तर व्हाल पत्नी नं. १

* डॉ. अनामिका प्रकाश श्रीवास्तव

अलीकडच्या काळात जर तुम्ही पत्नींना विचारलंत की पतीची पत्नीकडून काय अपेक्षा असतात तर अनेक जणी हेच उत्तर देतील की सौंदर्य, वेशभूषा, मृदुभाषी, प्रेमळ.

नक्कीच, बऱ्याचदा पती पत्नीकडून प्रेमाचीच अपेक्षा करत असतो. त्यांना सौंदर्य, शालीनता आणि शृंगारदेखील हवाच असतो. परंतु केवळ याच गोष्टी त्यांना समाधान देतात का?

तर नाही. तो कधीकधी पत्नीमध्ये तीव्रतेने तिचा नैसर्गिक साधेपणा, सहृदयता, गंभीरता आणि दृढ प्रेमदेखील शोधत असतो. कधीकधी त्याला ती बुद्धिमान असावी तसंच भावना समजून घेणारी असावी असंदेखील वाटत असतं.

आत्मीयता गरजेची

पतीला एखाद्या बाहुल्याप्रमाणे रमविणं हेच पत्नीसाठी पुरेसं नाहीए. दोघांमध्ये आत्मीयता असणंदेखील तितकंच गरजेचं आहे. असा आपलेपणा की पतीला आपल्या पत्नीमध्ये कोणत्याही परकेपणाची अनुभूती नसावी. तो तिला पूर्णपणे ओळखतो आणि ती त्याच्या सुख:दुखांत कायम त्याच्यासोबत आहे ही जाणीव त्याला कायम असावी. पतिपत्नीच्या प्रेमात आणि वैवाहिक जीवनात ही आत्मिक एकता खूपच गरजेची आहे. पत्नीचा कोमल आधार वास्तवात पत्नीची शक्ती आहे. जर तिने सहृदयता आणि संयमाने पतीच्या भावनांना आधार नाही दिला, तर ती यशस्वी पत्नी बनूच शकत नाही.

पत्नीदेखील मानसिक प्रेमाची अनुभूती घेते. तीदेखील पतीच्या खांद्यावर मान ठेवून जीवनातील सर्व दु:खाला सामोरं जायला तयार राहाते.

अनेकांच्या आयुष्यात अनेकदा कटुता येते; कारण वर्षांनुवर्षं ते एकमेकांच्या सहवासात राहूनदेखील एकमेकांपासून मानसिकरित्या दूर राहातात आणि एकमेकांना समजून घेत नाहीत. तिथूनच या दुराव्याला सुरुवात होते. तुम्हाला जर हा दुरावा वाढवायचा नसेल, आयुष्यात प्रेम कायम राहावं असं वाटत असेल तर खालील गोष्टी लक्षात घ्या :

* तुमचे पती तत्त्वज्ञानी असतील तर तुम्हीदेखील त्याबाबत तुमचं ज्ञान वाढवा. त्यांना कधीही शुष्क वा उदास चेहऱ्याने तुमच्या अरुचिपणाची जाणीव करू देऊ नका.

* तुम्ही जर कवीच्या पत्नी असाल, तर समजून जा की वीणेच्या कोमल तारा छेडत राहाणं, हेच तुमचं जीवन आहे. सुंदर राहा, हसत राहा आणि सहृदयतेने पतीवर प्रेम करा. त्यांचं हृदय खूपच कोमल आणि भावुक आहे. तुमच्या वेदना ते सहन करू शकणार नाहीत.

* तुमचे पती जर श्रीमंत असतील, तर त्यांची श्रीमंती तुम्ही मिटवू नका; श्रीमंतीने अधिक प्रभावित होऊ नका अन्यथा पतींना वाटेल की तुमचं सर्व लक्ष फक्त श्रीमंतीवरच केंद्रित आहे. तुम्ही श्रीमंतीकडे दुर्लक्ष करून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाकडे आकर्षित व्हा. विनम्रता आणि प्रतिष्ठेने पैशाचा विनियोग करा. पतींना आपल्या प्रेमाच्या सानिध्यात ठेवा.

* तुमचे पती श्रीमंत नसतील तरी त्यांचा आदर करा. तुम्ही सांगत राहा की तुम्हाला दागिन्यांची अजिबात आवड नाहीए. साध्याशा कपड्यांमध्येदेखील तुमचं सौंदर्य अबाधित ठेवा. चिंता आणि दु:ख विसरून प्रत्येक गोष्टीत त्यांना सोबत करा.

कायम एक गोष्ट लक्षात ठेवा की खरं सुख एकमेकांसोबत आहे, भौतिक सुविधा काही काळ मन रमवितात, कायमच्या नाही.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें