सणांसाठी असे करा स्वयंपाकघर तयार

* भटनागर

सण-उत्सव म्हणजे भरपूर मौजमजा, खूप खायचे, नानाविविध पदार्थ बनवायचे आणि घरासह स्वत:ही सजायचे. अशा वेळी जेव्हा घराच्या स्वच्छतेबाबत बोलले जाते तेव्हा खास करून स्वयंपाकघर स्वच्छ करण्याकडे लक्ष द्यावे लागते. कारण, येथेच तर आपण आपल्या माणसांच्या आरोग्याची काळजी घेत त्यांच्या आवडीचे पदार्थ बनविण्यासोबतच सणांवेळी विविध प्रकारचे पक्वान्न बनवून पाहुण्यांचेही स्वागत करतो. पण जर तुमचे स्वयंपाकघर स्वच्छ नसेल, तेथील वस्तू नीटनेटक्या लावलेल्या नसतील तर तुम्हाला सणांची लगबग सुरू झाली आहे असे वाटणारच नाही, शिवाय तुमच्याकडे आलेले पाहुणेही तुमचे स्वयंपाकघर पाहून नाक मुरडतील, याचा विचार तुम्ही केला आहे का? म्हणूनच यंदाच्या सण-उत्सवांवेळी तुम्ही तुमचे किचन म्हणजेच स्वयंपाकघरातील स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्या आणि त्याला सणांसाठी सज्ज करा. यासाठी माहिती करून घ्या काही सोप्या टिप्स :

सुरुवात करा स्वत:च्या स्वच्छतेपासून

स्वयंपाकघराच्या स्वच्छतेचा विचार करण्यापूर्वी आपण स्वत:च्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यायला हवे, कारण दररोज घर आणि घराबाहेरील कामे करताना किटाणू आपल्या संपर्कात कधी येतात, हे आपल्या लक्षातही येत नाही. त्यातच ते दिसत नसल्यामुळे आपल्याला उगाचच असे वाटत असते की, आपले हात स्वच्छ आहेत. प्रत्यक्षात असे काहीच नसते.

जेव्हा आपण एखाद्या वस्तूला स्पर्श करतो किंवा हस्तांदोलन करतो तेव्हा त्या प्रत्येक वेळी आपण किटाणूंना आपल्या हातांवर येऊन बसण्याचे आमंत्रण देत असतो. यामुळे संसर्ग, अन्नातून विषबाधा होण्यासह बऱ्याचदा जिवावरही बेतू शकते. म्हणूनच थोडया थोडया वेळाने हात पाण्याने धुणे गरजेचे आहे. यामुळे तुम्ही आजारांपासून दूर राहण्यासोबतच सण-उत्सवांवेळी आपल्या माणसांचीही विशेष काळजी घेऊ शकाल.

वस्तू नीटनेटक्या ठेवा

कपाट सुंदर दिसण्यासोबतच त्यातील सामान पटकन मिळावे यासाठी ज्याप्रमाणे तुम्ही ते व्यवस्थित लावून ठेवता त्याचप्रमाणे स्वयंपाकघरातील वस्तूही नीट लावून ठेवा. अनेक महिलांना स्वयंपाकघरातील छोटयामोठया वस्तू कुठेही ठेवण्याची सवय असते. यामुळे दिसायला अत्यंत वाईट दिसते, शिवाय त्या उघडयावर राहिल्यामुळे त्यांच्यावर किटाणू जमा होण्याची शक्यताही खूपच वाढते. त्यानंतर अजाणतेपणी का होईना, पण जेव्हा आपण त्या वापरतो तेव्हा त्यावरील किटाणू आपल्या शरीरात जाऊन आपल्याला आजारी पाडू शकतात.

फूड क्लिप्सचा वापर करून खायच्या वस्तू ठेवा सुरक्षित

तुम्ही जे काही खाल ते आरोग्यदायी असण्यासोबतच दीर्घ काळापर्यंत ताजे रहावे, असे तुम्हाला वाटत नाही का? तुमची छोटीशी सवय स्नॅक्स तसेच अन्य पदार्थांना दीर्घकाळ ताजे ठेवण्याचे काम करेल. बऱ्याचदा असे पाहायला मिळते की, स्टोरेज बॉक्स नसल्यामुळे स्वयंपाकाची बरीच सामग्री उघडयावर ठेवावी लागते. त्यामुळे त्यात ओलावा निर्माण होऊन त्याला कीड लागू शकते. त्यामुळे ती वापरता येत नाही. म्हणूनच तुम्ही हर्ब्स, मसाले, बिस्किटे, वेफरची पाकीट अशा प्रकारच्या तुमच्या स्वयंपाकघरातील सामग्रीला फूड क्लिप लावून त्या हवाबंद तसेच सुरक्षित ठेवू शकता. विशेष करून सण-उत्सवांवेळी हे क्लिप्स खूपच उपयुक्त ठरतात. कारण या काळात पाहुण्यांची ये-जा सुरूच असते. अशा वेळी सतत पाकिटातून खाद्यपदार्थ बाहेर काढल्यामुळे ते खराब होण्याची शक्यता अधिक असते. क्लिप्स हवा किंवा ओलाव्याला पाकिटाच्या आत जाऊ देत नाहीत.

किचनमध्ये ठेवा मल्टी स्पेस असलेले कंटेनर

कोरोनामुळे यंदा लोकांच्या मनात भीती आहे. त्यामुळे सण-उत्सवांतील उत्साहावर काहीसे विरजण पडले आहे. पण कधीपर्यंत लोक आपल्या माणसांना भेटण्यापासून स्वत:ला रोखू शकतील? त्यामुळे भलेही नेहमीपेक्षा कमी असतील, पण आपली काही माणसे आपल्याला भेटायला येतीलच. तेव्हा त्यांच्यासाठी एका प्लेटमध्ये बिस्किटे, त्यानंतर दुसऱ्यात सुकामेवा असे एकेक पदार्थ घेऊन येण्याऐवजी तुम्ही सणांआधीच तुमच्या स्वयंपाकघरात मल्टी बॉक्स कंटेनर आणून त्यात स्नॅक्स ठेवा. या गोष्टीकडेही लक्ष द्या की, या कामासाठी तुम्ही जो कंटेनर वापरणार असाल तो वरून झाकून ठेवण्यासाठीचा पर्याय त्यात उपलब्ध असेल. यामुळे पाहुण्यांसमोर एक एक पदार्थ घेऊन जाण्याचे तुमचे कष्ट वाचतील, शिवाय स्नॅक्स खराब होण्याची शक्यताही कमी होईल.

मायक्रोव्हेवची घ्या विशेष काळजी

मायक्रोव्हेवने आपले जीवन अगदी सोपे केले आहे. यात जेवण बनविण्यासोबतच ते गरम करण्याची प्रक्रिया एवढी सोपी आहे की, आता तर तो प्रत्येक स्वयंपाकघरातील एक महत्त्वाचा घटक बनत चालला आहे. पण ज्या मायक्रोव्हेवला तुम्ही सुविधेचे चांगले साधन समजता तो योग्य प्रकारे स्वच्छ न केल्यास तुम्हाला आजारीही पाडू शकतो, हे तुम्हाला माहिती आहे का? जेव्हा आपण मायक्रोव्हेवमध्ये जेवण गरम करतो किंवा बनवतो तेव्हा त्याच्या आजूबाजूची जागा तसेच मायक्रोव्हेवची प्लेट अस्वच्छ होत असल्यामुळे त्यावर किटाणू जमा होतात, जे आपल्या आरोग्यासाठी घातक ठरतात..

स्पंज आणि सिंक नेहमीच ठेवा स्वच्छ

तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की, एका छोटयाशा स्पंजमध्ये तब्बल ५४ अब्ज बॅक्टेरियल सेल्स म्हणजे किटाणूंच्या पेशी असतात, ज्या स्पंजमुळे इतर वस्तूंमध्ये शिरून तुमचे आरोग्य बिघडवू शकतात. म्हणूनच स्पंज, किचनमधील कपडे तसेच सिंक हे गरम पाण्यात डिशवॉशर घालून दररोज स्वच्छ करा. यामुळे किटाणू नष्ट होऊन तुम्ही स्वयंपाकघरातील स्वच्छतेकडे विशेष लक्ष देऊ शकता. या गोष्टीकडेही लक्ष द्या की, कपडे धुतल्यानंतर ते व्यवस्थित सुकवा. अस्वच्छ कपडयाने धुतलेली भांडी कधीच पुसू नका. तुमचा हा सुज्ञपणा तुमच्या आपल्या माणसांची खास काळजी घेण्यास उपयोगी ठरेल.

या जागा वरचेवर करा स्वच्छ

स्वयंपाकघरात अशा बऱ्याचशा जागा असतात ज्या जेवण बनविण्याच्या ठिकाणाच्या संपर्कात येत नाहीत. पण जेव्हा आपण त्यांना आपल्या हातांनी सतत स्पर्श करतो तेव्हा त्या किटाणूंच्या संपर्कात येतात. जसे की, दरवाजाची कडी, हँडल, नळ, फ्रीजचा दरवाजा इत्यादी. यामुळे किटाणू सर्वत्र पसरण्याची शक्यता अधिकच वाढते. म्हणूनच हे गरजेचे आहे की, ज्यावेळी तुम्ही हँडलला स्पर्श कराल त्या प्रत्येक वेळी हात स्वच्छ धुवा, जेणेकरून तुमच्यामुळे तुमच्या जेवणापर्यंत किटाणू पोहोचणार नाहीत.

छोटी छोटी साफसफाई ठेवेल किटाणूंपासून दूर

स्वयंपाकघरातील ओटा असो, गॅस, स्टोव्ह किंवा कचऱ्याचा डबा असो, या सर्वांचीच साफसफाई चांगल्या प्रकारे करण्याची गरज असते. गॅस किंवा स्टोव्हवर नेहमी जेवण बनविले जात असल्यामुळे त्यावर अन्नपदार्थ सांडून ते अस्वच्छ होतात. ओटयावर आपण भाज्या ठेवण्यापासून ते चपात्या लाटण्यापर्यंतची सर्व कामे करतो. त्यामुळे दररोज हे सर्व स्वच्छ, निर्जंतुक करणे गरजेचे आहे. यामुळे किटाणू मरण्यासोबतच तुमचे स्वयंपाकघरही स्वच्छ दिसेल.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें