आपण नेहमी एखाद्याच्या नजरेत असता

* मोनिका गुप्ता

आज जागो-जागी सुरक्षेसंबंधी हेरगिरी करणारे कॅमेरे बसविण्यात आले आहेत. परंतु आपल्या आजूबाजूला अशी घाणेरडी मानसिकता असलेले लोक आहेत, जे या सुरक्षा कवच कॅमेऱ्यांना गुन्ह्याचे कारण बनवण्यास हट्टास पेटले आहेत.

आम्ही जेव्हाही बाहेर पडतो तेव्हा बऱ्याच ठिकाणी कॅमेरे बसवलेले दिसून येतात. अशा परिस्थितीत आपण स्वत:ला सुरक्षित अनुभव करतो. परंतु आता लोकांना हे कॅमेरे पाहून सुरक्षित कमी आणि असुरक्षित अधिक वाटते.

आपण बाहेर चेंजरुम, हॉटेलरूम, सार्वजनिक वॉशरूम वापरतो पण काहीवेळा अशा ठिकाणी गुप्त कॅमेरे बसवले जातात ज्याची आपल्याला माहिती नसते. या कॅमेऱ्यांद्वारे महिलांचे अश्लील व्हिडिओ बनविले जातात आणि नंतर ते इंटरनेट आणि पॉर्न साइट्सवर टाकले जातात. जेव्हा हे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठया प्रमाणात व्हायरल होतात तेव्हा त्यांना याबद्दल कळून येते, ज्यामुळे त्यांची बरीच बदनामी होते आणि त्यांना मानसिक तणावातून जावे लागते. अशा अनेक स्त्रिया आहेत, ज्या ही बदनामी सहन करू शकत नाहीत आणि आत्महत्या करून घेतात.

अशा परिस्थितीत जर तुम्हीही बाहेर जाण्याचा किंवा हॉटेलमध्ये राहण्याचा प्लॅन करत असाल तर हॉटेलमधील खोलीची तपासणी एकदा अवश्य करून घ्या. आपण कपडयांची खरेदी करण्यासाठी जात असाल तर आपली नजर चेंजिंग रूममध्ये नक्कीच फिरवा. कुठेतरी एखादा लपलेला म्हणजे स्पाय कॅमेरा आपल्या गोपनीयतेसह खेळखंडोबा तर करत नाही ना.

अशी अनेक प्रकरणे समोर येत असतात ज्यांत लपलेल्या कॅमेऱ्यांचा गैरवापर केला जातो. अशीच एक बाब काही वर्षांपूर्वी समोर आली होती, त्यात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी गोव्यातील एका शोरूममधील चेजिंगरूममध्ये एक हिडन कॅमेरा पकडला होता.

जरी लपलेले कॅमेरे शोधणे थोडे कठीण असू शकते, परंतु अशा काही टिपा आहेत, ज्याद्वारे आपण सहजपणे हेरगिरी करणारे कॅमेरे शोधू शकता. परंतु त्यापूर्वी अश्लील व्हिडिओ बनविण्यासाठी कॅमेरे कुठे लपवितात आणि या व्हिडिओंचा व्यवसाय कसा केला जातो हे जाणून घेणे आवश्यक आहे.

अश्लील व्हिडिओ कसे तयार करतात

अश्लील व्हिडिओ यासाठी बनविले जातात की जेणेकरून ते अश्लील साइटवर विकता येतील. हे व्हिडिओ एडिट करून काही मिनिटांचे बनविले जातात आणि हे काही मिनिटांचे व्हिडिओ विकून ५०-६० हजार रुपये मिळतात. मग व्हिडिओ खरेदीदार ते अश्लील साइटवर अपलोड करुन कोटयवधी रुपये कमवतात.

कोणताही अश्लील व्हिडिओ स्पाय कॅमेऱ्याद्वारे बनविला जातो. स्पाय कॅमेरे खूपच लहान असतात. म्हणूनच ते कोणत्याही वस्तुमध्ये सहज फिट होतात आणि ते सहज सापडत नाहीत. जेव्हा-जेव्हा एखादी महिला चेंजिंग रूममध्ये कपडे बदलत असते किंवा सार्वजनिक वॉशरूम वापरत असते किंवा एखाद्या हॉटेलच्या खोलीत राहत असते, तेव्हा या लपविलेल्या कॅमेऱ्यांद्वारे तिचा अश्लील व्हिडिओ बनविला जातो आणि मग तो सोशल मीडिया, अश्लील साइटवर अपलोड करून दिला जातो.

गुप्त कॅमेरा शोधण्याच्या युक्त्या

* आरशात आपले बोट ठेवून लपविलेला कॅमेरा आरशाच्या मागे आहे की नाही ते आपण शोधू शकता. जर आपण काचेवर बोट ठेवले आणि आरशात दिसून येणाऱ्या आपल्या बोटाच्या दरम्यान अंतर येत असेल तर याचा अर्थ असा की तो आरसा ओरिजनल आहे.

* खोलीतील दिवे बंद करुनदेखील लपलेला कॅमेरा शोधला जाऊ शकतो. खोलीत लपलेला कॅमेरा शोधण्यासाठी खोलीचा प्रकाश बंद करा. मग तेथे लाल किंवा हिरवे लाईट तर दिसून येत नाही ना ते पहा. असे दिसून आल्यास याचा अर्थ असा आहे की आपल्या खोलीत लपलेला कॅमेरा लावलेला आहे.

* आपण एखाद्या ट्रायल रूममध्ये गेलांत आणि आपल्या फोनचे नेटवर्क गायब झाले तर खोलीत लपलेला कॅमेरा असल्याचे समजून घ्या.

* ट्रायलरूम वापरताना सर्वात आधी ट्रायलरूमचे हुक किंवा हँडलमध्ये लपलेला कॅमेरा तर नाही ना ते पहा, कारण बऱ्याचदा अशा ठिकाणीही लपलेला कॅमेरा असण्याची शक्यता असते.

* दारात तळाशी किंवा मध्यभागी किंचितशी जागा असल्यास किंवा कुठेतरी मध्यभागी तुटलेले असेल तर त्या ठिकाणी लपलेला कॅमेरा असू शकतो.

* लपलेला कॅमेरा शोधक एक अतिशय उपयुक्त वस्तू आहे. हे शोधक कुठेही लपविलेले कॅमेरे शोधू शकतात.

* काही कॅमेरे गती संवेदनशील असतात, जे क्रियाकलाप झाल्यावर स्वयंचलितपणे चालू होतात, ज्याचा आवाज ऐकून आपण सहजपणे लपलेला कॅमेरा पकडू शकता.

* आपण आपल्या स्मार्टफोनमध्ये हिडन कॅमेरा फाइंडर अॅप डाउनलोड करू शकता. आपण ट्रायलरूममध्ये प्रवेश करताच अॅप चालू करा आणि मोबाइलला ट्रायलरूममध्ये फिरवा. जर लाल रंगाचे निशाण चमकू लागले तर खोलीत कॅमेरा असल्याचे समजून घ्या.

* तंत्रज्ञानाचा योग्य फायदा घेऊन अशा परिस्थिती टाळण्यासाठी नेहमीच सावधगिरी बाळगा. विशेषत सार्वजनिक ठिकाणी.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें