मान्सून स्पेशल : रिमझिमधील मेकअप ट्रिक्स

* शैलेंद्र सिंह

मान्सून सीजनमध्ये घाम आणि पावसाचे पाणी मेकअप खराब करते. अशात मेकअप तुम्हाला सुंदर नाही तर कुरूप बनवतो. मेकअपच्या दुनियेत वॉटरप्रूफ मेकअप प्रॉडक्ट्सने पदार्पण केल्यानंतर मेकअपचे टेंशन आता दूर झाले आहे.

वॉटरप्रूफ मेकअपची सर्वात मोठी खासियत म्हणजे पावसाचे पाणीही याचे काहीही बिघडवू शकत नाही. फक्त पावसातच नाही तर रेन डान्स आणि स्विमिंग पूलचा आनंद घेतानाही वॉटरप्रूफ मेकअप आपली कमाल दाखवतो. घाम आल्यावर मेकअप त्वचेच्या रोमछिद्रांत झिरपत जातो. ज्यामुळे तो खराब होतो.

त्वचेच्या रोमछिद्रांतून मेकअप शरीरात जाणार नाही हे काम वॉटरप्रूफ मेकअप करतो. त्वचेची रोमछिद्रे बंद करून केलेला मेकअपच वॉटरप्रूफ मेकअप असतो.

मान्सूनमध्ये वॉटरप्रूफ मेकअप उत्पादने वापरणे हा सोपा उपाय आहे. तुम्हाला हवे असल्यास कॉम्पॅक्ट पावडर आणि फाउंडेशनही वापरू शकता. ते तुम्ही हळुवारपणे ओल्या स्पंजने लावू शकता किंवा मग सुकी पावडरही लावू शकता. नेहमी लिपस्टिक, मस्कारा, आयलाइनर यांचे २ कोट लावा म्हणजे ते बराच वेळ टिकून राहतील. कोणतेही उत्पादन खरेदी करताना हे तपासून घ्या की ते वॉटरप्रूफ आहे की नाही आणि ते किती वेळ टिकून राहते.

ब्लशर : पावडर ब्लश ऐवजी तुम्ही क्रीम ब्लशचा वापर करू शकता. जर तुम्हाला कलर आणखी थोडा हायलाइट करायचा असेल तर क्रीम ब्लशवर पावडर ब्लश लावा. ज्यामुळे तो जास्त वेळ तुमच्या गालांवर टिकून राहील. हा तुमच्या चेहऱ्यावर चमक आणि कलर आणण्यासोबतच तुमचे सौंदर्यही वाढवतो.

बँग्स : बँग्स म्हणजे डोक्यावरील पुढचे आखूड केस अनेक महिला पसंत करतात, पण ते अनेकदा मान्सूनमध्ये गुंततात. बँग्स जवळजवळ चेहऱ्याचा अर्धा भाग झाकतात. ज्यामुळे त्वचा श्वास घेऊ शकत नाही आणि वातावरणातील ओलाव्यामुळे घाम येऊ लागतो. यामुळे न केवळ केस चिकट दिसू लागतात तर गरमी आणि घाम यामुळे तुम्हाला मुरुमही होऊ शकतात.

काजळ : काजळ लावलेले डोळे नेहमीच सुंदर दिसतात, पण जेव्हा हवेत ओलावा असतो, तेव्हा काजळ पसरण्याची शक्यता असते. मग डोळयांकडे पाहताना असे वाटते की तुमच्या  डोळयांखाली डार्क सर्कल्स आले आहेत. त्यामुळे वॉटरप्रूफ लिक्विड लायनर लावा.

वॉटरप्रूफ मस्कारा : पावसाळयात वॉटरप्रूफ मेकअपच केला गेला पाहिजे. वॉटरप्रूफ मस्कारा वापरा किंवा मग क्लिअर मस्काराही उत्तम पर्याय असू शकतो.

लिक्विड फाउंडेशन : आर्द्र मोसमात लिक्विड फाउंडेशन चेहऱ्यावर वितळू लागते. जास्त फाउंडेशन लावणे त्यामुळे योग्य नसते. एकसारखे टेक्श्चर आणि डागविरहित बेस मिळवण्यासाठी बीबी क्रीम किंवा ऑइल फ्री कुशन फाउंडेशन वापरा.

क्रीमी कंसीलर : मान्सूनमध्ये कंसीलरचा वापर टाळा, कारण घामाचा हा मोसम कंसीलरला चेहऱ्यावर टिकू देत नाही, पण जर कंसीलरची खरोखरच आवश्यकता असेल तर क्रीमी कंसीलरचा पर्याय निवडता येतो.

ग्लिटर आयशॅडो : ग्लिटर आयशॅडो अनेक महिलांच्या पसंतीस उतरते, मात्र मान्सूनमध्ये याचा वापर तुम्हाला एक भयावह लुक देऊ शकतो. हवेतील ओलावा ग्लिटरला चिपचिपीत आणि डागयुक्त दर्शवू शकतो आणि जर पाऊस पडला तर नक्कीच तुमचा आयशॅडो तुमच्या गालांना एक डागाळलेली चमक देईल. ग्लिटर वाहून डोळयांतही जाऊ शकतो, ज्यामुळे तुम्हाला डोळयांच्या तक्रारी उद्भवू शकतात.

स्ट्रेट हेअर : ओलाव्यामुळे केस चिपचिपीत आणि विस्कटलेले दिसू लागतात. जर तुम्ही यापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी हेअर स्ट्रेटनिंग करण्याचा पर्याय अवलंबणार असाल तर ही चूक मुळीच करू नका. कारण फक्त काही दिवसच तुमचे केस मुलायम आणि चमकदार दिसतील, पण हे दीर्घकाळ टिकून राहणार नाही. याऐवजी केसांना पोषण देणाऱ्या ट्रीटमेंट्स करून पहा.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें