अशाप्रकारे घ्या दागिन्यांची काळजी

* प्रतिनिधी

दागने कोणत्याही धातूचे असले तरी ते नियमितपणे वापरल्यास त्याच्यावर धूळ जमा होते. मग हळूहळू त्याची चमक कमी होत जाते.

अशावेळी दागिन्यांची विशेष देखभाल करणे गरजेचे असते, जेणेकरून त्यांची चमक तशीच नव्यासारखी राहील. तुम्ही त्या दागिन्यांची सुंदरता टिकवून ठेवण्यासाठी सराफाकडे घेऊन जाऊ शकता. ते दागिन्यांना केमिकलने स्वच्छ करतात. पण सातत्याने असे केल्यास दागिन्यांच्या वजनात घट होते.

सोने आणि प्लॅटिनमच्या दागिन्यांची विशेष काळजी घ्यावी लागत नाही. पण रोजच्या वापरातल्या किंवा सातत्याने वापरात येणाऱ्या दागिन्यांची स्वच्छता ठेवणे गरजेचे असते.

सुभाषिनी ऑर्नामेंटचे ज्वेलरी डिझायनर आकाश अग्रवाल यांनी दागिन्यांची चमक सदाबहार ठेवण्यासाठी काही सोप्प्या पद्धती सांगितलेल्या आहेत :

अशाप्रकारे घरीच दागिन्यांची सफाई करा

सोन्याचे दागिने : सोन्याचे दागिने स्वच्छ करण्यासाठी प्रथम त्यांना स्वच्छ कपडयाने पुसून घ्या. मग चिमुटभर हळद लावून मलमलच्या कपडयाने हलकेच रगडले की दागिने स्वच्छ होतील.

डिश सोपने स्वच्छता : एका वाटीत गरम पाणी घेऊन त्यात लिक्विड साबणाचे काही थेंब मिसळा. अधिक चांगला परिणाम पाहण्यासाठी सोडियम फ्री सॅल्टजर किंवा क्लब सोडयाचा वापर करू शकता. नाजुक आणि रत्नजडित दागिन्यांवर उकळत्या पाण्याचा वापर करू नये. सोन्याच्या दागिन्यांना साबणाच्या पाण्यात १५ मिनिटांसाठी भिजवत ठेवा. गरम साबणाचे पाणी दागिन्यांच्या कोपऱ्यात जाऊन तेथे अडकलेल्या धुलीकणांना सैल करतील मग सॉफ्ट टूथब्रशने ते साफ करून घ्या. बाजारात दागिन्यांची सफाई करण्यासाठी विशेष ब्रश उपलब्ध आहे.

चांदीचे दागिने : चांदीचे दागिने नेहमी डब्यात बंद करून ठेवा. हवा आणि दमटपणाने ते काळे पडू शकतात. नियमितपणे उपयोगात येणाऱ्या चांदीच्या दागिन्यांना थोडयाशा टूथपेस्टने हातानेच हळूवारपणे स्क्रब करा आणि काही वेळासाठी तसेच ठेवून द्या. मग सॉफ्ट टूथब्रशने हळूहळू साफ करा.

* एक वाटी गरम पाण्यात १ चमचा बेकिंग सोडा घालून ५ मिनिटे तसेच ठेवा. त्यात चांदीचे दागिने काही वेळासाठी बुडवा. मग त्यांना पाण्यातून काढा आणि मलमलच्या कपडयाने नीट पुसून घ्या.

* ब्लीच विरहीत डिटर्जंट पावडरनेदेखील चांदीचे दागिने साफ करता येतात. एका वाटीत पाणी घेऊन त्यात डिटर्जंटचा घोळ बनवून घ्या.

* बटाटे उकडलेले पाणी वापरून चांदीचे दागिने स्वच्छ केल्यास चमक येईल.

मोत्यांचे दागिने : सफेद चमकदार मोती प्रत्येकाचेच मन मोहून घेतात. पण त्यांची काळजी घेतली नाही तर त्यांची चमक हरवून जाते. मोत्यांवर कोटींग केलेली असते. त्यामुळे दमट वातावरणात ते कोटींग निघण्याची शक्यता अधिक असते.

* मोत्याचे दागिने खरेदी केल्यानंतर त्यावर लगेच रंगविरहीत नेलपेंटचा एक कोट लावून घ्या, जेणेकरून ते काळे पडणार नाहीत.

* मोत्यांचे दागिने कापसावर स्पिरीट लावून स्वच्छ करा म्हणजे ते चमकदार दिसतील.

* जर मोती अस्वच्छ दिसत असतील तर मलमलचा कपडा पाण्याने ओला करूम हळूहळू स्वच्छ करा.

* मोत्याच्या दागिन्यांना शार्प दागिन्यांसह ठेवू नका. नाहीतर त्यावर स्क्रॅचेस येऊ शकतात.

* मोत्यांच्या हाराला वर्षातून एकदा सराफाकडून व्यवस्थित बांधून घ्या म्हणजे ते मजबूत राहतील.

प्लॅटीनमचे दागिने : प्लॅटीनमला सोने म्हणूनही संबोधले जाते. याप्रमाणे घ्या काळजी :

* प्लॅटीनमच्या दागिन्यांना अमोनियाने साफ करू नका.

* साबणाच्या पाण्यात जास्त वेळ ठेवू नका.

* प्लॅटीनमचे दागिने स्वच्छ करण्यासाठी साबणाचा फेस बनवून छोटया ब्रशने हलक्या हातांनी साफ करा, मग ते धुवून सुकवा.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें