सौंदर्य समस्या

* समस्यांचे निराकरण, आल्प्स ब्युटी क्लिनिकच्या संस्थापक, संचालक      डॉ. भारती तनेजा द्वारे

कोरोना महामारीच्या या शतकात हात नियमितपणे धुणे आणि त्यांना सतत सॅनिटियझि करणे खूप महत्वाचे आहे परंतु प्रत्येक तासाला हात धुणे किंवा सॅनिटाय केल्याने माझी त्वचा कोरडी आणि निर्जीव होत आहे. मी माझ्या हातांची काळजी कशी घेऊ?

हाताच्या काळजीसाठी आपण आपले हात मॉइश्चरायझिंग साबणाने धुवा किंवा जेल असलेले सॅनिटायझर वापरा. प्रत्येक वेळी हात धुतल्यानंतर हातांवर नॉर्मल मॉइश्चरायझर किंवा व्हॅसलीन वापरा, जर हातांची त्वचा कोरडी आणि भेगा पडलेली असेल तर ती ठीक करण्यासाठी खोबरेल तेलाचा वारंवार हातांवर वापर करा.

झाड-लोट करताना, भांडी धुताना व कपडे साफ करताना जेव्हा तुम्ही डिटर्जंट किंवा जंतुनाशक वापरता तेव्हा हातमोजे घाला. जर तुमच्या त्वचेवर कट किंवा हातावर कोरडे ठिपके असतील, जे मॉइश्चरायझर वापरूनही बरे होत नसतील तर त्यावर त्वचारोगतज्ज्ञांकडून उपचार करा.

माझ्या पापण्यांचे केस दाट नाहीत तसेच ते तुटण्याची प्रवृत्तीदेखील आहे. माझ्या समस्या दूर होण्यासाठी मी काय करावे?

दाट पापण्यांसाठी एरंडेल तेल खूप फायदेशीर मानले जाते. त्यात रिसिनोलिक अॅसिड आढळते. हे केसांच्या मुळांमध्ये रक्त प्रवाह वाढवते आणि पापण्यांच्या वाढीस उत्तेजन देते. एरंडेल तेल तुमच्या पापण्यांना दाट तर बनवतेच शिवाय पापण्यांचे केस तुटण्यापासून ही वाचवते.

तुम्हाला हवे असल्यास तुम्ही कायमस्वरूपी आयलॅशेसचा पर्यायदेखील निवडू शकता, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडी आणि गरजेनुसार कोणताही रंग, लांबी आणि हवे तेवढे आयलॅशेस निवडू शकता, परंतु आम्ही शिफारस करतो की तुम्ही कमीत कमी आयलॅशेस निवडा जेणेकरून तुम्हाला एक नैसर्गिक लुक मिळू शकेल.

या प्रक्रियेपूर्वी त्वचेचा प्रकारदेखील तपासला जातो आणि नंतर संगणकाद्वारे वेगवेगळया आकाराच्या आयलॅश सेट करून चेहरे पाहिले जातात. नंतर सूट करणारी आयलॅश बसवली जाते.

आयलॅशच्या विस्तारामध्ये कोणतीही हानी नसते आणि ते खूप सुरक्षितदेखील आहे. या आयलॅशेस जलरोधक, घामरोधक आणि तेलरोधक असतात, तथापि हे एक्स्टेंशन कायमस्वरूपी मानले जाते, परंतु नेल एक्स्टेंशनप्रमाणे यालादेखील दरमहा रिफिलिंग करणे आवश्यक असते. यामध्ये पुन्हा पापण्यांवर आयलॅश सेट केली जाते. एक्स्टेंशन वारंवार सुधारणे आवश्यक असते.

माझे उपचार चालू असल्याने मी काही औषधे घेत आहे, त्यामुळे माझे ओठ कोरडे होऊ लागले आहेत. कृपया मला काही उपाय सांगा ज्याने ओठ बरे करता येतील?

जर औषधामुळे तुमचे ओठ फुटत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुमच्या शरीरात आर्द्रतेची कमतरता आहे. तुमच्या शरीरात आर्द्रतेची कमतरता टाळण्यासाठी दररोज ८ ते १० ग्लास पाणी पिण्याचा प्रयत्न करा. तसेच आपल्या आहाराची पूर्ण काळजी घ्या जेणेकरून शरीरात कोणत्याही घटकाची कमतरता भासू नये. याशिवाय बोटात थोडे कोमट देशी तूप घेऊन ओठांवर हलके मसाज करा. यामुळे रक्ताभिसरण वाढेल आणि फाटलेल्या ओठांच्या समस्येत आराम मिळेल.

ओठांचा ओलावा परत येण्यासाठी डाळिंबाचे दाणे बारीक करून त्यात थोडे दूध आणि गुलाबजल मिसळा. ही पेस्ट हलक्या हातांनी ओठांवर लावल्यानेही लवकर फायदा होतो.

माझ्या चेहऱ्यावर अचानक पांढरा डाग दिसू लागल्याने मी खूप अस्वस्थ आहे. कृपया सांगा मी यासाठी काय करावे?

सर्वप्रथम याबद्दल एखाद्या चांगल्या त्वचारोग तज्ज्ञाचा सल्ला घ्या कारण हा ल्युकोडर्माचा पॅच असू शकतो. त्यांच्या तपासणीत असे निदान आढळल्यास योग्य औषध घ्यावे. यानंतर काही दिवस घेतलेल्या उपचारांमुळे जर तुमचा पॅच वाढत नसेल तर पर्मनंट मेकअपद्वारे तुम्हाला उपचार देऊन तो पांढरा डाग सामान्य केला जाऊ शकतो.

या उपचारात पांढरा डाग त्वचेसारख्या रंगाने भरला जातो, ज्यामुळे तो आसपासच्या त्वचेच्या रंगाचा बनतो.

जर तुमचा पांढरा डाग ल्युकोडर्माचा पॅच नसेल तर तुम्ही घरगुती उपाय अवलंबू शकता. यासाठी पाणी आणि सफरचंद व्हिनेगर २:१ च्या प्रमाणात मिसळा. थोडया-थोडया वेळाने ते डागांवर लावत राहा. असे केल्याने डाग लवकर साफ होतील.

खूप दिवसांपासून मी घरीच केस सरळ करते पण त्याचा परिणाम पार्लरसारखा मिळत नाही. मला केस सरळ करण्याची योग्य पद्धत सांगा?

जेव्हा तुम्ही पार्लर किंवा क्लिनिकमध्ये केस स्ट्रेटनिंग करून घेता तेव्हा ते करणारे लोक हे नॉर्मली तज्ज्ञ असतात, केसांचे पातळ-पातळ थर सरळ करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या स्ट्रेटनिंग सोल्यूशनची गुणवत्तादेखील खूप चांगली असते, ज्याचा तुम्ही घरी तेवढया चांगल्या प्रकारे वापर करू शकत नाही.

त्यामुळे रोज-रोज घरीच स्ट्रेटनिंग करण्यापेक्षा कायमस्वरूपी स्ट्रेटनिंग करून घेणे चांगले आहे ज्याने तुम्हाला पार्लरप्रमाणे कायमचे केस सरळ मिळतील. केस सरळ ठेवण्यासाठी तुम्ही केसांमध्ये कायमस्वरूपी हेअर एक्स्टेंशनही करून घेऊ शकता.

जर तुम्हाला कायमस्वरूपी हेअर एक्स्टेंशन करायचे नसेल तर तुम्ही जेव्हाही बाहेर जाल तेव्हा तात्पुरते हेअर एक्स्टेंशन लावूनदेखील केस सेट करू शकता.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें