नववधूच्या मेकअपसाठी ९ टीप्स

* डॉक्टर भारती तनेजा, संचालक, एलप्स ब्युटी क्लिनिक अँड अकॅडमी

लग्नसोहळा म्हटले म्हणजे स्वाभाविकपणे तुमच्या डोळयासमोर सिल्क, जरी, मोती, काचांच्या टिकल्या, चंदेरी आणि सोनेरी कलाकुसरीचा लेहेंगा परिधान केलेली नववधू उभी राहते. या पोशाखात ती एखाद्या अप्सरेलाही लाजवेल अशीच दिसत असते. जरदोसीने सजवलेल्या पोशाखात तुमचेही रूप खुलून दिसावे यासाठी मेकअप कसा करायला हवा, हे डॉ. भारती तनेजा यांच्याकडून माहिती करून घेऊया :

सर्वप्रथम हे ठरवा की, तुम्हाला नैसर्गिक रुप हवे आहे की जास्त उठावदार मेकअप करायचा आहे. आजकाल अनेक नववधूंना नैसर्गिक वाटेल असाच मेकअपच जास्त आवडतो. तुम्हालाही जर असे नैसर्गिक रूप हवे असेल तर त्यासाठी तुमच्या मेकअपच्या स्टेप्स पूर्णपणे उठावदार मेकअपसारख्याच असतील, पण मेकअपसाठी वापरलेले रंग सौम्य असतील. अन्य मेकअपचा अगदी थोडासाच वापर करून त्यावर पावडर लावून ती चेहऱ्यावर सर्वत्र व्यवस्थित पसरवली जाते, जेणेकरून संपूर्ण त्वचा एकसमान दिसेल.

नैसर्गिक मेकअप

आपले रूप नैसर्गिक वाटावे यासाठी आयशॅडो ब्लशर, लिपस्टिक आणि हायलायटरचे रंग सौम्य ठेवले जातात. या मेकअपमध्ये विंग्ड आयलायनर लावले जात नाही, फक्त डोळयांची आऊटलायनिंग केली जाते. याच्या मदतीने तुम्ही कपाळावर छोटी टिकलीही काढू शकता.

उठावदार मेकअप

* वधूचा मेकअप तासनतास कायम टिकून रहावा यासाठी वॉटरप्रुफ मेकअपचा वापर करावा, जेणेकरुन सासरी पाठवणीच्या वेळेपर्यंत चेहऱ्याची चमक कायम राहील. याशिवाय लग्नाच्या हॉलमधील झगमगत्या प्रकाशात तिच्या चेहऱ्यावरील लाली झाकोळली जाणार नाही.

* फक्त डोळे आणि ओठ या दोन ठिकाणीच गडद मेकअप करणे, ही आता भूतकाळातील गोष्ट झाली आहे. आता एकतर लिपस्टिक सौम्य रंगाची लावा आणि जर डोळयांचा मेकअप सौम्य केला असेल तर लिपस्टिक गडद रंगाची लावा. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की, मेकअप तुमचा लेहेंगा किंवा लग्नाच्या पेहरावाशी जुळणारा किंवा त्याला पूरक दिसेल असाच हवा.

* डोळे मादक दिसावेत यासाठी बनावट मिळणारे पापण्यांचे केस तुम्ही तुमच्या पापण्यांवर लावू शकता. त्यांना पापण्यांच्या रंगाने कर्ल करा आणि मस्कराचा कोट लावा जेणेकरून ते तुमच्या पापण्यांसारखेच नैसर्गिक वाटतील. तुमची इच्छा असल्यास, तुम्ही तुमच्या लग्नाच्या २ दिवस आधी बनावट मिळणाऱ्या पापण्या या कायमस्वरूपी लावून घेऊ शकता.

* डोळयांचा आकार व्यवस्थित दिसण्यासाठी विरोधाभासी रंगांचे दोन प्रकारचे लायनर वापरू शकता. उदाहरणार्थ, पापणीच्या आतील कोपऱ्यावर इलेक्ट्रिक ब्लू आणि बाहेरील कोपऱ्यावर हिरव्या रंगाने विंग्ड लायनर लावा. डोळयांखालीही सौम्य हिरवा रंग लावा, सोबतच डोळयांखालील कडांना गडद जेल काजळ लावा.

* आजकाल कपाळावर मोठी टिकली व भांग भरण्याचा ट्रेंड आहे, अशा परिस्थितीत जर तुमच्या कपाळाचा निम्म्यापेक्षा जास्त भाग हा भांग भरल्यामुळे झाकला गेला असेल, तर लेहेंग्याच्या रंगाशी मिळतीजुळती बिंदी लावा. भांगेत कमी कुंकू लावले असेल तर कपाळाच्या मध्यभागी मोठी बिंदीही लावता येते.

* अशा प्रसंगी, वधू सतत मेकअप नीटनेटका करू शकत नाही, म्हणून आधीच ओठांवर आपल्या लेहेंग्याशी जुळणारी किंवा त्याला शोभेल अशी ओठांवर दीर्घकाळ टिकणारी लिपस्टिक लावा.

* केस म्हणजे जणू डोक्याचा मुकुट असतो. तो सजवण्यासाठी हेअरस्टाईलमध्ये डिझायनर नेक पीस, खडयांनी सजवलेली बनावट वेणी, त्यावर लावलेला कुंदनजडित पट्टा, सुंदर सजवलेली कृत्रिम फुले वापरता येतील. मात्र आजकाल फुलांचा ट्रेंड आहे, त्यामुळे केसांसाठी फक्त फुलांचाच वापर केला जात आहे.

असा असावा नववधूचा श्रुंगार

* गरिमा पंकज

आपल्या लग्नात प्रत्येकीलाच सुंदर दिसावं वाटतं आणि सुंदरता वाढविण्यामध्ये वस्त्र आणि अलंकारांसह मेकअपचंदेखील तितकंच मोठं योगदान असतं. वेगवेगळ्या भागात मेकअपच्या पद्धतीही वेगवेगळ्या असतात.

‘गृहशोभिके’च्या फेब सेमिनारमध्ये मेकअप आर्टिस्ट शिवानी गौडने इंडियन आणि पाकिस्तानी ब्रायडल मेकअपच्या टीप्स दिल्या :

इंडियन ब्रायडल मेकअप

आय मेकअप : मेकअपची सुरूवात डोळ्यांपासून करावी, कारण चेहऱ्याचं पहिलं आकर्षण डोळेच असतात. डोळ्यांचा मेकअप सुरू करण्यासाठी सर्वप्रथम हलकी लाइन ड्रॉ करा आणि मग तीला ब्लेन्ड करा. लाइट कलरने सुरूवात करून डार्क कलरकडे जा आणि तो ब्लेन्ड करत जा. आउटर कॉर्नर्सला थोडा स्मोकी लुक देण्यासाठी डार्क ब्राऊन कलरचा वापर करू शकता.

ब्रायडल मेकअपमध्ये गोल्डन ग्लिटरचा वापर चांगला वाटतो. पण तुम्ही अन्य कोणताही आवडीचा रंग वापरू शकता. आता मसकारा लावून आर्टिफिशिअल आईलॅशेज लावा. त्यामुळे डोळे मोठे दिसतात. मग डोळ्यांच्या कडांना काजळ लावून थोडंसं स्मज करून घ्या. त्यामुळे डोळे सुंदर दिसतील.

बेस तयार करा : प्रथम त्वचेला मॉइश्चराइज करा. त्वचा ऑयली असेल तर जास्त मॉइश्चराइझरचा वापर करू नका. जरूरी असेल तर ऑईल फ्री मॉइश्चरायझर लावा. मग प्रायमर लावा. त्यानंतर इफेक्टेड भागावर कंसील लावा. डाग अजिबात दिसणार नाहीत. आता लिक्किड क्रिम बेस्ड फाऊंडेशन चांगल्याप्रकारे चेहऱ्यावर लावा. यानंतर ट्रान्सल्यूशन पावडर लावा. जेणेकरून काजळ पसरणार नाही आणि मेकअप अधिक काळापर्यंत टिकून राहिल. आता फेस कंटूरिंग करा जेणेकरून चेहऱ्याला सुंदर शेप देता येईल आणि फिचर्स उठून दिसतील. मग ब्लशर अप्लाय करा आणि त्यानंतर पीकबोन्स एरियावर हाईलाइट करा.

लिप मेकअप : प्रथम आपल्या ओठांवर लिपबाम लावून ते मुलायम बनवा. त्यानंतर लिप पेन्सिलने शेप द्या आणि त्याच रंगाची लिपस्टिक लावा. मेकअपनंतर फिक्सिंग स्प्रे वापरा, जेणेकरून मेकअप अधिक काळपर्यंत टिकून राहिल.

पाकिस्तानी ब्रायडल मेकअप

पाकिस्तानी ब्रायडल मेकअपमध्ये काही गोष्टी सोडल्या तर बाकी सर्व इंडियन ब्रायडल मेकअपसारखीच पद्धत असते. पाकिस्तानी ब्रायडल मेकअपमध्ये या गोष्टींची काळजी घ्या.

* पाकिस्तानी ब्रायडल मेकअप दरम्यान लायनर जाड लावलं जातं.

* यात कट एन्ड क्रीज आय मेकअप असतो.

* हेवी आयलॅशेजचा वापर केला जातो.

* डोळ्यांवर ग्लिटर आणि पिगमेंट्सचा वापर होतो.

* फेस कंटूरिंग थोडी जास्त गडद असते.

* हेअरस्टायलिंगही हेवी असते. हाय पफ बनवला जातो. मोठमोठ्या स्टफिंग आणि एक्सटेंशन्सचा वापर होतो.

हेअर बन

हेअर स्टायलिस्ट सिल्की बालीने एक सुंदर हेअर बन बनवायची पद्धत सांगितली. आधी केसात हेअरमूज लावा. याने सिल्की स्मूद केस थोडे रफ होतील आणि त्यांची पकड सोप्या पद्धतीने होईल. यानंतर केसांना क्रिपिंग मशीनने क्रिप करा, जेणेकरून केसांत वॉल्यूम येईल.

आता पुन्हा ‘ए टु ए’ सेक्शन काढा आणि क्राऊन एरियातल्या केसांना बॅक कोंब करून पफ बनवा. मागील केसांना एकत्र करून पोनी बांधा. पोनीमध्ये कर्ल्स करा. आता एक राऊंड स्टफिंग लावा आणि कर्ल केलेल्या केसांना थोडं डिझाईन करून स्टफिंग कव्हर करा. आता फ्रंट सेक्शन स्टार्ट करा. सेंटर पार्टींग करा. मग अनेक पातळ सेक्शन घेऊन चांगल्या प्रकारे बॅक कोंब करा. आपल्या फेसनुसार फॉल देऊन पिन लावा. एक्सेसरीज लावून आणखीन जास्त आकर्षक बनवू शकता.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें