझायनर दिव्यांपर्यंत सर्व उपलब्ध आहेत. द्राक्षे, बेरी आणि लीचीच्या आकाराव्यतिरिक्त आपण फुले, डमरू आणि मेणबत्त्यांच्या डिझाईनवाले रंगीबेरंगी दिवेदेखील खरेदी करू शकता.

या दिवाळीत डीजेवाली लेझर लाइट्स तुमच्या सेलिब्रेशनमध्ये रंग भरू शकते. लेझर पॅनेलमधून निघणाऱ्या नमुन्यांचा कव्हरेज एरिया १०० ते २०० मीटरपर्यंत असतो. काही पॅनेल लेझरचा एकच नमुना उत्सर्जित करतात, तर काही पॅनेल भिन्न-भिन्न. विशेष गोष्ट अशी आहे की आपण या लेझर लाईट्सची गती आपल्यानुसार सेट करू शकता.

बाजारात नवरत्न आणि मल्टीकलर झालरिंनाही मागणी आहे. यंदा झालर्ससाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. इतर उत्पादनांप्रमाणेच झालरमध्येही एलईडी दिवे जास्त वापरण्यात येत आहेत. एलईडी दिवे असलेल्या नवरत्न झालरी खूप चांगल्या दिसतात. या रंगीबेरंगी प्रकाश देणाऱ्या झालरी जास्त प्रमाणात उजेड देतात. याशिवाय पारंपारिक झालरींमध्येही मोठया बल्बचा पर्याय उपलब्ध आहे. रेडिमेड फिटेड झालरदेखील घरासाठी खरेदी केली जाऊ शकते.

कंदीलने सजावट

दिवाळीनिमित्त जवळजवळ सर्व घरात कंदील बसवले जातात. अशा परिस्थितीत, आपण एका अनोख्या शैलीत कंदील सजवल्यास घराचा लखलखाट पाहून अतिथी तुमची प्रशंसा केल्याशिवाय राहणार नाहीत. रंगीबेरंगी कागदी पिशवी वापरून कागदाचे कंदील बनवा. पिशवीचा वरचा भाग खाली करा आणि त्यास वायरने बांधून घ्या. बॅगमधून हँडल काढा आणि त्यावर रिबन अटकवा. वरच्या भागात एक छिद्र करा आणि आतमध्ये बल्ब लावून प्रकाशित करा, तसेच आपण पारंपारिक कागदाच्या कंदीलऐवजी काचेच्या कंदीलनेदेखील घर सजवू शकता.

दिवे स्वत: बनवता येतात

* जुन्या काचेच्या बरणीवर आपला आवडता रंग स्प्रे करा. यानंतर, गोल्डन कलरने भिन्न डिझाइन देताना वर आणि खाली स्प्रे करा. आता या पेंट केलेल्या बरणीमध्ये एलईडी लाइट किंवा मेणबत्ती ठेवा. तुमचे घर लखलखून जाईल. आपण कप केकच्या साचांनीदेखील फॅन्सी लाइट बनवू शकता. एक लांब तार घ्या आणि त्यात कप केकचा साचा जोडा आणि आतून एक लहान बल्ब लावा आणि ड्रॉईंगरूमच्या कोपऱ्यात ठेवा.

*कोल्डड्रिंकची प्लास्टिकची बाटली मध्यभागी कात्रीने कापा. झाकणासह बाटलीचा वरचा भाग वापरा. कात्रीने प्लास्टिकच्या बाटलीवर एक लांब कट टाका आणि त्याला फुलाचा आकार देण्यासाठी बाहेरून दुमडवा. यानंतर, प्लास्टिकला फुलांच्या पानाचा आकार द्या आणि प्रत्येक पानांवर थोडीशी चमक लावा. प्रकाशासाठी मध्यभागी मेणबत्ती पेटवा आणि घराच्या लॉबी व बाल्कनीच्या कोणत्याही कोपऱ्यात सजवा.

* काचेच्या काही बाटल्या गोळा करा. रंगीबेरंगी पारदर्शक पत्रके बाजारात उपलब्ध आहेत. त्यांना बाटलीवर लावा आणि पातळ एलईडी दिवे आत ठेवा. सर्व बाटल्यांमध्ये पिवळा प्रकाश टाकून, त्याचा प्रभाव भिन्न असेल.

* छिद्रित सजावटीचे पितळी दिवे प्रकाशाला एक सुंदर परिमाण देतात. या दिव्यांमध्ये सजावटीच्या नमुन्यांत बनविलेल्या छिद्ररांमधून चारीबाजूला चाळून विखुरणाऱ्या प्रकाशाने संपूर्ण वातावरण प्रकाशित होते. तसेच, अशा काही खास दिव्यांच्या प्रकाशामुळे भिंतींवर फुले किंवा इतर प्रकारच्या सुंदर आकृत्या तयार होतात, ज्यामुळे घराला उत्सवाची चमक मिळते.

* लाल रंगात तडकलेले काचेचे कंदील तुटलेल्या काचेसारखा प्रभाव सोडतात. त्यामध्ये मेणबत्ती किंवा दिवा ठेवा. या कंदीलची चमकणारी प्रतिमा आपल्याला आश्चर्यचकित करेल.

* सुंदर फुलांचे आणि इतर आकृत्यांचे टी लाईट्सदेखील प्रकाशाला एक अनोखा लुक देतात. या छोटया-छोटया टी लाईट्ससह चमकणारे दिवे घराला एक सुंदर रूप देतात. यांना आकर्षक टी लाईट होल्डर्समध्ये ठेवून आपण घराचा प्रत्येक गडद कोपरा सुंदरपणे प्रकाशमय करू शकता.

मेणबत्त्यांची कमाल

रंगीबेरंगी रंगात आढळणाऱ्या सामान्य मेणबत्त्या एका ओळीत ठेवल्यावर त्या चारी बाजूला लखलखाट पसरवतात. मेणबत्त्या आजकाल असंख्य शेपमध्ये आणि आकारांमध्येदेखील आढळत आहेत. मेणबत्त्या आपल्या सजावटीच्या वस्तुंजवळ ठेवू शकता. त्यांना गोलाकार शेप देत कोपऱ्यात सजवा. दिवाळीत यांच्या लुकलुकणाऱ्या ज्योती खूप चांगल्या वाटतात. फ्लोटिंग मेणबत्त्यादेखील एक विशेष आणि सुंदर पर्याय आहेत. मातीच्या किंवा मॅटेलच्या एखाद्या मोठया वाडग्यात किंवा दिव्यामध्ये पाणी भरा आणि त्यात अनेक लहान फ्लोटिंग मेणबत्त्या ठेवा. पाण्यात तरंगणाऱ्या या सुंदर फ्लोटिंग मेणबत्त्याचा गट खूपच आकर्षक दिसेल. या पाण्यात गुलाबाच्या फुलांची पाने घालून आपण यात प्रकाशासह रंगाचा सुंदर तालमेल बनवू शकता.

याशिवाय आजकाल बाजारात एलईडी मेणबत्त्याही आल्या आहेत. उत्सवांमध्ये कोणताही त्रास न घेता या घर रोषणाईसाठी उत्कृष्ट आहेत. आपण स्तंभ मेणबत्त्या, विशिष्ट आकाराच्या सजावटीच्या मेणबत्त्या, मुद्रित आकृतिबंध असलेल्या मेणबत्त्या इ.नीदेखील घर प्रकाशाने भरु शकता. रंग बदलणाऱ्या मेणबत्त्या या दिवसात बऱ्याच चर्चेत आहेत, कारण त्या रिमोट कंट्रोलद्वारे नियंत्रित होतात, ज्यामुळे आपण एकाच वेळी १२ पर्यायांपैकी ३ रंग प्रदर्शित करू शकता. यातील सुगंध आणि रंग बदलण्याची शैली आपल्या घरास एक नवीन रूप देईल.

दिव्यांनी प्रकाशित व्हावा प्रत्येक कोपरा

पारंपारिक चिकणमातीच्या दिव्यांचे अस्तित्व कधीच संपत नाही म्हणूनच त्यांना नवनवीन आकारातदेखील तयार केले जात आहे, अगदी प्रत्येक खोलीच्या सजावटीची काळजी घेण्याबरोबरच पेंटिंगसह त्यांच्यावर खास सजावटदेखील केली जात आहे. आपण घराच्या प्रत्येक भागात दिवे ठेवू शकता. घराच्या प्रवेशद्वारावर दिव्याचाच आकार देऊन हे दिवे ठेवता येतील किंवा फुलांचा आकार देऊन यांच्या सभोवताली ताज्या फुलांची पानेदेखील कलात्मकतेने सजविली जाऊ शकतात.

हे दिवे, प्रत्येक आकारात आणि नाविन्यपूर्ण डिझाईन्समध्ये उपलब्ध आहेत, पेंटेडदेखील उपलब्ध आहेत आणि त्यांवर सजावटदेखील केली जाते. त्यांना ड्रॉईंग रूमच्या भिंतींच्या बाजूने ओळी बनवत ठेवा. यांचा एकत्रितपणे निघणारा प्रकाश खोलीस एका वेगळयाच उजेडाने भरेल. ते टेबलावर सुशोभितदेखील केले जाऊ शकतात.

यावेळी नवीन ट्रेंड पाहिला जात आहे, तो म्हणजे इलेक्ट्रिक दिवे. आपण २० किंवा अधिक दिवे असलेल्या यांच्या सरी कोणत्याही खोलीत लावू शकता. त्या दारावरही लटकवू शकता. या व्यतिरिक्त लटकणारे दिवे आणि टॉवरसारखे फिरणारे दिवेदेखील आपल्या घराच्या सजावटीची शोभा वाढवतील.

बॅटरीचे दिवेदेखील आपल्या घरास फॅन्सी लुक देऊ शकतात. १ दिवा असलेली बॅटरी ३० ते ४० रुपयांना बाजारात मिळते. हिचे फॅन्सी कव्हर बनवण्यासाठी पिठाचा उंडा, संत्रीची गोल साल किंवा शंख इत्यादी घ्या आणि त्यांस लेस, कुंदन, स्वरोस्की इत्यादीने सजवा. याशिवाय याच साचांमध्ये गरम मेण भरून आपण घरीच मेणबत्त्या बनवू शकता. या वॅक्स कँडलच्या सभोवती आपण दालचिनीच्या स्टिक लावूनदेखील सजवू शकता.

बॅटरीचालित गोलाकार सिल्वर एलईडी दिवे घराच्या कोणत्याही भागात वापरता येतील. राइस लाइट्सदेखील एक चांगला पर्याय आहे. या दिव्यांमध्ये असलेले २० कंदील दोन्ही बाजूंनी भिन्न रंग दर्शवतात. त्यात सामान्यत: ३८ बल्ब असतात. ते खिडक्यांवर लावले जाऊ शकतात. संपूर्ण खिडकी याद्वारे लखलखून जाईल.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें