हातांची स्वच्छता का महत्त्वाची आहे

* सोनिया राणा

जेव्हापासून कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे, तेव्हापासून लोक हातांच्या स्वच्छतेकडे लक्ष देऊ लागले आहेत. पण हे फक्त कोविड-१९ बद्दल नाही. हात धुण्याबद्दल अनेकदा घरातील वडीलधारी मंडळी वेळोवेळी सल्ला देतात आणि खडसावत ही असतात की जेवण करण्यापूर्वी आणि नंतर बाहेरून घरात आल्यानंतर, बाहेरून आणलेल्या कोणत्याही वस्तूला हात लावल्यानंतर आणि शौचालयात गेल्यानंतर हात साबणाने चांगले धुतले पाहिजे.

कारण जेव्हाही आपण हात न धुता अन्न खातो तेव्हा आपल्या हातातील जंतू अन्नासोबत आपल्या शरीरात प्रवेश करतात, ज्यामुळे आपल्याला अन्न विषबाधेसह अनेक आजारांना सामोरे जावे लागू शकते.

अनेक आजार होऊ शकतात

हातांच्या स्वच्छतेच्या बाबतीत आपण कोविड-१९ सारख्या महामारीकडे क्षणभर दुर्लक्ष केले तरी ते आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. सौम्य विषाणूजन्य संसर्गापासून ते कॉलरापर्यंत असे अनेक रोग आहेत, जे तुमच्या दैनंदिन दिनचर्येत या छोटयाशा सवयीचा समावेश न केल्याने तुम्हाला आपल्या जाळयात अडकवू शकतात, जसे की डायरिया, गॅस्ट्रोएन्टेरिटिस, अतिसार, कॉलरा, टायफॉइड, हिपॅटायटीस ए आणि इ, कावीळ, एच १, एन १, सर्दी आणि खोकला.

हात स्वच्छ कसे ठेवायचे

हात धुण्याशी संबंधित जाहिरातींनी बाजार भरलेला आहे, वर्तमानपत्रांतून असो की मासिकांतून किंवा दूरचित्रवाणीवरील जाहिरातींमधून, आम्हाला हात व्यवस्थित कसे धुवावेत याची माहिती दिली जाते. मात्र गेल्या १ वर्षात या जाहिरातीच नव्हे तर बाजारात उपलब्ध सॅनिटायझर आणि हँड वॉशचे प्रमाणही वाढले आहे.

अशा परिस्थितीत आपण सर्वजण घरी असलो तर सतत साबणाने हात स्वच्छ करणे आणि घराबाहेर असलो तरी आता सॅनिटायझरने हात जंतूमक्त करणे गरजेचे झाले आहे. यामुळे तुम्ही कोविड-१९ महामारीपासून तर वाचालच पण इतर आजारांपासूनही तुम्ही स्वत:चे रक्षण करू शकाल. डब्ल्यूएचओच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्येही असे म्हटले आहे की आपण आपले हात २० सेकंदांपर्यंत चांगले घासून धुवावेत.

ग्लोबल हँड वॉशिंग डे

हात धुण्याबाबत जनजागृती करण्यासाठी ‘ग्लोबल हँड वॉशिंग डे’ साजरा केला जातो. यूएनने २००८ पासून तो साजरा करण्यास सुरुवात केली होती आणि जेव्हा तो पहिल्यांदा साजरा केला गेला तेव्हा जगभरातील सुमारे १२० दशलक्ष मुलांनी आणि प्रौढांनी आपले हात धुतले होते. त्यानंतर तो दरवर्षी १५ ऑक्टोबरला साजरा केला जातो. २०२० मध्ये ‘हँड हायजिन’ ही त्याची थीम ठेवण्यात आली होती.

हाताचे आरोग्यदेखील महत्त्वाचे आहे

कोविड काळात हात धुणे खूप महत्वाचे झाले आहे. अशा परिस्थितीत हात धुण्यासोबतच त्यांच्या आरोग्याची काळजी घेणेही महत्त्वाचे आहे.

हात धुतल्यानंतर क्रीम लावा : हातांच्या वरच्या त्वचेवर नैसर्गिक तेल आणि मेण असते. वारंवार हात साबणाने धुतल्याने आणि सॅनिटायझर वापरल्याने ते कोरडे होतात. त्यामुळे हे टाळण्यासाठी हात धुतल्यानंतर किंवा सॅनिटायझर वापरल्यानंतर मॉइश्चरायझर जरूर वापरा.

सुगंधित साबणाचा वापर कमी करा : कोरोना संसर्गाच्या काळात लोकांनी सुगंधी साबणाचा अधिक वापर सुरू केला आहे. म्हणून याचा कमीत कमी वापर करा, कारण ते फेसाचा जाड थर बनवते आणि नंतर जेव्हा तुम्ही हात चोळून धुता तेव्हा ते त्यांच्यातील नैसर्गिक तेलदेखील धुवून टाकते. असे सतत केल्याने हातांचे नैसर्गिक सौंदर्यदेखील खराब होऊ शकते.

हात फाटले असल्यास सॅनिटायर लावू नका : हाताची त्वचा फाटली असेल तर अल्कोहोलयुक्त सॅनिटायझर लावणे टाळा. हँड सॅनिटायझर लावल्याच्या काही वेळानंतर मॉइश्चरायझिंग क्रीम वापरता येते. रात्री झोपण्यापूर्वी हातांवर मॉइश्चरायझिंग क्रीम लावा आणि सुती कापडाच्या हातमोजेने २० मिनिटे हात झाकून ठेवा जेणेकरून त्यात ओलावा येईल.

निरोगी राहायचे असेल, तर या सवयी लावा

* सोमा घोष

मुलांना अगदी सुरुवातीपासूनच साफसफाई आणि हायजीनबाबत सांगितले पाहिजे. ही सवय लहानपणापासूनच लावल्यास, ती मुलांच्या अंगवळणी पडते. केवळ मुलांनाच नव्हे, तर आईवडील दोघांनी अशी सवय स्वत:लाही लावून घेतली पाहिजे. साफसफाई व हायजीनमुळे अनेक आजारांपासून मुलांचे संरक्षण होते. उन्हाळा आणि पावसाळयात संक्रमणाचे आजार आपले डोके वर काढतात. अशावेळी या मोसमांत हायजीनची काळजी घेणे आवश्यक आहे.

एका सर्व्हेनुसार, भारतामध्ये ४७ टक्के मुले कुपोषणाची शिकार आहेत. याचे कारण म्हणजे, पोटातील इन्फेक्शन. पोटात सतत इन्फेक्शन झाल्यामुळे त्यांच्या शरीरातील पोषक तत्त्वे नष्ट होऊ लागतात. त्याचा परिणाम त्यांच्या डोक्यावर होतो. एवढेच नव्हे, पुअर हायजीनमुळे ५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांच्या मृत्यूचे प्रमाणही जास्त आहे.

मुंबईच्या एसआरव्ही हॉस्पिटलचे बालरोगतज्ज्ञ डॉ. विशाल बालदुवांच्या मतानुसार, निरोगी शरीरात नेहमीच निरोगी विचारांचा वास असतो आणि हे खरेही आहे. कारण हायजीन अनेक प्रकारचे असतात. त्यात खास आहेत, दात, नखे, केस आणि संपूर्ण शरीर.

साफसफाईशी संबंधित खालील टिप्स आईवडील मुलांना देऊ शकतात :

* जेव्हा मूल थोडेसे मोठे होईल, तेव्हा त्याला ब्रश आणि पेस्ट द्या. ब्रश करण्याची क्रियाही सांगा. सोबत तुम्हीही ब्रश करा. म्हणजे तुम्हाला पाहून, त्यालाही स्वत:हून ब्रश करण्याची इच्छा होईल. असे केले नाही, तर कमी वयात कॅविटी होण्याची शक्यता असते. कॅविटी हिरडयांपर्यंत गेल्यास, दुधाचे दात पडूनही नवीन येणाऱ्या दातांसाठी समस्या निर्माण होऊ शकते. त्याचप्रमाणे, काही मुले मोठी झाल्यानंतरही बाटलीने दूध पितात. अशावेळी दूध प्यायल्यानंतर त्यांना थोडे पाणी प्यायला दिले पाहिजे.

* नेल्स हायजीनबाबत मुलांना अवश्य सांगा. मुले धूळ-मातीत खेळतात. त्यामुळे त्यांचे हात व नखांच्या माध्यमातून जंतू त्यांच्या शरीरात प्रवेश करतात. घाणेरड्या हातांनी शरीर किंवा डोके खाजविल्याने फोड किंवा पुरळ येतो, याला स्कॅबिज इन्फेक्शन म्हणतात. जर एक दिवसाआड मुले नखे कापायचा कंटाळा करत असतील तर दोन दिवसांआड नखे कापा. मात्र, नखे कापताना मुलांना त्याचे फायदेही समजावून सांगा. त्याचप्रमाणे, जेवायला बसण्याअगोदर हात धुवायची सवय लावा.

पुअर हायजीनमुळे मुलांना अनेक आजार होतात. त्यामध्ये कॅविटी, टायफाइड, हगवण, हॅपेटाइटिस ए आणि इ हे कॉमन आहेत. याचा अर्थ, मुलांनी खेळण्यासाठी बाहेर जाऊ नये, असा नव्हे. त्यांना बाहेर जाऊ द्या, खेळू द्या. मात्र, घरात आल्यानंतर त्यांना अंघोळीची सवय लावा. नेहमी मेडिकेटेड साबणाचा वापर करा. उन्हाळा आणि पावसाळयात हायजीनची खास काळजी घ्या. जेणेकरून, आपले मूल योग्य सवयींमुळे नेहमी निरोगी राहील. जर आपले मूल निरोगी राहिले, तर त्याचा मानसिक विकासही उत्तमप्रकारे होईल.

पब्लिक स्पेसमध्ये हायजीन

संक्रमणामुळे पसरणाऱ्या आजारांच्या कचाटयात सापडण्याचा धोका घराबाहेर जास्त प्रमाणात असतो. खास करून तेव्हा, जेव्हा तुम्ही किंवा तुमची मुले सार्वजनिक शौचायलाचा वापर करता. आजकाल बाजारात अशी उत्पादने उपलब्ध आहेत, ज्यांचा वापर करून तुम्ही पब्लिक स्पेसमध्ये हायजीनची काळजी घेऊ शकता. स्प्रेच्या रूपात मिळणाऱ्या उत्पादनांना कॅरी करणेही सोपे असते. पब्लिक स्पेसमध्ये शौचालयांचा वापर करण्यापूर्वी सीटवर स्प्रे फवारा आणि संक्रमणापासून स्वत:चा बचाव करा.

अशी लावा मुलांना हात धुण्याची सवय

* पारुल भटनागर

एकीकडे मुलांचे लहान हात गोंडस वाटतात तर दुसरीकडे ते बहुतेक वेळा मातीत खेळत असल्याने जंतूंनीदेखील भरलेले असतात. त्यांचे मन नेहमी खोडया करण्यात गुंतलेले असते. अशा परिस्थितीत आपण या मौजमस्तीच्या वयात खोडया करण्यापासून त्यांना रोखू शकत नाही, परंतु त्यांना हँडवॉशचे महत्त्व नक्कीच सांगू शकतो.

बहुतेकदासंसर्गजन्य रोगाचे कारण घाण आणि हात न धुणे असते आणि यामुळे बरीच मुले आजारी पडतात आणि मरण पावतात. अशावेळी हँडवॉशच्या सवयीमुळे हे प्रमाण कमी होण्यास मदत होऊ शकते.

हातावर सर्वाधिक जंतू

हातावर दोन प्रकारचे जंतू असतात, ज्याला सूक्ष्मजीवदेखील म्हणतात. एक रहिवासी आणि दुसरे प्रवासी सूक्ष्मजीव. जे रहिवासी सूक्ष्मजीव असतात ते निरोगी लोकांना आजार पाडू शकत नाहीत, कारण ते नेहमीच हातावर असतात आणि हँडवॉशनेही जात नाहीत, तर प्रवासी सूक्ष्मजीव येत-जात असतात. खोकला, शिंकणे, दूषित अन्नाला स्पर्श केल्याने हे हातावर स्थानांतरित होतात. म्हणून साबणाने हात धुणे खूप महत्वाचे आहे.

न्यूझिलंडमध्ये झालेल्या संशोधनानुसार केवळ ९२ टक्के महिला आणि ८१ टक्के पुरुष शौचालयानंतर साबण वापरतात, तर अमेरिकेच्या संशोधनानुसार केवळ ६३ टक्के लोक शौचालयानंतर आपले हात धुतात. त्यापैकी फक्त २ टक्के साबण वापरतात.

कोणत्या युक्त्या आहेत ज्यामुळे मुलांमध्ये हँडवॉशची सवय लागेल :

मजेसह शिका : आपल्या मुलांना बाहेरून आल्यावर शौचालय वापरण्यास शिकवा. जेव्हा-जेव्हा तुम्ही एखाद्या प्राण्याला स्पर्श कराल, शिंकाल किंवा खोकाल तेव्हा-तेव्हा हात अवश्य धुवा अन्यथा जंतू तुम्हाला आजारी बनवतील. तुम्हीही त्यांच्या या नित्यकर्मात सहभागी व्हा. त्यांना सांगा की जो लवकर हँडवॉश करेल तोच विजेता होईल.

स्मार्ट स्टूल्स : बऱ्याच घरात हात धुण्याची जागा खूप उंचावर असते, ज्यामुळे मुलांना पुन्हा-पुन्हा त्या ठिकाणी जायला आवडत नाही. अशा परिस्थितीत आपण त्यांच्यासाठी स्मार्ट स्टूल ठेवा, ज्यावर चढायला त्यांना आवडेल आणि त्यावर चढून ते हात धुवू शकतील. यासह टेप्समध्ये पक्ष्याच्या आकारात येणारे स्मार्ट किड्स फॉसिट एक्स्टेंड लावावे, या सर्व वस्तू मुलांना आकर्षित करतात, तसेच त्यांना हात धुण्याची सवय देखील लावतात.

जंतूविरहीत हात : ‘जर्म मेक मी सिक’ तुम्हाला वाटतं का की जंतूंनी तुम्हाला आजारी पाडावं परिणामी तुम्ही शाळेत जाऊ शकणार नाही वा मित्रांसोबत खेळूही शकणार नाही. नाही ना, तर मग जेव्हा-जेव्हा आपण हँडवॉश करता तेव्हा आपली बोटे, तळवे आणि अंगठे साबणाने चोळून चांगले स्वच्छ करा.

ग्लिटर पद्धतीने शिकवा : जर आपली मुले हँडवॉश चांगले करत नसतील तर आपण त्यांना ग्लिटरद्वारे जंतूंबद्दल समजवावे. यासाठी आपण त्यांच्या हातांवर ग्लिटर टाका, नंतर थोडयाशा पाण्याने हँडवॉश करून त्यांना टॉवेलने पुसण्यास सांगा. यानंतरही ग्लिटर त्यांच्या हातावर राहील्यास आपण त्यांना समजावून सांगा की जर तुम्ही हँडवॉश नीट केले नाही तर जंतू तुमच्या हातावर राहतील आणि तुम्हाला आजारी पाडतील.

मजेदार गाण्याद्वारे सवय लावा : मजेदार गाणे गाऊन आपल्या मुलांना हँडवॉशची सवय लावा. जेव्हा-जेव्हा ते खायला बसतात किंवा टॉयलेटमधून येतात तेव्हा त्यांना हँडवॉश करण्यास सांगत म्हणा,

वाश योर हैंड्स, वाश योर हैंड्स

बिफोर यू ईट, बिफोर यू ईट,

वाश विद सोप ऐंड वाटर, वाश विद सोप ऐंड वाटर,

योर हैंड्स आर क्लीन, यू आर रैडी टू ईट,

वाश योर हैंड्स, वाश योर हैंड्स,

आफ्टर टौयलेट यूज, वाश योर हैंड्स विद सोप ऐंड वाटर,

टू कीप डिजीज अवे.

यकीन मानिए ये ट्रिक आप के बहुत

काम आएंगे.

आकर्षक सोप डिस्पेंसर : आकर्षक गोष्टी पाहून मुलांना आनंद होतो. अशावेळी आपण त्यांच्यासाठी एक आकर्षक हँडवॉश डिस्पेन्सर आणा, ज्याकडे पाहून त्यांना पुन्हा-पुन्हा हँडवॉश करायला आवडेल.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें