असे दिसा ऑफिसमध्ये स्मार्ट

– गरिमा पंकज

ऑफिसात प्रेझेंटेबल आणि प्रोफेशनल दिसायचे असेल तर आपल्या ड्रेस आणि मेकअपला एक स्मार्ट कॉर्पोरेट लुक द्या आणि लोकांवर सकारात्मक प्रभाव पाडण्यात तुम्ही कशा यशस्वी होता ते पहा.

टीबीसी बाय नेचरच्या एमडी, मोनिका सूद सांगत आहेत ऑफिस मेकअपच्या काही खास टीप्स :

डोळे

* डोळयांच्या मेकअपची सुरुवात चांगला बेस आणि आय प्रायमर लावून करा. डोळयांचा मेकअप करताना आयब्रोजकडे दुर्लक्ष करू नका. वेळ नसल्यास आयब्रोजसाठी क्लिअर ब्राउन जेलचा वापर करणे क्रमप्राप्त असते.

* लाँगलास्टिंग मस्काराचा वापर करा, जो सात ते आठ तास टिकून राहील.

ओठ

* दररोजच्या म्हणजे साधारण लुककरता न्यूड पेन्सिल किंवा ग्लॉस वापरणे योग्य असते, कारण त्याला दिवसातून कधीही सहजगत्या रिअप्लाय करता येणे शक्य असते.

* दररोजसाठी न्यूट्रल पिंक आणि सॉफ्ट सेबल कोरल शेडचा वापर तर विशेष प्रसंगी बोल्ड शेडचा वापर करावा.

* डोळयांवर डार्क कलर लावण्याऐवजी काही कलर अॅड करा. लिप मेकअपसाठी डार्क शेडसचा वापर करा.

* रेट्रो वर्किंग लेडी लुक मिळवण्यासाठी तुमच्या स्किनटोनला मॅच करणाऱ्या बेरी किंवा ब्राऊन रेड शेडचा वापर करा.

गाल

* चेहऱ्यावर निखार येण्यासाठी गालांवर हलकासा ब्लश असणे जरुरी असते.

* कामाच्या ठिकाणी जास्त शिमरी मेकअप प्रोडक्ट्सचा वापर टाळा.

* चीकबोन्सवर हलकासा शिमर मात्र खुलून दिसतो.

या गोष्टींकडेही लक्ष द्या

* अधिक काळ टिकणाऱ्या आणि कमी मेंटेनन्स असलेल्या प्रोडक्ट्सचा वापर करा.

* मेकअपच्या साहाय्याने आपल्या चेहऱ्यावरील स्पेशल फिचर्स खुलून येतील याचा प्रयत्न करावा.

* मेकअपने इतरांचे लक्ष वेधणे ठीक आहे, पण लक्षात असू द्या की असे होऊ नये. समोरची व्यक्ती तुमचे महत्त्वाचे म्हणणे ऐकण्याऐवजी तुम्हाला टक लावून पाहत बसेल असे

ऑफिसमध्ये कशी असावी हेअरस्टाइल

* मध्यम लांबीचे केस नेहमीच ट्रेंडी वाटतात. तुम्ही ते स्ट्रेट ठेऊ शकता किंवा हलक्या ब्राऊन किंवा दुसऱ्या डार्क शेड्समध्ये कलर करून घेऊ शकता. अनेक प्रकारच्या हेअरस्टाइल तुम्ही करू शकता किंवा स्टायलिश लुक देऊन केस मोकळेही ठेऊ शकता.

* घनदाट केस हे नेहमीच मुलींना आवडत आले आहेत. केस लहान असोत किंवा मोठे ते घनदाट असल्यास शोभून दिसतात. लहान केसांना कलर आणि हेअरड्रायरच्या मदतीने कर्ली किंवा स्ट्रेट करूनही व्हॉल्युमने परिपूर्ण बनवू शकता.

एल्प्स ब्युटीपार्लरच्या फाउंडर, डायरेक्टर भारती तनेजांकडून जाणून घेऊया ऑफिससाठी काही खास परफेक्ट हेअरस्टाईल्स :

कॉर्पोरेट बन

सर्वप्रथम केस कंगव्याने सोडवून, त्यावर जेल लावून सेट करून घ्यावेत जेणेकरून ते सहजपणे चिकटतील. त्यानंतर साइड पार्टीशन करून बोटांनी विंचरल्यासारखे सगळे केस मागे घेऊन त्याचा बन करून तो बॉब पिनेने फिक्स करावा. या बनला हलकासा फॅशनेबल टच देण्यासाठी स्टाइलिश एक्सेसरीजने सजवा किंवा कलरफुल पिनांनी सेट करा.

स्लिक्ड बॅक पोनी

केसांना प्रेसिंग मशीनने स्ट्रेट लुक द्या आणि त्यानंतर हलकेसे जेल लावून घ्या. यामुळे स्लिक लुक येईल आणि स्टाइलही बराच वेळ टिकून राहील. त्यानंतर क्राऊन एरियातून केस मागच्या बाजूला विंचरत कानांच्या लेव्हलला टाइट पोनी टेल बांधून घ्या. पोनीटेलचा हा लेटेस्ट पॅटर्न केवळ फॉर्मल आउटफिटच नाही तर कॅज्युअलवरही खुलून दिसतो.

वेट वेव्ही हेअर

पुढील केसांना जेल लावून सेट करून घ्या जेणेकरून पुढून केस चिपचिपीत दिसणार नाहीत. नंतर केसांच्या बटांना जेल आणि पाणी लावत कॅप रोलर लावून असेच काही वेळ राहू द्या. जवळजवळ एक-दोन तासांनी हे रोलर्स मोकळे करा. केस वेव्ही आणि कर्ली दिसतील. तसेच वेट लुकमुळे केस चमकदार तर दिसतीलच आणि कर्ल्सही पण बराच वेळ टिकून राहतील.

ड्रेसिंग सेन्स

रोपोसोच्या फॅशन हेड सिद्धिका गुप्तांकडून जाणून घेऊया २०१७ चे वर्कवेअर ट्रेंड :

* पॅन्ट सोबत डिकन्सट्रक्टेड ड्रेस घाला. हा ड्रेस डिस्ट्रक्चर्ड असतो आणि विस्तारित रफल्स आणि असमान हेमलाइनसह सैल असतो. मोठया आकाराच्या रफल्स प्रमाणबद्धरित्या वापरून स्त्रीत्वाचा स्पर्श दर्शवू शकता, पण ते विचित्र वाटू नये यासाठी आकर्षक वेस्टलाइन आणि हेमलाइन कर्व्स कट करा.

* २०१७ च्या फॅशनमध्ये स्ट्राइप्सची चलती आहे. आवडत असल्यास वेगवेगळया आकाराच्या स्ट्राइप्स एकत्र करू शकता. उभ्या स्ट्राइप्स वापरून उंच दिसण्याचा आभासही आपण निर्माण करू शकता.

स्टेटमेंट स्लीव्ज

आपला वॉर्डरोब स्लीव्ह स्लिट, वन शोल्डर्स, पफ शोल्डर्सनी भरा. या स्टाइलची नवी अपडेट आहे ओव्हरसाइज्ड सिल्हूट आणि लॉन्ग स्लीव्ह, जिथे हॅम्स जवळपास गुडघ्यास घासून जाणारे दिसतात.

खाकी

शर्ट ड्रेसपासून बेल्टेड स्कर्टपर्यंत, रन वेपासून वर्कप्लेस पर्यंत खाकीचा खूप वापर होत आहे.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें