मनाजोगती ब्रेस्ट साईज

* शैलेंद्र कुमार

हेमाचे लग्न ठरले होते. पण ती आनंदी दिसण्याऐवजी तिला न्यूनगंडाने ग्रासले होते. कारण तिच्या ब्रेस्टची साईज खूपच कमी होती. तिला वाटत होते की या कारणामुळे तिचे भावी वैवाहिक जीवन चांगले व्यतित होणार नाही. हेमाने ब्रेस्ट साईज वाढवण्याकरिता खूप सारी औषधे व मसाज क्रीम्स वापरून पाहिली. पण काही फायदा झाला नाही. एके दिवशी हेमाला कोणाकडून तरी कळले की ब्रेस्ट इम्प्लांट आणि फॅट इंजक्शनद्वारे ब्रेस्ट साईज वाढवता येऊ शकते.

ब्रेस्ट इम्प्लांटमध्ये सिलिकॉन पॅड ब्रेस्टच्या आत टाकून साईज वाढवण्यात येते. पण लग्नाआधी मुली असे ऑपरेशन करायला बिचकतात. त्यांना वाटते की कोण जाणे ज्याच्याशी आपले लग्न होत आहे, त्याला या सर्जरीबाबत काय वाटेल. पण फॅट इंजक्शनद्वारे ब्रेस्टची साईज वाढवण्यात काही अडचण नसते. म्हणूनच मुलींना फॅट इंजेक्शनद्वारे ब्रेस्टचा आकार वाढवणे योग्य वाटते.

अचूक साईज

ब्रेस्टची साईज कप साईजवर अवलंबून असते. महिलांच्या ब्रेस्टची साईज ‘ए’ पासून सुरु होऊन एचपर्यंत वाढतो. ‘सी’ आणि ‘डी’ साईज भारतीय सौंदर्यात सर्वात सुंदर मानला जाते. ब्रेस्टचा साईज किशोरावस्थेपासून तर आई बनेपर्यंत बदलत राहते. महिलेचे वय आणि उंची यानुसार सुंदरतेमध्ये मोडणाऱ्या आकर्षक ब्रेस्टला सुंदर मानले जाते. सर्वात लहान साईजला हायपोमेस्टिया आणि सर्वात मोठया साईजला जिंगटोमेस्टिया म्हणतात. या दोन्ही साईज महिलांच्या मनात न्यूनगंड निर्माण करतात.

ब्रेस्टची लहान साईज नैसर्गिक बाब असते. पण अलीकडच्या काळात स्त्रिया हे स्विकारू शकत नाहीत. ब्रेस्टचा आकार नीट नसणे त्यांच्यात न्यूनगंड उत्पन्न करतात. त्या ब्रेस्टचा योग्य आकार मिळवण्यासाठी त्या सर्वतोपरी प्रयत्न करतात. खूप महिलांच्या बाबतीत लग्न व मूल झाल्यावर ब्रेस्ट साईजमध्ये बदल दिसून येतो. पण  काही वेळा असे घडतसुद्धा नाही.

अशा प्रकारच्या केसेसमध्ये कॉस्मॅटिक सर्जरीद्वारे ब्रेस्ट इम्प्लांट अथवा फॅट इंजेक्शनद्वारे मनाजोगता आकार मिळवता येतो. कधी कधी तर एक स्तन लहान तर दुसरे मोठे असेही आढळून येते. साधारणत: हा फरक एवढा किरकोळ असतो, कोणाच्या लक्षातदेखील येत नाही. जर साईजचा फरक दुरून लक्षात येत असेल तरी ब्रेस्ट इम्प्लांट व फॅट इंजक्शन हे दोन्ही उपाय प्रभावी ठरतात.

सोपा उपाय फॅट इंजक्शन

विनायक कॉस्मॅटिक सर्जरी हॉस्पिटल, लखनौचे सर्जन डॉ. अनुपम सरन सांगतात की ब्रेस्टचा आकार वाढवण्याकरिता फॅट इंजेक्शनचा मार्ग ब्रेस्ट इम्प्लान्टपेक्षा कितीतरी पटीने उत्तम मानला जातो. या प्रक्रियेत जिच्या ब्रेस्टचा आकार वाढवायचा असतो, तिच्या पोटावरील अथवा जांघेतील फॅट्स काढून इंजक्शनने ते ब्रेस्टमध्ये सोडण्यात येतात.

हे ब्रेस्ट इम्प्लांटपेक्षा स्वस्त असते. ब्रेस्ट व्यवस्थित आकारात यायला २-३ महिने लागतात. गरज भासल्यास ही ट्रीटमेंट परत २ वर्षांनी घेता येते. याचे वैशिष्टय हे आहे की यात ब्रेस्ट वाढवताना सर्जरीची कोणतीही खूण राहात नाही. याचा खर्च रुपये २५-३० हजारपर्यंत येतो, या उलट ब्रेस्ट इम्प्लांटमध्ये रुपये ६० ते ७० हजारापर्यंत खर्च येतो. ब्रेस्ट इम्प्लांटमध्ये सिलिकॉन पॅड ब्रेस्टमध्येही टाकण्यात येतो. साधारणत: याचे कोणतेही साईडइफेक्टस नसतात.

फॅट इंजक्शनद्वारे ब्रेस्ट साईज कोणत्याही वयात वाढवता येते. लग्ना आधीसुद्धा या मार्गाने ब्रेस्टचा आकार वाढवता येतो. असे केल्यावर  २-३ महिने टाईट ब्रा घालायला हवी. फॅट इंजेक्शन ट्रीटमेंट घेतल्यानंतर ४ आठवडयांनी तुम्ही सेक्स करू शकता. ही ट्रीटमेंट घेण्याअगोदर व नंतर तुमची मॅमोग्राफी केली जाते.

ब्रेस्ट कॅन्सरच्या ऑपरेशन नंतरही उपयोगी

ब्रेस्ट कॅन्सरच्या ऑपरेशननंतर जेव्हा ब्रेस्ट साईज बिघडते तेव्हा त्यात इंजेक्शनद्वारे फॅट टाकून हा आकार व्यवस्थित केला जातो. पूर्वी हा आकार नीट करण्यासाठी कातडी लावून नीट केले जायचे, पण यामुळे मनाजोगता आकार मिळत नसे. फॅट इंजक्शनमुळे कॅन्सरच्या महिला रुग्णांना दिलासा मिळू लागला आहे. आता मनाजोगता आकार प्राप्त होणे ही फार मोठी कठीण गोष्ट राहिली नाही. ब्रेस्ट कॅन्सरच्या स्त्रियांसाठी फॅट हे इंजेक्शन खूप मोठा दिलासा घेऊन आले आहे

मनाजोगत्या आकारासाठी ब्रेस्ट इम्प्लांट

पूर्वी ब्रेस्ट इम्प्लांटसाठी सिलिकॉन इम्प्लांटचा वापर केला जात असे. पण आता आधुनिक तंत्राच्या सहाय्याने ब्रेस्ट इम्प्लांटमध्येही खूप बदल झाले आहेत. यामुळे ब्रेस्टला नैसर्गिक रूप प्राप्त होते. ब्रेस्ट इम्प्लांटसाठी मेमरी ग्रंथीच्या खाली सर्कमरिओलेर, आर्मपिट वा ट्रान्सबिलिकलमध्ये चिरा देऊन सिलिकॉन पॅड घातला जातो. बहुतेक प्रकरणात मेमरी ग्रंथीच्या खाली चिरा देऊन इम्प्लांट केले जाते, ज्यामुळे खूण लपली जाते आणि हळूहळू नाहीशीही होते

ऑपरेशननंतर त्वचा आक्रसल्याने काही दिवस वेदना जाणवतात. त्या नाहीशा करण्याकरिता औषध दिले जाते. बाजारात अनेक साईजचे इम्प्लांट्स मिळतात ज्यांची किंमत ३० ते ३५ हजार रुपयांच्या आसपास असते. याशिवाय जवळपास इतकाच खर्च औषधे आणि सर्जरीलाही येतो. म्हणजे एकूण खर्च ९०-९५ हजार रुपयांच्या आसपास असतो. हे ऑपरेशन साधारण एक तासाचे असते. ऑपरेशननंतर फारसा त्रास होत नाही. पतिला सांगितल्याशिवाय कळत नाही की तुम्ही ब्रेस्ट इम्प्लांट केले आहे. आई बनल्यानंतर बाळाला दूध पाजण्यात कोणतीही अडचण येत नाही आणि तुम्हाला हवे तेव्हा हे काढून टाकता येते.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें