मान्सून स्पेशल : मादकता प्रदान करणाऱ्या शॉर्ट्स

* प्रतिनिधी

पावसाळा असो की उन्हाळा, शॉर्ट्स नेहमीच हॉट व मादक लुक प्रदान करतात. मात्र, परफेक्ट लुक मिळविण्यासाठी आवश्यक आहे, योग्य शॉर्ट्सची निवड. आपली शारीरिक ठेवण लक्षात घेऊन, योग्य शॉर्ट्सची निवड कशी करावी ते आपण इथे जाणून घेऊ, फॅशन डिझायनर नेहा चोप्रा यांच्याकडून :

स्ट्रेट बॉडी शेप

स्ट्रेट बॉडी शेपमध्ये कमनीयता कमी असल्याने, अशा तरुणींनी शरीराच्या खालील भागाला हेवी लुक मिळेल, अशी शॉर्ट्स परिधान केली पाहिजे. उदा. बलून शेप शॉर्ट्स यांच्यासाठी उत्तम ठरतील. त्यामुळे लोअर बॉडीला हेवी लुक मिळेल.

* फ्रंट पॉकेट, प्लीट्स, नॉट किंवा बेल्टवाल्या शॉर्ट्सही यांच्यासाठी परफेक्ट ठरू शकतात.

* वेगळी प्रिंट किंवा टेक्स्चर असलेल्या शॉर्ट्सही वापरून पाहू शकता.

* अशा प्रकारच्या शॉर्ट्ससोबत ऑफ शोल्डर, बोटनेक, व्हाइट व्ही किंवा यू नेक असलेले टॉप खुलून दिसतील.

* कमरेजवळ बेल्ट, नॉट, चेन यासारख्या एक्सेसरीजचा वापर करा, जेणेकरून शरीराच्या खालील भागाला हेवी लुक मिळेल.

पेअर बॉडी शेप

अशा महिलांच्या शरीराचा खालील भाग वरील भागापेक्षा जास्त हेवी असतो. त्यामुळे त्यांच्या मांडया आणि कटीभाग जाड दिसू लागतो. म्हणून अशा तरुणींनी :

* हाय वेस्ट किंवा स्लीम फिटेड शॉर्ट्स परिधान केल्या पाहिजेत. त्यामुळे त्यांचे पाय उंच दिसतील.

* ए लाइन शॉर्ट्सही वापरू शकता, ती हेवी मांडयांना लपवू शकते.

* जर मांडया जास्त जाड दिसत असतील, तर शक्यतो शॉर्ट्स वापरणं टाळलेलंच बरं. त्याऐवजी मिड लेंथ शॉर्ट्सचा वापर करा.

* नॉट्सवाल्या शॉर्ट्स टाळा.

* शरीराला बॅलन्स लुक देण्यासाठी शॉर्ट्ससोबत लाँग टॉप्स परिधान करा.

आर ग्लास बॉडी शेप

जर तुमचा बॉडी शेप आर ग्लास असेल, तर आपली बस्ट लाइन व हिप्सचा भाग दोन्ही हेवी असल्याने, बॉडीला बॅलन्स लुक मिळतो.

* या तरुणी हर प्रकारच्या शॉर्ट्स वापरू शकतात. मिड वेस्ट, हाय वेस्ट, लो वेस्ट इ.

* जर तुमचं पोट सडपातळ असेल, तर शॉर्ट्ससोबत क्रॉप टॉप खुलून दिसेल, तसेच त्यामुळे तुम्हाला हॉट लुक मिळेल. जर मांडया जास्त हेवी असतील तर मात्र मिड किंवा गुडघ्यापर्यंत शॉर्ट्स वापरा.

* शॉर्ट्ससोबत हेवी किंवा प्रिंटेड टॉप वापरण्याऐवजी, हलके टीशर्ट वापरा.

* जर शॉर्ट्ससोबत बेल्ट वापरण्याची इच्छा असेल, तर स्किनी बेल्टची निवड करा.

* मादक लुक मिळविण्यासाठी शॉर्ट्ससोबत स्लिव्हलेस किंवा स्पॅगेटी टॉपचा वापर करा.

ओव्हल बॉडी शेप

यामध्ये बस्ट लाइनपासून थाइजपर्यंतचा भाग हेवी असतो. म्हणून अशा तरुणींनी यांच्या हेवी शरीराला सडपातळ दर्शविणाऱ्या शॉर्ट्स खरेदी केल्या पाहिजेत.

* त्या शॉर्ट, मीडियम, लाँग कोणत्याही लेंथच्या शॉर्ट्स वापरू शकतात.

* प्रिंटेड, रंगीबेरंगी शॉर्ट्सऐवजी एकाच रंगाची प्लेन शॉर्ट्स वापरावी. त्यामुळे शरीराच्या खालील भागाला सडपातळ लुक मिळेल.

* पॉकेट, प्लीट्स, नॉट असलेली शॉर्ट्स वापरण्याची चूक कधीही करू नका. त्यामुळे लोअर बॉडी पार्ट हेवी दिसू लागेल.

* शॉर्ट्ससोबत व्ही नेक लाइन असलेला टॉप सुंदर दिसेल.

अॅप्पल बॉडी शेप

अॅप्पल बॉडी शेप असलेल्या महिलांचा शरीराचा वरील भाग, पोटाचा भाग लोअर बॉडी पार्टपेक्षा जास्त हेवी असतो. अशा वेळी शॉर्ट्स खरेदी करताना खालील गोष्टींची काळजी घ्या :

* हाय वेस्टच्या शॉर्ट (कमी लांबीच्या) शॉर्ट्स यांच्यासाठी उत्तम ठरू शकतात.

* शॉर्ट्ससोबत मफिन टॉप्स वापरा. त्यामुळे पोट सहजपणे लपविता येईल.

* बॅक पॉकेट शॉर्ट्ससुद्धा यांच्यासाठी उत्तम पर्याय आहे. मात्र, फिटेड शॉर्ट्स किंवा बेल्ट असलेल्या शॉर्ट्स वापरण्याची चूक करू नका.

* शॉर्ट्ससोबत सैल टॉप मुळीच वापरू नका.

कमी उंचीच्या तरुणींसाठी शॉर्ट्स

तसे पाहिलं तर कमी उंचीच्या म्हणजेच बुटक्या तरुणी शॉर्ट्स वापरणं टाळतात. त्यांना वाटतं की, शॉर्ट्स घातल्यास त्या आणखी बुटक्या दिसतील. मात्र लक्षात घ्या, काही गोष्टींची काळजी घेतली, तर कमी उंचीच्या तरुणीही शॉर्ट्स वापरू शकता. या तरुणींनी कमी लेंथ असलेल्या शॉर्ट्स वापरल्यास, त्यांचे पाय उंच दिसतील. अशा प्रकारे त्या आपली शॉर्ट्स वापरण्याची इच्छा पूर्ण करू शकतात.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें