चविष्ट आणि हेल्दी साबुदाणा पुलाव घरीच बनवा

* गृहशोभिका टीम

साबुदाणा हा एक आरोग्यदायी अन्न आहे, ज्याचा वापर लोक खीर बनवण्यासाठी करतात, पण तुम्ही साबुदाणा पुलाव करून पाहिला आहे का? साबुदाणा पुलाव बनवणे खूप सोपे आहे. हे आरोग्यदायी तसेच चवदार आहे. आज आम्‍ही तुम्‍हाला साबुदाणा पुलावच्‍या रेसिपीबद्दल सांगणार आहोत, जी तुम्ही केव्हाही नाश्ता किंवा रात्रीच्या जेवणात तयार करून खाऊ शकता.

साहित्य

* साबुदाणा 150 ग्रॅम

* तूप २ चमच

* काजू 40 ग्रॅम

* कोथिंबीर 50 ग्रॅम

* बटाटे २ मध्यम आकाराचे

* 7 हिरव्या मिरच्या

* शेंगदाणे 20 ग्रॅम

* लिंबाचा रस 2 चमचे

* काळी मिरी पावडर अर्धा चमचा

* मोहरी 1 चमचा

* तेल 1 चमचा

* चवीनुसार मीठ

कृती

सर्व प्रथम, एक खोल पॅन मध्यम आचेवर ठेवा आणि त्यात पाणी घाला. त्यात बटाटे घालून उकळू द्या. बटाटा चांगला उकळून मऊ झाल्यावर त्याची साल काढून त्याचे छोटे तुकडे करा.

आता हिरवी मिरची आणि कोथिंबीर बारीक चिरून अलगद ठेवा. आता साबुदाणा पाण्याने नीट धुवून घ्या आणि साधारण ४-५ तास पाण्यात भिजत ठेवा.

आता एका पातेल्यात तेल न लावता शेंगदाणे कोरडे भाजून घ्या. आता त्याच कढईत थोडे तेल टाकून काजू तळून घ्या. आता त्याच कढईत तेलाऐवजी तूप गरम करा. तूप गरम झाल्यावर त्यात मोहरी घाला आणि मोहरी फुटायला लागली की त्यात हिरव्या मिरच्या घाला.

आता चिरलेले बटाटे पॅनमध्ये ठेवा आणि बटाटे हलके तपकिरी होईपर्यंत तळा. आता कढईत भिजवलेल्या साबुदाणासोबत लिंबाचा रस, काळी मिरी पावडर आणि मीठ घालून चांगले मिक्स करा. साबुदाणा झाकून 2 ते 3 मिनिटे चांगले शिजवून घ्या. आता हा पुलाव तुमच्या कुटुंबीयांना आणि मित्रांना सुक्या मेव्यांसोबत गरमागरम सर्व्ह करा.

पास्ता आणि नुडल्स

* अनुपमा गुप्ता

  • ग्रीन स्पेगेटी

food-article

साहित्य

* १ कप शिजवलेली स्पेगेटी
* ३ मोठे चमचे कोथिंबीर
* १ हिरवी मिरची
* पाव कप शेंगदाणे
* १ लसूण पाकळी
* १ मोठा चमचा ऑलिव्ह ऑइल
* मीठ चवीप्रमाणे.

कृती

मिक्सरमध्ये कोथिंबीर, लसूण व भाजलेले शेंगदाणे आणि मिरची यांची जाडसर पेस्ट बनवा. कढईत तेल गरम करून त्यात ही पेस्ट टाका. मीठ व स्पेगटी घालून मिसळा व गरमगरम सर्व्ह करा.

 

  • पास्ता विथ व्हाईट सॉस व्हेजिटेबल्स

paasta-food-article

साहित्य

* १ कप पास्ता
* ३ पातीचे कांदे
* अर्धा कप बीन्स
* १-१ मोठा चमचा लाल, पिवळी, हिरवी कापलेली सिमला मिरची
* २ मोठे चमचे मटार दाणे
* १ पाकळी लसूण
* २ मोठे चमचे फ्लॉवर
* १ कप दूध
* २ मोठे चमचे बटर
* १ मोठा चमचा ओट्सचे पीठ
* पाव लहान चमचा मिरपूड
* २ मोठे चमचे किसलेले चीज.

कृती

कढईत लोणी गरम करून त्यात लसूण व पातीचा कांदा परतून घ्या. मग त्यात सर्व भाज्या टाका व त्या थोडया शिजल्या की त्यात परत एक चमचा लोणी आणि ओट्सचे पीठ घालून भाजून घ्या. यात एक कप दूध घाला. हळूहळू ढवळत राहा व हे मिश्रण जरा घट्ट होऊ द्या. यात चीज व शिजलेला पास्ता टाका. मग मिर पूड टाकून गरम गरम सर्व्ह करा.

 

  • पनीर नुडल्स सूप

paneer-noodles-soup

साहित्य

* अर्धा कप आटा नुडल्स
* १-१ मोठा चमचा लाल, हिरव्या, पिवळया, सिमला मिरच्या कापलेल्या
* २ मोठे चमचे कापलेले गाजर
* १ पातीचा कांदा कापलेला
* २ उकडलेल्या टॉमॅटोची प्युरी
* १ कापलेली हिरवी मिरची
* २ मोठे चमचे पनीरचे बारीक तुकडे
* पाव लहान चमचा नुडल्स मसाला
* एक पाकळी कापलेला लसूण
* १ चमचा लोणी
* मीठ चवीनुसार.

कृती

कढईत लोणी गरम करून त्यात लसूण, पातीचा कांदा व सिमला मिरच्या परतून घ्या. यात गाजर, टोमॅटोची प्युरी, मीठ, हिरवी मिरची टाका, नुडल्स मसाला व दीड कप पाणी टाकून उकळू द्या. मग त्यात पनीरचे तुकडे व न्युडल्स टाका व गरमगरम सर्व्ह करा.

आरोग्यदायी पौष्टिक भाज्या

पाककृती * नीरा कुमार

  • सरसोंची (मोहरी) भाजी

healthy-food-recipe

साहित्य

* २५० ग्रॅम सरसों साग (मोहरीची भाजी) जाडसर चिरलेली

* १०० ग्रॅम फ्रोजन कॉर्न

* १ मोठा चमचा उभी चिरलेली लसूण

* २ अख्ख्या लाल मिरच्या

* १ मोठा चमचा मस्टर्ड ऑइल

* मीठ चवीनुसार.

कृती

एका कढईत तेल गरम करून लसूण व लाल मिरच्यांचे तुकडे परता. यामध्ये भाजी व मक्याचे दाणे टाका. जर फ्रोजन कॉर्न नसतील तर मक्याचे दाणे उकडून टाका. आता मीठ टाका. ६-७ मिनिटांत भाजी शिजेल. ही भाजी मक्याची वा बाजरीची भाकरी अथवा पराठ्यांसोबत खूप छान लागते.

  • मूगडाळ-मुळ्याची भाजी

healthy-food-recipe

साहित्य

* ५ कप पानांसहित चिरलेली मुळ्याची भाजी

* अर्धा कप भिजवलेली मूगडाळ

* १ लहान चमचा बारीक चिरलेलं आलं व हिरवी मिरची

* १ लहान चमचा ओवा

* २ अख्ख्या लाल मिरच्या

* पाव लहान चमचा हळद पावडर

* १ मोठा चमचा राईचं तेल

* मीठ चवीनुसार

कृती

एका कढईत तेल गरम करून ओवा व लाल मिरचीची फोडणी घाला आणि त्यामध्ये मुळ्याची भाजी व मूगडाळ टाका. मग हळद पावडर, आलं, मिरची आणि मीठ टाका. भाजीवर झाकण ठेवून ७-८ मिनिटं शिजू द्या. मग मुळा व डाळ शिजली की भाजी सर्व्हिंग बाउलमध्ये काढा.

  • पालक कबाब

healthy-food-recipe

साहित्य

* २५० ग्रॅम ब्लांच केलेला पालक

* पाव कप चण्याची डाळ अर्धा तास पाण्यात भिजवलेली

* पाव लहान चमचा गरममसाला

* १ मोठा चमचा तांदळाचं पीठ

* १०० ग्रॅम कुस्करलेलं पनीर

* २० मनुका

* पाव लहान चमचा काळीमिरी पावडर

* २ लहान चमचे चिरलेली कोथिंबीर

* कबाब शेकवायला पुरेसं तेल

* मीठ चवीनुसार.

कृती

भिजलेल्या चण्याच्या डाळीत पाव कप पाणी आणि पाव लहान चमचा मीठ घालून प्रेशरकुकरमध्ये मऊ होईपर्यंत शिजवा. डाळ कोरडी होऊ द्या. डाळ थंड करून मॅशरने मॅश करा. ब्लांच केलेल्या पालकमधील पाणी काढून टाका आणि पालक मिक्सरमध्ये बारीक करा. मग यामध्ये मॅश केलेली डाळ, गरममसाला, पाव लहान चमचा मीठ आणि तांदळाचं पीठ व्यवस्थित मिसळून घ्या. यानंतर पनीरमध्ये काळीमिरी पावडर, मनुका, कोथिंबीर आणि चिमूटभर मीठ मिसळा. आता पालकचं थोडं थोडं मिश्रण घेऊन हातावर पसरवा. त्यामध्ये पनीरचं मिश्रण भरून बंद करा. जेव्हा सर्व कबाब बनवून तयार होतील तेव्हा नॉनस्टिक तव्यावर तेल टाकून कबाब शेकवा. दोन्ही बाजूंनी परतून लालसर रंग येऊ द्या. स्वादिष्ट कबाब तयार आहेत.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें