स्मार्टफोनचे व्यसन आहे वाईट

* ललिता गोयल

स्मार्टफोन आपल्या सगळयांच्या जीवनाचा एक अभिन्न अंग बनला आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण याच्यावर अवलंबून असतो, मग गोष्ट सकाळच्या अलार्मची असो, ऑनलाईन पेमेंटची, शॉपिंगची, बोअर झालं की संगीत ऐकणे किंवा चित्रपट बघणे, एखादा महत्वाचा मेल करायचा असो किंवा आपल्या मित्रांशी व नातेवाईकांशी कनेक्ट राहायचे असो. आपणा सगळयांचा पूर्ण संसार या लहानशा वस्तूत  सामावलेला आहे. परंतु तुम्हाला हे माहीत आहे का की या लहानशा वस्तूशी आपली ही जवळीक आपल्या दैनंदिन वर्तणुकीत कित्येक समस्यासुद्धा निर्माण करत आहे? जर तुम्ही स्मार्टफोनमधून महत्वाची माहिती काढू शकला नाहीत तर तुम्ही त्रासून जाता. जर तुमच्यापर्यंत मेसेज किंवा कॉल पोहोचत नसेल, तर तुम्ही बेचैन होऊ लागता. जर तुमच्याकडे प्रीपेड कनेक्शन असेल, तर स्मार्टफोनमध्ये बॅलेंस कमी होताच तुम्ही घाबरून जाता. कित्येक व्यक्तींमध्ये इंटरनेटचं स्पीडही टेन्शन वाढवतो.

फेसबुक वा अन्य सोशल नेटवर्किंग साईटवर स्वत:चा स्टेटटस अपलोड करू न कल्याने वा इतरांचा स्टेटस वाचू न शकल्यानेही अस्वस्थता जाणवते.

याव्यतिरिक्त काही लोकांना नेहमी आपला स्मार्टफोन हरवणार असल्याची भीती सतावत राहते. याचा अर्थ जर एक मिनिटही फोन त्यांच्या नजरेपासून दूर झाला तर ते बेचैन होऊ लागतात. आपला स्मार्टफोन हरवल्याच्या भीतिने त्यांच्या हृदयाची धडधड वाढते.

नोमोफोबिया नावाचा आजार

लोवा स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये अलीकडेच लावलेल्या शोधानुसार स्मार्टफोन लोकांमध्ये नोमोफोबिया नावाचा आजार निर्माण करत आहे. या रोगाच्या व्यक्तीला सतत आपला मोबाईल हरवण्याची भीती वाटत राहते आणि कित्येकदा तर हा फोबिया माणसांवर एवढा वरचढ होतो की टॉयलेटमध्येसुद्धा ते आपला मोबाईल बरोबर घेऊन जातात आणि दिवसातून कमीतकमी ३० पेक्षा जास्त वेळा आपला फोन चेक करतात. प्रत्यक्षात त्यांना भीती वाटत असते की फोन घरी विसरलो तर त्यांचा एखादा महत्वाचा मेसेज किंवा कॉल मिस होईल आणि त्यांची हीच भीती त्यांच्या वर्तणूक आणि व्यक्तिमत्वातील बदलाचे कारण बनते. या भीतिने त्रस्त लोकांना वाटत राहते की फोनविना आपला सगळया जगाशी काहीच संपर्क राहणार नाही.

फोनविना जीवन अपूर्ण

लंडनमध्ये झालेल्या एका दुसऱ्या संशोधनात म्हटलं आहे की नोमोफोबिया आजच्या काळातली एक गंभीर समस्या आहे आणि यांच्या गांभीर्याला समजून घेण्यासाठी जवळपास १००० लोकांवर संशोधन झालं, ज्यात ६६ टक्के लोक म्हणाले की त्यांना आपला मोबाईल हरवण्याची भीती त्रास देत राहते. संशोधनात असंही दिसून आले की १८ ते २४ वर्षांमधील तरुणांमध्ये मोबाईलप्रति सर्वाधिक जवळीक आहे. या वयातील साधारणत: ७७ टक्के लोक मोबाईलविना एक मिनिटसुद्धा राहू शकत नाहीत. अशा लोकांना वाटतं की मोबाईलविना आपलं जीवन अपूर्ण आहे. ते याच्याशिवाय राहू शकणार नाहीत. संशोधनात असेही दिसून आले की नोमोफोबिया झालेली व्यक्ती दिवसातून कमीतकमी ३७ वेळा आपला मोबाईल चेक करते.

उपाय काय

मानलं की स्मार्टफोनचे टेक्निक तुम्हाला स्मार्ट आणि अपडेट ठेवते, पण त्याबरोबरच हे लक्षात ठेवायची गरज आहे की ही टेक्निक तुमची सुविधा बनण्याऐवजी डोकेदुखीचे कारण न बनो. मोबाईल फोनच्या या व्यसनातून बाहेर निघायला आवश्यक आहे की तुम्ही तुमच्या जीवनाचं काहीतरी ध्येय ठरवावं. स्वत:ला आपल्या आवडीच्या छंदात व्यस्त ठेवायचा प्रयत्न करा. ऑफिसमध्ये काम करताना फोन एरोप्लेन मोडवर ठेवा. असे केल्याने तुम्ही फालतू कॉल्स आणि मेसेजेसपासून दूर राहाल. आपल्या सगळया सोशल मिडिया अॅपचे नोटिफिकेशन बंद ठेवा. सोबतच फोनमध्ये फालतू अॅप्स ठेवू नका. यामुळे तुम्ही फोनवर अवलंबून राहणार नाही. काल्पनिक जगातले संबंध निभावण्याऐवजी खऱ्या जीवनातल्या मित्रांबरोबर वेळ घालावा. शक्य तितके स्वत:ला फोनपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करा.

बना टेक्नोस्मार्ट मॉम

– गरिमा पंकज

घरगुती कामं असो किंवा नातीगोती सांभाळणं असो, मुलांचा गृहपाठ करून घ्यायचा असो किंवा प्रेमळ आईचे कर्तव्य पार पाडायचे असो, नव्या तंत्रज्ञानाचा हा नवा काळ प्रत्येक क्षण खास बनवतो.

एकीकडे स्मार्ट फोनमुळे तुम्ही सुंदर फोटो काढून कधीही कुठेही सोशल साईट्सवर अपलोड करू शकता, तर प्रिंटरच्या मदतीने सजावटीसाठी रंगबेरंगी डिझाइन्सच्या प्रिंट काढून आपली कला सादर करू शकता.

गृहिणींसाठी किती उपयोगी

ऑफिस असो किंवा घर, तंत्रज्ञान प्रत्येक क्षेत्रात महिलांसाठी सुविधा घेऊन आले आहे. फक्त गरज आहे हे समजून वापरून पहाण्याची. तंत्रज्ञानाबद्दल बोलायचे तर हा काळ सध्याचा तंत्रज्ञानाचा सुवर्णकाळ म्हटला पाहिजे.

एनर्जी सप्लायर अॅन्ड पॉवरद्वारे काही काळापूर्वी युकेच्या ५७७ वयस्कर महिलांवर केल्या गेलेल्या अभ्यासानुसार महिला साधारणत: एका आठवड्यात १८.२ तास घरकामांमध्ये घालवतात व या कामांमध्ये क्लिनिंग, व्हॅक्यूमिंग, शॉपिंग व कुकिंग इ.चा अंतर्भाव आहे. याउलट ५ दशकांपूर्वी हेच प्रमाण ४४ टक्के प्रति आठवडा होते.

घरगुती कामांमध्ये लागणारा कमी वेळ घटत आहे कारण नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.

एक काळ होता जेव्हा महिलांचा सर्व वेळ जेवण बनवण्यात, मुलांना सांभाळण्यात आणि घरगुती कामे आवरण्यात व्यतित होत असे. पण आज काळ बदलला आहे. नव्या तंत्रज्ञानामुळे घरगुती महिलासुद्धा पटापट कामं संपवून आपल्या वाचलेल्या वेळेचा सदुपयोग करत आहेत. आज स्वयंपाक करण्यासाठीही इलेक्ट्रॉनिक व इतर अनेक प्रकारचे गॅझेट्स उपलब्ध आहेत. त्यामुळे वेळेची बचत होऊ शकते.

कुकर, रोटीमेकर, डिशवॉशर, टचस्क्रीन इंडक्शन, ओव्हन अशी कितीतरी उत्पादने आहेत, ज्यांनी किचनची कामं सोपी केली आहेत. तसेच फुल्ली ऑटोमॅटिक वॉशिंग मशिन, व्हॅक्यूम क्लिनर अशी उत्पादने घरातील कामे अधिक वेगाने करण्यास मदत करतात. यामुळे अधिक सहजतेने उत्तम काम होते. पण या सर्व वस्तू व्यवस्थित वापरता यायला पाहिजेत.

तंत्रज्ञान समजणे आवश्यक

दिल्लीच्या मनीषा अग्रवाल, ज्या गृहिणी आहेत, त्या सांगतात, ‘‘मी सर्व प्रकारचे तंत्रज्ञान माहीत करून घेते. कोणतंही नवं तंत्रज्ञान आलं की ते समजून घेण्याचा मी प्रयत्न करते. त्यामुळे गृहिणी असूनही मी घराबाहेरीलसुद्धा वरवरची सर्व कामे करते. उदा. बँकेची सर्व कामे जसे एफडी, डीडी वगैरे बनवणे, अपडेट करणे, क्रेडिट/डेबिट कार्ड्सचा वापर करून ट्रान्झक्शन करणे, ऑनलाइन तिकिट बुक करणे, आधारला पॅन कार्ड लिंक करणे, एलआयसीचे प्रिमियम भरणे वगैरे. प्रत्येक ठिकाणी कामे कॉम्प्यूटराइज्ड व ऑनलाइन होऊ लागली आहेत. मी सहजतेने ती कामे करते.

‘‘खरंतर, महिलांना तांत्रिक ज्ञान असणे गरजेचे आहे. त्यांना कॉम्प्युटर हाताळता आला पाहिजे. गॅझेट्सच्या तांत्रिक बाबींची समज असायला पाहिजे. तेव्हाच ती स्मार्ट स्त्री बरोबरीनेच हुशार आईसुद्धा बनू शकते.

‘‘मुलांचा गृहपाठ मलाच करवून घ्यायचा असतो. त्यांना अशा प्रकारचे प्रोजक्ट्स मिळतात, जे कॉम्प्यूटर आणि प्रिंटरशिवाय अशक्य असतात. कॉम्प्युटरद्वारे साहित्य तयार करावे लागते. एमएस पॉवर पॉइंट, एमएस पेंट, एमएस वल्ड वगैरेवर काम करावे लागते. मग प्रोजेक्ट तयार करून प्रिंटरमधून कलर प्रिंटआउट काढावे लागतात. या सर्वांसाठी कॉम्प्युटर आणि त्याच्या सॉफ्टवेअरशी परिचित असावे लागते.

‘‘मला तर असे जाणवले आहे की महिला तांत्रिक बाबतीत हुशार असेल तर ती फक्त पति व मुलांचीच मदत करू शकत नाही तर ओळखीचे परिचित व नातेवाईकांचीही मदत करू शकते.’’

स्वावलंबी होत आहेत महिला

आज तंत्रज्ञानाने आपल्याला इतक्या सुविधा दिल्या आहेत की एका टचने आपण मैलो न् मैल दूर असलेल्या व्यक्तिशीही संवाद साधू शकतो. स्मार्टफोन हातात असेल तर कितीही दूर असणाऱ्या आपल्या परिचितांना किंवा तज्ज्ञांना आपण आपली समस्या सांगून समाधान मिळवू शकतो.

स्क्रीनशॉट आणि व्हॉट्सअॅपद्वारे फोटो पाठवून प्रत्येक माहिती शेअर केली जाऊ शकते. याचाच परिणाम म्हणजे महिला घरपरिवार, मुलं वा ऑफिसशी सबंधित कुठल्याही समस्या स्वत: सोडवण्यासाठी समर्थ बनू शकल्या आहेत.

कुठेही जाणे झाले सोपे

जर महिलांना एकटे किंवा मुलांसोबत कुठे जाणे गरजेचे असेल तरी टेन्शनचे काही कारणच नाही. ऑनलाइन तिकिट सहजतेने बुक करून त्या पुढचा प्लान बनवू शकता. हल्ली तर असे अॅप्स आले आहेत, ज्याद्वारे ५ ते १० मिनिटात कॅब घरी बोलावली जाऊ शकते. गूगल मॅपच्या सहाय्याने जगातील कुठल्याही कोपऱ्यात सहज पोहोचता येते. कुठल्याही प्रकारच्या असुरक्षिततेच्या भावनेशिवाय महिला भ्रमंती करू शकतात. कारण तंत्रज्ञानाने स्मार्टफोनमध्ये असेही अॅप्स दिले आहेत, जे त्यांची सुरक्षित यात्रा सुनिश्चत करतात.

नव्या पर्यायांची वाढती शक्यता

महिला स्मार्टफोनमुळे फेसबुक वगैरेच्या सहाय्याने त्यांच्या शाळा कॉलेजच्या मित्रमैत्रिणींच्या संपर्कात राहू शकतात. त्यामुळे त्यांना करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी वेगवेगळ्या पर्यायांची माहिती मिळू शकते. त्यामुळे मेंदूला चालना मिळते. आजकाल महिला घरातूनही फ्रिलान्सींग कामे करू लागल्या आहेत. वेबसाइट्स बनवू लागल्या आहेत. बिझनेस करू लागल्या आहेत. या सर्व गोष्टींची सकारात्मक बाजू ही आहे की महिला स्मार्ट आणि अॅक्टिव्ह बनण्याबरोबरच स्वावलंबीसुद्धा बनत आहेत.

जबाबदाऱ्या सांभाळण्याचे सामर्थ्य

लेखिका व समाजसेविका कुसुम अंसल म्हणतात, ‘‘जगाने जरी २१व्या शतकात पदार्पण केले असले तरी आजही भारतात बहुंताशी महिला कुटुंबाशी संबंधित घरगुती कामे आणि वेगवेगळ्या जबाबदाऱ्यांशी जोडल्या गेल्या आहेत. पुरुषांच्या तुलनेत त्या कमी तर्कसंगत आणि कुशल समजल्या जातात. पण आता तंत्रज्ञानाच्या विकासामुळे या रूढीवादी बाधा पार केल्या जाऊ लागल्या आहेत. आजच्या स्त्रिया स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वगैरे सहजतेने अॅक्सेस करू शकतात. त्या यूट्यूबसारख्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म्सवर वेगवेगळ्या ट्यूटोरिअल्स मार्फत शिकून आपली योग्यता वाढवू शकतात, जेणेकरून आपले हित व जबाबदाऱ्या त्या समर्थपणे पेलू शकतील.

‘‘असं नाही की महिलांसाठी तांत्रिक ज्ञान समजून घेणं अवघड आहे व त्यांना याची समज नाही. त्यांना वाटले तर त्या या क्षेत्रात पुरूषांपेक्षा कितीतरी यशस्वी होऊ शकतात. हल्लीच रिटे्रवोद्वारा केल्या गेलेल्या गॅजेटोलॉजी टीएम स्टडीनुसार महिला ग्राहक इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्ट्सबद्दल पुरुषांपेक्षा जास्त माहिती ठेवतात आणि पुरूषांना याबाबतीत भ्रम आहे की त्यांना अधिक माहिती आहे.

स्त्रियांनी हे समजून घ्यायला हवे की आपले कुटुंब व मुलांना प्रत्येक क्षेत्रात पुढे जाण्यासाठी आणि सफल बनवण्यासाठी गरजेचे आहे की त्यांनी स्वत:ही स्मार्ट बनावे. टेक्नोसॅव्ही वूमन बनून त्यांनाही मार्गदर्शन करा.’’

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें