खुलून दिसतील केस हेअर स्टायलिंग टूल्सने

* गुंजन गौड, कार्यकारी संचालक, एल्पस ब्यूटी क्लिनिक

आजकाल हेअर स्टायलिंग टूल्सचा वापर बराच वाढला आहे. पण त्यांचा वापर
करताना काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

हेअर ड्रायर : केसांची नवी स्टाईल करताना इलेक्ट्रिक उपकरणांपैकी एक
असलेला हेअर ड्रायर मुख्य आहे. केस व्यवस्थित ठेवण्यासाठी आठवडयातून
एकदा तुम्ही हेअर ड्रायरचा वापर करू शकता. पण रोज किंवा वरचेवर वापर
केल्यास केस रूक्ष होणे, डँड्रफ अशा समस्या वाढू शकतात. हेअर ड्रायरच्या उत्तम
परिणामांसाठी या महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष द्या :
* तुमच्यासाठी हेअर ड्रायरचा वापर गरजेचा असल्यास केसांना नियमित तेल
लावा. आठवडयातून जास्तीत जास्त एकदाच याचा वापर करा.
* ड्रायर वापरण्यापूर्वी केसांना कंडिशनिंग करायला विसरू नका.
* हेयर ड्रायर वापरण्यापूर्वी केसांना नॅरिशमेंट सीरम लावा. ड्रायरच्या उष्णतेमुळे
केस मऊ होतील.
* केस कुरळे असतील, रुक्ष, मऊ किंवा सिल्की, केसांचा प्रकार आणि
आवश्यकतेनुसार हेयर ड्रायरचा वापर करा.
* ६ ते ९ इंच अंतर ठेवूनच हेयर ड्रायर वापरा, अन्यथा केसांचा कोरडेपणा वाढेल.
* केस रुक्ष असल्यास ड्रायरचा उपयोग कमीत कमी करा. केस तेलकट
असल्यास ड्रायर जास्तीत जास्त वापरा.

हेयर आयर्न
केस स्ट्रेट ठेवण्यासाठी आजकाल हेअर आयर्नचा खूपच वापर केला जात आहे.
परंतु याच्या चांगल्या परिणांमासाठी लक्षात ठेवण्यासारखी महत्त्वाची गोष्ट
म्हणजे नेहमीच चांगल्या प्रतीच्या प्लेट आणि वेगवेगळया तापमानासाठी
सिरॅमिक प्लेट्सची आयर्न घ्यावी, ज्या स्वयंचलितपणे बंद होतात. केस खूपच
पातळ आणि खराब असतील तर सुरुवात कमी सेटिंगपासून करावी. केस कुरळे
आणि जाड असतील तर हाय सेटिंगवर जा.
केसांवर आयर्न वापरण्यापूर्वी त्यांना शाम्पू आणि कंडिशनिंग करा. ओल्या
केसांवर कधीच स्ट्रेटनिंग केले जात नाही. म्हणून आधी ब्लो ड्रायरने केस कोरडे
करा. केसांना अधुनमधुन थंड हवेनेही ब्लो ड्रायर करा. अन्यथा ते जाळण्याची
भीती असते. केसांसाठी चांगल्या हिट प्रोटेक्टरचा वापर करा. जेणेकरून हॉट
आयर्नमुळे ते खराब होणार नाहीत. ते खरेदी करताना लक्षात ठेवा की त्यात तेल
किंवा जास्त प्रमाणात सिलिकॉन नसावे. त्याचा केवळ एक थेंबच पुरेसा असतो.

व्हायब्रेटर मसाजर
व्हायब्रेटर मसाजरने केलेला मसाज हातांनी केलेल्या मसाजपेक्षा वेगळा असतो.
व्हायब्रेटर केसांच्या मांसपेशी आणि टाळूच्या त्वचेमध्ये कंपन निर्माण करून
उत्तेजना वाढवते, यामुळे रक्ताभिसरण चांगले होते आणि नसांवरील ताण कमी
होऊन थकवा दूर होतो. केस निरोगी ठेवण्यासाठी हे खूप फायदेशीर आहे.केस
एकमेकांना घासले जाणे हानिकारक असते. हातांनी केलेल्या मालिशमुळे केस
बऱ्याच प्रमाणात एकमेकांवर घासले जातात. व्हायब्रेटरने केलेल्या मालिशमुळे
केस एकमेकांवर घासले जाण्याची शक्यता दूर होते, तसेच रक्ताभिसरण
वाढल्याने केसांची मुळे मजबूत होतात. व्हायब्रेटर मसाजरने मसाज करण्यासाठी
झाकणासारख्या गोल आकाराच्या दातांच्या अॅप्लिकेशनचा वापर केला जातो.

चांगल्या परिणामांसाठी केसांच्या त्वचेची मालिश करण्यासाठी व्हायब्रेटरची
क्षमता प्रति मिनिट २००० कंपनांपेक्षा जास्त नसावी. मसाज करताना हलू नये,
कारण धक्का लागल्यास दुखापत होऊ शकते. कोरडया केसांना तेल
लावल्यानंतरही व्हायब्रेटर मसाजरचा वापर केला जाऊ शकतो.

स्काल्प स्टीमर
हे इलेक्ट्रिक डिव्हाइस थोडयाच वेळात पाण्याची वाफ तयार करतो. कुठल्याही
प्रकारच्या केसांच्या समस्येसाठी स्टीम ट्रीटमेंट विशेष फायदेशीर ठरते. वाफेमुळे
त्वचेची रंध्रे उघडतात आणि त्यात अडकलेली घाण बाहेर येते. रक्ताभिसरण
वेगवान झाल्यामुळे केसांना संपूर्ण पोषण मिळते. याच्या अधिक चांगल्या
परिणामांसाठी, स्काल्प स्टीमरद्वारे नियमितपणे दोन आठवडयांसाठी स्टीम
ट्रीटमेंटचा वापर करावा. केसांना दिल्या जाणाऱ्या सर्व उपचारांमध्ये स्टीम पद्धत
विशेष फायदेशीर आहे. वाफ दिल्यानंतर केस धुवू नयेत.

इन्फ्रारेड रेज लॅम्प
इन्फ्रारेड किरण उष्णता निर्माण करणारे असे किरण आहेत जे दिसत नाहीत.
त्यांना प्रकाशाशी एकरूप केले तरच ते दिसतात. इन्फ्रारेडच्या तापमानाचा वेग
सुरुवातीला कमी असतो, पण काही मिनिटांतच तो उच्च तापमानापर्यंत पोहोचतो.
याद्वारे त्वचेतील मांसपेशी आणि त्वचेवर होणारा प्रभाव दीर्घकाळ राहतो.
शुद्ध रक्तवाहिन्या आणि हृदयाच्या दिशेने अशुद्ध रक्त वाहून नेणाऱ्या
रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताभिसरणाचा वेग वाढल्यामुळे त्या ठिकाणी आवश्यक
पोषक तत्त्व आणि ऑक्सिजन पुरेशा प्रमाणात मिळू लागते. यामुळे मांसपेशीत
निर्माण होणाऱ्या समस्या जसे की सूज येणे, मांसपेशी आखडणे, थकवा येणे,
नलिकांमधील थकवा आणि वेदना दूर करण्यासाठी याचा विशेष फायदा
होतो.इन्फ्रारेडचा वापर करताना डोळे स्वच्छ ठेवा. कॉन्टॅक्ट लेन्स किंवा चष्मा
लावत असाल तर काढून ठेवा. तुम्ही सोनेचांदी किंवा इतर कोणत्याही धातूचे

दागिने घातले असतील तर तेदेखील काढून ठेवा, अन्यथा ते गरम झाल्यामुळे
त्वचा भाजू शकते. लॅम्पच्या वापरानंतर तसेच त्वचा सामान्य झाल्यानंतर शाम्पू
करा. त्यासाठी कोमट पाणी वापरा. लॅम्प २५ ते ३० इंचाच्या अंतरावर ठेवा.

ओझोन रेंज लॅम्प
या इलेक्ट्रिक उपकरणाद्वारे ओझोन किरणांची निर्मिती केली जाते. ओझोन
किरणे रोग पूर्णपणे बरा करतात. या किरणांचा वापर करीत राहिल्यास केस
आणि टाळूच्या त्वचेत कोणत्याही प्रकारचे संक्रमण होण्याची किंवा कोणत्याही
रोगाची शक्यता उरत नाही. केस पांढरे होण्याची समस्या, टक्कल पडणे, केस
मोठ्या प्रमाणात गळणे अशा सर्व समस्या कायमच्या दूर करण्यासाठी ओझोन
किरणे पूर्णपणे सक्षम असतात. या उपकरणासोबत कंगव्यासारखा एक बल्बही
असतो. याचा उपयोग करून ओझोन किरणांना सहजपणे आणि योग्य प्रकारे
केसांच्या मुळांपर्यंत पोहोचवता येते.
ओझोन किरणे नेहमी कोरडया केसांमध्येच सोडली जातात. ओल्या केसांमध्ये
चुकूनही त्यांचा वापर करू नका. कारण यात विद्युत प्रवाह असल्यामुळे करंट
लागू शकतो.
केसांमध्ये संसर्ग किंवा एखादा रोग बळावल्यास नियमितपणे दीड ते अडीच
मिनिटे ओझोन किरणे दिली जाऊ शकतात. महिने दर आठवडयाला हा उपचार
करावा. उपचारानंतर केसांच्या मुळांवर एखादे हेअर टॉनिक लावावे. हे खूप
फायदेशीर आहे. या उपचारामुळे केसांच्या वाढीसाठी विशेष फायदा होतो.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें