“कलाकाराला जगभरातून मिळणारे प्रेम हा खूप मोठा आशीर्वाद आहे!”

* सोमा घोष

अभिनेता आणि गायक आयुष्मान खुराना यांचे म्हणणे आहे की, एका कलाकाराला मिळणारे जगभराचे प्रेम आणि सन्मान ही त्याच्यासाठी सर्वात मोठी देणगी आहे. 2024 मध्ये, आयुष्मानचे गाणे 184 देशांतील लोकांनी ऐकले, आणि ही कामगिरी त्यांना अधिक प्रेरणा आणि कृतज्ञतेची जाणीव करून देते.

“कलाकार हा कदाचित जगभरात सर्वाधिक प्रेम मिळवणारा व्यक्ती असतो, कारण त्याला सीमा, भाषा पार करून जगभरातून स्नेह मिळतो. कला लोकांना जोडते, त्यांच्या दैनंदिन आयुष्यातून बाहेर काढते आणि त्यांना आनंदाने भरलेल्या जगात घेऊन जाते. मी अभिनेता असूनही, पूर्ण वेळ संगीतकार नसतानाही, माझ्या गाण्यांना 184 देशांमध्ये पोहोचताना पाहणे खूपच नम्र करणारे आहे. हे मला माझ्या चित्रपटांच्या वेळेत अधिक संगीत निर्माण करण्यासाठी प्रेरणा देते. मी आभारी आहे की मी क्रिएटिव आर्ट्सचा भाग आहे आणि दररोज लोकांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्याचा प्रयत्न करतोय,” आयुष्मान म्हणाला.

अलीकडेच, अयुष्मानने अमेरिकेत आपला म्युझिक टूर केला, ज्यामध्ये शिकागो, सॅन जोस, न्यूयॉर्क, न्यू जर्सी आणि डलासमध्ये हाऊसफुल शो झाले. आयुष्मान प्रेक्षकांशी आणि चाहत्यांशी जोडण्याचा आनंद घेतो, आणि त्याचे संगीत त्याला अत्यंत खास आणि जवळच्या पद्धतीने जोडण्याची संधी देते.

“मी एक अभिनेता, कवी आणि गायक/संगीतकार म्हणून माझ्या स्वप्नांना जगत आहे. माझी गाणी ऐकणाऱ्या आणि माझ्या कन्सर्टला येणाऱ्या प्रत्येकाचे मी मनःपूर्वक आभार मानतो. तुमचे पाठबळ माझ्यासाठी सर्वकाही आहे आणि हे मला अधिक करण्यासाठी प्रेरित करते. मला आशा आहे की तुम्ही माझे संगीत ऐकत राहाल, माझे चित्रपट पाहत राहाल आणि नेहमीच आनंद मिळवत राहाल!” आयुष्मान पुढे म्हणाला.

अभिनयाच्या जगात, अयुष्मान दिवाळी 2025 मध्ये मॅडॉक फिल्म्सच्या ब्लॉकबस्टर हॉरर कॉमेडी युनिव्हर्सच्या थामा या चित्रपटात झळकणार आहे. याशिवाय, ते धर्मा-सिख्या प्रोडक्शनच्या एका अनोख्या चित्रपटात मुख्य भूमिकेत असेल, ज्याचे नाव अद्याप निश्चित झालेले नाही.

 

झोंबिवलीत रंगणार झोंबीजचा कहर

* प्रतिनिधी

Saregama प्रस्तुत, Yoodlee Films निर्मित आणि सुप्रसिध्द सिने दिग्दर्शक आदित्य सरपोतदार दिग्दर्शित ‘झोंबिवली’ चित्रपटाची रिलीज डेट अनाऊन्समेंट आज इंस्टा लाईव्ह वरून करण्यात आली. येत्या ४ फेब्रुवारी २०२२ रोजी हा चित्रपट चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

जनमनावर अधिराज्य गाजवणारे अभिनेते अमेय वाघ, ललित प्रभाकर आणि अभिनेत्री वैदेही परशुरामी यांनी अपल्या अनोख्या अंदाजात आज रिलीज डेट अनाऊन्समेंट पोस्टर लाँच केले असून ४ फेब्रुवारी २०२२ ला ‘झोंबिवली’ संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

तर ४ फेब्रुवारी ला ‘झोंबिवली’ स्टेशनवर उतरून हा हॉरर-कॉमेडी प्रवास अनुभवण्यासाठी तुम्ही नक्की सज्ज राहा.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें