योग्य आहारात दडले आहे सौंदर्याचे रहस्य

* श्रुती शर्मा, बॅरिएट्रिक समुपदेशक आणि न्यूट्रिशनिस्ट, जेपी हॉस्पिटल, नोएडा

अन्नाचा परिणाम तुमच्या त्वचेचा रंग, केस आणि अगदी तुमच्या मूडवरही होतो. जर तुम्ही आतून निरोगी असाल तर तुमची त्वचा स्वत:हून चमकदार दिसते. त्वचेवरूनच तुमचे आरोग्य कसे आहे हे समजते. अन्नामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि खनिज पदार्थ असतात, जे तुमचा ताण नियंत्रित करण्यासोबतच तुमच्या त्वचेलाही चमकदार ठेवतात. त्वचेला सुंदर आणि निरोगी ठेवणे कठीण नसते.

योग्य आहारामुळे वजन नियंत्रणात राहते : जास्त खाणे आणि चुकीचा आहार घेतल्याने वजन वाढते. परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही स्वत:ला मॉडेलसारखे एकदम सडपातळ बनवावे. लठ्ठपणादेखील चांगली गोष्ट नाही, कारण तो मधुमेह आणि हृदयविकारासारख्या आजाराचे कारण ठरू शकतो.

योग्य आहाराचे सेवन न केल्यास केस रूक्ष आणि निर्जीव होतात : केसांना पोषणाची गरज असते. आहाराचा थेट परिणाम केसांवर होतो.

नखांनाही हवे पोषण : तुमची नखे सहज तुटत असतील तर याचा अर्थ असा की तुम्ही आहारात बदल करायला हवा. केसांप्रमाणेच नखांनाही पोषण आवश्यक असते. त्यासाठी अंडी, कमी चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थ आणि मटण खा. यामुळे नखांना पुरेसे प्रोटीन (प्रथिने) मिळेल.

पोषक पदार्थांच्या अभावामुळे स्नायू कमजोर होतात : स्नायूंचा तुमच्या सौंदर्याशी थेट संबंध असतो. स्नायू कमजोर होऊ लागले तर तुम्ही वर्कआऊट करू शकणार नाही. याचा परिणाम तुमच्या शरीरावर होईल. स्नायू बळकट ठेवण्यासाठी प्रथियुनक्त खाद्यपदार्थांचे सेवन करा.

तुम्ही जे काही खाता ते तुमच्या त्वचेद्वारे प्रतिबिंबित होते : रूक्ष आणि निर्जीव त्वचा तुमच्या निकृष्ट आहाराचा परिणाम आहे. तुम्ही पुरेशा प्रमाणात प्रथिनांचे सेवन केल्यास भरपूर प्रमाणात फळे आणि भाज्या खाल्ल्यास त्वचा तरूण, चमकदार राहील. चरबीयुक्त पदार्थ आणि प्रक्रिया केलेले पदार्थ खाऊ नयेत.

पौष्टिक आहार वृद्धत्वाची प्रक्रिया कमी करू शकतो : अन्नाचा परिणाम शरीरात होणाऱ्या वृद्धत्वाच्या प्रक्रियेवरही होतो. अँटीऑक्सिडंटयुक्त आहार जसे की, सेंद्रिय फळे आणि भाज्या या फ्री रॅडिकल्स दूर करून त्वचेला सुरकुत्या आणि फाईन लाइन्सपासून वाचवतात.

आहाराचा परिणाम डोळे आणि पापण्यांवरही होतो : तुम्ही योग्य आहार घेत नसाल आणि पुरेसे पाणी पित नसाल तर त्याचा परिणाम तुमच्या डोळयांवर आणि पापण्यांवर होऊ शकतो. योग्य पोषण न मिळाल्याने पापण्यांचे केसही गळायला सुरुवात होते.

सौंदर्यासाठी आवश्यक पोषक तत्त्व

व्हिटॅमिन सी : व्हिटॅमिन सी एक शक्तिशाली अँटिऑक्सिडंट आहे. हे कोलेजेन तयार करण्यासाठी मदत करते, जे त्वचा कोमल ठेवण्यासाठी आवश्यक असते. ब्रोकोली, अंकुरित धान्य, पेरू, द्राक्षे, स्ट्रॉबेरी, पार्सली यात खूप जास्त व्हिटॅमिन सी असते.

सेलेनियम : सेलेनियमदेखील एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहे, जे त्वचेची लवचिकता कायम ठेवते. अक्रोड, ट्युना, लिव्हर, व्हीट जर्म, कांदे, सीफूड, कडधान्य, तपकिरी तांदूळ आणि कुकुट (पोल्ट्री) उत्पादनांमध्ये सेलेनियम मोठया प्रमाणात आढळते.

व्हिटॅमिन ई : त्वचेसाठी व्हिटॅमिन ई खूप महत्त्वाचे असते. ते व्हिटॅमिन ए सोबत मिळून त्वचेला कर्करोगापासून दूर ठेवते. व्हिटॅमिन ई मध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात, जे प्रदूषण, धुके, प्रक्रिया केलेले अन्न आणि उन्हामुळे त्वचेत तयार होणारी फ्री रॅडिकल्स दूर करतात. बदाम, पोल्ट्री उत्पादने, अक्रोड, अव्होकॅडो, शतावरी, सूर्यफुलाच्या बिया, काजू, शेंगदाणे, पालक, ओटचे जाडेभरडे पीठ आणि ऑलिव्ह हे व्हिटॅमिन ई ने परिपूर्ण असलेले पदार्थ आहेत.

ओमेगा ३ : याला अत्यावश्यक फॅटी अॅसिड असे म्हणतात. एझिमासारख्या त्वचेच्या अनेक आजारांमध्ये ते प्रभावी असल्याचे दिसून आले आहे. आवश्यक फॅटी अॅसिड त्वचेतील आर्द्रता आणि लवचिकता कायम राखतात. शरीर स्वत: याची निर्मिती करू शकत नाही, म्हणून याचे सेवन आहारासोबत करणे गरजेचे असते. अक्रोड, सालमन, अळशी, चायना सीड हे ओमेगा -३ चे उत्तम स्रोत आहेत.

व्हिटॅमिन ए आणि बीटा कॅरोटीन : त्वचेच्या देखभालीसाठी व्हिटॅमिन ए अत्यंत आवश्यक असते. जर तुमची त्वचा कोरडी असेल, त्वचेची सालपटे निघत असतील तर समजून जा की तुमच्या शरीरात व्हिटॅमिन एची कमतरता आहे. हे उन्हामुळे त्वचेचे नुकसान होण्यापासून वाचवते. व्हिटॅमिन ए आणि बीटा कॅरोटीनचे उत्तम स्रोत आहेत – शतावरी, पीच, बीट, ग्रीन पालक, अंडी, रताळे, लाल मिरची.

झिंक : झिंक हा एक महत्तवपूर्ण ट्रेस खनिज पदार्थ आहे, जो त्वचेच्या खराब झालेल्या उतींची दुरुस्ती आणि जखमांना बरे करण्यासाठी उपयुक्त आहे. जर तुम्ही मुरुमांमुळे त्रस्त असाल तर शरीरात जस्ताची कमतरता असू शकते. झिंकचे स्रोत आहेत – ओएस्टर, पेकान, पोल्ट्री उत्पादने, भोपळयाच्या बिया, आले, डाळी, सीफूड, मशरूम, अख्खे धान्य इ.

निरोगी त्वचेसाठी टीप्स

भरपूर पाणी प्या : पाणी पिण्यामुळे त्वचेतील ओलावा टिकून राहतो आणि तिच्यातील विषारी द्रव्ये निघून जातात, ज्यामुळे त्वचा मऊ राहते.

कोशिंबीर खा : कोशिंबीर, कच्चा पालक आणि उकडलेली अंडी खा. यामध्ये कॅरोटीनॉइड्स, अँटीऑक्सिडंट असतात, जे त्वचा निरोगी ठेवण्यासाठी मदत करतात.

हळदीचं सेवन करा : तपकिरी भात, मांसाचे पदार्थ आणि शेक इत्यादीमध्ये हळद घालून त्याचे सेवन करा.

आरोग्यदायी पशु उत्पादने : आठवडयातून २-३ सालमन घ्या. यात उत्कृष्ट गुणवत्तेचे ओमेगा ३ फॅटी अॅसिड असतात.

साखरेचे कमी प्रमाणात सेवन करा : साखर आणि साखरयुक्त पदार्थांचे सेवन टाळा. ते ग्लायसेशन वाढवते, ज्याचा त्वचेच्या उतींवर वाईट परिणाम होतो.

खराब फॅटपासून दूर राहा, चांगल्या फॅटचे सेवन करा : वनस्पती तेल जसे की, कॉर्न ऑइल, कॉटन ऑईल, कॅनोला आणि शेंगदाण्याच्या तेलाचा वापर करू नका. त्याऐवजी खोबरेल तेल, अॅवोकॅडो, ऑलिव्ह ऑईल, एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑईल किंवा तुपाचे सेवन करा.

मधाचा वापर त्वचेसाठी फायदेशीर ठरेल

* गृहशोभिका टीम

आजकाल अति उष्मा आणि प्रदूषणामुळे त्वचेचे सर्वाधिक नुकसान होते, त्यासाठी आपण बाजारातून क्रीम्स विकत घेतो, पण ती फार काळ बरी होत नाही. त्वचेचे सौंदर्य दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी जर आपण नैसर्गिक घरगुती टिप्स वापरल्या तर ते आपल्या त्वचेसाठी फायदेशीर ठरेल. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला त्वचेसाठी मधाचे फायदे सांगणार आहोत. ज्याच्या सहाय्याने तुम्ही बाजारातून आणलेल्या उत्पादनांऐवजी घरगुती उत्पादने वापराल.

  1. मधामुळे त्वचा चमकदार होईल

मध आणि दुधामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट शरीरासाठी खूप चांगले असतात. मध आणि दुधापासून बनवलेला मास्क त्वचेवर लावल्याने झटपट चमक येते. दिवसभर ऑफिसमध्ये काम केल्यानंतर त्याचा वापर करून तुम्ही फ्रेश दिसू लागतो. यासोबतच नियमित मध आणि दुधाचा मास्क घेतल्याने चेहऱ्यावरील टॅनिंगही निघू लागते. याशिवाय, जीवनसत्त्वे, खनिजे आणि प्रथिने भरपूर प्रमाणात असल्याने, रंग सुधारण्यासदेखील मदत करते.

  1. सुरकुत्या काढा

जर तुम्हाला वृद्धत्वाची ही समस्या भेडसावत असेल आणि तुम्हाला सुरकुत्या दूर करायच्या असतील तर मध आणि दुधाने बनवलेला फेसपॅक तुम्हाला या समस्येत मदत करू शकतो. यासाठी दोन्ही समान प्रमाणात मिसळा आणि चेहऱ्यावर लावा.

  1. फाटलेल्या ओठांसाठी मध घरगुती उपाय

अनेकदा लोकांना ओठ फाटण्याची समस्या असते. फाटलेल्या ओठांना ओलावा लागतो. तुम्ही तुमच्या ओठांना मॉइश्चराइज करण्यासाठी या जादुई पेस्टचा वापर करू शकता. हे वेळेवर लावल्याने तुम्ही फाटलेल्या ओठांच्या समस्येपासून लवकरच सुटका मिळवू शकता.

  1. मध एक उत्तम क्लिन्झर आहे

कच्चे दूध हे चांगले क्लिन्झर आहे. ही गोष्ट आपणा सर्वांना माहीत आहे, पण कच्च्या दुधात मध मिसळल्याने त्वचेवर चांगला परिणाम होतो. यासाठी कच्च्या दुधात थोडे मध मिसळा आणि कापसाच्या साहाय्याने पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि पाच मिनिटे लावल्यानंतर धुवा. असे नियमित केल्याने तुमची त्वचा मुलायम आणि स्वच्छ होईल.

गुपित नितळ त्वचेचे

* भारत भूषण श्रीवास्तव

त्वचेवरील डाग व्रण नाहीसे करण्यासाठी महिला न जाणे कोणकोणते उपाय करून पाहतात. एवढे करूनही डाग वा व्रण गेले नाहीत तर चिडचिड होणे सहाजिक आहे. लाखो घरगुती उपाय व टीप्स आहेत आणि अनेक क्रीम्स बाजारात उपलब्ध आहेत. सगळे वापरूनही डाग वा व्रण कायमचे जात नसतील तर डागयुक्त असलेली त्वचा नक्कीच एक शाप आहे.

त्वचेवरील डाग वा व्रण नाहीसे करण्याकरीता आधी त्याची कारणे जाणून घेणे गरजेचे आहे, ज्यामुळे हे त्वचेवर दिसू लागतात व परत जायचे नाव घेत नाहीत.

त्वचेच्या आपल्या अशा काही गरजा असतात, ज्या आपण वेळीच समजून घेतल्या नाहीत तर वाढत्या वयानुसार हे डाग वा व्रण वाढत जातात आणि वेळ अशीही येते की कोणताही उपाय कामी पडत नाही.

खरेतर त्वचेवरील डाग वा व्रण बाह्य व अंतर्गत दोन्ही कारणे एकदम वरचढ झाल्याने ते आपल्याला भक्ष्य बनवतात आणि अशाप्रकारे बनवतात की आपल्याला समजतसुद्धा नाही की पहिला डाग केव्हा आला होता ते. म्हणजेच निष्काळजीपणा हेसुद्धा एक मोठे कारण आहे.

या, जाणून घेऊ नितळ त्वचा मिळवण्याची काही गुपितं, जेणेकरून चेहरा लपवावा लागणार नाही व आत्मविश्वासही कायम राहील.

आहार

त्वचेचा थेट संबंध आपल्या आहाराशी असतो, हे सगळयांना माहीत असते. पण असे असूनही जेवणातील काही घटकांच्या अभाव वा कमतरतेमुळे आपल्या लक्षात येत नाही आणि हेच त्वचेवर डाग वा व्रण येण्यास कारणीभूत ठरतात. म्हणून नव्या दृष्टीने जेवणाकडे बघायला हवे. जसे की :

* जेवणात जीवनसत्वे, प्रथिने, खनिजे व इतर घटक समाविष्ट असावेत.

* जेवणात ऋतूनुसार फळं, भाज्या, डाळी अवश्य समाविष्ट करा.

* दही, ताक आपल्या जेवणाचा भाग बनवा.

* व्हिटॅमिन ई व सी असलेलले खाद्यपदार्थ म्हणजे लिंबू वगैरे जेवणात असायला हवे.

* रात्रीचे जेवण झोपण्याच्या ३-४ तास अगोदर घ्यावे.

* सकाळचा नाश्ता पौष्टिक व तंतुमय असावा.

* संतुलित प्रमाणात सुका मेवा आपल्या आहारात सामाविष्ट करा.

अनेक कारणांमुळे डाएट चार्ट पाळणे शक्य होत नाही. पण जेवणात काय असावे व काय असू नये याकडे नक्कीच लक्ष असू शकते. जसे :

हे अजिबात घेऊ नका : दारू. पांढरा ब्रेड, शीत पेये, सोया मिल्क, स्ट्राबेरी, चॉकलेट. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की या पदार्थांचे अति सेवन केले तर ते त्वचा विकार निर्माण करतात. म्हणून हे पदार्थ घेतले नाही तरी चालतात.

मर्यादेत ठेवा : चहा, कॉफी, दूध, मीठ, साखर, शेंगदाण्याचे तेल व सालसा.

नियमित घ्या : सफरचंद, टोमॅटो, लिंबू, दही आणि फळांचा रस.

केवळ अंघोळ करणे हे त्वचेसाठी पुरेसे नाही, उलट त्वचा स्वच्छ ठेवण्यासाठी हे उपायसुद्धा अवलंबले पाहिजेत :

* आठवडयातून एकदा उटणे वापरा.

* महिन्यातून एकदा फेशियल व बॉडी मसाज अवश्य करा.

* चेहऱ्याकडे खास लक्ष द्या. पहिला डाग दिसताच जागे व्हा. त्वरित ब्युटिशियन वा त्वचारोगतज्ञाचा सल्ला घ्या.

* कमीतकमी ७-८ तासांची झोप पूर्ण करा.

* पोट साफ ठेवा. बद्धकोष्ठता हे त्वचेववरील डाग वा व्रणाचे एक प्रमुख कारण आहे.

* चेहऱ्यावर ठराविक काळाने मध, हळद, लिंबाचा रस, गुलाबजल, बेसन किंवा सायीचा वापर करा. हे वापरल्याने मृत त्वचा नाहीशी होते.

* नियमित सनस्क्रीन वापरा.

* ताण, अपचन, निद्रानाश यापासून दूर राहा. बऱ्याचदा डोळयांखाली काळी वर्तुळं यामुळेच येतात.

इंदोरच्या अनुभवी ब्युटिशियन मीनाक्षी पुराणिक सांगतात की किशोरावस्थेत ज्याप्रमाणे मुरूम येऊ लागतात त्याचप्रमाणे मेनापॉजच्या काळातही त्वचेच्या समस्या निर्माण होऊ लागतात, जसे सुरकुत्या येणे, पिगमेंटेशन येणे, डोळयांच्या आजूबाजूला रेषा व डार्क स्पॉटस येणे वगैरे.

या सांगतात की अलीकडे ब्युटी क्लिनिक्समध्ये फेशियलशिवाय अनेक नॉनसर्जिकल ट्रीटमेंट्स दिल्या जातात जसे मायक्रोडर्माटोजन, फ्रुट पील, केमिकल पिल, लिंफेटिक थेरपी, मॅगनेट थेरपी, अरोमा थेरपी, स्टोन थेरपी, मरीन ट्रीटमेंट वगैरे. ह्या सगळया ट्रीटमेंट्स त्वचा डागविरहित करतात. शक्य असेल तेवढी आपली जीवनशैली आणि आहार व्यवस्थित ठेवा. असे केल्याने त्वचेवरील चमक कायम राहील.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें