घरातील वातावरण बनवा पॉझिटिव्ह

* प्रतिभा अग्निहोत्र

पॉझिटिव्हिटी अर्थात सकारात्मकता व्यक्तिला मानसिक आणि शारीरिक स्तरावर सुदृढ व उर्जावान बनवते. मग अशावेळी मोठ्यातील मोठ्या संकटाचा सामना करणंही त्याच्यासाठी खूप कठिण ठरत नाही. पॉझिटिव्हिटीसाठी सकारात्मक मानसिकता असणं आवश्यक आहे जेणेकरून आपल्या विचारांना नकारात्मक बनवणारी तत्त्व आपल्या सभोवताली राहाणार नाहीत आणि आपण पॉझिटिव्ह एनर्जीचा अनुभव घेऊ.

काय आहे पॉझिटिव्ह एनर्जी

एनर्जीचा शाब्दिक अर्थ असतो उर्जा वा शक्ति. तिच पॉझिटिव्ह एनर्जी जी आपल्या मनाला शांतता आणि सुखासमाधानाची जाणीव करून देते आणि आपली मानसिकता, आपले विचार सकारात्मक बनवते. कायम पॉझिटिव्ह एनर्जीयुक्त राहाण्यासाठी आपण आपल्या घरालाही सकारात्मक उर्जेने भरण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी या काही गोष्टींकडे जरूर लक्ष द्या.

* घर अतिशय साफ स्वच्छ आणि नीटनेटकं ठेवा आणि घरातील सामानाची दर ६ महिन्यांनी पाहाणी करा. ज्या सामानाचा तुम्ही ६ महिन्यांपासून उपयोग केला नाही, त्या सामानाचा निकाल लावा, कारण घरात त्याचा वापर होत नाही मात्र ती वस्तू घरातील ठराविक जागा व्यापते. घरातील निरूपयोगी सामान आणि रद्दीकचरा नकारात्मक उर्जा निर्माण करतं.

* घरातील प्रत्येक खोली नको त्या सामानाने भरून टाकण्याऐवजी बाजारातून आवश्यक वस्तूच खरेदी कराव्यात. मोकळं आणि स्वच्छ नीटनेटकं घर पॉझिटिव्ह एनर्जी आमंत्रित करतं.

* घराच्या खिडक्या उघड्या ठेवाव्यात जेणेकरून घरात ताजी हवा खेळती राहिल.

* घरातील टाकाऊ सामान दर महिन्याच्या शेवटी रद्दीवाल्याला द्यावं.

* घरातील फर्निचर रिअरेंज करत राहा. यामुळे त्या ठिकाणी जमलेली धुळमाती स्वच्छ करता येते. नवीन ठिकाणी ठेवलेलं फर्निचर तुमच्यात नाविन्याची जाणीव निर्माण करून पॉझिटिव्ह एनर्जी संचालित करते.

* घर आणि बाल्कनीमध्ये पाम, कॅक्टस, मनीप्लांट, रबर प्लांट, फर्न, क्रोटन, एलोवेरासारखे इनडोर प्लांट आणि बाल्कनीमध्ये पिटोनिया आणि बोगनवेलिया यासारख्या रंगीबेरंगी फुलांचे आणि वेलींचे प्लांट लावा. यामुळे घरात ऑक्सिजन आणि पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते.

* घरात केमिकलयुक्त वस्तूंच्या ठिकाणी इको फ्रेंडली नॉनटॉक्सिक होममेड सोल्यूशन्सचा वापर करा. अलीकडे बाजारात इको फ्रेंडली साबण, सोल्यूशन्स क्रॉकरी तसंच फर्निचर उपलब्ध आहे.

* घरात रिसायकल केल्या जाणाऱ्या वस्तूंचा वापर करा. घरात दररोजच्या कचऱ्यासाठी दोन डबे ठेवा. एकामध्ये पेपर, विविध वस्तूंचे रॅपर व सुका कचरा टाकावा आणि दुसऱ्यामध्ये भाजीच्या साली व उष्ट खरकटं वगैरे ओला कचरा टाकावा. हा सर्व कचरा खड्डयात वा डब्यात एकत्रित करून खत बनवा. हे खत तुमच्या घरातील प्लांट्ससाठी अतिशय उपयुक्त ठरेल.

* घरात नैसर्गिक प्रकाश येण्याची योग्य व्यवस्था असावी, कारण खोलीतील अंधार तुमची मानसिकता संकुचित करणारा ठरतो, तर प्रकाशमान खोली तुम्हाला उर्जावान बनवून तुमच्यात पॉझिटिव्ह मानसिकता विकसित करते. सकाळ होताच खिडक्यांचे पडदे बाजूला करावेत जेणेकरून प्रकाश येऊ शकेल.

* प्रकाशयोजनाही योग्य असावी. सी.एफ.एल. ऐवजी एलईडी लाइट्सचा वापर करावा. हे आरोग्य आणि पर्यावरण दोहोंसाठी फायदेशीर असतं.

* घरात लवेंडर. मिंट, खस, मोगरा, रोजसारख्या नैसर्गिक सुगंध असणाऱ्या कॅन्डल्स लावा. याचा सुगंध घरातील नकारात्मक एनर्जी समाप्त करून सकारात्मकता वाढवतो.

* निसर्गाशी जवळीक साधा. घरात नैसर्गिक पेंटिंग लावा. जर घरात जागा असेल तर किचन गार्डन जरूर तयार करा. अन्यथा कुंड्यांमध्ये रोपटी लावून घराला हिरवंगार बनवा.

* आरसे हे एनर्जी निर्माण करतात असं मानलं जातं. ते अशा ठिकाणी लावा, जिथे तुम्ही सकारात्मक एनर्जी वाढवू इच्छिता. ते टॉयलेट, बाथरूम वा डस्टबिनया आसपास लावू नका नाहीतर नकारात्मक एनर्जी उत्पन्न होईल.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें