होली स्पेशल : होळीचे रंग करू नका केसांना बेरंग

– आभा

होळीच्या मस्तीत केमिकलयुक्त रंगांच्या वापरामुळे सुंदर रेशमी केसांचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे केसांचं रंगामुळे होणाऱ्या नुकसानीपासून बचाव करण्यासाठी मेकअप एक्सपर्ट रेणू महेश्वरी काही खास टिप्स सांगत आहेत :

* रंगांच्या मस्तीत माखण्यापूर्वी केसांना मस्टर्ड ऑइलने मसाज करा म्हणजे कोणत्याही केमिकलयुक्त रंगांचा प्रभाव कमी होईल आणि केस सहजपणे स्वच्छ करता येतील.

* नेहमी सल्फेड फ्री शाम्पूचा वापर करा. तुमचे केस जर कलर्ड असतील वा एखादी कलर्ड ट्रीटमेंट करवून घेतली असेल तर जास्त फेस येणारा शाम्पू नुकसानदायक ठरू शकतो. महिन्यातून कमीत कमी एकदा तरी क्लॅरिफाइंग शाम्पूचा वापर आवर्जून करा.

* क्लॅरिफाइंग शाम्पू लहान, छोटे, घनदाट, हलके, तेलकट आणि कोरड्या केसातील सर्व इंप्युरिटीज स्वच्छ करून त्यांचा चमकदारपणा परत आणतो.

खास जोपासना

* दररोज केस धुवायचे असल्यास माइल्ड शाम्पूचा वापर करा.

* केस लांब व घनदाट वा कुरळे असतील तर ते आठवड्यातून ३ वेळा धुवा. घामामुळे केसांना दुर्गंधी येण्याबरोबरच कोंड्याची समस्यादेखील निर्माण होते.

* केस टॉवेलने सुकविण्याऐवजी जुन्या कॉटनच्या कपड्याने बांधा. केस लवकर सुकतील.

* केसांच्या देखभालीसाठी विटामिन बीयुक्त शाम्पूचा वापर करा.

* केसांचा पोत ओळखूनच शाम्पू व कंडिशनरचा वापर करा. केस धुण्यापूर्वी त्यांच्या मुळांमध्ये व्यवस्थित तेल लावून मसाज करा. एका तासानंतर एखाद्या माइल्ड शाम्पूने धुऊन घ्या. शाम्पू नेहमी थोड्याशा पाण्यात मिक्स करूनच लावा. यामुळे शाम्पू पूर्णपणे केसांना कव्हर करून घेतो. नंतर कंडीशरनचा वापर करा. कंडीशनर ५ ते ७ मिनिटं तसाच राहू द्या. नंतर गरम पाण्याने धुऊन घ्या. यादरम्यान एकदा केसांना थंड पाण्यासोबतदेखील धुऊन घ्या.

कोरडे केस धुण्यासाठी टिप्स

* शाम्पूनंतर केसांना मध आणि गुलबक्षीच्या फुलांचा पॅक लावा. यामुळे केस मुलायम होतात.

* केस धुतल्यानंतर सीरम आवर्जून लावा.

* केसांमध्ये ब्रशिंग आणि स्टायलिंग प्रॉडक्ट वापरू नका.

ऑइली, स्टिकी आणि डॅण्ड्रफचे केस

* ट्रीटी ऑइल केसांमध्ये लावा व मिल्क प्रोटीन, ग्रीन टी पावडरच्या पॅकचा वापर करा.

* केसांना धुण्यासाठी डीप क्लीन शाम्पू आणि कंडिशनरचा वापर करा.

* आठवड्यातून एकदा केसांना वाफ द्या. गरम पाण्यात टॉवेल डिप करून पिळून घ्या. नंतर तो केसांना लपेटून घ्या. थोडा वेळ तसाच लपेटून ठेवल्यानंतर पुन्हा तसंच करा. यामुळे केस व्यवस्थित स्वच्छ होतील.

केस गळत असल्यास

* केस खूपच सेन्सिटिव्ह असतात. यासाठी बायोटिक शाम्पू ज्यामध्ये जटामाँसी आणि कॉफीचा वापर केला जातो, त्यांचा वापर करावा.

* केस धुतेवेळी कोमट पाण्यात शाम्पू मिसळून तो केसांवर हळुवारपणे पसरवत स्काल्पवर लावा. त्यानंतर पाण्याने स्वच्छ करून घ्या.

* लव्हेंडरयुक्त क्रीमी हेअर मास्कचा वापर करा.

* मॉश्चरायद्ब्रारयुक्त ग्लॉस सीरमचा वापर करा.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें