3 टिप्स : अशा प्रकारे चेहऱ्यावरील नको असलेले केस काढा

* गृहशोभिका टिम

तुमच्या चेहऱ्यावर खूप केस आहेत का? चेहऱ्याचे सौंदर्य कमी करणारे केस? आता तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. बहुतेक मुलींना चेहऱ्यावरील केसांची समस्या असते आणि कधीकधी या समस्येमुळे त्यांचा आत्मविश्वास कमी होतो. अनेकदा तणावामुळे असे घडते, काही वेळा अनुवांशिक किंवा हार्मोनल असंतुलनामुळे चेहऱ्यावर केस येतात.

प्रत्येकवेळी चेहऱ्याला ब्लीच केल्याने चेहऱ्याची चमक कमी होते आणि पुन्हा पुन्हा वॅक्सिंग करणे हा देखील या समस्येवर योग्य उपाय नाही. पण चेहऱ्याच्या केसांचा रंग हलका झाला तर? असे अनेक घरगुती उपाय आहेत ज्याचा अवलंब करून तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरील केसांचा रंग हलका करू शकता. रंग फिकट झाल्यामुळे ते कमी दिसतील आणि तितकेसे वाईट दिसणार नाहीत.

  1. संत्र्याची साल आणि दही पेस्ट

संत्र्याची साल त्वचेसाठी खूप फायदेशीर असते. याच्या वापराने चेहरा सुधारतो. याशिवाय चेहऱ्यावरील केसही हलके होतात. जर तुम्हाला चांगले परिणाम हवे असतील तर संत्र्याच्या सालीमध्ये थोडे दही आणि लिंबाच्या रसाचे काही थेंब मिसळा. ही पेस्ट रोज लावल्याने चेहरा सुधारेल, पिंपल्स आणि मुरुमांची समस्या दूर होईल आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे चेहऱ्यावरील केसांचा रंग फिकट होईल.

  1. पपई आणि हळद पेस्ट

पपई हे एक नैसर्गिक ब्लीच आहे जे केवळ रंगच स्वच्छ करत नाही तर चेहऱ्यावरील केसदेखील हलके करते. तुम्हाला हवे असल्यास पपईमध्ये चिमूटभर हळदही घालू शकता. या पेस्टने दररोज काही वेळ मसाज करा आणि नंतर 20 मिनिटे राहू द्या. मग आपला चेहरा स्वच्छ करा. काही दिवसातच चेहऱ्यावरील केस हलके होतील.

  1. लिंबाचा रस आणि मध

जर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरील केसांचा रंग हलका करायचा असेल आणि तुमचा रंग सुधारायचा असेल तर मध आणि लिंबाच्या रसाचे मिश्रण लावणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. हे मिश्रण दररोज चेहऱ्यावर लावा आणि 10 मिनिटे राहू द्या. काही दिवसातच तुम्हाला फरक दिसू लागेल.

त्वचा उजळवणारी उटणी

* माधुरी गुप्ता

वातावरणातील बदल, हवा, धूळ व प्रदूषणामुळे त्वचेवर वाईट परिणाम होत असतातच, अशात जर योग्य काळजी घेतली नाही तर अवेळी चेहऱ्यावर सुरकुत्या येतात, त्वचा टवटवीतपणा हरवू लागते.

त्वचेच्या पोतानुसार घरगुती उटण्यांचा वापर करून त्वचा स्वस्थ, सुंदर व चमकदार बनवता येऊ शकते.

सौंदर्यतज्ज्ञ डॉली कपूर सांगतात की उटण्याने चेहरा सतेज होतो. त्वचा आश्चर्यकारकरित्या उजळते. त्यामुळेच तर लग्नाच्या एक महिना आधीपासून नववधुला रोज उटणे लावले जाते. फक्त याबाबत काळजी घेतली गेली पाहिजे की उटण्यासाठी जे साहित्य वापरले जाईल, ते त्वचेला अनुकूल असावे. तसेच उटण्याने जेव्हा स्क्रब कराल, तेव्हा हलक्या हाताने करावे. जोर लावून उटणे काढू नये. असे केल्याने त्वचेला हानी पोहोचू शकते. त्यावर चट्टे येऊ शकतात. हलक्या हाताने गोलाकार फिरवत उटणे काढावे.

अनेक फायदे

उटण्याच्या वापराने त्वचेमध्ये ओलावा व चमक टिकून राहते. त्यामुळे मृत त्वचा निघून त्वचेला नवी टवटवी येते. तसेच रक्तप्रवाहही सुरळित होतो, कारण उटणे काढत असताना आपोआप त्वचेला मालिश केली जाते. उटण्यामुळे रंगही उजळतो. सुरकुर्त्यांपासून बचाव होतो.

बहुतेक उटण्यांमध्ये हळदीचा वापर केला जातो. त्यामुळे अनेक रोगांपासून त्वचेचा बचाव होतो. अनेक लाभ असले तरी आपल्या त्वचेला अनुरूप उटण्यांचाच वापर करावा. जसे की कोरड्या त्वचेसाठी कधी लिंबू, संत्रे आदी आंबट फळांचा वापर करू नये.

रंग उजळवणारी उटण

  • २ चमचे साय, १ चमचा बेसनपीठ व चिमूटभर हळद मिसळून पेस्ट बनवून चेहऱ्यावर लावावी. १०-१५ मिनिटांनंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा. रंग उजळू लागेल.
  • १ चमचा उडदाची डाळ कच्च्या दूधात भिजवा. मग वाटून पेस्ट तयार करा. यात थोडे गुलाब पाणी मिसळून चेहऱ्यावर लावा. थोडावेळ वाळू द्या. मग हळूहळू गोलाकार फिरवत फिरवत उटणे काढावे व चेहरा धुवावा. त्वचा चमकदार होईल.
  • २ चमचे बेसनपीठ, १ चमचा मोहरीचे तेल व थोडे दूध मिसळून पेस्ट बनवा. पूर्ण शरीरावर हे उटणे लावावे. काही वेळाने हळूहळू रगडून काढून टाकावे व अंघोळ करावी. त्वचा मऊ मुलायम होईल.
  • मसूर डाळ वाटून पावडर करून घ्या. मग २ चमचे मसूर डाळीच्या पावडरमध्ये १ अंड्याचा बल्क मिसळून पेस्ट बनवा. यात २ थेंब लिंबूरस व १ मोठा चमचा कच्चे दूध मिसळून रोज चेहऱ्यावर लावा, सुकल्यानंतर काढून टाका व चेहरा थंड पाण्याने धुवून घ्या.
  • १ चमचा दही, १ मोठा चमचा बेसनपीठ, चिमूटभर हळद व २ ते ३ थेंब लिंबाचा रस मिसळून घट्ट पेस्ट बनवा. हे मिश्रण हातपाय, चेहरा व इतर शरीरावर लावून ५-१० मिनिटं राहू द्या व नंतर हाताने काढून घेत अंघोळ करा.
  • एक चमचा मुलतानी मातीमध्ये थोडी साय, काही थेंब गुलाबजल मिसळून पेस्ट बनवा. ती चेहऱ्यावर लावून सुकू द्या. मग चेहरा थंड पाण्याने धुवून घ्या
  • १ चमचा मोहरीला दूधात बारीक वाटून घ्या व चेहऱ्यावर लावा मोहरीच्या उटण्याने रंग उजळतोच शिवाय त्वचाही चमकदार होते.
  • दह्यामुळे त्वचेचा रंग उजळतो. लिंबाने तेलकटपणा कमी होतो. या दोन्हींपासून बनवलेल्या उटण्याने कांती उजळते.
  • टरबूज आणि सीताफळाच्या बिया समप्रमाणात घेऊन वाटून घ्या. मग दूध मिसळून चेहरा व मानेवर लावा. हळूच मालिश करून काढा. काही दिवस याचा प्रयोग केल्याने रंग उजळेल.
  • ब्रेडस्लाईस थोड्या दूधात भिजवून चेहऱ्यावर लावा. ५-१० मिनिटांनी मालिश करून काढून घ्या. चेहरा पाण्याने धुवून घ्या. मृत त्वचा जाऊन सतेजपणा येईल.
  • १ चमचा बेसनपीठ, चिमूटभर हळद, २-३ थेंब लिंबाचा रस आणि थोडं कच्चं दूध मिसळून लेप बनवा. काही दिवस पूर्ण शरीरावर याचा प्रयोग करा. त्वचा उजळेल.

कोरड्या त्वचेसाठी

  • १ मोठा चमचा तांदळाचे पीठ, १ छोटा चमचा मध व १ छोटा चमचा अंड्याचा पांढरा भाग मिसळून लेप तयार करा. ५ मिनिटे लावून चेहरा धुवून घ्या.
  • मोठा चमचा चंदन पावडरमध्ये गुलाबपाणी मिसळून लेप तयार करा. मग चेहऱ्यावर १५-२० मिनिटे ठेवून हलक्या हाताने चोळून काढावे. चेहरा स्वच्छ धुवावा.
  • पिकलेलं केळ कुस्करून घ्या. त्यात थोडं मध व लिंबाचा रस मिसळून चेहऱ्यावर लावा. ५-६ मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुवून घ्या. यामुळे चेहरा तर उजळतोच व सुरकुत्याही नष्ट होतात.
  • १ लहान चमचा बदाम पावडर, १ लहान चमचा साय, १ मोठा चमचा मसूर डाळीची पेस्ट, १/४ लहान चमचा गुलाब पाणी व काही थेंब तेस मिसळून पेस्ट तयार करा. ती चेहरा व पूर्ण शरीराला ही लावू शकता. नंतर अंघोळ करावी. याने त्वचा उजळून निघेल.

तेलकट त्वचेसाठी

  • १ मोठा चमचा जवाचे पीठ, १ मोठा चमचा सफरचंदाचा गर मिसळून पेस्ट बनवा. चेहऱ्यावर लावून १०-१५ मिनिटांनी चेहरा धुवून घ्या.
  • २ मोठे चमचे संत्र्याच्या सालीच्या पावडरमध्ये थोडे कच्चे दूध आणि गुलाबपाणी घालून घट्ट लेप तयार करा. चेहऱ्यावर लावून थोड्या वेळाने चेहरा धुवून घ्या. त्वचा सतेज होईल.
  • १ मोठा चमचा दही व १ छोटा चमचा काकडीचा रस मिसळून १०-१५ मिनिटे चेहऱ्यावर लावा. मग थंड पाण्याने चेहरा धुवून घ्या.
  • १ मोठा चमचा चंदन पावडर, १ लहान चमचा कडूलिंबाची पाने, १ मोठा चमचा गुलाबाच्या पाकळ्या, १ लहान चमचा चोकर व चिमूटभर हळदपूड मिसळून पेस्ट बनवा व चेहऱ्यावर लावा. सुकल्यानंतर थपथपवून हळू हाताने काढा व चेहरा स्वच्छ धुवून घ्या.
  • १ मोठा चमचा जवाचे पीठ, १ मोठा चमचा बेसनपीठ, चिमूटभर हळद, ४-५ थेंब लिंबू रस व एक मोठा चमचा गुलाबजल मिसळून लेप तयार करा. ते चेहऱ्यावर किंवा शरीरावर लावा. वाळल्यांतर धुवून घ्या.

डागाळलेल्या त्वचेसाठी

  • २ मोठे चमचे साय, काही थेंब गुलाबपाण्यामध्ये, ताजी हळद वाटून मिसळा आणि चेहऱ्यावर काही दिवस रोज लावा. चेहरा नितळ होऊन डाग जातील.
  • १ मोठा चमचा कडूलिंबाची वाळलेली पाने, २ मोठे चमचे जवाचे पीठ, २ मोठे चमचे बेसनपीठ, २ मोठे चमचे मुलतानी माती, अर्धा चमचा मध व काही थेंब लिंबाचा रस मिसळून लेप तयार करून चेहऱ्यावर लावा. काही दिवस सतत प्रयोग केल्यास त्वचा स्वच्छ डागविरहित दिसू लागेल. ही पेस्ट बनवून आठवडाभर फ्रिजमध्ये ठेवू शकता.
  • दूधामध्ये चिमूटभर हळद, गव्हाचे पीठ व काही थेंब तेल घालून पेस्ट बनवून घ्या. हे हातपाय तसेच चेहऱ्यावर चोळून लावा. वाळल्यानंतर चोळून काढा. असे रोज केल्याने चेहरा उजळू लागेल.
अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें