झिरो साईजचा काळ गेला

* सतीश पेडणेकर

दर सहा महिन्यांनी बदलते ती फॅशन असं फॅशनबद्दल म्हटले जाते. पण यावेळी फॅशनच्या ग्लॅमरस विश्वात क्रांती होताना दिसत आहे. मागील काही काळापासून जगावर झिरो साईजचा एकछत्री अंमल सुरु होता. म्हणजे मॉडेल जितकी सडपातळ तितकी चांगली. कधी कोणी कल्पनाही केली नसेल ग्लॅमरस फॅशन उद्योग झिरो साईजला बाय म्हणून भरलेल्या शरीराला आणि उभारांना महत्व देवू लागेल.

झिरो साईज आता फॅशन राहिलेली नाही, आता मुली आपल्या भरीव शरीर उभारांमुळे लाजत नाहीत.

अलीकडे आंतरराष्ट्रीय फॅशन दुनियेच्या कांगलोमरेट एलवीएमएच आणि केरिंगने एक चार्टर लागू केले, ज्या माध्यमातून जगभरातील अशा मॉडेल्सची भरती बंद केली जाईल, ज्या खूपच सडपातळ आहेत. त्याच्या चार्टरनुसार त्यांचे सर्व ब्रँड त्या मॉडेलवर बंदी आणणार, ज्यांची फ्रेंच साईज ३४ पेक्षा कमी असेल, इथे उल्लेखनीय आहे की फ्रेंच साईज ३२ अमेरिकन साईज ० च्या बरोबरीची असते इस्रायलने तर २०१३ मध्येच सडपातळ मोडेल्सवर बंदी घातली होती.

मोठा निर्णय

फॅशन विश्वात फ्रांस पूर्ण जगाचे नेतृत्व करते. पण फ्रेंच सरकारने काही कालावधीपूर्वी एक निर्णय घेतला, त्यामुळे आता फॅशन विश्वात सौंदर्याचे मापदंड बदलतील. वास्तविक फ्रान्समध्ये झिरो साईज मॉडेल आणि मॉडेलिंगवर प्रतिबंध लावण्यात आले आहेत. फॅशन आणि सौंदर्याला केंद्रस्थानी ठेवून जगात चालणाऱ्या उद्योगासाठी हा खूपच मोठा निर्णय आहे. तसेच याआधी २००६ मध्ये इटली आणि स्पेनमध्ये झिरो साइजवर प्रतिबंध लावण्यात आले होते.

आता जेव्हा फ्रान्सने निर्णय घेतला तर सगळीकडे चर्चा होते, याचे कारण की फ्रांस किंवा पॅरिस फॅशनचे मापदंड ठरवतात. यामुळे जगातील फॅशन इंडस्ट्री या निर्णयामुळे चकित झाली.

आरोग्यासाठी सरकारी तपासणी

प्रतिबंध लावण्याबरोबरच फ्रांस सरकारने यासंबंधी एक कायदाही पास केला आहे. ज्या मॉडेल्सचा बॉडी इंडेक्स ठरवल्यानुसार मापदंडातून कमी असेल तर त्यांच्यामार्फत आपल्या उत्पादनाचा प्रचार केला जाणार नाही व त्यांना फॅशन शोमध्येही भाग घेता येणार  नाही.

या कायद्याचे उल्लंघन झाल्यास ६ महिने इतकी शिक्षा होऊ शकते, इतकंच नव्हे तर शिक्षेबरोबर दंडसुद्धा होऊ शकतो.

मॉडेल्ससाठी सरकारी आदेशांमध्ये असे स्पष्ट सांगितसे आहे की, मॉडेलिंग करिअर सुरु करण्याआधी आरोग्यासाठी सरकारी तपासप्रक्रियेतून जावे लागेल. तपासणीमध्ये मॉडेलची उंची आणि उंचीनुसार वजन आणि चेहऱ्याच्या ठेवणीची तपासणी करून घ्यावी लागेल. त्यानंतर एक फिटनेस सर्टिफिकेट दिले जाईल. याशिवाय करिअरची सुरुवात करता येणार नाही याचे अनुकरण अनेक नामांकीत फॅशन हाउसेजने केले.

भारतीयांचे वेगळे मापदंड

ख्रिश्चियन डीओर, दिवेंचे सेंट लृरंट आणि गुक्कीमध्ये कुठल्याही साईजवर प्रतिबंध नाही. पण मॉडेल निरोगी असणे गरजेचे म्हटले आहे. हे निश्चित आहे की १६ पेक्षा कमी वयाच्या मुलींना सज्ञान असल्याप्रमाणे सादर केले जाणार नाही आणि मागील काही वर्षांपासून हा आरोप केला जात आहे की फॅशन उद्योग आहारावरील निर्बंधांना चालना देत आहे.

भारतात आंतरराष्ट्रीय फॅशन कंपन्यांच्या निर्णयावर अनुकूल परिणाम झाला आहे. ते समर्थनार्थ स्पष्टीकरण देतात. अनेक भारतीय फॅशन शो निर्माते याबद्दल म्हणतात, ‘‘जगभरात जरी झिरो साईज फॅशनेबल समजली जात असेल पण आपल्या देशात नेहमी उठावदार व भरलेल्या शरीराच्या मॉडेल्स असतात. हे प्रतिक आहे कि भारतीय लोकाचे सौंदर्याचे ज्ञान फॅशन उद्योगाने प्रभावित होत नाही. ते फिल्म उदयोगाने प्रभावित होते. बॉलिवुडचा लोकांवर खूप जास्त प्रभाव आहे. अनेक दशकांपासून ते सुदृढ बांध्याच्या अभिनेत्रींनांच अधिक महत्व देत  आले आहेत.

‘‘मागील काही वर्षांपासून सडपातळ अभिनेत्रींना महत्व दिले गेले. तेही त्या मॉडेल्स फॅशन व्यवसायातून आलेल्या होत्या म्हणून.’’

सुदृढ मॉडेल्सची आहे एक वेगळी ओळख

भारतीय मॉडेल सानिया शेख म्हणते, ‘‘आंतरराष्ट्रीय परिदृष्यावर झालेले परिवर्तन महत्वपूर्ण आहे. मला असे वाटते की साईज झिरो सैंद्धातिक स्तरावर असते. आपल्या देशात झिरो साईज कधीच नव्हती. फॅशन व्यवसायात सुदृढ मॉडेल्सनाच पसंती होती, कारण आपल्या येथील शरीरयष्टी सडपातळ नसून उभार असलेली आहे. आपल्या इथे रनवेवरसुद्धा काही रुंद खांद्याच्या, काही भरगच्च नितंबाच्या, तर काही रुंद कमरेच्यादेखील आहेत. व्यवसायात कुणावरही कुठल्याही प्रकारचा दबाव नाही आणि भारतीय वेशभूषासुद्धा सुदृढ बांध्यावरच छान दिसते.’’

स्विकारली जात आहे प्लस साईज

डिझाइनर जोडी फाल्गुनी आणि शेन यांचे म्हणणे आहे कि आपल्या देशात ५० टक्केपेक्षा अधिक महिलांची साईज १२ किंवा त्यापेक्षा अधिक आहे. कापड उद्योग यावर लक्ष देत आहे.

आज रनवेपासून फॅशन स्टोर्स आणि मासिकांच्या पानांवरही प्लस साईजच्या स्त्रिया बघायला मिळतात. गरगरीत शरीर असणे हे या व्यवसायाने मान्य केले आहे म्हणून नव्हे तर उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने याकडे दुर्लक्ष करून चालणार नाहीए.

‘‘एक समुदाय म्हणून फॅशन व्यवसाय शरीराच्या आकारमानाच्या दृष्टीने सकारात्मक दृष्टीकोन ठेवत आहे हे समर्थनार्थ आहे. कारण आता ती वेळ आली आहे. आपल्याला स्त्रियांना त्या आहेत त्याच रुपात स्विकार करणे सोप्पे जाईल, जशा त्या आहेत फॅशन मासिकात फोटोशॉप करून दाखवल्याप्रमाणे सुंदर दिसणाऱ्या सडपातळ शरीरयष्टीच्या मॉडेल जशा की, अडेलएमी शूमर, एशले ग्रॅहम, स्टेफनिया फारेरोसारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या स्त्रिया आणि विद्या बालन, हुमा कुरेशी यांसारख्या भारतीय नायिकाही त्यांच्या सुदृढ शरीरासह स्वत:ला सिद्ध करत आहेत. यांना पाहून सामान्य महिला आत्मविश्वाने स्वत:ची प्लस साईज स्वीकारत आहेत.

काळ बदलला आहे

डिझाइनर मोनिषा जयसिंहचे म्हणणे आहे, ‘‘फॅशन उद्योग आता प्लस साईज ग्राहकांकडे लक्ष देत आहे, ज्यांना अनेक वर्षांपासून दुर्लक्षित केले होते. प्लस साईज फॅशन ब्लॉगर्ससुद्धा या प्रकरणी बदल घडवून आणण्यास सरसावले आहेत. जगभरातील प्लस साईज मॉडेल्स आणि ब्लॉगर्स फॅशनच्या भविष्याचा नवीन चेहरा आहेत.’’

मुंबईत राहणारी अमेरिकन मॉडेल लीजा गोल्डन भोजवानीचे म्हणणे आहे, ‘‘आता काळ बदलला आहे. आता प्लस साईज फिगर असणे चुकीचे ठरत नाही.’’

स्पेन, इटली आणि इस्रायलनंतर आता फ्रांसमध्येही झिरो साईजवर प्रतिबंध केला आहे. यानंतर आता आशा आहे की मॉडेल्समध्ये सडपातळ होण्याचे वेड थोडया प्रमाणात का असेना कमी होईल.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें