नववर्षाचा फिटनेस फॉर्म्युला

* आरुषी वर्मा

‘‘नवीन वर्षात मला फिट दिसायचे आहे आणि यासाठी मला ५ किलो वजन कमी करायचे आहे,’’ किंवा ‘‘मला आपला हरवलेला फिटनेस परत मिळवून तो मेंटेन ठेवायचा आहे,’’ अशाप्रकारचे काही संकल्प तुम्हीसुद्धा केले असतील. असेही होऊ शकते की तुमच्यापैकी काही लोकांनी लवकर फिट होण्याच्या नादात शॉर्टकट घ्यायला सुरुवातही केली असेल.

तुमच्यासाठी हे जाणून घेणे जरुरी आहे की हे सर्व प्रयत्न लाँग टर्मसाठी चांगले नाहीत. त्यामुळे समंजसपणे वजन कमी करण्याचे असे प्रयत्न करा की ज्यात सातत्याने तुमचे वजन घटत राहील. झुंबा आणि वेट लिफ्टिंग व्यायाम तुमच्यासाठी उत्तम ऑप्शन सिद्ध होईल.

झुंबा आहे जबरदस्त

झुंबासाठीही अनेक लोक जिमला जाणे पसंत करतात. परंतु जिमच्या उपकरणांवर आणि मशीनवर त्याच त्या पारंपरिक पद्धतीने वर्कआउट करणे फिटनेस प्रेमींमध्ये मोठया प्रमाणावर कंटाळवाणे ठरते. आता त्यांना आपले फिटनेस लक्ष्य गाठायला काहीतरी विविधता, उत्साह आणि मनोरंजन असलेले असे एखादे टेक्निक हवे असते.

झुंबाचा आविष्कार ९०च्या दशकात एक फिटनेस प्रशिक्षक अल्बर्टो बेटो पेरेज यांनी केला. हा ऊर्जेने परिपूर्ण असा एरोबिक फिटनेस प्रोग्रॅम आहे, जो दक्षिणी अमेरिकी डान्स शैलीपासून प्रेरित आहे. यात आपल्या पायांच्या पंज्यावर उभे राहून हिपहॉप आणि सालसाच्या मस्तीभऱ्या बिट्सवर आपली बॉडी मूव्ह करायची असते. उत्साह आणि फिटनेस यासाठी केला जाणारा झुंबा हा मुख्यत्वे ग्रुपने केला जातो.

झुंबा हा वेगाने केला जाणारा डान्स प्रकार असल्याने हा ट्रेडमिलवर धावणे किंवा क्रॉस ट्रेनरवर वेळ घालवणे अशा वर्कआउटपेक्षा वेगाने फॅट बर्न करतो.

लवचिकपणा वाढतो : झुंबा एक कार्डिओव्हॅस्क्युलर एक्सरसाइज आहे, जी वेगात आणि मध्यम अशा गतीने केली जाते आणि इंटरवेल ट्रेनिंगसारखे काम करते. त्यामुळे प्रत्येक मांसपेशी खासकरून पोट आणि पाठ यावर अधिक परिणामकारक ठरते. झुंबाचे परिणाम एवढेच सीमित नसून ताकदीने परिपूर्ण असलेल्या या वर्कआउटचा दुसरा फायदा हा आहे की हा सगळया मांसपेशींना सक्रिय करतो आणि पूर्ण शरीराला फिट राखायला मदत करतो. फिट राहण्यासाठी ५ ते ६५ वर्षांपर्यंत कोणीही व्यक्ती झुंबा करू शकतो.

वेट ट्रेनिंग

वेट ट्रेनिंग हेसुद्धा वजन कमी करण्याचे एक अन्य प्रभावी असे वर्कआउट आहे, जे परंपरागतरित्या बॉडी बिल्डर्समध्ये लोकप्रिय राहिलेले आहे. आश्चर्य वाटतंय? आपल्यापैकी बहुतेक लोकांचा असा समज असतो की वेट ट्रेनिंग हे फक्त मसल्स बनवण्यासाठीच योग्य असते. हेच कारण आहे की वजन कमी करू पाहणारे वेट ट्रेनिंगला प्राधान्य देत नाहीत आणि ते सोडून कार्डिओ आणि कॅलिस्थेनिक्स करतात.

वेट लिफ्टिंग शरीराच्या बळकटिसह वजन कमी करण्याचा एक महत्त्वपूर्ण व्यायाम आहे. परंपरागत रूपात स्ट्रेंथ ट्रेनिंगमध्ये सहनशक्ती आणि मांसपेशी मजबूत करण्यासाठी फ्री वेट किंवा वेट मशीनचा वापर केला जात आहे. मेटाबोलिक स्ट्रेंथ ट्रेनिंगमध्ये उच्च तीव्रतेचे इंटरवेल सर्किट्स आणि चेंजिंग कॉम्बिनेशन्ससह फ्री वेट्स, कॅटलबेल्स, डंबेल्स इ. चा वापर करत रिपीट करायचे असते.

वर्कआउट दरम्यान रेजिस्टन्स बँड्स मेटॅबॉलिझम रेट वाढवतात. कार्डिओ ट्रेनिंगमध्ये फक्त वर्कआउटच्या दरम्यान हृदय आणि फुफ्फुसांची क्षमता वाढून कॅलरीज बर्न होतात, याउलट वेट ट्रेनिंगमध्ये व्यायाम संपल्यानंतरही ७२ तासांपर्यंत कॅलरी बर्निंग सुरू राहते.

वजन कमी मजबूतीची हमी : वेट लिफ्टिंगचे फायदे केवळ वजन कमी करण्यापर्यंत सीमित नाहीत. वेट ट्रेनिंग हे बॉडी मसल्स बनवण्यासाठी आणि हाडांची घनता वाढवण्यासाठी उपयुक्त ठरते. ज्यामुळे ऑस्टिओपोरोसिससारख्या आजारांपासून संरक्षण मिळते. दररोज वेट लिफ्टिंग केल्याने डायबिटीसचा धोका कमी होतो आणि यामुळे पाठदुखीतही आराम मिळतो. मानसिक स्वास्थ्यही वाढते.

त्यामुळे शरीराच्या मजबुतीसाठी भलेही फिटनेसच्या धुंदीत तुम्ही झुंबा निवडा किंवा वेट ट्रेनिंग, हे दोन्हीही वर्कआउट्स तुमचे फिटनेसचे ध्येय गाठायला तुम्हाला मदत करतील. तुम्हाला वजन कमी करायचे असो किंवा मांसपेशींची मजबुती, झुंबा आणि वेट लिफ्टिंग हे दोन्हीही उत्तम मार्ग आहेत. तर मग तुम्ही घाम गाळायला तयार आहात का?

स्वस्थ गर्भावस्थेसाठी जरूरी नियमित तपासण्या

– डॉ. सुनीता यादव

गर्भधारणा होणे कोणत्याही स्त्रीसाठी सर्वात आनंददायी बाब आणि अप्रतिम अनुभव असतो. जेव्हा तुम्ही गर्भार राहता, त्या दरम्यान करण्यात येणाऱ्या प्रिनेटल चाचण्या तुम्हाला, तुमच्या गर्भात वाढणाऱ्या बाळाच्या आरोग्याबाबत माहिती देतात. यामुळे अशा कोणत्याही समस्येची माहिती मिळण्यास मदत होते, ज्याचा बाळाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो जसे की संक्रमण, जन्मजात व्यंग किंवा एखादा जेनेटिक आजार. याचे निदान बाळाच्या जन्माआधीच काही निर्णय घेण्यास मदत करतात.

तसे पाहता प्रीनेटल चाचण्या खुपच उपयोगी असतात, परंतू हे जाणणे खुप अवश्यक आहे की त्यांच्या परिणामांची व्याख्या कशी करायला हवी. पॉझिटिव्ह टेस्टचा नेहमी हाच अर्थ नसतो की आपल्या बाळाला एखादा जन्मजात दोष असेल. तुम्ही आपल्या डॉक्टरांशी चाचणीच्या रिपोर्टबाबत चर्चा करा.

डॉक्टर सगळयाच गर्भवती महिलांना प्रीनेटल टेस्टस् करण्याचा सल्ला देतात. काही स्त्रियांच्या बाबतीतच जेनेटिक तक्रारींची टेस्ट व इतर स्क्रिनिंग टेस्टस् करायची गरज भासते.

५ नियमित टेस्ट्स

गर्भावस्थेत काही नियमित चाचण्या हे निश्चित करण्यासाठी असतात की तुम्ही स्वस्थ आहात की नाही. तुमचे डॉक्टर तुमच्या रक्ताची आणि लघवीची चाचणी करून काही गोष्टी माहीत करून घेतात. यात खालील चाचण्यांचा समावेश आहे :

1 हिमोग्लोबिन (एचबी)

2 ब्लड शुगर एफ आणि पीपी

3 ब्लड ग्रुप चाचणी

4 व्हायरल मार्कर चाचणी

5 ब्लड प्रेशर

जर तुम्ही गर्भधारणेचा विचार करत असाल तर डॉक्टर तुम्हाला फॉलिक असिड (सप्लिमेंट्स) टॅबलेट्स घेण्याचा सल्ला देऊ शकतात. या गोळया घेण्याचा सल्ला तुम्हाला तेव्हासुद्धा दिला जाऊ शकतो, जेव्हा तुम्ही अगदी ठीक आहात आणि उत्तम आहारसुद्धा घेत आहात. व्हिटॅमिन बी सप्लिमेंट्स आणि कॅल्शियम घेण्याचा सल्ला सर्वच गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांना देण्यात येतो. हे सुरु करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्यावा.

इतर चाचण्या

स्कॅनिंग टेस्ट : अल्ट्रासाउंड तुमच्या बाळाच्या आणि आपल्या जननेंद्रियांच्या प्रतिमा घेण्यासाठी ध्वनितरंगांचा वापर करते. जर तुमची गर्भावस्था सामान्य असेल, तर तुम्हाला हे २-३ वेळा करावे लागेल. पहिल्यांदा अगदी सुरूवातीला काय परिस्थिती आहे हे पाहायला दुसऱ्यांदा बाळाची वाढ पाहायला साधारण १८-२० आठवडयाचा गर्भ झाल्यावर, ज्याने हे निश्चित होऊ शकेल की बाळाच्या शरीराचे सगळे अवयव योग्य प्रकारे विकसित होत आहेत अथवा नाहीत.

जेनेटिक टेस्ट्स : प्रीनेटल जेनेटिक टेस्ट् विशेषत: त्या स्त्रियांसाठी महत्त्वाची असतात, ज्यांच्या बाळाला जन्मजात व्यंग अथवा जेनेटिक समस्या असण्याची शक्यता असते. असे खालील परिस्थितीत होऊ शकते :

* तुमचे वय ३५ वर्षांहून अधिक असेल.

* तुम्हाला एखादा जेनेटिक आजार असेल किंवा तुम्ही किंवा तुमच्या नवऱ्याच्या कुटुंबात एखाद्या जेनेटिक आजाराचा इतिहास असेल.

* तुमचा आधी एखादा गर्भपात होऊन मृत शिशु जन्मले असल्यास.

डॉ. मोनिका गुप्ता, एम.डी.,डीजीओ गायनॉकोलॉजीस्टच्या मते निरोगी गर्भावस्थेसाठी चाचण्यांबाबत माहिती असणे अवश्यक आहे. प्रीनेटल टेस्टसमध्ये ब्लड टेस्ट्स सामिल आहेत, ज्यामुळे तुमचा ब्लड ग्रुप, तुम्हाला अॅनिमिया आहे अथवा नाही यासाठी तुमच्या हिमोग्लोबिनची पातळी, डायबेटीसच्या चाचणीसाठी ब्लड ग्लुकोजची पातळी, तुमचा आरएच फॅक्टर (जर तुमचा ब्लड ग्रुप आरएच निगेटिव्ह असेल आणि बाळाच्या वडिलांचा ब्लड ग्रुप आरएच पॉझिटिव्ह असेल तर शिशुमध्येही वडिलांचे आरएच प्रॉझिटिव्ह ब्लड असू शकते, ज्यामुळे तुमच्या शरीरात अँटीबॉडीज तयार होणे सुरु होते आणि त्यामुळे तुमच्या गर्भाला धोका उत्पन्न होऊ शकतो.) तपासला जातो. एचआयव्ही, हेपेटाईटीस सी आणि बीसारख्या आजारांसाठी तुमची व्हायरल मार्कर चाचणीसुद्धा होऊ शकते, कारण गर्भावस्थेत हे आजार होऊ शकतात.

जर तुम्हाला आधीच कळले असेल की तुमच्या जोडीदाराला एखादा विशिष्ट आजार आहे, तर तुम्ही सुरूवातीपासुनच भावनिक पातळीवर तयार राहु शकता.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें