गोडगोड दिवाळी

* प्रतिनिध

काजू-मँगो फज

साहित्य

* १ कप जाडसर वाटलेले काजू

* १०० ग्रॅम गोड आंबापोळी

* पाव कप साखर

* १ मोठा चमचा नारळाचा कीस

* सजावटीसाठी काप केलेले मेवे.

कृती

एका पॅनमध्ये साखर विरघळा. आंबापोळीचे छोटे तुकडे कापून घ्या. साखरेच्या मिश्रणात काजू आणि आंबापोळी मिसळा व चांगल्याप्रकारे ढवळा. हे मिश्रण एका तूप लावलेल्या ताटात काढा. थोडं थंड झाल्यावर चमच्याने घेऊन थोडं-थोडं मिश्रण प्लेटमध्ये ठेवा. वरून नारळाचा कीस आणि मेव्याचे काप पेरा. थंड करून वाढा.

 

रताळ्याची खीर

साहित्य मॅरिनेट

* ५०० ग्रॅम उकडलेली रताळी

* २ लीटर दूध

* १ कप कंडेस्ड मिल्क

* अर्धा कप मेव्याचे काप

* सजवण्यासाठी थोडेसे पिस्ते व गुलाबाच्या पाकळ्या

* चिमूटभर छोटी वेलची पावडर.

कृती

रताळी सोलून कुस्करून घ्या. एका जाड बुडाच्या भांड्यात दूध उकळण्यासाठी ठेवा. जेव्हा दूध उकळून अर्धे राहील, तेव्हा त्यात कुस्करलेली रताळी व वेलची पावडर टाका. दूध दाट होईपर्यंत शिजवा. मग मेवे व कंडेस्ड मिल्क घालून सतत ढवळत राहा. उकळी आल्यानंतर गॅसवरून उतरवा. गरम खीर सर्व्हिंग डिशमध्ये घ्या. वर पिस्ता व गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवा.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें