होली स्पेशल :या होळीला रंगीत पक्वान्नांची मेजवानी घ्या

– नीरा कुमार

होळीचा सण जवळ आला आहे आणि तुम्ही अजूनही द्विधावस्थेत आहात की सणासाठी कोणती पक्वान्नं बनवावीत आणि कोणती नाही, तर अजिबात घाबरू नका. या होळीला तुम्ही कमी वेळेत कमी कॅलरी असलेली पक्वान्नं बनवून एका वेगळ्या अंदाजात सादर करा आणि होळीची मजाही घ्या आणि इतरांची प्रशंसाही मिळवा.

* अलीकडे लोक कमी गोड खातात. म्हणून कर्ड पुडिंग बनवा. घट्ट दह्यामध्ये थोडी पिठीसाखर, चिमूटभर जायफळ पावडर, वेलची पावडर, काही बारीक चिरलेली फळं आणि रोस्ट केलेले व लहान लहान तुकडे केलेले ड्रायफ्रूटस घालून लहानलहान वाट्यांमध्ये घालून सकाळीच फ्रिजमध्ये ठेवून द्या. खायला अगदी चविष्ट आणि ढटपट बनवले जाणारे पुडिंग तयार आहे. आता घरात कोणीही पाहुणा आला की फ्रिजमधली तयार वाटी काढा आणि प्लास्टिकचा चमचा व नॅपकिन देऊन सर्व्ह करा.

* हवं तर तुम्ही कर्ड पुडिंगसारखंच कस्टर्डही बनवू शकता. त्यामध्ये थोडीशी मलई मिसळली तर कस्टर्ड खाण्यात आणखीनच चविष्ट लागतं. त्याच्यावर चॉकलेट सॉस किंवा स्ट्रॉबेरी सॉसही तुम्ही घालू शकता.

* मिल्क पावडर आणि पनीरद्वारे घरामध्येच तुम्ही खाण्याची बर्फीही बनवू शकता. यापासून मिठाई बनवा आणि मग टूथपिकमध्ये लावूनच सर्व्ह करा.

* हवं तर तुम्ही फ्रूट स्टिकही तयार करू शकता. यासाठी तुम्ही तुमच्या आवडीचं फळ घ्या आणि समान आकारात कापून ते टूथपिकमध्ये लावा.

अतिशय लो कॅलरी डिश तयार आहे

* लहान मिनी इडली पिवळ्या, हिरव्या, लाल आणि पांढऱ्या रंगात तयार करा. मग एका एका स्टिकमध्ये ४-४ इडली लावा आणि ते एका मोठ्या कॅसरोलमध्ये ठेवा. सोबतच चटणीही झाकून ठेवा आणि मग येणाऱ्या पाहुण्यांना गरम गरम सर्व्ह करा.

* जाडसर कागदाचे लहान लहान कोन बनवा. कांदा, काकडी, टोमॅटो आणि बटाटा बारीक चिरून एका वेगळ्या कॅसरोलमध्ये ठेवा, त्याचबरोबर चटणीही ठेवा. जे कोणी पाहुणे येतील त्यांच्या हातात एक-एक कोन टेकवा.

* स्प्राउट सलाडमध्ये सर्व प्रकारच्या सिमलामिरची, कांदा इत्यादी मिसळून लहानलहान इकोफ्रेंडली प्लास्टिकच्या बाउल्समध्ये ठेवा. पाहुणे आल्यावर शेंगदाण्याचं कूट त्यावर भुरभुरून प्लास्टिकच्या चमच्यासहित सर्व्ह करा.

* जलजीरा बनवून ठेवा. मग ते पेपर ग्लासमध्ये सर्व्ह करा. चहा द्यायचा असेल तर आधीच बनवून थर्मासमध्ये ठेवा. शिवाय जर थंडाई द्यायची असेल तर तीही तुम्ही सर्व्ह करू शकता.

* मिनी बटाटा दही चाट बनवा. बटाटे उकडून सोलून घ्या. हिंगजिऱ्याची फोडणी द्या. मग ती घुसळलेल्या दह्यामध्ये घाला. त्यात थोडीशी सुंठपावडर, मीठ, मिरची आणि भाजलेलं जिरं मिसळा. बाउलमध्ये सर्व्ह करा. चारी बाजूला थोडीशी पापडी घालून आलू भुजिया भुरभुरवून सर्व्ह करा.

* अशाच प्रकारे तुम्ही दही पॅटिस बनवू शकता.

* बाजारात तयार इडलीचं पीठ सहज मिळतं. ते तुम्ही रात्रभर एका गरम ठिकाणी ठेवा. सकाळी ते आंबल्यावर त्यामध्ये किसलेलं गाजर, लाल, पिवळी आणि हिरवी सिमला मिरची आणि कोथिंबीर मिसळा आणि मग आप्पेपात्रांत फ्राइड इडली तयार करून चटणीसोबत सर्व्ह करा.

* बाजारातून इन्स्टण्ट ढोकळ्याचं पाकीट विकत आणा आणि सांगितल्याप्रमाणे मिश्रण तयार करा. मग इडली स्टॅण्डमध्ये थोडं थोडं मिश्रण घालून ढोकळा तयार करा आणि त्यावर फोडणी टाका. इडली स्टाइल ढोकळा तयार आहे.

* तुम्ही फ्रूट कॅनेट्सही तयार करू शकता. ब्रेड टोस्टरमध्ये रोस्ट करा, मग त्याचे चौकोनी किंवा गोल तुकडे कापून घ्या. त्यावर घट्ट दही लावा आणि किवी ठेवा, मग पुन्हा दही लावा आणि डाळिंबाचे दाणे भुरभुरवून सर्व्ह करा.

* तुम्ही घरातच बेक्ड करंजी बनवू शकता. खवा नसेल तरी हरकत नाही, २ कप दुधाच्या पावडरीमध्ये अर्धा कप दूध घाला आणि नॉनस्टिक कढईमध्ये शिजवा, झटपट खवा तयार होईल.

* तुम्ही जर बाजारातून बुंदीचे लाडू आणि लहान गुलाबजाम आणले असतील तर बुंदीचे लाडू फोडून घ्या. मग थोडं थोडं बुंदीचं मिश्रण घेऊन त्याच्यामध्ये एक गुलाबजाम ठेवून ते गोल करा आणि दोन तास फ्रिजमध्ये ठेवा. मग बाहेर काढून सुरीने मधोमध कापा. टू इन वन लाडू तयार आहे.

* बेक करून तुम्ही समोसेही बनवू शकता. हे लोकांना खूप आवडतात. तुमच्याजवळ जर ओव्हन किंवा एयरफ्रायर असेल तर त्यातच तुम्ही ते कमी तापमानात ठेवा, समोसे कुरकुरीत आणि क्रिस्पी बनतील.

* अलीकडे लोक पूर्ण करंजी खात नाहीत. म्हणून अर्धी करंजी तुम्ही नॅपकिनमध्ये गुंडाळून ठेवा.

* एका ट्रेमध्ये नॅपकिन, पेपर प्लेट्स, ग्लास, बाउल्स, चमचे इत्यादी आधीच ठेवून घ्या. पाणी पिण्यासाठी वेगळे ग्लास आणि पाण्याचा जग ठेवा. एका जुन्या सुती धोतराचे किंवा ओढणीचे लहानलहान तुकडे फाडून घ्या आणि कोणालाही काही देण्यापूर्वी हात पुसूनच द्या. लक्षात ठेवा, तुमचे रंगीत हात खाद्यपदार्थांना लागता कामा नये. इतरांनाही हात पुसण्यासाठी ओला आणि सुका कपडा द्या, म्हणजे रंगीत पक्वान्नांच्या मेजवानीची गंमत येईल. एक डस्टबीनही जवळ ठेवा ज्यामध्ये पेपर प्लेट्स, कप्स आणि कपडे टाकता येतील.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें