सौंदर्य समस्या

* डॉ. भारती तनेजा, ऐल्प्स ब्युटी क्लीनिक फाऊंडर, डायरेक्टर

माझे केस खूपच कोरडे आहेत. मला त्यामध्ये चमक आणायची आहे. चमक आणण्यासाठी एखादा उपाय सांगा?

जर केस कोरडे असतील तर त्यांना पोषणची गरज असते. खाण्यात प्रोटीनचे प्रमाण वाढवा ज्यामुळे केसांना न्यूट्रिशन मिळेल आणि त्यांचा रफनेच कमी होईल. कोरड्या केसांसाठी खास शॅम्पू मिळतात ज्यांच्या वापरामुळे तुम्ही केसांचा रफनेस कमी करू शकता. त्यानंतर यामध्ये कंडीशन लावणं गरजेचं आहे. केस धुतल्यानंतर त्यांच्या लेंथमध्ये कंडिशन लावून ३ ते ५ मिनिटे राहू द्या आणि त्याचवेळी कोंब करा म्हणजे कंडीशनर पूर्ण केसांवरती योग्य प्रकारे पसरेल. त्यानंतर कंडिशनर धुवून घ्या. तुमच्या केसांची शायनिंग वाढेल. तरीदेखील जर तुम्हाला वाटतंय की केसांचा रफनेस जात नाहीये, तर त्यामध्ये ‘लिव इन’ कंडिशनर लावा, ज्यामुळे केसांमध्ये शायनिंग येते. केसांना सेट केल्यानंतर मॉइश्चरायझिंग स्प्रे व शायनिंग स्प्रे लावल्यास केसांमध्ये शाईन येते.

मी ४७ वर्षांची आहे आणि माझी मासिकपाळी बंद झालीये. माझा चेहरा आणि हनुवटीवर खूप केस येताहेत, ते रोखण्यासाठी व परमनंटली काढण्यासाठी उपाय सांगा?

मासिक पाळी बंद झाल्यावर शरीरावर केस येणं हे शरीरात हार्मोन्सच्या स्तराच्या बदलामुळे होतं. सर्वप्रथम तुम्ही एखाद्या चांगल्या स्त्रीरोग तज्ञाचा सल्ला घ्या आणि रक्ताची हार्मोनल तपासणीदेखील करून घ्या. हे बॅलन्स करण्यासाठी काही औषधे घ्या. ही प्रोसिजर मोठी आहे परंतु औषध घेतल्यानंतर तुम्ही बराच महिने बॅलन्स करू शकता. यासोबतच जर तुमच्या केसांचा रंग काळा आहे आणि यापासून तुम्हाला मुक्ती हवी असेल तर लेझर वा पल्स लाईट तंत्रज्ञानाचा वापर करा. नको असलेल्या केसांपासून लवकरच परमनंट सुटका मिळते. हे तंत्रज्ञान सुरक्षित, पेनलेस आणि क्विक आहे. २-३ सेटिंग्स घेतल्यानंतर केसांची ग्रोथ खूपच कमी होते. वॅक्सिंग, थ्रेडिंग इत्यादींच्या त्रासापासून सुटका मिळते. ४ ते ६ आठवड्याच्या अंतरामध्ये याची सेटिंग घेणं गरजेचं असतं. जर तुमचे काही केस पांढरे झाले असतील तर त्यासाठी तुम्ही थर्मालीसीस करून घेऊ शकता. कारण पांढऱ्या केसांवर लेझर वा पल्स लाईट काम करत नाही.

माझं वय २१ वर्षे आहे. अनेक वर्षांपासून चष्मा लावल्यामुळे माझ्या डोळ्याच्या भोवती काळी वर्तुळं बनली आहेत. ही वर्तुळं खूप वाईट दिसतात. यामुळे मला खूप त्रास होतो. घराबाहेर पडावसं वाटत नाही. कृपया एखादा उपाय सांगा?

जर तुम्ही चष्म्याचा वापर गरजेपेक्षा कमी करत असाल तर तुमच्या डोळ्याच्या मास पेशींवरती जोर टाकल्यामुळे त्या कमजोर होतात. यामुळे तुमचं ब्लड सर्क्युलेशन कमी होऊ लागतं, ज्यामुळे तुमची काळी वर्तुळं वाढतात. तुम्ही या गोष्टीची काळजी घ्या की डोळ्यांवरती जास्त जोर पाडू नका. चष्मा लावून देखील तुमच्या डोळ्यांवरती दबाव पडला तर तज्ज्ञांकडून डोळ्यांची तपासणी पुन्हा करून घ्या. अन्यथा चष्म्याचा सतत वापर करत रहा. चष्म्याच्या जागी तुम्ही लेन्स लावू शकता. अलीकडे लेन्स नॅचरलच नाही तर अनेक विविध रंगांमध्ये मिळतात आणि तुमचं सौंदर्य अधिक उजळतं. या व्यतिरिक्त तुमच्या डोळ्यांवर बदामाच्या तेलाचे काही थेंब डोळ्यांवरती रिंग फिंगरने हलकं हलकं बाहेरून आतल्या बाजूने गोल गोल मसाज करा. काकडी किसून तुमच्या डोळ्यांवरती १० ते १५ मिनिटे ठेवा. यामुळेदेखील तुमचे काळे डाग बरेचसे कमी होतील. एलोवेराचे पानांना घेऊन धुऊन त्याच्या आतील पल्प काढून घ्या.

पल्पमध्ये काही थेंब विटामिन ए तेल टाका आणि काहीच थेंब मधाचे थेंब टाका. त्यानंतर या तिघांना एकत्रित करून तुमच्या डोळ्याच्या चहुबाजूनी थोडावेळ मसाज करा आणि सकाळी डोळे स्वच्छ धुऊन घ्या. असं सतत केल्यामुळे तुमच्या डोळ्याची काळी वर्तुळं बरीचशी कमी होतील.

माझं वय २२ वर्षं आहे. माझं लग्न होणार आहे. मी दिसायला छान आहे परंतु माझी अडचण ही आहे की माझ्या ब्रेसचा आकार खूप लहान आहे. यामुळे मला खूप संकोच वाटतो. मला मदत करा?

सर्वप्रथम तुम्ही एखाद्या गायनाकॉलॉजिस्टकडून तुमच्या शरीराची चांगली तपासणी करून घ्या आणि हार्मोन्सची तपासणी करा. जर यामध्ये काही अडचण असेल तर त्याचं औषध घ्या, ज्यामुळे तुमच्या स्तनांचा आकार वाढू शकतो या व्यतिरिक्त तुम्ही असा काही खास व्यायाम करा ज्यामुळे ब्रेस्टची वाढ होण्यास मदत मिळते. जसं की तुम्ही स्विमिंग बॅक स्ट्रोक करू शकता. दोरीने मागे उड्या मारण्याचा व्यायाम करू शकता. एखाद्या चांगल्या ब्रेस्ट डेव्हलपमेंट तेलाने ब्रेस्ट खालून वरच्या दिशेने मालिश करायला सुरुवात करा. यामुळे देखील काही फरक पडू शकतो. यामुळे रक्तसंचारत वाढ होईल आणि ब्रेस्टच्या विकासात मदत मिळेल. आहारात दूध, पनीर, फळं आणि अंड्यांचा वापर करा. यामुळे तुम्हाला चांगलं न्यूट्रिशन मिळेल आणि ब्रेस्टमध्ये वाढ होईल. एखाद्या चांगल्या कॉस्मेटिक क्लिनिकमध्ये जाऊन ब्रेस्टच्या वाढीसाठी खास सेटिंग्स घेऊ शकता. कोबीची मोठमोठी पान घेऊन बर्फाच्या थंड पाण्यामध्ये टाका आणि थंड झाल्यावरती तुमच्या ब्रेस्टवरती लावून थोडावेळ ठेवा. यामुळे देखील स्तनांचा आकार वाढण्यात मदत मिळते. जर हे सर्व उपाय यशस्वी झाले नाही तर तुम्ही सर्जरीदेखील करू शकता. यामध्ये जो कट येतो तो अगदी ब्रेस्टच्या खाली असतो, जो साधारणपणे दिसत नाही आणि ही सर्जरी बरीच वर्षापर्यंत चालते. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुमचं आयुष्य तुम्ही अधिक चांगल्या प्रकारे जगू शकाल.

मनाजोगती ब्रेस्ट साईज

* शैलेंद्र कुमार

हेमाचे लग्न ठरले होते. पण ती आनंदी दिसण्याऐवजी तिला न्यूनगंडाने ग्रासले होते. कारण तिच्या ब्रेस्टची साईज खूपच कमी होती. तिला वाटत होते की या कारणामुळे तिचे भावी वैवाहिक जीवन चांगले व्यतित होणार नाही. हेमाने ब्रेस्ट साईज वाढवण्याकरिता खूप सारी औषधे व मसाज क्रीम्स वापरून पाहिली. पण काही फायदा झाला नाही. एके दिवशी हेमाला कोणाकडून तरी कळले की ब्रेस्ट इम्प्लांट आणि फॅट इंजक्शनद्वारे ब्रेस्ट साईज वाढवता येऊ शकते.

ब्रेस्ट इम्प्लांटमध्ये सिलिकॉन पॅड ब्रेस्टच्या आत टाकून साईज वाढवण्यात येते. पण लग्नाआधी मुली असे ऑपरेशन करायला बिचकतात. त्यांना वाटते की कोण जाणे ज्याच्याशी आपले लग्न होत आहे, त्याला या सर्जरीबाबत काय वाटेल. पण फॅट इंजक्शनद्वारे ब्रेस्टची साईज वाढवण्यात काही अडचण नसते. म्हणूनच मुलींना फॅट इंजेक्शनद्वारे ब्रेस्टचा आकार वाढवणे योग्य वाटते.

अचूक साईज

ब्रेस्टची साईज कप साईजवर अवलंबून असते. महिलांच्या ब्रेस्टची साईज ‘ए’ पासून सुरु होऊन एचपर्यंत वाढतो. ‘सी’ आणि ‘डी’ साईज भारतीय सौंदर्यात सर्वात सुंदर मानला जाते. ब्रेस्टचा साईज किशोरावस्थेपासून तर आई बनेपर्यंत बदलत राहते. महिलेचे वय आणि उंची यानुसार सुंदरतेमध्ये मोडणाऱ्या आकर्षक ब्रेस्टला सुंदर मानले जाते. सर्वात लहान साईजला हायपोमेस्टिया आणि सर्वात मोठया साईजला जिंगटोमेस्टिया म्हणतात. या दोन्ही साईज महिलांच्या मनात न्यूनगंड निर्माण करतात.

ब्रेस्टची लहान साईज नैसर्गिक बाब असते. पण अलीकडच्या काळात स्त्रिया हे स्विकारू शकत नाहीत. ब्रेस्टचा आकार नीट नसणे त्यांच्यात न्यूनगंड उत्पन्न करतात. त्या ब्रेस्टचा योग्य आकार मिळवण्यासाठी त्या सर्वतोपरी प्रयत्न करतात. खूप महिलांच्या बाबतीत लग्न व मूल झाल्यावर ब्रेस्ट साईजमध्ये बदल दिसून येतो. पण  काही वेळा असे घडतसुद्धा नाही.

अशा प्रकारच्या केसेसमध्ये कॉस्मॅटिक सर्जरीद्वारे ब्रेस्ट इम्प्लांट अथवा फॅट इंजेक्शनद्वारे मनाजोगता आकार मिळवता येतो. कधी कधी तर एक स्तन लहान तर दुसरे मोठे असेही आढळून येते. साधारणत: हा फरक एवढा किरकोळ असतो, कोणाच्या लक्षातदेखील येत नाही. जर साईजचा फरक दुरून लक्षात येत असेल तरी ब्रेस्ट इम्प्लांट व फॅट इंजक्शन हे दोन्ही उपाय प्रभावी ठरतात.

सोपा उपाय फॅट इंजक्शन

विनायक कॉस्मॅटिक सर्जरी हॉस्पिटल, लखनौचे सर्जन डॉ. अनुपम सरन सांगतात की ब्रेस्टचा आकार वाढवण्याकरिता फॅट इंजेक्शनचा मार्ग ब्रेस्ट इम्प्लान्टपेक्षा कितीतरी पटीने उत्तम मानला जातो. या प्रक्रियेत जिच्या ब्रेस्टचा आकार वाढवायचा असतो, तिच्या पोटावरील अथवा जांघेतील फॅट्स काढून इंजक्शनने ते ब्रेस्टमध्ये सोडण्यात येतात.

हे ब्रेस्ट इम्प्लांटपेक्षा स्वस्त असते. ब्रेस्ट व्यवस्थित आकारात यायला २-३ महिने लागतात. गरज भासल्यास ही ट्रीटमेंट परत २ वर्षांनी घेता येते. याचे वैशिष्टय हे आहे की यात ब्रेस्ट वाढवताना सर्जरीची कोणतीही खूण राहात नाही. याचा खर्च रुपये २५-३० हजारपर्यंत येतो, या उलट ब्रेस्ट इम्प्लांटमध्ये रुपये ६० ते ७० हजारापर्यंत खर्च येतो. ब्रेस्ट इम्प्लांटमध्ये सिलिकॉन पॅड ब्रेस्टमध्येही टाकण्यात येतो. साधारणत: याचे कोणतेही साईडइफेक्टस नसतात.

फॅट इंजक्शनद्वारे ब्रेस्ट साईज कोणत्याही वयात वाढवता येते. लग्ना आधीसुद्धा या मार्गाने ब्रेस्टचा आकार वाढवता येतो. असे केल्यावर  २-३ महिने टाईट ब्रा घालायला हवी. फॅट इंजेक्शन ट्रीटमेंट घेतल्यानंतर ४ आठवडयांनी तुम्ही सेक्स करू शकता. ही ट्रीटमेंट घेण्याअगोदर व नंतर तुमची मॅमोग्राफी केली जाते.

ब्रेस्ट कॅन्सरच्या ऑपरेशन नंतरही उपयोगी

ब्रेस्ट कॅन्सरच्या ऑपरेशननंतर जेव्हा ब्रेस्ट साईज बिघडते तेव्हा त्यात इंजेक्शनद्वारे फॅट टाकून हा आकार व्यवस्थित केला जातो. पूर्वी हा आकार नीट करण्यासाठी कातडी लावून नीट केले जायचे, पण यामुळे मनाजोगता आकार मिळत नसे. फॅट इंजक्शनमुळे कॅन्सरच्या महिला रुग्णांना दिलासा मिळू लागला आहे. आता मनाजोगता आकार प्राप्त होणे ही फार मोठी कठीण गोष्ट राहिली नाही. ब्रेस्ट कॅन्सरच्या स्त्रियांसाठी फॅट हे इंजेक्शन खूप मोठा दिलासा घेऊन आले आहे

मनाजोगत्या आकारासाठी ब्रेस्ट इम्प्लांट

पूर्वी ब्रेस्ट इम्प्लांटसाठी सिलिकॉन इम्प्लांटचा वापर केला जात असे. पण आता आधुनिक तंत्राच्या सहाय्याने ब्रेस्ट इम्प्लांटमध्येही खूप बदल झाले आहेत. यामुळे ब्रेस्टला नैसर्गिक रूप प्राप्त होते. ब्रेस्ट इम्प्लांटसाठी मेमरी ग्रंथीच्या खाली सर्कमरिओलेर, आर्मपिट वा ट्रान्सबिलिकलमध्ये चिरा देऊन सिलिकॉन पॅड घातला जातो. बहुतेक प्रकरणात मेमरी ग्रंथीच्या खाली चिरा देऊन इम्प्लांट केले जाते, ज्यामुळे खूण लपली जाते आणि हळूहळू नाहीशीही होते

ऑपरेशननंतर त्वचा आक्रसल्याने काही दिवस वेदना जाणवतात. त्या नाहीशा करण्याकरिता औषध दिले जाते. बाजारात अनेक साईजचे इम्प्लांट्स मिळतात ज्यांची किंमत ३० ते ३५ हजार रुपयांच्या आसपास असते. याशिवाय जवळपास इतकाच खर्च औषधे आणि सर्जरीलाही येतो. म्हणजे एकूण खर्च ९०-९५ हजार रुपयांच्या आसपास असतो. हे ऑपरेशन साधारण एक तासाचे असते. ऑपरेशननंतर फारसा त्रास होत नाही. पतिला सांगितल्याशिवाय कळत नाही की तुम्ही ब्रेस्ट इम्प्लांट केले आहे. आई बनल्यानंतर बाळाला दूध पाजण्यात कोणतीही अडचण येत नाही आणि तुम्हाला हवे तेव्हा हे काढून टाकता येते.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें