मास्क ब्युटीचा नवा ट्रेंड

– रितु वर्मा

तब्बल दोन महिन्यांनी भावना ऑफिसमध्ये गेली होती. पण तिला स्वत:ला तिचा चेहरा एखाद्या कार्टूनप्रमाणे वाटत होता. भावनाला वाटले की जर आता मास्कच लावून राहायचे आहे तर मेकअपची काय गरज आहे? तिने असा विचार करून आपले केस विंचरले, मास्क लावला आणि निघाली. ऑफिसमध्ये प्रत्येकजण तिला विचारत होते, ‘‘अरे काय झाले, एवढी उदास का वाटते आहेस?’’ भावनाला समजात नव्हते की हे असे का विचारत आहेत?

जेव्हा तिने घरी येऊन मास्क काढला, तेव्हा तिला कळले की ते बरोबर म्हणत होते. असे वाटत होते जणूकाही चेहऱ्यावर शोककळा पसरली आहे. भावनाला कळत नव्हते की या अशा दु:खी चेहऱ्याने ती छान कशी दिसेल?

रविताचे प्रकरण वेगळेच आहे. लॉकडाऊन सुरु होता, वेतन कपात सुरु झाली. रविताच्या डोक्यात भूत शिरले होते की कशाप्रकारे बचत करायची. म्हणून तिने स्वस्त दराचे मास्क खरेदी करून बचत करून फायदा मिळवला. मास्क लावूनच राहायचे आहे तर काय गरज आहे लिपस्टिक, सनस्क्रिन वा अन्य प्रसाधनांची. एका आठवडयाच्या आत रविताच्या चेहऱ्यावर अॅलर्जी व काळे चट्टे उमटले. जेव्हा रविता डॉक्टरकडे गेली, तेव्हा कळले की मास्कच्या मटेरिअलमुळे चेहऱ्यावर अॅलर्जी आली आणि सनस्क्रिन न लावल्याने काळे चट्टे उमटले.

लॉकडाऊन उठत आहे आणि यासोबत ऑफिसही सुरु होऊ लागले आहे. जर तुम्ही बाहेर जात असाल तर मास्क लावणे अनिवार्य झाले आहे. पण याचा अर्थ हा नाही की मास्क तुमच्या सौंदर्याच्या मधला अडथळा आहे. जर आपण लहानसहान गोष्टींकडे लक्ष दिले तर तुम्ही मास्क ब्युटीचा नवा ट्रेंड सुरु करू शकता.

रंगीबेरंगी मास्क

बाजारात २० रुपयांपासून ते ४५० रुपयांपर्यंत मास्क उपलब्ध आहेत. पण रोज रोज एकच मास्क लावणे महिलांना डल व कंटाळवाणे वाटते. तुम्ही काही रंगीबेरंगी मास्क आरामात घरातच बनवू शकता. प्रत्येक दिवसासाठी एक नवीन मास्क. घरात तुमच्या पडलेल्या जुन्या टीशर्टच्या बाह्यांपासून तुम्ही अतिशय सहजतेने मास्क बनवू शकता. सुती जयपुरी दुपट्टयांपासूनसुद्धा तुम्ही मनाजोगते मास्क बनवू शकता. पण मास्क बनवताना हे अवश्य लक्षात ठेवा. कापडाचा दर्जा मऊ आणि रंग पक्का असावा. मास्क तुमच्या चेहऱ्यावर एक नवे तेज आणतील.

अॅक्सेसरीजकडे दुर्लक्ष करू नका

मोकळया केसांवर मास्क लावल्यास केस खूपच वाईट दिसतात. तसेही नंतर तुम्ही स्पा वा कॅराटिन करू शकणार नाही. म्हणून केसांचा पोनीटेल बांधून मास्क लावा. मास्कच्या रंगाला मिळत्या जुळत्या अॅक्सेसरीज तुम्हाला एक वेगळाच लूक प्रदान करतील.

डोळयांना एक वेगळीच परिभाषा द्या

आता जोवर चेहऱ्यावर मास्क राहील तोवर सगळे काम डोळयांनीच करावे लागेल. चांगल्या कंपनीच्या वॉटरप्रुफ लायनरने आपल्या डोळयांचे सौंदर्य वृद्धिंगत करा. उष्ण हवामान असल्याने काजळ वापरणे टाळा. आयब्रोजना घरीच कात्री व प्लकरने आकार द्या. लक्षात ठेवा डोळयांभोवती जमा झालेले जंगल कोणालाही आकर्षक वाटत नाही.

ओठांकडेसुद्धा लक्ष द्या

मास्क लावलेला असल्याने लिपस्टिक लावणे टाळले तरी चालेल, पण ओठांची काळजी घेणे नाही. रोज रात्री ओठांवर ग्लिसरीन अवश्य लावा. मास्क लावण्याआधी ओठांवर न्यूड लीपबाम अवश्य लावा. हे ओठांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे.

सनस्क्रीनशी मैत्री कायम ठेवा

सनस्क्रिन न लावता घरातून चुकूनही बाहेर निघू नका. मास्क केवळ कोरोना व्हायरसपासून आपले रक्षण करेल, सूर्याच्या किरणांपासून नाही.

अशाच काही लहान सहान टीप्स अवलंबून तुम्ही मास्कच्याबाबतीत एक नवा ब्युटी ट्रेंड आणू शकता.

ऑफिसवेअरमध्ये करू नका या चूका

– मोनिका गुप्ता

कुठला उत्सव असो किंवा घरात कुठले फंक्शन, महिला आपण सर्वांमध्ये उठावदार दिसावं यासाठी प्रयत्नरत असतात. यावरून स्पष्ट कळतं की प्रत्येक महिलेला नटणेथटणे छान जमते. लग्नसमारंभ किंवा घरातील इतर कार्यक्रमात बऱ्याचदा महिलांकडे विचार करण्याचा वेळ असतो आणि त्याचा व्यवस्थित उपयोग करून त्या स्वत:ला परफेक्ट लूकमध्ये दर्शवतात.

आज बऱ्याच महिला नोकरदार आहेत. नोकरदार असल्यामुळे घर आणि ऑफिस यात त्या एवढया व्यस्त होऊन जातात की आपल्या वेषभूषेकडे योग्यप्रकारे लक्ष्य देऊ शकत नाहीत. दुसरीकडे अशाही काही महिला असतात, ज्या ऑफिसला थोड्या जास्तच सजूनधजून जातात. महिलांना फॅशनचे ज्ञान तर असते, परंतु ते योग्यप्रकारे कॅरी कसे करायचे, यांत अधिकतर महिला कन्फ्यूज असतात. अशास्थितीत एकीकडे काही महिला अगदी सिंपल लुकमध्ये ऑफिस जाणे पसंत करतात तर दुसरीकडे काही महिला भडक रंगाचे कपडे आणि किंमती दागिने घालूनही ऑफिसला जातात.

नोकरदार महिलांसाठी त्यांची वेशभूषा खूप महत्वाची असते. एका नोकरदार महिलेसाठी वेशभूषा अशी असावी, जी कामात बाधा बनू नये आणि जवळपासच्या लोकांवरही चांगला प्रभाव टाकू शकेल. सादर आहेत काही टीप्स :

व्यावसायिकासारखी असावी वेशभूषा
जर आपण आपल्या करिअरबद्दल गंभीर असाल तर आपण फॅशनेबल दिसण्याऐवजी व्यावसायिक दिसण्याचा प्रयत्न करा. आजकाल लोक कामाबरोबरच आपल्या बोलण्याच्या अंदाजावर व वेषभूषेवरही लक्ष्य देतात. म्हणून नोकरदार महिलांना ऑफिसात स्वत:ला व्यवस्थितपणे सादर करणे खूप गरजेचे आहे. ऑफिसला जाताना आपल्या वेषभूषेवर अवश्य लक्ष्य द्या. जास्त भडक रंग, अधिक दागिने व चमकणारे कपडे आपल्या प्रतिमेला बिगडवू शकतात. जर आपला ड्रेस अनुकूल असेल तर याचा आपल्या कामावर प्रभाव पडतो. आपल्या ऑफिसात आपले सहयोगी आपल्या ड्रेसवर चर्चा करू लागतात, ज्यामुळे आपले कामात लक्ष्य लागत नाही. काही काळापूर्वी महिला सुटसलवार व साडी घालून कामावर जात असत. परंतु आता त्या खूप स्मार्ट झाल्या आहेत. आजच्या नोकरदार महिलांनी ट्राऊजर, शर्टसारखी वेशभूषा स्वीकारली आहे. आता अधिकतर महिलांच्या वार्डरोबमध्ये सूट, साडी कम फॉर्मल जास्त दिसून येत आहेत.

जेव्हा मिटिंग असेल
जर ऑफिसात एखादी मिटिंग असेल तर अशा स्थितीत आपण साडीकडे दुर्लक्ष्य करून ट्राऊजर, फॉर्मल शर्ट वा टॉप घालून जावे, साडी सांभाळण्यापेक्षा जास्त कर्म्टेबल फॉर्मल ड्रेस आहे. यामुळे आपले लक्ष्य विचलित होणार नाही आणि एकाग्रता टिकून राहील.

पेहराव असा, जो आराम देईल
असं बऱ्याच वेळा होतं की आपण ऑफिसात असा ड्रेस घालून जाता, ज्यामुळे पूर्ण दिवस आपण कंफर्ट फील करत नाहीत. म्हणून कपडे असे निवडा, जे आवश्यकतेपेक्षा जास्त टाइट नसावेत. नेहमी टाइट कपडयांत आपण कामापेक्षा जास्त कपडयांवर लक्ष्य देतो. अधिक फॅशनेबल कपडे घालू नयेत, जे कुठून कापलेल्या डिजाइनवाले किंवा गरजेपेक्षा जास्त शॉर्ट असतील.

ऑफिससाठी कुर्ती वा सूट खूप सिंपल घ्या. हे जास्त द्ब्रागमगीत नसावे. आपण ब्लॅक किंवा सफेद कुर्तीबरोबर रंगबेरंगी दुपट्टा कॅरी करू शकता. जर कुर्ती बुटिकमध्ये शिवून घालणार असाल तर जास्त डिपनेक घेऊ नये आणि ना ही जास्त डिपबॅकही घेऊ नये. कुर्तीची डिजाइन जेवढी सिंपल असेल ऑफिस लुकसाठी तेवढेच चांगले असेल.

कंफर्टच ट्रेंड आहे
नोकरदार महिलांसाठी कंफर्ट ट्रेंड आहे. फॅशन डिझाइनर अंजली बेदीचे म्हणणे आहे, ‘‘वर्किंग महिलांनी फॅशनपेक्षा जास्त कंफर्ट लेव्हल बघितली पाहिजे. जर आपण आपल्या ड्रेसमध्ये कंफर्ट आहात तर आपल्याला स्वत: चांगले फील होऊ लागते आणि आपण जास्तीत जास्त वेळ आपल्या कामाला देऊ शकता. ऑफिससाठी नेहमी फॉर्मल लुकच ठेवला पाहिजे. वाटल्यास आपण डार्क ब्लू जीन्सबरोबर व्हाईट शर्ट घालू शकता. ब्राउन ट्राऊजरबरोबरसुद्धा व्हाईट शर्ट मॅच होऊ शकते. फिटेड पँट बरोबर टीशर्ट घालू शकता. स्ट्रेट स्कर्टसोबत  सेमी फॉर्मल टॉप कॅरी करू शकता.’’

कंफर्टच्सोबत स्टाइलही आवश्यक
नोकरदार महिलांना कंफर्टबरोबरच स्टाईलची काळजी घ्यावी लागते. नेहमी असा ड्रेस घाला, जो ना अधिक एक्सपोज करणारा असेल वा ना अधिक टे्डिशनल लूक देणारा असेल. ड्रेस प्रॉपर इस्त्री केलेला असावा. त्याच्यावर चुण्या पडलेल्या असू नयेत. असं वाटायला नको की आपण तो बळजबरीने घातले आहे. योग्य पेहराव आपल्या व्यक्तिमत्वाला दर्शवितो. जर आपणास ज्वेलरी घालणे पसंत असेल तर कानातील सिंपल रिंग घालू शकता किंवा गळयात सिंपलसे लॉकेट घालू शकता.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें