मान्सून स्पेशल : मान्सून हेअर अँड स्किन केअर

* डॉ. अप्रतिम गोयल

पावसात त्वचेच्या अनेक समस्या उद्भवत असतात. हवेतील आर्द्रतेमुळे त्वचेवर अनेक प्रकारचे बॅक्टेरिया, फंगस तसेच इतर संसर्ग यांची लागण होते. त्याचबरोबर पहिल्या पावसाच्या सरीमध्ये भरपूर प्रमाणात आम्ल असते, ज्यामुळे सर्वात जास्त त्वचा आणि केसांचे नुकसान होते. अशात या मोसमात काही गोष्टींची काळजी घेतल्यास त्वचा आणि केसांच्या समस्यांपासून संरक्षण मिळते.

मान्सूनमध्ये त्वचेची देखभाल

सफाई किंवा क्लिंजिंग : पावसाच्या पाण्यात रसायने मोठया प्रमाणात असतात. त्यामुळे मान्सूनमध्ये त्वचेची योग्य प्रकारे सफाई होणे जरूरी असते. मेकअप काढायला मिल्क क्लिंजर किंवा मेकअप रिमूव्हरचा वापर केला गेला पाहिजे. त्वचेतील अशुद्धता धुऊन काढल्यामुळे त्वचेवरील रोम उघडले जातात. साबण वापरण्याऐवजी फेशिअल, फेस वॉश, फोम इ. अधिक परिणामकारक असते.

टोनिंग : क्लिंजिंगनंतर हे केले पाहिजे. मान्सूनदरम्यान वायू आणि जल याद्वारे अनेक मायक्रोब्स निर्माण होतात. यामुळे स्किन इन्फेक्शन तसेच त्वचा फाटण्यापासून वाचण्यासाठी अँटी बॅक्टेरियल टोनर अधिक उपयुक्त असतो. कॉटन बडचा वापर करून त्वचेवर हळुवार टोनर फिरवा. जर त्वचा अधिकच शुष्क असेल तर टोनरचा वापर टाळला पाहिजे. होय, अतिशय सौम्य टोनरचा वापर करू शकता. तेलकट आणि मुरूम असेलल्या त्वचेवर टोनर चांगला परिणाम करतो.

मॉइश्चरायजर : उन्हाळ्याप्रमाणेच पावसातही मॉइश्चरायझिंग आवश्यक असते. मान्सूनमुळे शुष्क त्वचेवर डिमॉश्चरायजिंग प्रभाव पडू शकतो तसेच तेलकट त्वचेवर याचा ओव्हर हायड्रेटिंग प्रभाव पडतो. पावसात हवेत आर्द्रता असतानाही त्वचा पूर्णपणे डिहायड्रेट होऊ शकते. परिणामी त्वचा निस्तेज होऊन आपली चमक हरवून बसते.

सर्व प्रकारच्या त्वचेसाठी दररोज मॉश्चराइज करणे खूप आवश्यक असते. जर असे केले नाही तर त्वचेला खाज सुटू लागते. जर तुम्ही पाण्यात वारंवार भिजत असाल तर नॉन वॉटर बेस्ड मॉइश्चरायजरचा वापर करा. लक्षात ठेवा की जरी तुमची त्वचा तेलकट असली तरी रात्री तुम्ही वॉटर बेस्ड लोशनच्या पातळ थराचा वापर केला पाहिजे.

सनस्क्रीन : सनस्क्रीनचा वापर न करता घरातून बाहेर पडू नका. असेपर्यंत ऊन तुमच्या त्वचेला युवीए तसेच युवीबी किरणांपासून संरक्षणाची गरज भासेल. घरातून बाहेर पडताना कमीतकमी २० मिनिटे आधी २५ एसपीएफ असेलेले सनस्क्रीन लावा आणि दर ३ ते ४ तासांनी हे लावत राहा. सर्वसाधारणपणे हा चुकीचा समज असतो की सनस्क्रीनचा वापर फक्त तेव्हाच करावा, जेव्हा ऊन असते. ढगाळ/पावसाळी दिवसातील वातावरणामधील अल्ट्राव्हायोलेट किरणांना कमी लेखू नका.

शरीर कोरडे ठेवा : पावसात भिजल्यावर शरीर कोरडे ठेवण्याचा प्रयत्न करा. आर्द्रता असलेल्या हवेत शरीरावर अनेक प्रकारचे किटाणू वाढीस लागतात. जर तुम्ही पावसाच्या पाण्यात भिजला असाल तर स्वच्छ पाण्याने आंघोळ करा. घरातून बाहेर पडताना पावसाचे पाणी पुसायला जवळ काही टिश्यू किंवा छोटा टॉवेल बाळगा.

त्वचेची देखभाल : चमकत्या तसेच डागविरहित त्वचेसाठी त्वचारोगतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार स्किन ट्रीटमेंट घेत राहा. पील्स तसेच लेजर ट्रीटमेंटसाठी मान्सून हा सर्वात चांगला मोसम असतो, कारण सूर्याची किरणे बहुतांशवेळा नसल्यामुळे उपचार केल्यानंतर विशेष देखभाल करावी लागत नाही.

मान्सूनमध्ये केसांची देखभाल

* जर पावसात केस भिजले असतील तर जितक्या लवकर शक्य होईल तेवढे माइल्ड शॅम्पूने केस धुवा. केसांना जास्त काळ पावसाच्या पाण्याने ओले ठेवू नका, कारण त्यात रसायनांचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे केसांचे नुकसान होऊ शकते.

* डोक्याचे सुकेच मालिश करा जेणेकरून रक्ताभिसरण व्यवस्थित होईल. आठवडयातून एकदा कोमट तेलाने डोक्याला मसाज करणे चांगले असते, पण जास्त वेळ तेल केसांत राहू देऊ नका म्हणजे काही तासांतच ते धुवून टाका.

* दर दुसऱ्या दिवशी केस धुवावेत. जर लहान केस असतील तर तुम्ही ते रोज धुवू शकता. केस धुण्यासाठी अल्ट्राजेंटल किंवा बेबी शॅम्पू वापरणे अधिक चांगले असते. हेअर शॉफ्ट्सवर कंडिशनर लावल्याने केस मजबूत होतात.

* मान्सूनमध्ये हेअर स्प्रे किंवा जेलचा वापर करू नका, कारण हे स्कॅल्पला चिकटू शकतात आणि त्यामुळे कोंडा होऊ शकतो. ब्लो ड्राय करणेही या दिवसांत टाळा. जर रात्री केस ओले असतील तर त्यांना कंडिशनर लावून ब्लोअरच्या थंड हवेने सुकवा.

* पातळ, वेव्ही आणि कुरळया केसांत अधिक ओलावा शोषला जातो. यावर सर्वोत्तम उपाय म्हणजे स्टायलिंग करण्याआधी ह्युमिडिटी प्रोटेक्टिव्ह जेल वापरावे.

* आपल्या केसांच्या प्रकारानुसार हेअर केअर उत्पादनांची निवड करा. साधारणपणे गुंतलेले, कोरडे आणि रफ केस हे हेअर क्रीम लावून सरळ करता येतात.

* मान्सूनमध्ये हवेत अधिक आर्द्रता आणि ओलावा असल्याकारणाने कोंडा ही एक कॉमन समस्या असते. त्यामुळे आठवडयातून एकदा चांगल्या अँटी डँड्रफ शॅम्पूचा वापर करावा.

* मॉन्सूनमध्ये पाण्यात क्लोरिनचे प्रमाणही अधिक असते, जे केसांना ब्लीच करून खराब करू शकते. त्यामुळे शक्य असल्यास केस पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी.

* पावसाचा मोसम हा केसांत उवा होण्यासाठीही अनुकूल असतो. जर केसांत उवा झाल्या असतील तर परमाइट लोशन वापरा. १ तास डोक्याला लावून ठेवा आणि मग धुऊन टाका. ३-४ आठवडे असे करत रहा.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें