डोळ्यांखाली काळी वर्तुळे असतील तर अशा प्रकारे कमी करा

* गृहशोभिका टीम

डोळ्यांखाली काळी वर्तुळे आल्याने आपला चेहरा खराब होतो. या काळ्या वर्तुळांमुळे व्यक्ती थकल्यासारखे आणि वृद्ध दिसते. शरीरात पोषक तत्वांची कमतरता, झोप न लागणे, मानसिक ताणतणाव किंवा संगणक प्रणालीवर जास्त वेळ काम करणे यासारख्या अनेक कारणांमुळे ही समस्या उद्भवू शकते, त्यामुळे यापासून मुक्त होण्यासाठी तुम्हाला युक्ती माहित असणे आवश्यक आहे. चला तर मग जाणून घेऊया या समस्येपासून सुटका करण्यासाठी उपाय.

काकडी आणि बटाटा

काकडी किंवा बटाटा ठेचून डोळ्यांवर ठेवा. काही वेळ डोळे मिटून ठेवल्यानंतर ते गडद भागावर हलक्या हाताने फिरवा. यामुळे डोळ्यांभोवतीचा फुगवटा कमी होईल आणि अंधारही कमी होईल.

टोमॅटो पेस्ट

१ टोमॅटो, १ चमचा लिंबाचा रस आणि चिमूटभर बेसन आणि हळद घेऊन मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. ही घट्ट पेस्ट डोळ्याभोवती लावा आणि २० मिनिटांनी चेहरा धुवा. हे आठवड्यातून तीनदा करा.

बर्फाच्या चहाच्या पिशव्या

काळ्या वर्तुळांवरही थंड चहाच्या पिशव्या वापरता येतात. चहाच्या पिशव्यामध्ये असलेले टॅनिन हे घटक डोळ्यांभोवती सूज आणि काळोख कमी करते.

बदाम तेल

डोळ्यांच्या आजूबाजूच्या संवेदनशील त्वचेवर बदामाचे तेल लावून रात्री झोपू शकता. दुसऱ्या दिवशी सकाळी थंड पाण्याने चेहरा धुवा.

गुलाब पाणी

गुलाब पाण्यात भिजवलेला कापूस बंद डोळ्यांवर ठेवा. हे फक्त 10 मिनिटांसाठी करा. असे केल्याने डोळ्यांभोवतीची त्वचा चमकते.

संत्र्याचा रस आणि ग्लिसरीन

संत्र्याचा रस आणि ग्लिसरीन एकत्र मिसळून रोज डोळ्यांवर आणि आजूबाजूच्या भागात लावा. हे खूप प्रभावी आहे आणि काळी वर्तुळेदेखील दूर करते.

पाणी प्या

कमी पाणी प्यायले तरी काळी वर्तुळे होऊ शकतात. पाणी कमी प्यायल्याने शरीरात रक्ताभिसरण नीट होत नाही आणि डोळ्यांखालील नसांना पुरेसे रक्त मिळत नाही, ज्यामुळे काळी वर्तुळे होतात. त्यामुळे भरपूर पाणी आणि ताज्या फळांचा रस प्या.

डार्क सर्कल्स हटवण्याचे सोपे उपाय

* गरिमा

असं म्हणतात की डोळे आपल्या मनातल्या गोष्टी दर्शवत असतात, पण बहुदा तुम्हाला हे ठाऊक नसेल की डोळे हे आपल्या आरोग्याचेही निदर्शक असतात. स्वस्थ आणि चमकदार डोळयांच्या तुलनेत थकलेले आणि डार्क सर्कल्सने वेढलेले डोळे हे तुमची चुकीची जीवनशैली आणि खराब आरोग्याचे संकेत देत असतात. त्याचबरोबर तुम्ही यामुळे वयस्कही दिसू लागता. मेकअप करून कितीही लपवायचा प्रयत्न केला तरी हे डार्क सर्कल्स लपत नाहीत.

डार्क सर्कल्स का उद्भवतात

डार्क सर्कल्स हे अनियमित जीवनशैली, हार्मोन्समधील बदल, आनुवंशिकता, तणाव इ. अनेक कारणांमुळे होऊ शकतात.

थकवा आणि तणाव : महिला आपल्या तब्येतीविषयी अगदीच बेपर्वाई बाळगत असतात. संपूर्ण दिवस त्या घरातल्या लोकांच्या फर्माईशी पूर्ण करण्याच्या मागे असतात. त्यांना स्वत:च्या खाण्यापिण्याची किंवा आराम करण्याचीही शुद्ध नसते. ऑफिसमध्ये जाणाऱ्या महिलांवर तर कामाचा दुहेरी ताण असतो. अशाप्रकारे तणाव, शारीरिक थकवा, अपूर्ण झोप त्यांच्या डोळयांभोवती डार्क सर्कल्सच्या स्वरूपात येऊ लागते.

आजार : अॅनिमिया, किडणीचा आजार, टीबी, टायफॉइड यांसारख्या आजारातही अशक्तपणामुळे डोळयांखाली डार्क सर्कल्स येऊ शकतात.

पाण्याची कमतरता : डिहायड्रेशनमुळे बहुतेकवेळा अशा प्रकारच्या समस्या उद्भवतात. पाणी कमी प्यायल्याने शरीरात ब्लड सक्युलेशन योग्य प्रकारे होत नाही, ज्यामुळे डोळयांखालील नसांपर्यंत पूर्ण रक्तप्रवाह पोहोचत नाही. परिणामी डार्क सर्कल्स तयार होतात.

व्यसन : धूम्रपान, मद्यपान, कॅफिन किंवा इतर कोणत्याही प्रकारचे व्यसन करण्याची सवय हे डार्क सर्कल्सचे कारण ठरू शकते.

पिगमेंटेशन : प्रखर उन्हात अधिक काळ राहिले तरी डार्क सर्कल्स होऊ शकतात.

मेकअप : डोळ्यांखालील त्वचा खूप पातळ आणि संवेदनशील असते. चूकीच्या मेकअप प्रोडक्ट्सचा वापर डार्क सर्कल्सला कारणीभूत ठरू शकतो.

सोडियम आणि पोटॅशियम यांचे वाढलेले प्रमाण : भोजनातील यांचे वाढलेले प्रमाण यामुळे डार्क सर्कल्स होऊ शकतात. बीन्स, पीनट बटर, योगर्ट, दूध, टॉमेटो, संत्री, बटाटे इ. मध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. जास्त मीठामुळेही शरीरात सोडियम वाढते.

अॅलर्जी निर्माण करणारे खाद्यपदार्थ : डार्क सर्कल्स हे एखाद्या खास खाद्यपदार्थामुळे झालेली अॅलर्जिक रिअॅक्शन किंवा सेन्सिटिव्हिटी याचा परिणामही असू शकतो. चॉकलेट, मटार, यीस्ट, आंबट फळे, साखर हे सामान्य अॅलर्जिक पदार्थ आहेत.

काय आहेत उपाय

संतुलित आणि पौष्टिक भोजन : प्रयत्न करा की तुमच्या आहारात व्हिटॅमिन आणि आयर्नयुक्त खाद्यपदार्थ पुरेशा प्रमाणात असले पाहिजेत. जसे, हिरव्या पालेभाज्या, शेंगभाज्या, मोसमी फळे, मासे अंडी इ. वगैरे.

झोप : तसे तर प्रत्येक व्यक्तिची झोपेची गरज वेगवेगळी असू शकते. पण तरीही एका युवा महिलेने दररोज ६-७ तास झोप घेणे जरुरी असते. रात्री लवकर झोपण्याचा आणि सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करा.

डोळयांचे प्रखर उन्हापासून रक्षण करा : आपल्या डोळयांना अल्ट्राव्हायोलेट किरणांच्या संपर्कात येऊ देऊ नका. कधीही उन्हात जायचे झाल्यास डोळयांवर काळा चष्मा घालूनच जा.

व्हिटॅमिन सप्लिमेंट्स : व्हिटॅमिन बी १२, व्हिटॅमिन ए, के, ई किंवा डी, फॉलिक अॅसिड यांच्या कमतरतेमुळेही डार्क सर्कल्स होऊ शकतात. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने मल्टीव्हिटॅमिन आणि अन्य सप्लिमेंट्स घेऊ शकता.

भरपूर पाणी प्या : दिवसभरात ७-८ ग्लास पाणी अवश्य प्या. डिहायड्रेशन होऊ नये म्हणून ज्यूस, सूप आणि इतर पौष्टिक पेयपदार्थसुद्धा अधूनमधून घेत राहा.

दूध : दूध हे लॅक्टिक अॅसिड, अमिनो अॅसिड, एन्झाइम्स, प्रोटीन आणि इतर अनेक अँटिऑक्सिडंट्सच्या गुणांनी परिपूर्ण असते. त्यामुळे दिवसातून दोनदा दूध पिण्याची सवय करून घ्या.

कंसीलर : एका चांगल्या क्वालिटीच्या कंसीलरचा वापर करा जो त्वचेच्या टोनशी मिळताजुळता असेल. त्याच्या साहाय्याने डार्क सर्कल्स कव्हर करा. मग पावडर लावून सेट करून घ्या.

स्किन पॅच टेस्ट करा : ज्या उत्पादनांमुळे त्वचेची आग होणं, रॅश येणं, डोळयांत वेदना किंवा पाणी येणं असा त्रास होत असेल तर त्यांचा वापर त्वरित थांबवा.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें