घरबसल्या शुद्ध सोन्यासारखी नितळ त्वचा

* पारुल भटनागर

लग्न, समारंभ, पार्ट्यांचा हा मौसम आहे. अशावेळी नववधू असो किंवा समारंभांना उपस्थित राहणाऱ्या इतर महिला असोत, आता त्यांना प्रत्येक कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद घ्यायचा आहे, कारण गेल्या १-२ वर्षात साथीच्या आजारामुळे त्यांच्या मौजमस्तीवर, बाहेर जाण्यावर निर्बंध आले होते. म्हणूनच आता लग्न असो किंवा एखादा समारंभ, मौजमजेबरोबरच त्यांना त्यांच्या त्वचेसोबतही कोणतीही तडजोड करायची नाही. त्वचेवरील डाग निघून जाण्यासोबतच त्वचेवर चमक यावी, अशी त्यांची अपेक्षा आहे, पण त्यासाठी पाकिटावर भार टाकून सतत पार्लरमध्ये जावे लागते. अशा परिस्थितीत आम्ही एक असा उपाय सांगत आहोत, ज्यामुळे तुम्ही घरबसल्या प्रत्येक कार्यक्रमासाठी तयार व्हाल आणि तेही तुमच्या बजेटमध्ये. चला तर मग, जाणून घेऊया डाबर फेम ब्लीच बद्दल :

फेम ब्लीच देते चेहऱ्यावर अप्रतिम चमक

अनेकदा जेव्हा चेहऱ्यावर चमक आणायची असते तेव्हा आपण विचार करतो की, अशी चमक पार्लरमध्ये जाऊन फेशियल करूनच मिळवता येईल, पण तुमचा हा विचार पूर्णत: चुकीचा आहे, कारण ब्लीचने तुम्हाला कुठलाच त्रास होऊ न देता अगदी काही मिनिटांत घरबसल्या फेशियलसारखी चमक देऊ शकते, कारण डाबर फेम ब्लीच खूपच प्रभावशाली आहे. यात त्वचेमधील मृत पेशी काढून टाकून नवीन पिगमेंटेंशन सेल्स म्हणजेच रंगद्र्व्य पेशींची वाढ रोखण्याची ताकद आहे. जेव्हा त्वचेवर मृत पेशी जमा होतात तेव्हा त्या त्वचेवरील रोमछिद्रे बंद करण्यासोबतच त्वचेवर कोरडे पट्टे तयार करतात. त्यांना एक्सफोलिएशननेही काढून टाकता येते जेणेकरून त्वचेची रचना आणि त्वचेला निरोगी ठेवता येईल.

हे आहे अमोनिया मुक्त

डाबर फेम ब्लीच अमोनिया मुक्त आहे. ते त्वचा आणि डोळयांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ देत नाही. तुम्ही पाकिटावर दिलेल्या सूचनांचे पालन करून ते चेहऱ्यावर सुरक्षितपणे लावू शकता. अमोनियामुळे तुमचे डोळे आणि त्वचेला खाज येते, जळजळ होते सोबतच ते थोडया प्रमाणात शरीरात गेले तरी तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होण्यासोबतच शरीराला सूज येण्यासारखी समस्याही निर्माण होऊ शकते.

नको असलेल्या केसांना लपवा

आजकाल महिलांना फेशिअल हेअर्सच्या समस्येचा सामना करावा लागतो. यामुळे त्यांचा आत्मविश्वास डळमळू लागतो, शिवाय चांगले कपडेही घालावेसे वाटत नाहीत आणि लोकांचा सामना करण्याचीही इच्छा होत नाही. नको असलेले केस त्यांच्या सौंदर्यात बाधा आणतात. अशावेळी फेस ब्लीचमध्ये असलेला हायड्रोजन पॅरोक्साईड हा घटक जो ब्लिचिंग एजंट असतो, त्याच्यामुळे नको असलेले केस लपले जातात आणि हरवलेले सौंदर्यही पुन्हा मिळवता येते.

२४ कॅरेट गोल्ड डस्ट ब्लीच

२४ कॅरेट गोल्ड डस्ट ब्लीच क्रीममध्ये गोल्ड डस्ट आणि नैसर्गिक अँटीऑक्सिडंट असते, जे तुमच्या त्वचेला उजळ बनवते सोबतच काही मिनिटांतच तुम्हाला नववधूसारखी तजेलदार चमक मिळवून देते. ते अत्यंत शुद्ध सोन्यासारखे त्वचेला चमकदार, नितळ बनवते. विश्वास ठेवा की, जेव्हा तुम्ही नववधूच्या रूपात सजून २४ कॅरेट गोल्ड डस्ट ब्लीचने चेहऱ्याला सुंदर बनवून हॉलमध्ये प्रवेश कराल तेव्हा लोकांच्या नजरा तुमच्यावर खिळून राहतील.

लावणे अतिशय सोपे

हे तुम्ही सोप्या पद्धतीने टप्प्याटप्प्याने घरबसल्या काही मिनिटांतच लावू शकता, जसे की :

* सर्वात आधी चेहरा स्वच्छ पाण्याने स्वच्छ करा. त्यानंतर टिश्यू पेपरने तो नीट पुसून घ्या. त्यामुळे चेहऱ्यावर जमा झालेला सर्व मळ निघून जाईल.

* दिलेल्या सूचनांनुसार क्रीममध्ये थोडेसे अॅक्टिवेटर मिसळून नीट एकजीव करा. त्यानंतर ते चेहरा आणि मानेवर लावा. डोळे तसेच डोळयांभोवती ते लावू नका.

* शेवटी थंड पाण्याने चेहरा धुवा. काही मिनिटांतच तुम्हाला नववधूसारखी नितळ, चमकदार त्वचा मिळेल.

५ उपायांनी चेहऱ्यावरचे डाग हटवा

* पारुल भटनागर

त्वचेवर कोणत्याही प्रकारचा डाग कोणालादेखील आवडत नाही. परंतु हे डाग तर दूरच त्वचेवरती जेव्हा मोठमोठे ओपन पोर्स दिसू लागतात तेव्हा त्वचेचं आकर्षण कमी होण्याबरोबरच ती निस्तेज दिसू लागते. सोबतच अनेक स्कीन प्रॉब्लेम्स जसं अॅक्ने, ब्लॅकहेडससारख्या समस्यादेखील निर्माण होऊ लागतात.

तसही या समस्यांपासून दूर राहण्यासाठी बाजारात अनेक सोल्युशन्स उपलब्ध आहेत, परंतु आपण आपल्या त्वचेला केमिकल्सपासून दूर ठेवून काही अशा होममेड रेमेडीजबद्दल सांगणार आहोत, ज्या  सहजपणे उपलब्ध होण्याबरोबरच तुमच्या त्वचेचं कोणतही नुकसान करत नाहीत.

चला तर या संबंधित जाणून घेऊया कॉस्मेटोलॉजीस्ट पूजा नागदेव यांच्याकडून :

आईस क्यूब

तुम्हाला माहित आहे का बर्फामध्ये त्वचा टाइटनींग प्रॉपर्टीज असतात, जे मोठे पोर्स छोटं करण्याचे तसेच अतिरिक्त ऑईल कमी करण्याचं काम करतात. सोबतच फेशियल ब्लड सर्क्युलेशनला इंप्रुव्ह करून त्वचेच्या हेल्थलादेखील इंप्रुव्ह करण्याचं काम करतात. हे अप्लाय केल्यानंतर काही वेळातच त्वचा मऊ मुलायम दिसू लागते. यासाठी तुम्ही एका स्वच्छ कपडयांमध्ये बर्फ घेऊन त्याने थोडा वेळ चेहऱ्यावर व्यवस्थित मसाज करा वा मग बर्फाच्या थंड पाण्याने त्वचा स्वच्छ करू शकता. असं तुम्ही एक महिन्यापर्यंत दररोज काही सेकंद करा. तुमच्या त्वचेत तुम्हाला फरक दिसू लागेल.

एप्पल साइडर विनेगर

एप्पल साइडर विनेगरमध्ये एंटीइनफ्लॅमेटरी प्रापर्तीज असण्याबरोबरच हे अॅक्नेला ट्रीट करण्याबरोबरच त्वचेची पीएच पातळीदेखील बॅलन्स ठेवतं. सोबतच मोठे पोर्स कमी करून स्किन टाईटेनिंगचंदेखील काम करतं.

यासाठी तुम्ही एका बाउलमध्ये एक छोटा चमचा एप्पल साइडर विनेगर घेऊन त्यामध्ये दोन छोटे चमचे पाणी एकत्रित करा. नंतर कापसाच्या मदतीने तयार मिश्रणला फेसवर अप्लाय करून पाच ते दहा मिनिटांसाठी सोडून द्या. नंतर चेहरा स्वच्छ धुऊन त्यावर मॉइश्चरायझर अप्लाय करा. असं काही महिन्यापर्यंत आठवडयातील दोन-तीन वेळा करा यामुळे मोठे पोर्स श्रींक होऊ लागतील आणि तुमचं हरवलेलं आकर्षण पुन्हा पूर्ववत होईल.

शुगर स्क्रब

तसंही तुम्ही हे ऐकलं असेल की जर तुमच्या चेहऱ्यावर मोठमोठे पोर्स असतील तर तुम्ही स्क्रबिंग करता कामा नये. परंतु तुम्हाला सांगतो की आठवडयातून एकदा स्क्रबिंग हे प्रत्येकासाठी गरजेचं आहे. कारण यामुळे त्वचेतील जमा झालेली धूळ आणि रोगजंतू निघून जातात.

शुगरबद्दल सांगायचं तर हे त्वचेला खूपच योग्य प्रकारे एक्सफोलिएट करून पोर्समधील अतिरिक्त तेल व धूळ काढण्याचं काम करते. हे त्वचेतील पोर्सदेखील काही आठवडे छोटी करण्यात मदत करतं. यासाठी तुम्ही लिंबाच्या अर्ध्या तुकडयावर साखर लावा.

नंतर हे हलक्या हाताने चेहऱ्यावर रब करत ज्यूस व शुगर क्रिस्टल्सला चेहऱ्यावर लावून १५ मिनिटांसाठी सोडून द्या. नंतर स्वच्छ धुवा. महिनाभरात तुम्हाला त्वचेतील फरक दिसून येईल.

बेकिंग सोडा

बेकिंग सोडामध्ये त्वचेतील पीएच लेवल बॅलन्स ठेवण्याची क्षमता असते. यामध्ये अँटीइनफ्लैमेटरी व अँटीबॅक्टरियल प्रोपर्टीज होण्याबरोबरच हे अॅक्कने आणि पिंपल्सना काढण्याचं काम करतो. यासाठी तुम्हाला दोन मोठे चमचे बेकिंग सोडामध्ये दोन मोठे चमचे पाणी एकत्रित करून मिश्रण चेहऱ्यावर सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करा. नंतर हे चेहऱ्यावर पाच मिनिटांसाठी लावून सोडून द्या. नंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ करून घ्या.

टोमॅटो स्क्रब

टोमॅटोमध्ये एस्ट्रीजेंट प्रॉपर्टी असल्यामुळे हे त्वचेतील अतिरिक्त ऑईल कमी करण्याबरोबरच त्वचेला टाईट करून मोठया पोर्सना श्रींक करण्याचं काम करतं. सोबतच टोमॅटोमध्ये अधिक प्रमाणात अँटिऑक्सिडंट असल्यामुळे हे एजिंग प्रोसेसदेखील कमी करतं. यासाठी तुम्ही एक चमचा टोमॅटोच्या रसात तीन-चार थेंब लिंबाचा रस टाकून व ही पेस्ट चेहऱ्यावर २० मिनिटापर्यंत अप्लाय करा. नंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा.

तुम्हाला एकाच वापरानंतर तुमच्या चेहऱ्यावर ग्लो दिसून येईल आणि मोठया पोर्सची समस्यादेखील एक दोन महिन्यात ठीक होईल. परंतु यासाठी तुम्हाला हा पॅक आठवडयातून तीन वेळा अप्लाय करावा लागणार.

सनबर्नपासून वाचण्याचे घरगुती उपाय

– पारुल भटनागर

सूर्याच्या तीव्र किरणांचा थेट परिणाम महिलांच्या त्वचेवर होतो. यामुळे त्वचा काळवंडणे यासोबतच खाज, जळजळ व लाल चट्टे पडू लागतात. याला सनबर्न म्हणतात. यात हळूहळू त्वचेची आर्द्रता संपण्यासोबतच त्वचा रुक्ष व मृतवत होऊ लागते. इतकेच नव्हे तर सूर्याच्या अल्ट्रावायलेट किरणांच्या अधिक संपर्कात आल्याने त्वचेला सुरकुत्या पडण्याने वयदेखील जास्त दिसू लागते.

जर तुम्हीसुद्धा सनबर्नने त्रस्त असाल तर घाबरू नका. उलट आम्ही तुम्हाला असे काही उपाय सांगू, ज्याद्वारे तुम्हाला काही दिवसांतच सनबर्नच्या तक्रारीपासून मुक्तता मिळेल.

घरीच सनबर्नच्या समस्येचे निवारण करा

जर सनबर्नची समस्या आहे तर सनबर्न झालेल्या जागी कच्च्या बटाटयाचा उपयोग केल्याने चेहऱ्यावरचे डाग व चट्टे दूर होतात व वर्णदेखील उजळतो. याशिवाय तुम्ही बटाटयाचा रसदेखील घेऊ शकता, जो त्वचेची सूज कमी करण्यासोबतच त्वचेमध्ये होणारी जळजळदेखील कमी करतो. यासाठी तुम्ही एक बटाटा धुवून त्याची साल काढून किसून एका बाऊलमध्ये त्याचा ज्यूस काढा. नंतर यात काही थेंब लिंबाचा रस मिसळून कापूस बुडवून त्याला चेहऱ्यावर २० मिनिटांसाठी लावून तसेच राहू द्या. नंतर चेहरा थंड पाण्याने धुवा. याचा नियमित वापर केल्याने सनबर्नची समस्या ठीक होऊन जाते.

बटाटयात व्हिटॅमिन, मिनरल, फायबर व नॅचरल ब्लिचिंग प्रॉपर्टीज असतात. तसेच यात व्हिटॅमिन सीचे कॉम्बिनेशन असल्याने हे पिगमेंटेशन घालवण्यासोबतच त्वचेचा वर्णसुद्धा उजळण्याचे काम करते.

एलोवेरा, लाल मसूर व टोमॅटोचा पॅक

लाल मसूरचा पॅक सनबर्नसाठी बराच चांगला उपाय मानला जातो. यासाठी फक्त जेव्हा तुम्हाला हा पॅक चेहऱ्याला लावायचा असेल, तेव्हा एक तास आधी डाळ पाण्यात भिजवून ठेवा. ज्यामुळे स्मूथ पेस्ट बनवणे सोपे होईल. नंतर यात जवळपास एक चमचा टोमॅटोचा रस व थोडेसे एलोवेरा जेल मिसळून ही पेस्ट सनबर्न असलेल्या जागी लावून पाच मिनिटे मसाज करा. नंतर तीस मिनिटे लावून तसेच ठेवा व नंतर धुवा. लावल्यानंतर काहीच दिवसात तुम्ही त्वचेत बदल पाहू शकाल.

ते अशासाठी की लाल मसूरमध्ये विटामिन सी असते, जे सनबर्न घालवण्यासोबतच त्वचेचा पोतदेखील सुधारण्याचे काम करते. सोबतच यातील पोषक तत्वांमुळे हे ड्राय पॅचेससुद्धा हटवते. याला स्किन क्लिंजरदेखील म्हणतात, ज्यामुळे त्वचा निरोगी टवटवीत व उजळ बनते. शिवाय कोरफडीत व्हिटॅमिन्स, मिनरल्स, अमिनो अॅसिड, सॅलिसिलिक अॅसिड, अँटीऑक्सिडंट्स असतात, जे त्वचेचा काळपटपणा व सुरकुत्या दूर करण्यासाठी उत्तम मानले जातात.

बेसन व हळदीचा पॅक

त्वचेचा वर्ण उजळण्यासाठी बेसन व हळदीच्या पॅकचा वापर तर वर्षानुवर्षे चालत आलेला आहे. अशात तुम्ही उजळपणासोबतच डागरहित त्वचा व सनबर्नपासून सुटका मिळवू इच्छिता, तर तुम्ही बेसन व हळदीचा पॅक जरूर लावा. यासाठी तुम्हाला एक छोटा चमचा बेसन, अर्धा लिंबू, एक छोटा चमचा मधात चिमुटभर लिंबाचा रस मिसळावा लागेल. नंतर या तयार पेस्टला चेहऱ्यावर तीस मिनिटे लावून तसेच ठेवा. सुकल्यानंतर दुसऱ्यांदा स्क्रब करा. यामुळे काही मिनिटांमध्ये चेहरा उजळण्यासोबतच दर वेळच्या लावण्याने सनबर्न हळूहळू कमी होऊ लागेल. चांगल्या परिणामांसाठी हा पॅक आठवडयातून तीन ते चार वेळा लावावा लागेल.

बेसन नॅच्युरल एक्सफोलिएटरच्या रूपात काम करते, ज्यामुळे त्वचेच्या मृतपेशी निघून जाण्यासोबतच त्वचेत जिवंतपणा येतो. हळद चेहऱ्यावर चमक आणण्यासोबतच पिगमेंटेशन दूर करण्याचेदेखील काम करते. मधात त्वचेच्या पेशी वेगाने भरून काढणारी तत्त्वे असतात, ज्याने त्वचेचा गेलेला वर्ण पुन्हा येऊ लागतो.

आईस क्यूब ट्रीटमेंट

आईस क्यूब प्रत्येक घरी सहज उपलब्ध असतात. सन बर्न ठीक करण्यासाठी हे चेहऱ्यावर लावा. यामुळे त्वचेला थंडपणा मिळण्यासोबतच ती घट्ट होईल व त्यावर तेजसुद्धा दिसू लागेल. बर्फात थंडपणाचे गुणधर्म असल्याने ते त्वचेच्या उष्णतेला शोषून घेऊन थंडपणा पोहोचवण्याचे कामदेखील करते, ज्यामुळे जळजळदेखील कमी होते. सोबतच काळया वर्तुळांपासूनदेखील सुटका होते.

दही पॅक

सनबर्नपासून वाचण्यासाठी दही खूप उपयुक्त ठरते. यात असणारे प्रोबायोटिक्स त्वचेची सूज कमी करून त्वचा स्वच्छ करतात. यासाठी तुम्ही दही दहा ते पंधरा मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावा व नंतर धुवा. यामुळे रोमछिद्रे मोकळी होतात व त्वचा स्वच्छ होऊन जाते. दह्यात झिंक व अँटी इन्फ्लॅमेटरी प्रॉपर्टीजदेखील असतात, ज्यामुळे त्वचेची जळजळ बऱ्यापैकी कमी होते. तुम्ही हा पॅक आठवडयातून चार वेळा नक्की लावा.

हनी मिल्क पॅक

सनबर्न घालवण्यासाठी तुम्हाला एका बाऊलमध्ये एक मोठा चमचा मधात लिंबाच्या रसाचे काही थेंब घालावे लागतील. पेस्ट बनवण्यासाठी यात दूध मिसळा. नंतर हे २० मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवा. सुकल्यानंतर हलक्या हाताने मसाज करून धुवून टाका. रोज असे केल्याने तीव्र सनबर्नदेखील ठीक होतात. जिथे मधात अँटी टॅन एजंट असतात, तिथे दूध त्वचेला आर्द्र बनवण्याचे काम करते, ज्यामुळे त्वचेच्या तक्रारीही दूर होतात.

राईस वॉटर पॅक

सनबर्नसाठी राईस वॉटर पॅक उत्तम आहे. यासाठी तांदूळ शिजवा व त्याचे पाणी फेकू नका, तर एक दिवस तसेच ठेवा. मग त्यात इसेन्शियल ऑईल घालून त्याचा पॅक बनवा, जेणेकरून त्याची घाण निघून जाईल. नंतर त्यात टिशू पेपर घालून चेहऱ्यावर वीस मिनिटे ठेवा. याला सनबर्न ट्रीटमेंट असेही म्हणतात. याने खूप लवकर सन बर्न ठीक होतो.

या नॅच्युरल बाथ थेरपीजदेखील तुम्हाला सनबर्न व वेदना, जळजळ यापासून आराम देण्यासाठी उपयुक्त ठरतील :

* आपल्या बाथटबमध्ये अर्धा कप अॅप्पल साइडर व्हिनेगर घाला. यामुळे सन बर्न त्वचेची पीएच लेवल पातळीत येण्याने त्वचा भरून येण्यात मदत होते.

* अंघोळ करते वेळी पाण्यात इसेन्शियल ऑईल, जसे की गुलाबजल, लव्हेंडर घाला. यामुळे वेदनेपासून बराच आराम मिळतो.

* थोडा बेकिंग सोडा घातलेल्या पाण्याने अंघोळ केल्याने सनबर्नमुळे झालेली जळजळ व वेदना कमी होतात.

* एक कप ओट्स पाण्यात भिजवण्यासाठी ठेवून द्या. नंतर ह्याने अंघोळ करा. यामुळे त्वचेची जळजळ दूर होण्यासोबतच त्वचेची गेलेली आर्द्रतादेखील परत येऊ लागते.

काही अत्याधुनिक ट्रीटमेंट्सदेखील आहेत ज्यांची माहिती करून घेऊया त्वचारोग तज्ञ डॉक्टर भारती तनेजा यांच्याकडून :

फ्रुट बायोपील फेशियल बरेच परिणामकारक

फेशियल तर तुम्ही पुष्कळ करून घेतले असतील, परंतु टॅनिंग वा सनबर्नसाठी फ्रुट बायोपील फेशियलसारखं उत्तम काही नाही. कितीही तीव्र सनबर्न का असेना, याच्या एका एप्लीकेशनने बऱ्याच प्रमाणात दूर होतो. जसे पपईचा वापर केला जातो. त्यामुळे त्वचा एका वेळेतच खूप सुंदर बनते.

व्हाइटनिंग फेशियल

व्हाइटनिंग फेशियलसुद्धा सनबर्नसाठी पुष्कळ लोकप्रिय फेशियल आहे, कारण यात व्हिटॅनॉल घातलं जातं. त्यामुळे याला व्हाइटनिंग फेशियल म्हणतात. यामुळे त्वचेवर कितीही तीव्र सनबर्न असेल, तरी तो आरामात निघून जातो, कारण यात अँटिऑक्सिडंट व पोषक तत्वे जी असतात, जी त्वचेतून मेलानिन कमी करून त्वचेचा वर्ण सुधारण्यासोबतच उजळण्याचेदेखील काम करतात.

लेर ट्रीटमेंट

चेहऱ्यावरील केस लेझरद्वारे काढण्याबद्दल तुम्ही ऐकलेच असेल, परंतु आता तीव्र सनबर्नदेखील १-२ सीटिंग्समध्ये लेझर ट्रीटमेंटद्वारे हटवले जाऊ शकते. जेव्हा त्वचा लाल तसेच सोलवटून निघण्यासोबतच ताप, प्रभावित भागावर फोड येतात, तेव्हा लेझर ट्रीटमेंटची गरज पडते. यात स्किन पिगमेंटेशन लेझर ट्रीटमेंटद्वारे एकाच खेपेत त्वचेतून ८० टक्के मेलानिन हटवले जाते. फ्रॅक्सील लेझर ट्रीटमेंटने हायपर पिग्मेंटेशन, एजिंग व अॅक्ने व्रण यांना सहजतेने हटवून नवीन निरोगी त्वचा मिळवली जाऊ शकते.

त्वचा सुंदर बनवण्यासाठी या खास टिप्स फॉलो करा

* दीपिका शर्मा

सौंदर्य कोणाला आवडत नाही? आजकाल प्रत्येकाला सुंदर दिसण्याची इच्छा असते. स्त्री असो वा पुरुष. एक हसरा आणि चमकणारा चेहरा प्रत्येकाला स्वतःकडे आकर्षित करतो आणि कोणीही त्या निर्जीव आणि दुःखी चेहऱ्याकडे लक्ष देत नाही. सौंदर्यासाठी, आपल्या त्वचेची पूर्ण काळजी घेणे आवश्यक आहे, परंतु प्रत्येकजण हे करू शकत नाही, काहींना वेळेचा अभाव आहे, काही महाग उत्पादनांमुळे. त्यामुळे आज तुमच्या समस्या समजून घेत आम्ही काही घरगुती उपाय सांगत आहोत जे तुमच्या बजेटमध्ये बसतील आणि सौंदर्य वाढवायला जास्त वेळ लागणार नाही.

बटाटा ही एक उत्तम गोष्ट आहे

जरी बटाटा सर्व भाज्यांमध्ये घालून चव वाढवतो, परंतु बटाटा आपल्या त्वचेसाठीदेखील खूप फायदेशीर आहे, आपण विचार करत असाल कसे? म्हणून आम्ही तुम्हाला सांगत आहोत.

एक चमचा बटाट्याची पेस्ट बनवा. आता त्यात एक चमचा दही घाला. सुमारे अर्धा तास तयार पेस्ट ठेवा. आता ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. तुमची त्वचा तजेलदार होऊन तुमची त्वचा घट्ट होण्यास मदत होईल.

बटाटा आणि हळदीचा फेस पॅक त्वचेचा टोन सुधारण्यास मदत करतो, अर्धा बटाटा किसून घ्या आणि त्यात चिमूटभर हळद मिसळा आणि अर्धा तास सोडा. आता सामान्य पाण्याने चेहरा स्वच्छ करा. तुमच्या चेहऱ्याचा रंग सुधारण्यास सुरुवात होईल.

गुलाबपाणी आणि काकडीच्या रसाने त्वचा उजळते

गुलाबपाणी आणि काकडीचा रस तुरट म्हणून काम करतात. गुलाबपाणी त्वचेची पीएच पातळी सामान्य करते. याशिवाय यामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. काकडीसोबत गुलाब पाण्याचे मिश्रण प्रभावीपणे छिद्र कमी करते. गुलाबपाणी आणि काकडीचा रस एकत्र करून चेहऱ्याला लावा आणि पंधरा मिनिटांनी थंड पाण्याने धुवा. यामुळे त्वचेचे छिद्र बरे होतात आणि त्वचा चमकते.

कारले आणि हळद

कारली खायला तिखट लागते पण आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. हळदीचा वापर फेसपॅक म्हणून अनेक वर्षांपासून केला जातो. कारल्याबरोबर याचा वापर केल्यास त्वचा स्वच्छ होते. हा फेसपॅक बनवण्यासाठी कडबा आणि कडुलिंबाची पाने बारीक करून त्यात हळद मिसळा आणि चेहऱ्याला लावा. साधारण दहा ते पंधरा मिनिटांनी त्वचा धुवा. हा फेस पॅक केवळ त्वचाच सुधारत नाही, तर मुरुम, डाग आणि खाज इत्यादींवरही प्रभावी ठरतो.

सरीनने कोरड्या त्वचेला अलविदा म्हणा

हिवाळ्यात कोरडी त्वचा आणि फाटलेल्या ओठांमुळे प्रत्येकजण त्रस्त असतो. अशा परिस्थितीत ग्लिसरीन हे त्वचेसाठी उत्तम मॉइश्चरायझर आहे. दररोज त्वचेवर ग्लिसरीन वापरल्याने त्वचा हायड्रेटेड, मुलायम आणि ताजी राहते. लिंबाचा रस आणि गुलाबजल ग्लिसरीनमध्ये मिसळा आणि लावा, तुमची त्वचा तडे जाणार नाहीत आणि मऊ राहतील.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें