जशी त्वचा टोन, तशी नेल पेंट

* पारुल भटनागर

जेव्हा पण आपण नेलपॉलिश निवडतो तेव्हा अनेक रंग आपल्याला आकर्षित करतात. ते आपल्याला आवडतात, जे आपण विचार न करता खरेदी करतो कारण ते आपल्याला आवडण्याबरोबरच ट्रेंडमध्ये असतात. पण तुम्हाला माहीत आहे का की नखांवर स्किन टोननुसार नेल पेंट न लावल्यास हात आणि नखांचे सौंदर्य तसे दिसून येत नाही, जसे तुम्हाला हवे असते.

अशा परिस्थितीत तुमच्या स्किन टोननुसार नेल पेंट कसा निवडायचा ते आम्ही तुम्हाला सांगत आहोत. या संदर्भात कॉस्मेटोलॉजिस्ट भारती तनेजा सांगत आहेत :

गडद त्वचा टोन

डस्की स्किन टोन हा एक अतिशय आकर्षक टोन मानला जातो कारण या स्किन टोनवर सर्वकाही सूट होते आणि ते खूप आकर्षकदेखील वाटते. अशा परिस्थितीत, जर तुमचा गोंधळ उडत असेल तर तुम्हाला सांगतो की गडद शेड्स, गुलाबी, केशरी, गाजर, गडद तपकिरी किंवा मग याशी मिळतेजुळते शेड्स तुमच्या त्वचेच्या टोनवर चांगले दिसतील.

कोणते रंग टाळावेत : या स्किन टोनवर सर्व रंग चांगले दिसतात, त्यामुळे कोणताही रंग टाळण्याची गरज नाही.

फेयर स्किन टोन

तुमची त्वचा खूप गोरी आहे आणि तुमच्यावर तर सर्व काही छान दिसेल असा जर तुम्ही विचार करत असाल तर कदाचित ही तुमची चूक आहे कारण काही न्यूड शेड्स तुमच्या नखांवर अजिबात छान दिसणार नाहीत. तुमच्या त्वचेच्या टोनवर गुलाबी, हलका जांभळा, मध्यम आणि गडद लाल, निळयाचे सर्व शेड्स, गुलाबी रंगाचे शेड्स खूप छान दिसतील.

कोणते रंग टाळावेत : काळा, गडद हिरवा, केशरी रंग यासारखे गडद शेड्स तुमच्या नखांना खूप जास्त चमकदार बनविण्याबरोबरच नखांचे सौंदर्य ही नाहीसे करण्याचे काम करतील. त्यामुळे त्यांना टाळा.

गडद त्वचा टोन

जेव्हा आपली त्वचा गडद असते, तेव्हा आपल्याला वाटते की आपली त्वचा तर आधीच गडद आहे, त्यामुळे गडद रंग आपल्याला शोभणार नाहीत. म्हणूनच आपण फक्त हलके रंग निवडले पाहिजेत.

पण प्रत्यक्षात ते आपल्या विचाराच्या अगदी विरुद्ध आहे कारण आपली त्वचा जर गडद असेल तर तुम्हाला गडद हिरवा, बरगंडी, गडद लाल इत्यादी रिच किंवा गडद शेड्स अधिक चांगले दिसतील. आपण चमकदार केशरी आणि चमकदार गुलाबी रंगदेखील अवश्य वापरून पहा.

कोणते रंग टाळावेत : तपकिरी रंगाचे नेलपेंट लावू नका कारण त्यामुळे तुमची नखे फिके दिसतील. सिल्व्हर, व्हाईट, निऑन शेड्स यांसारख्या उन्हाळयातील ट्रेंडी पेस्टल रंग तुम्ही पूर्णपणे टाळावेत.

पेल स्किन टोन

जेव्हा आपण गोऱ्या त्वचेबद्दल बोलतो तेव्हा आपण गोरे तर असतो, परंतु आपल्या त्वचेत थोडासा पिवळसरपणाही असतो आणि या प्रकारच्या त्वचेच्या टोनला पेल स्किन टोन म्हणतात. या त्वचेच्या टोनसाठी नेल पेंट थोडेसे पाहून निवडणे आवश्यक असते. अशा टोन असलेल्यांनी पेस्टल शेड्स, लाइट शेड्स, लाल, जांभळा इत्यादी हलक्या शेड्स लावाव्यात.

कोणते रंग टाळावेत : काळा, मरून असे फारसे गडद शेड्स अजिबात लावू नका. हातावर थोडासा पिवळसरपणा असल्याने पिवळा सोनेरी शेड्सदेखील टाळा.

बँडेड नेल पेंटच सर्वोत्तम

तुम्हाला आज बाजारात विविध रंग आणि प्रकारांमध्ये स्थानिक नेल पेंट्स मिळतील, जे तुमच्या बजेटमध्ये असल्याने तुम्ही एकावेळी अनेक शेड्स खरेदी करता, जे भले दिसायला चांगले वाटतील पण तुम्हाला माहिती आहे का की त्यात असे घटक असतात, जे हार्मोन्सचे संतुलन बिघडवतात तसेच मधुमेहास कारणीभूत ठरतात, म्हणून जेव्हाही तुम्ही नेल पेंट खरेदी कराल तेव्हा याची खात्री करा की ते ब्रँडेड असण्याबरोबरच अधिकाधिक नैसर्गिक घटकांपासून बनवलेले असतील, रसायनांचा वापर कमीत कमी झाला असेल आणि तसेच नखांना मॉइश्चरायझ करणारी गुणधर्मदेखील असावेत.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें