तुम्हाला उत्सवात वेगळे दिसायचे असेल तर सोन्याचा मुलामा असलेल्या दागिन्यांसह ट्रेंडी लुक मिळवा

* सोमा घोष

सोन्याच्या दागिन्यांचे नाव ऐकताच महिलांचे हृदय आनंदाने भरून येते आणि का नाही, वर्षानुवर्षे सोन्याच्या दागिन्यांना एक वेगळीच चमक आली आहे, जी कोणत्याही स्त्रीचे सौंदर्य वाढवते. सोनं मौल्यवान असण्यासोबतच स्त्रियांना वेगळा लूकही देतो. हेच कारण आहे की राजांच्या काळापासून आजपर्यंत प्रत्येक व्यक्तीला खास प्रसंगी सोन्याचे दागिने घालणे आवडते, परंतु सोन्याच्या सततच्या वाढत्या किमतीमुळे दागिने घेण्याचा ट्रेंड खूप बदलला आहे.

आज प्रत्येकजण गोल्ड प्लेटेड ज्वेलरी खरेदी करण्यास प्राधान्य देत आहे कारण ते उत्कृष्टता, स्मार्ट आणि ट्रेंडी लूक देते, शिवाय यामुळे तुमचे बजेट बिघडत नाही आणि आवश्यक खरेदी देखील करता येते. गेल्या वर्षभरातील आकडे बघितले तर 10 ग्रॅम सोन्याचा भाव 62 हजार ते 74 हजार रुपयांच्या आसपास पोहोचला आहे, जो खूप जास्त आहे आणि सर्वसामान्यांच्या बजेटवर भारी आहे.

यामुळेच आजकाल बाजारात सोन्याचा मुलामा असलेल्या दागिन्यांचा ट्रेंड आला आहे, जे घालणे आणि राखणे सोपे झाले आहे. आधुनिक सोन्याचा मुलामा असलेल्या दागिन्यांनी फॅशन जगतात स्वतःची प्रतिमा निर्माण केली आहे. सोन्याच्या दागिन्यांसाठी हा एक परवडणारा पर्याय आहे जो कमी किमतीत समान सुंदर आणि विलासी देखावा देतो. 2024 चा ट्रेंड म्हणजे सोन्याचा मुलामा असलेल्या बांगड्या, नेकलेस, कानातले इत्यादी, जे तुम्ही ऑनलाइन किंवा बाजारात जाऊन सहज खरेदी करू शकता.

सोन्याचा मुलामा असलेले दागिने कसे बनवायचे

गोल्ड प्लेटिंगमध्ये पितळ किंवा तांब्यासारख्या धातूवर पातळ थर लावला जातो. त्यामुळे, सोन्याचा कमीतकमी वापर करून, खाणकामाशी संबंधित पर्यावरणीय दुष्परिणाम देखील कमी केले जाऊ शकतात ज्यामुळे आधुनिक ग्राहकांची पर्यावरणीय जागरूकता देखील राखली जाते.

ते बनवण्याची प्रक्रिया जाणून घेऊया

सर्वप्रथम, बेस मेटल गॅल्वनाइज्ड केले जाते जेणेकरून ते गंजणार नाही आणि सोन्याच्या थरावर परिणाम होणार नाही. यानंतर, इलेक्ट्रोप्लेटिंग प्रक्रियेद्वारे सोन्याचा थर लावला जातो. यामध्ये विद्युत प्रवाह वापरून बेस मेटलवर सोन्याचा थर जमा केला जातो.

सोन्याचा थर लावण्यासाठी, तुकडा प्लेटिंग सोल्यूशनमध्ये बुडविला जातो. यामध्ये वेळ, तापमान आणि व्होल्टेज काळजीपूर्वक नियंत्रित केले जातात. या प्रक्रियेनंतर दागिने सुकण्यासाठी सोडले जातात.

गोल्ड प्लेटिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या सोन्याची शुद्धता 10 कॅरेट ते 24 कॅरेटपर्यंत असू शकते.

भेटवस्तू देण्यासाठी देखील एक चांगला पर्याय

सोन्याचा मुलामा असलेली कोणतीही वस्तू दिवाळीला भेट देण्यासाठी चांगली मानली जाते कारण त्याची चमक खऱ्या सोन्यासारखी असते आणि ती बजेटनुसार असते. योग्य देखभाल करून ते वर्षानुवर्षे परिधान केले जाऊ शकते.

सोन्याचा मुलामा असलेल्या वस्तू किंवा दागिने प्रत्येकाला देऊ शकतात, मग ते नातेवाईक असोत वा मित्र. यामध्ये त्याच्या नावाचे पहिले अक्षर असलेली सोन्याचा मुलामा असलेल्या बँड आणि अंगठ्या भाऊ किंवा प्रियकराला देऊ शकतात. याशिवाय, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कफ लिंक्स, कॉलर पिन, टाय पिन, पेंडेंट आणि इतर सोन्याचा मुलामा असलेले तुकडे देखील देऊ शकता.

महिलांसाठी, अंगठ्या, नेकपीस, पेंडेंट, कानातले, अंगठ्या, बांगड्या, ब्रेसलेट इत्यादी चांगले भेटवस्तू पर्याय आहेत, सहकाऱ्यांसाठी किंवा मित्रांसाठी, सोन्याचा मुलामा असलेले पॅन, मोनोग्राम केलेले सोन्याचे घड्याळे, सोन्याचे पॅन, वैयक्तिक अंगठी, सोन्याचा मुलामा असलेली नाणी इ. भेटवस्तू आपल्या प्रेमाची आणि नातेसंबंधाची ताकद वाढवते.

ज्वेलरी बोल्ड घ्यावी की क्लासिक

– सोमा घोष

या वर्षी बोल्ड, क्लासिक, विविध रंगांच्या मिश्रणाने तयार केलेले दागिने, मीनाकारी आणि निरनिराळया स्टोन्सपासून तयार केलेल्या दागिन्यांचा ट्रेंड आहे, जे प्रत्येक स्त्रीला कोणत्याही कार्यक्रमात घालायला आवडतात. याशिवाय क्लासिक डायमंड ज्वेलरी, ज्यात हिऱ्याशिवाय रूबी वगैरेंचे विविध रंगीबेरंगी स्टोन्स वापरून तयार केलेले दागिने खूप ट्रेंडमध्ये आहेत.

रोज गोल्डचाही खूप ट्रेंड आहे. यामुळे क्लासी, एलिगंट लुक दिसतो. भारतीय स्किन टोनवर हा खूप छान दिसतो. भारतीय पोषाखच नाही तर त्याबरोबरच दागिने घालण्याचाही ट्रेंड आजकाल जोर धरू लागला आहे.

महिलांची आवड

याबाबतीत वोईलाचे ज्वेलरी डिझायनर संजय शर्मा सांगतात की आजच्या महिला प्रत्येक दागिन्यात काहीतरी नवीन शोधतात, म्हणून आम्हाला त्यांच्याकडे लक्ष द्यावे लागते. ट्रेडिशनल बोल्ड एलिगंट चोकर आणि इअररिंग्स यावेळचे खास आकर्षण आहेत, जे केव्हाही घालता येतात. ट्रॅप्ड आणि प्रोटेक्टेड जेमस्टोनमध्ये पारंपरिक डिझाईनचे रत्न बसवले जातात. रंगीत असल्याने प्रत्येक रंगाच्या ड्रेसबरोबर घालता येऊ शकतात. आजकाल फ्लुइड फॉर्मचे कपडे जास्त परिधान केले जातात. त्यामुळे ते अधिक सुंदर दिसावे यासाठी फ्लुइडवाल्या दागिन्यांचा वापर छान  दिसतो.

फ्रिल्स आणि रफल्सच्या पोशाखात सर्वाधिक दागिन्यांना मागणी आहे. कित्येक रंगांच्या मिश्रणापासून तयार केलेले हे दागिने महिलांना खूप आवडतात. रंगांच्या ट्रेन्डबाबत बोलायचं झालं तर पेस्टल ग्रीन आणि ऑरेंज लग्न किंवा इतर कुठल्याही समारंभात घातले जाऊ शकतात.

कॅज्युअल वेअरबरोबर इंडिगो ब्लु, डार्क ब्लु, इंडिगो टर्क्वाइश ब्लु इत्यादी रंगांचे दागिने लोकप्रिय आहेत. हे दागिने कोणत्याही समारंभात घातले जातात. याशिवाय ऑक्सिडाइज्ड दागिने किट्टी पार्टी किंवा गरबा इत्यादि समारंभात घातले जातात.

नोकरदार महिलांची आवड

दागिन्यांचे डिझाईन तयार करताना ३ गोष्टींकडे लक्ष द्यावे लागते ते म्हणजे त्याची अस्थॅटिक व्हॅल्यू, घालायला आरामदायक आणि किंमत कमी असणे, कारण आजकाल स्त्रिया कमी किंमतीत सुंदर डिझाईन शोधतात, जे कोणत्याही समारंभात वापरता येतील.

ब्रायडल ज्वेलरीत तर स्त्रिया सगळया प्रकारचे दागिने घालतात जसे की मांगटिका, नथ, गळयातला चोकर, मध्यम हार, लवंगहार,कानातले झुमके किंवा चंद्रासारखी बाली, बाजूबंद, हातातली फुलं, कंबरपट्टा, पैंजण, बिछिया वगैरे. यातही चोकर नेकलेस सगळयात लोकप्रिय आहे.

याशिवाय ३८ इंचापासून ते ४० इंच लांबीची टे्रडिशनल चेनसुद्धा एखाद्या पार्टीत स्त्रीची शोभा वाढवते. मोठया इअर रिंग्सचीही आजकाल फॅशन आहे. यात नेकपीस न घालतासुद्धा तुम्ही सौंदर्य कायम ठेवू शकता.

ऑफिसला जाणाऱ्या महिलांची आवड सामान्य महिलांपेक्षा वेगळी असते. त्या जास्त करून लहान झुमके, लहान इअररिंग्स सामान्य क्लासिक ड्रेसवर घालण्याला पसंती देतात. त्या सामान्यत: असे दागिने खरेदी करतात, जे त्यांच्या सगळया ड्रेसवर घालता येतील.

चलनातील दागिने

संजय म्हणतात की ट्रेंडपेक्षाही जास्त दागिने चेहऱ्याप्रमाणे घालायला हवे. लंबगोलाकृती, गोल आणि चौकोनी चेहरा असणाऱ्या महिलांनी याकडे लक्ष द्यायची आवश्यकता आहे. लंबगोलाकृती महिलांसाठी मार्कीज आकाराचे कानातले छान दिसतात, याउलट गोल आकार असणाऱ्यांनी झुमके घालणे जास्त छान असते. चोकोनाकृती चेहऱ्यासाठी भौमितिक आकाराचे कानातले चांगले दिसतात.

टीनएजर मुलींमध्ये लहान रंगीत, नाजूक दागिने घालण्याचा अधिक ट्रेंड आहे. आता नोज पिन, नोजक्लिपचा ट्रेंडही यांच्यात जास्त आहे. हे त्या वेस्टर्न ड्रेससोबत अगदी सहज घालू शकतात.

मध्यमवयात ट्रेडिशनल, कलाकुसरीचे काम केलेले क्लासिक, फाईन गोल्डचे दागिने अधिक पसंत केले  जातात. याशिवाय झुमके, चांदबाली, जाळीचे काम, डायमंड लुक अधिकिने ट्रेंडमध्ये आहे. ५० पेक्षा अधिक वयाच्या महिलांसाठी सिंगल लाईन नेकलेस, कुंदन नेकलेस, प्युअर डायमंड किंवा गोल्डचे हातातले कडे वगैरे लोकप्रिय आहेत.

आजकाल रंगीत ज्वेलरीसुद्धा विशेष चलनात आहे, ज्यात नैसर्गिक स्टोन्स लावलेले असतात. यामुळे दागिन्यांचा भाव जास्त वाढल्याने कित्येकदा सेमीप्रेशिअस स्टोनचासुद्धा वापर सोन्याबरोबर केला जातो, जो दिसायला खराच वाटतो आणि बजेटमध्येही असतो.

ट्रेंडी ज्वेलरीने मिळवा नवा लूक

* तोषिनी राठौड

कपडयांच्या फॅशनप्रमाणे ज्वेलरी ट्रेंडही सातत्याने बदलत असतो. पण काही ज्वेलरी अशी असते, तिची क्रेझ सतत टिकून असते. यात झुमक्यापासून ते नव्या डिझाइन्सचे चोकर, नेकपीस, बिंदी, विविध प्रकारचे कडे इत्यादी महिलांमध्ये प्रचलित आहेत. चला पाहूया, सध्या कोणती ज्वेलरी फॅशनमध्ये इन आहे.

ऑक्सिडाइज ज्वेलरी

आजकाल स्त्रिया सगळीकडे ऑक्सिडाइज ज्वेलरी घालताना दिसतात. पण या ज्वेलरीला एका वेगळया रुपात सादर केलं जातं. जसं की ऑक्सिडाईज ज्वेलरीमध्ये बनवले जाणारे पेंडेंट आणि इतर छोटे छोटे डिझाइन्स मणी हे लोकरीच्या धाग्यांमध्ये ओवले जातात. याव्यतिरिक्त ऑक्सिडाइज सिल्व्हरने बनलेले कडे, हस्तीदंतापासून बनलेल्या कडे आणि मोत्यांच्या ज्वेलरीसोबत वापरले जातात. जे राजस्थानी लुक देतात. तसेच ऑक्सिडाईज ज्वेलरीसोबत एअर कफचाही ट्रेंड शीखरावर आहे. ज्यामुळे तुमचं सौंदर्य खुलून दिसेल.

कडे

तुमचा लुक अधिक खुलवण्यासाठी हातामध्ये घातलेल्या कडयांची महत्त्वाची भूमिका असते. हे कडे सर्वांनाच आकर्षित करतात. या सीझनमध्ये इतरांपेक्षा हटके दिसण्यासाठी तुम्ही असे कडे निवडा, ज्यामुळे तुमचे सौंदर्य उठून दिसेल. आजकाल गोंडे, मोती, रेशीम, लोकर लावलेले कडे ट्रेंडमध्ये आहेत. तसेच ट्रायबल डिझाइन्ससह ऑक्सिडाइज कडे तुमच्या हातावर छान दिसतील. तुम्ही गोल्डनसह सिल्व्हर कडयांचं कॉम्बिनेशन करून ड्रेसनुसार घालू शकता.

वुलन ज्वेलरी

आजकाल वुलन ज्वेलरी घालण्याचा ट्रेंड सुरु आहे. ही ज्वेलरी सामान्यपणे हाताने बनवली जाते. यात डिझाइनर पॅचवर हातांनी मोत्यांचं काम केलं जातं. यासह वुलनचे गोंडे, लटकन लावले जातात. याची सुंदरता काही औरच आहे.

वेस्ट बेल्ट

वेस्ट बेल्ट अशी ज्वेलरी आहे, जी तुम्हाला स्टाइलिश लुक मिळवून देते. बाजारात अनेक प्रकारचे वेस्ट बेल्ट उपलब्ध आहेत. यात ऑक्सिडाईज सिल्वरसह वुलन बेल्ट, मिरर वर्क बेल्ट इत्यादी तुम्ही तुमच्या ड्रेसनुसार घालू शकता, ज्यामुळे तुमचा ड्रेस अधिक आकर्षक दिसेल.

कंठा ज्वेलरी

कंठा ज्वेलरीची फॅशन खूप वर्षांपूर्वी होती. पण यंदा याच स्टाइलला वेगळया पद्धतीने सादर केलं जात आहे. कंठा ज्वेलरीमध्ये मेटलने बनलेल्या मोत्यांचा वापर केला जातो, जे लोकरीच्या धाग्यात ओवले जातात आणि पेंडेंटसोबत सजवले जातात.

डँग्लर्स अँड ड्रॉप्स

सिनेक्षेत्रात चलती असलेल्या या कानातल्यांचा ट्रेंड सर्वच ठिकाणी दिसून येतो. विशेषत: या ज्वेलरीत चंद्राच्या आकाराचे झुमके ट्रेंडमध्ये आहेत, जे आकारांत मोठे असतात. यामुळे कानांचं सौंदर्य वाढतं. हे कानातले घालून तुम्हालादेखील स्टार असल्यासारखं वाटेल.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें