पैसा आणि नाती असा साधा ताळमेळ

* रंभा

एक जूनी म्हण आहे की, ‘जेव्हा गरीबी दरवाज्यावरती येते तेव्हा प्रेम खिडकीतून पळून जाते,’ अगदी सार्थ म्हण आहे. नात्यात समर्पण, श्रद्धा, प्रामाणिकपणा प्रेमामुळेच येतो. परंतु हे प्रेम पैशाच्या अभावी संपून जातं. एक काळ असा होता जेव्हा संबंध आणि त्याची संवेदनशीलताच महत्त्वाची मानली जात होती.

नाती बनल्यावर पैशाच्या तराजूत तोलल्यानंतर संबंध बनविण्याचे प्रयत्न सुरू करण्यापूर्वी त्यामध्ये एकमेकांच्या स्टेटस सिम्बल्सना पहिलं बघितलं जातं. अगदी आपल्या नातेवाईकांकडूनदेखील भविष्यात संबंध ठेवण्यासाठी दोघांचा आर्थिक स्तर मोजला जातो.

आयुष्य जगण्यासाठी गरजा आणि सुविधांच्या गोष्टी जमविण्यात पैसाच कामी येतो. सर्व गोष्टींचं मूल्य याच पैशाच्या बदल्यात तोललं जातं. काळाबरोबरच व्यक्तीच्या मूल्यालादेखील पैशानेच आखलं जातं.

हे जाणूनदेखील की जीवन जगण्यासाठी अन्न, वस्त्र आणि निवारा याव्यतिरिक्त आजूबाजूचे चांगले संबंध आणि त्यांची अनुभूतीदेखील खूप गरजेची आहे. चांगली नाती आपल्याला नेहमी आतून भरलेल्याची जाणीव करतात परंतु सोबतच वेळीअवेळी आपली मदतदेखील करतात. ही वेगळी गोष्ट आहे की नात्यांमध्येदेखील कॅल्क्युलेशन होणं नैसर्गिक आहे.

डिपेंडंट रिलेशनशिप

याबाबत चार्टर्ड अकाउंट वर्षा कुमारीचं म्हणणं आहे की प्रत्येक नात्याला चांगल्या प्रकारे बनविण्यासाठी पैसा महत्वाची भूमिका निभावतो. मान्य आहे की नातं बनण्यात आणि त्याच्या स्वामित्वासाठी त्यामध्ये प्रेम, जवळीक, व्यक्तिमत्वाची तत्व समाविष्ट आहेत. परंतु पैशाशिवाय हे संबंधदेखील जास्त दिवस चालतात.

प्रेम जाहीर करणं, कायम राखण्यासाठी पैशांची गरज पडतेच

फॅशन डिझायनर श्वेता अग्रवालचं म्हणणं आहे की आपल्या जीवनात सर्वात जवळचं नातं पती-पत्नीचे असतं. लग्नानंतर काही काळापर्यंत मी काम करणं सोडलं होतं. तीन वर्षानंतर जेव्हा मी बाहेर काम करायला सुरुवात केली तेव्हा माझी वागणूक पतींना खटकू लागली. म्हणजे माझ्या प्रत्येक गोष्टीवरती ते म्हणत असतं की अरे आता तर तू कमावती झाली आहेस परंतु त्यापूर्वी त्यांना माझ्या या गोष्टींमध्ये माझा भोळसरपणा वाटायचा.

इतर नात्यांमध्ये अशा प्रतिक्रिया मी समजून घेतल्या असत्या, परंतु आपल्या पतीकडून असं ऐकल्यावर मला खरोखरच खूप दु:ख होतं. या पैशाने तर सर्व संबंधांनाच बदललं आहे.

बाजारवादाचा प्रभाव

काळाबरोबरच उपभोक्ता वादामुळेदेखील पैशाचं महत्त्व वाढत चाललं आहे, सोबतच दुसऱ्या गोष्टींच मूल्यदेखील घटलं आहे. आधुनिक समाजातील सर्व झगमगाट पैशांवरती टिकला आहे. आपल्या आजूबाजूला चालणारे सर्व मानसन्मान आणि संबंध पैशानेच मोजले जाऊ लागले आहेत. तिथे जाहिरातीदेखील लोकांच्या भावनांना भडकवितात. एक जाहिरात काही वर्षांपूर्वी आली होती टीव्हीमध्ये ज्यात एक छोटा मुलगा घरातून पळून रेल्वे स्टेशनवर जातो. तिथे गरम-गरम जिलेब्या पाहून त्याच्या लोभापाई तो पुन्हा घरी परततो.

म्हणजेच आताच त्या निरागस मुलाच्या मनात ही गोष्ट बसली आहे की त्याच्याशी संबंधित नाती त्याला परत घरी बोलवणार नाहीत व जिलेब्यामुळे त्याच्यामध्ये लालूच निर्माण होते आणि तिथेच नाती बनतात. आता जिलेब्या नाही तर पिझ्झा, बर्गर आणि आयफोनचा काळ आहे. एवढाच फक्त फरक  आहे.

अनेकदा पाहण्यात आलंय की पत्नी आपल्या पतीला सांगतात की मला वाटतं तुम्ही माझ्यावर प्रेम नाही करत. म्हणूनच बरेच दिवसापासून माझ्यासाठी कोणतेच गिफ्ट आणलं नाहीए अर्थात पती-पत्नीच्या प्रेमामध्ये भौतिक गोष्टीच महत्त्वाच्या आहेत असं वाटू लागलं आहे.

भावनात्मक वाट

शिक्षिका रश्मी पालवचं म्हणणं याबाबत थोडं वेगळं आहे. त्या सांगतात की मान्य आहे की आज नात्यांमध्ये पैसा खूप वाईटरित्या आला आहे. परंतु वैयक्तिकरित्या मी माझ्या नात्यांमध्ये पैसा येऊ देत नाही याला माझी एक भावुकतादेखील म्हटली जाऊ शकते. परंतु माझं म्हणणं आहे की जेव्हा नात्यांमध्ये हिशोब येऊ लागतो तेव्हा ते ओझं बनू लागतं.

त्यामुळे कायम माझा प्रयत्न हाच असतो की पैसा यामध्ये येऊ नये आणि जर आलाच तर त्याला प्राथमिकता देत नाही. होय, अनेकदा मला यामुळे फायनान्शिअल लॉसदेखील सहन करावा लागतो, परंतु माझ्या आयुष्यात यामुळेच आनंद आहे. भलेही तुम्ही याला माझं ओव्हर इमोशनल म्हणा वा मग तुम्ही मला प्रॅक्टिकल म्हणू नका.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें