सौंदर्य समस्या

* एअरब्रश मेकअप एक्सपर्ट,इशिका तनेजा

 • मला घरात नियमितपणे स्क्रबिंग करायचे आहे, पण मी असे ऐकलेय की ते योग्य पध्दतीने केले नाही, तर त्वचेवर विपरित परिणामही होऊ शकतो. स्क्रबिंगची योग्य क्रिया काय आहे?

तुम्ही बरोबरच ऐकलेय. स्क्रब करण्याची योग्य पध्दत ही आहे की आपल्या त्वचेवर हलका दाब देत स्क्रबिंग करावे. खास करून फेशियल त्वचेवर हे खूप आवश्यक आहे. कारण ती जास्त संवेदशील असते. म्हणून याला स्क्रब करताना जास्त काळजी घ्यावी लागते. स्किन ड्राय झाल्यावर तिला स्पेशल केअरसोबतच एक्सफॉलिएटेड करण्याची गरज असते.

कधीही आपल्या चेहऱ्यावर सरळ स्क्रबचा वापर करू नका. आधी आपली त्वचा ओली करा. मग थोड्याशा प्रमाणात स्क्रब घेऊन चेहऱ्यावर लावण्यापूर्वी त्यात थोडे पाणी मिसळा. त्यामुळे स्क्रब सौम्य होतो आणि तो चेहऱ्यावर सहजपणे लावता येऊ शकतो.

 • मी नोकरदार महिला आहे आणि मला कामासाठी जास्त करून उन्हात राहावे लागते. त्यामुळे मला पिग्मेंटेशनची समस्या निर्माण झाली आहे. मी या पिग्मेंटेशनला कसे रोखू कृपा करून मला सल्ला द्या?

स्किन पिग्मेंटशनच्या कारणांमध्ये सन डॅमेज, हार्मोनल डिसऑर्डरपासून ते आनुवंशिक कारणे कारणीभूत असतात. बहुतेक प्रकरणांत सन एक्सपोजर त्वचेच्या पिग्मेंटेंशनचे कारण बनते. आपण पिक टाइमच्या वेळी सन एक्सपोजरपासून दूर राहा. आपला चेहरा आणि हाताला ३० ते ४० एसपीएफ असलेले सनस्क्रीन किमान अर्धा तास आधी लावून मगच उन्हात बाहेर पडावे.

जर आपली त्वचा रेडिएशनबाबत जास्त सेंसिटिव्ह असेल, तर आपल्ण बाहेर जाण्यापूर्वी लावता तेवढेच घरातही सनस्क्रीन लावणे आवश्यक आहे. घरातील आर्टिफिशियल लाइटही त्वचेवर प्रभाव पाडते. कारण यातही काही प्रमाणात रेडिएशन असते. सामान्यपणे घरात असताना एसपीएफ १५ पर्यंतचे सनस्क्रीन लावणे उत्तम असते.

 • बहुतेकदा मेकअप करण्यापूर्वी फाउंडेशन लावण्याचा सल्ला दिला जातो. कृपया सांगा की फाउंडेशन लावण्याची योग्य पध्दत काय आहे?

मेकअपची सुरुवात फाउंडेशन लावून केली जाते आणि ते लावण्यापूर्वी चेहरा चांगल्याप्रकारे स्वच्छ व मॉइश्चराइज करणे आवश्यक असते. आपल्या चेहऱ्याच्या वेगवेगळ्या भागांत फाउंडेशनचे ठिपके लावा. समस्या असलेल्या त्वचेला (असमान त्वचेचा टोन) चांगल्याप्रकारे लावा. नैसर्गिक लुकसाठी ब्लॅडिंग करणे आवश्यक आहे.

 • माझे हात खूप कोरडे आहेत. कोणाशी हात मिळवल्यानंतर मला खूप लाज वाटते. माझे हात मऊ होण्यासाठी मी काय करू?

हातांमध्ये ऑइल ग्लँड्स कमी असतात. म्हणून हात विशेषत: बदलत्या मोसमात रूक्ष होतात. घरातील कामे उदा. कपडे, भांडी इ. धूत राहिल्यामुळेही हातांची त्वचा खराब होते. अशा वेळी हातांना नियमितपणे एक्सफोलिएट आणि मॉइश्चराइज करत राहिले पाहिजे. त्याबरोबरच १ मोठा चमचा लिंबाचा रस, एक छोटा चमचा साखरेत थोडेसे पाणी मिसळून पेस्ट बनवा.

हे मिश्रण हातांना ५ मिनिटे लावून ठेवा. मग हात कोमट पाण्याने स्वच्छ करा. याबरोबरच १/३ कप ग्लिसरीन आणि २/३ कप गुलाबपाणी एकत्र मिसळून ते बाटलीत भरून फ्रीजमध्ये ठेवा. तुम्ही जेव्हा एखादे काम कराल, त्यानंतर हात कोरडे वाटल्यास या मिश्रणाने त्यांना मसाज करा.

 • मी माझ्या केसांबाबत खूपच जागरूक आहे. त्यामुळे त्यांना नियमित तेलाने मालीश करण्याची इच्छा असते, पण वर्किंग असल्यामुळे नेहमी शक्य होत नाही. मला हे जाणून घ्यायचे आहे की, केस धुतल्यानंतर किती तासांनंतर ऑयलिंग केले पाहिजे?

जर आपल्याला आपले केस निरोगी व आकर्षक बनवायचे असतील, तर खरोखरच त्यांना ऑयलिंग करणे आवश्यक आहे. त्यासाठी तेल केस धुण्यापूर्वी लावा, केस धुतल्यानंतर नव्हे. तेल लावल्यामुळे धूळमातीचे कण केसाला चिकटतात. म्हणून केस धुण्याच्या अर्धा तास आधी केसांना ऑयलिंग करत, हळूहळू हेडमसाज करणे, ही चांगली पध्दत आहे. आठवड्यातून २-३ दिवस तेलाने मालीश करा. त्यामुळे केसांना पोषण मिळते.

 • मी सूर्यकिरणांपासून संरक्षण करण्यासाठी सनस्क्रीन लोशन लावते, पण ते लावल्यानंतर मला खूप घाम येतो आणि त्यामुळे सनस्क्रीन निघून जाते. मला सनस्क्रीन लावायची इच्छा असते, पण समस्या निर्माण होऊ नये, म्हणून मला काय केले पाहिजे?

जर सनस्क्रीन लोशन लावल्यानंतरही आपल्याला घाम येत असेल, तर चिकटपणापासून संरक्षण करण्यासाठी सनस्क्रीनसोबत कॅलमाइन लोशन मिक्स करा. पाण्याच्या संपर्कात येण्याने किंवा घामामुळे एसपीएफयुक्त सनस्क्रीनचा प्रभाव नष्ट होऊ लागतो. त्यामुळे अल्ट्राव्हायोलेट किरण त्वचेला सहजपणे नुकसान पोहोचवू शकतात.

म्हणून सनस्क्रीनचा मोठा थर त्वचेवर लावणे खूप आवश्यक आहे.

आरोग्य परामर्श

* डॉ. यतीश अग्रवाल

प्रश्न : मी २८ वर्षीय विवाहित महिला आहे. माझा रंग सावळा आहे. मी आता गरोदर आहे. असा काहीतरी उपाय सांगा की बाळ गोऱ्या रंगाचे होईल. आहाराने त्याच्यावर काही प्रभाव पडतो का? दुसरे काही घरगुती उपाय असतील, तर तेही सांगा? गृहशोभिकेच्या याच स्तंभात काही महिन्यांपूर्वी त्वचेच्या रंगामागे मिलेनोसाइटची माहिती दिली होती. असा काही उपाय आहे का की बाळाची मिलेनोसाइट अपरिणामकारक राहील व बाळ गोरेगोमटे होईल?

उत्तर : आपल्या चेहऱ्याची ठेवण आणि इतर शारीरिक गुण उदा. उंचीप्रमाणेच आपल्या त्वचेचा रंग ठरवणाऱ्या मिलेनोसाइट्सच्या घनत्वाचे गणितही आपले जीन्स निश्चित करतात. ते आपल्या आईवडील आणि इतर पूर्वजांशी जुळतात. त्यांना कशाही प्रकारे बदलता येत नाही.

तसेही एखाद्या व्यक्तिचे रूप-सौंदर्य केवळ त्याच्या रंगावरच अवलंबून नसते. अनेक सावळ्या रंगाचे लोकही खूप सुंदर दिसतात आणि अनेक गोरेगोमटे सामाजिक दृष्ट्या सुंदर नसतात. त्यामुळे आपण उगाचच स्वत:च्या व होणाऱ्या बाळाच्या रंगाबाबत एवढा विचार करू नका.

गरोदरपणानुसार उचित प्रमाणात प्रोटीन, व्हिटॅमिन आणि मिनरलयुक्त आहार घ्या. त्यामध्ये फळे, पालेभाज्या, दूध, अंडी, डाळी पुरेशा प्रमाणात असावीत. जेणेकरून आपल्याला व आपल्या बाळाला सर्व पोषक तत्त्वे पुरेशा प्रमाणात मिळू शकतील.

प्रश्न : मी २८ वर्षांची तरुणी आहे. मला पाळी येत नाही. गेल्या काही दिवसात मी डॉक्टरांच्या सल्ल्यावरून आपले पेल्विक अल्ट्रासाउंड करून घेतले होते. त्याच्या रिपोर्टनुसार, माझ्या युटेरसची साइज २९ मिलीमीटर १८ मिलीमीटर १३ मिलीमीटर आहे. मला पुढे कधी गर्भधारणा होईल का? मी काय केले पाहिजे, योग्य सल्ला द्या?

उत्तर : तुम्ही तुमच्या अल्ट्रासाउंडचा पूर्ण रिपोर्ट पाठवला असता, तर चांगले झाले असते. त्यामुळे युटेरसबरोबरच ओव्हरीजबाबतही माहिती मिळाली असती. राहिला प्रश्न युटेरसचा, तर युटेरस लहान असून, त्याचा व्यवस्थित विकास झालेला नाहीए. याला हाइपोप्लास्टिक युटेरसचा दर्जा दिला जातो. हा विकार अनेक कारणांनी होतो. त्याच्या मुळाशी जाण्यासाठी सविस्तर डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे आवश्यक आहे.

काही महिलांमध्ये युटेरस सुरुवातीपासूनच लहान असतो आणि ही स्थिती एखाद्या मोठ्या सिंड्रोमचा भाग असते. त्यामध्ये केवळ युटेरसच नव्हे, तर व्हेजाइनाचाही व्यवस्थित विकास होत नाही. काही महिलांमध्ये युटेरसचे लहान असणे त्या मोठ्या क्रोमोझमल विकाराचा भाग असतो, ज्याला टर्नर सिंड्रोम असे नाव दिले गेले आहे. त्यामध्ये मोठी सुधारणा होण्याची शक्यता नसते. एखाद्या मुलीमध्ये हा लैंगिक अवयवांचा विकास अर्धवट राहतो, जेव्हा ती आईच्या गर्भात असते आणि आई सिंथेटिक इस्टरोजेन म्हणजेच डाईइथाइलस्टील्बेस्ट्रो घेते.

काही उदाहरणांत ही संपूर्ण समस्या हार्मोनल पातळीवर निर्माण होते. किशोरावस्थेत जेव्हा शरीर प्यूबर्टीसह होणाऱ्या हार्मोनल बदलांच्या देखरेखीत स्वत:ला वाढत्या वयासाठी तयार करते आणि इतर सेक्शुअल गुणांसोबतच लैंगिक अवयवही परिपक्व होऊन मातृत्वाची जबाबदारी सांभाळण्यासाठी विकसित होतात, त्यावेळी अंतर्गत हार्मोनल गडबड झाल्यामुळे युटेरसचा विकास मध्येच अर्धवट राहतो. ही विकारमय स्थिती प्रामुख्याने पिट्युटरी ग्लँडमध्ये बनणाऱ्या प्रोलॅक्टिन हार्मोनच्या अधिकतेमुळे निर्माण होते.

आपला युटेरस का हाइपोप्लास्टिक म्हणजे अल्पविकसित राहिला, याची योग्यप्रकारे डॉक्टरी तपासणी केल्यानंतरच स्पष्ट होईल की आपल्या मदतीसाठी काय केले जाऊ शकते? ही तपासणी आपण एखाद्या मोठ्या हॉस्पिटलच्या गायनोकोलॉजी विभागामध्ये करू शकता. या तपासणीत बराच काळ लागेल आणि येणाऱ्या खर्चासाठीही आपल्याला तयार राहावे लागेल. कारण स्पष्ट झाल्यानंतरही उपचार यशस्वी होण्याची शक्यता मर्यादित राहील.

जिथे आपली पाळी न येण्याचा प्रश्न आहे, तर त्याचे मूळही युटेरसचे हाइपोप्लास्टिक होणे आहे.

प्रश्न : माझे वय १५ वर्षे आहे. मला वेळेवर पाळी येत नाही. बहुतेकदा निश्चित वेळे, २-४ दिवस निघून गेल्यानंतर येते. याचे काय कारण आहे? मी या समस्येसाठी एखाद्या डॉक्टरकडे जाऊन आपली तपासणी करून घेतली पाहिजे का? माझ्या एका मैत्रिणीचे म्हणणे आहे की हे योग्य नाहीए. त्यामुळे पुढे मला याचा त्रास  सहन करावा लागू शकतो. कृपया योग्य सल्ला द्या?

उत्तर : तुम्ही असे काळजी करणे योग्य नाहीए. सत्य हे आहे की ज्या गोष्टीबाबत आपण काळजी करत आहात, ती गोष्ट अगदी सामान्य आहे. हे खरे आहे की बहुतेक महिलांमध्ये मासिकपाळीचे चक्र २८ दिवसांचे असते. पण हे सत्यही तेवढेच मोठे आहे की, बऱ्याचशा स्त्रियांमध्ये हे चक्र २६ दिवस, २७ दिवस, २९ दिवस किंवा मग ३० दिवसांचे असते. प्रत्येक स्त्रीच्या शरीरात बनणाऱ्या लैंगिक हार्मोनचे वाढणे-कमी होणे, तिच्या शरीराच्या लयीवर अवलंबून असते, जी तिचे विशेष असते. एवढेच नव्हे, हे मासिक चक्र बऱ्याचशा अंतर्गत आणि बाहेरील तत्त्वांनी प्रभावित होऊ शकते. भौगोलिक स्थान परिवर्तन, जलवायू, व्यक्तिगत आरोग्य, मानसिक आरोग्य आणि एवढेच नव्हे, तर घरात किंवा हॉस्टेलमध्ये अन्य महिलांच्या मासिक चक्राचाही यावर प्रभाव पडताना आढळला आहे.

तुमचे मासिक चक्र ३०-३२ दिवसांचे आहे, तर यात काही विशेष गोष्ट नाही. याबाबत ना ही आपल्याला एखाद्या डॉक्टरकडे जायची गरज आहे आणि ना ही अशा एखाद्या मैत्रिणीच्या सल्ल्याने काळजीत पडण्याची गरज आहे, जिला मासिकपाळीच्या नियमांबाबत नीट माहिती नाहीए. तपासणीची आवश्यकता तेव्हाच असते, जेव्हा मासिकपाळी उशिरा येण्याबरोबरच अनियमित असेल किंवा त्यात मासिक स्त्राव थोड्याच प्रमाणात होत असेल.

सौंदर्य समस्या

* प्रतिनिधी

 • मी १९ वर्षांची आहे. माझ्या चेहऱ्यावर ४-५ वर्षांपासून मुरुमांचा त्रास आहे. मी त्यांना फोडते, म्हणून माझ्या चेहऱ्यावर त्यांच्या खुणा आहेत. कृपया मला सांगा की मी या स्पॉट्सपासून कसे मुक्त होऊ?

आपल्याला ही समस्या आहे कारण आपल्या त्वचेचे छिद्र बंद झालेले आहेत आणि त्यात धूळ आणि घाण भरली आहे. तुम्ही रोज आपला चेहरा स्वच्छ करा. यासाठी क्लीनिंग, टोनिंग व मॉइश्चरायझिंग करा. मुरुमे फोडू नका. डाग काढून टाकण्यासाठी कडुनिंब पॅक लावा. तसेच तेलकट पदार्थ खाणे टाळा आणि दिवसाला ८-१० ग्लास पाणी अवश्य प्या.

 • मी ६ महिन्यांपूर्वी रीबॉन्डिंग केले होते. आता माझे केस मुळातून बाहेर येत आहेत. ते परत यावेत म्हणून मी काय करावे? मला एखादा शॅम्पू किंवा तेल सांगा, ज्याच्या मदतीने केस परत येतील?

रीबॉन्डिंग करताना रासायनिक उत्पादने वापरली जातात. म्हणून, रीबॉन्डिंगनंतर केसांची काळजी घेणे आवश्यक असते. आपण एखादा गुळगुळीत शॅम्पू वापरा आणि आठवडयातून एकदा हेअरमास्कदेखील लागू करा. त्याचबरोबर केसांना स्टीमही द्या. नक्कीच फायदा होईल.

 • मी १८ वर्षांची आहे. उन्हात गेल्यावर माझ्या सर्व चेहऱ्यावर लहान-लहान मुरुमे येतात. कृपया या समस्येपासून मुक्त होण्यासाठी कुठलाही घरगुती उपाय सुचवा?

कडुलिंब आणि तुळशीचा फेसपॅक लावा. यामुळे त्वचेत असणारी घाण साफ होईल. आठवडयातून एकदा जेल स्क्रब अवश्य लावा. अन्नामध्ये कमी तेल वापरा आणि बाहेर जाण्यापूर्वी आपले तोंड झाकून घ्या.

 • सनबर्नमुळे गळयाचा मागील भाग काळा झाला आहे. उत्कृष्ट ब्लीच आणि वॅक्स वापरुन प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही. मला असे कोणतेही घरगुती उपचार सांगा ज्याद्वारे माझी समस्या सोडविली जाऊ शकेल?

जर उन्हामुळे होणाऱ्या त्रासाने मानेच्या मागील भागावर काळेपणा आला असेल तर आपण टोमॅटो, काकडी आणि बटाटा यांचा पॅक बनवून घ्या आणि लावा. नंतर २० मिनिटांनंतर हलके हातांनी चोळा आणि त्यातून मुक्त व्हा. त्यानंतर मॉइश्चरायझर लावा. हे दिवसातून ३ वेळा करा. काळेपणा दूर होईल.

 • माझा रंग सावळा आहे आणि चेहऱ्यावर चमक नाही. कृपया एखादा घरगुती उपाय सुचवा?

चेहऱ्यावर चमक आणण्याचा सर्वात चांगला आणि सोपा मार्ग म्हणजे दिवसाला  १०-१५ ग्लास पाणी पिणे. तसेच कोरफड जेलने दररोज चेहऱ्यावर मालिश करा. जेव्हापण आपण उन्हात बाहेर पडाल तेव्हा नेहमीच आपला चेहरा झाकून ठेवा.

 • माझ्याकडे असलेले बहुतेक कपडे शॉर्ट स्लीव्हचे आहेत. परंतु माझ्या हातांच्या रंगामुळे मी ते घालू शकत नाही. वास्तविक माझे अर्धे हात गोरे आणि अर्धे हात टॅनिंगमुळे काळे झाले आहेत. कृपया मला एखादा असा उपाय सांगा, ज्याद्वारे माझ्या हातांचा रंग एकसारखा होऊ शकेल?

जर हातांना टॅनिंग झाले असेल तर बेसन पीठ, हळद आणि दुधाची पेस्ट बनवून घ्या आणि लावा. थोडया वेळाने त्यातून मुक्त होण्यासाठी हलके हाताने चोळा. रंग हळूहळू साफ होईल. तसेच उन्हात जाण्यापूर्वी सनस्क्रीन लावा आणि कॉटनचे हातमोजे अवश्य घाला.

 • माझे केस लांब आणि दाट तर आहेत, परंतु ते खूप विभाजित होत आहेत. बरेच ब्रँडेड शॅम्पू वापरण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. कृपया काही उपचार सांगा?

जर केस विभाजित होत असतील तर याचा अर्थ असा आहे की त्यामध्ये प्रथिनांचा अभाव आहे. प्रथिने समृद्ध शॅम्पू आपल्या केसांना लावा आणि त्यानंतर केसांना प्रथिने क्रीम लावून १५ मिनिटांनी केस धुवा. दोन महिन्यांच्या अंतराने आपल्या केसांना ट्रिमिंगदेखील करत राहा.

 • मी ४० वर्षांची श्रमिक महिला आहे. प्रत्येक हंगामात माझ्या टाचा क्रॅक होतात. बरेच उपचार केलेत पण काही उपयोग झाला नाही? कृपया समस्या सोडवा?

आपल्या पायांची त्वचा कोरडी आहे. म्हणूनच रात्री झोपायच्या आधी आपले पाय कोमट पाण्यामध्ये काही काळ बुडवून ठेवा आणि नंतर मोहरीच्या तेलाने चांगले मसाज करा आणि काही काळ मोजे घाला. ऑफिसला जातानादेखील सॉक्स घाला. आपण आपले पाय जितके अधिक कव्हर कराल ते तितकेच नरम होतील.

 • मी ३५ वर्षांची श्रमिक महिला आहे. माझ्या केसांमध्ये वारंवार कोंडा होतो, ज्यामुळे ते खूप कोरडे होतात आणि डण्यास सुरवात करतात. मी नियमितपणे तेलदेखील लावते, तरीही असं होतं. कृपया घरगुती उपाय सुचवा?

तेल लावणे हा डोक्यातील कोंडयावर उपचार नाही. आपण कोरफड, नारळ आणि तुळशीच्या पानांची पेस्ट बनवून ती केसांवर लावा किंवा मध आणि ग्लिसरीन मिसळा आणि डोक्यातील कोंडा निघत नाही तोपर्यंत केसांना लावा. नियमितपणे हे केल्याने निश्चितच फायदा होईल आणि केस चमकतील.

सौंदर्य समस्या

*प्रतिनिधी

 • मसाजसाठी कोणते तेल योग्य आहेत आणि मालिश कशी करावी, कृपया सांगा?

चांगल्या टाळूच्या आरोग्यासाठी जोजोबा तेल, रोझमेरी तेल, ऑलिव्ह तेल, नारळ, मोहरी किंवा बदाम तेलाने मालिश करा. आठवड्यातून दोनदा कोरड्या केसांवर, आठवड्यातून एकदा सामान्य केसांवर मालिश करा. टाळूचे पोषण करण्यासाठी मालिश करण्याची पद्धतदेखील विशेष असावी. दोन्ही हातांचे अंगठे मानेच्या मागच्या खड्ड्यात ठेवा, बोट कपाळावर समोर पसरून ठेवा. मग कपाळावर बोटं ठेवून, अंगठा गोलाकार हालचालीत फिरवून आणा. मग बोटे सरळ डोक्याच्या मध्यभागी हलवा आणि हलवा. अशा प्रकारे, मानेपासून खाली डोक्याच्या वरपर्यंत दाब देताना मालिश करा.

दिवसभर काम केल्यानंतर थकवा आपल्या संपूर्ण शरीरावर अधिराज्य गाजवतो. अशा स्थितीत थकव्यामुळे मेंदू काहीही विचार करण्याच्या स्थितीत नसतो. थोडी विश्रांती आणि मालिश शरीरात ऊर्जा परत करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. मालिश तुमच्यासाठी किती फायदेशीर आहे हे तुम्हाला माहिती आहे का? जर नसेल तर तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगू की डोक्याची मालिश केल्याने रक्त प्रवाह सुधारतो. यामुळे ऑक्सिजनची पुरेशी मात्रा मेंदूपर्यंत पोहोचते आणि झोपेची गुणवत्ताही सुधारते.

जेव्हा तुम्ही तुमच्या केसांना चांगल्या प्रतीच्या तेलाने मसाज करता तेव्हा ते तुम्हाला मानसिक शांती तर देतेच पण तुमचे केस सुंदर आणि निरोगी बनवते. याशिवाय डोक्याला मसाज करण्याचे अनेक फायदे आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच काही फायद्यांविषयी सांगणार आहोत.

मायग्रेन आणि डोकेदुखी मध्ये कधीकधी तणाव किंवा चिंतामुळे पाठ आणि डोकेदुखीची समस्या असते. यामुळे, तुमच्या दैनंदिन जीवनातील कामांवर परिणाम होऊ शकतो. अशा स्थितीत जर तुम्ही डोक्यावर मसाज केला तर ते संपूर्ण शरीरात रक्ताचा प्रवाह वाढवते. हे तुमचे मन शांत करते आणि तणाव दूर करते. याशिवाय जर डोक्याची नियमितपणे मालिश केली गेली तर मायग्रेनची समस्या देखील कायमची दूर होऊ शकते.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें