जर मैत्रीण असेल सेक्सी

* पारुल

अलीकडच्या तरुणाईमध्ये सेक्सी दिसण्याचा ट्रेंड हीट आहे. ते विचार करतात की जे शॉर्ट कपडे वापरतात, स्लिम स्ट्रीम असतात तेच सेक्सी असतात आणि जे सेक्सी आहेत तेच खरे बुद्धिमान आहेत. यामुळे सर्वांना त्यांच्याशी मैत्री करायला आवडते. एवढेच नाही तर काही तरुण सेक्सी लुकच्या मागे अशा प्रकारे वेडावतात की ते अनेकदा स्वत:च व्यक्तीमत्वच विसरून जातात आणि या नादापायी समोरच्याचा राग करू लागतात. अशावेळी हे समजून घेणे गरजेचे आहे की इर्षेऐवजी तुम्ही तुमच्या व्यक्तिमत्त्वात स्मार्टनेस आणण्याचा प्रयत्न करणे गरजेचा आहे.

चला तर जाणून घेऊया की मैत्रीण सेक्सी असल्यास आपण काय करतो आणि खरं काय करायला हवं :

आपण काय करतो

इर्षेमागची भावना : जेव्हा आपली मैत्रीण आपल्यापेक्षा अधिक सेक्सी दिसत असेल, स्वत:ला सेक्सी बनविण्यासाठी कोणतीच कसर सोडत नसेल, ज्यामुळे प्रत्येक मुलगा तिच्या मागे लागत असेल तर आपल्या मनात तिच्यासाठी इर्षेची भावना निर्माण होऊ लागते. ज्यामुळे आपण अनेकदा खरी गोष्टदेखील चुकीची समजू लागतो. आपण तिच्याशी चांगलं नातं असूनदेखील तिच्याशी दुरावा ठेवू लागतो, तिच्याबद्दल दुसऱ्यांना चुकीचं सांगण्यातदेखील मागे पुढे पाहत नाही, कारण आपल्याला वाटतं की ती अधिक सेक्सी असल्यामुळे मुलं आपल्याकडे दुर्लक्ष करताहेत, जे अजिबात सहन होत नाही.

प्रत्येक गोष्ट वाटते चुकीची : मुलांनी रियाच्या सेक्सी लुकची स्तुती करायला काय सुरुवात केली की आता प्रियाच्या डोळयात रिया अशी काही खटकू लागली  की तिची योग्य गोष्टदेखील चुकीची वाटू लागली. कारण प्रियाला सेक्सी लुक अजिबात सहन होत नव्हता.

एकदा जेव्हा रियाने तिच्या परीक्षेसाठी तिला सल्ला दिला तेव्हा तिच्या मनातील इर्षेमुळे तिचा सल्ला बोलणं चुकीचं म्हणून ऐकला नाही, ज्याचा चुकीचा परिणाम तिच्यासाठी गंभीर सिद्ध झाला कारण जेव्हा आपल्या मनात कोणासाठी इर्षेची भावना येऊ लागते खासकरून मुलींमध्ये एकमेकांच्या लुकबाबत तेव्हा ते कोणत्याही परिस्थितीत सहन करू शकत नाहीत. तिची प्रत्येक गोष्ट खरी असूनदेखील चुकीची सिद्ध करण्यात स्वत:ला समाधान पोहोचण्याचा प्रयत्न करतात जे योग्य नाहीए.

कॅरेक्टरला जज करतात : जेव्हा कोणतीही मुलगी स्वत:ला सेक्सी दाखवू लागते तेव्हा तिच्या मैत्रिणी तिची स्तुती करण्याऐवजी तिच्या लुकवरती जळफळू लागतात. नंतर हा जळफळाट व्यक्त करण्यासाठी त्या दुसऱ्या लोकांसमोर हेदेखील बोलायला घाबरत नाहीत की यार ही तर सेक्सी लुकने मुलांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे, म्हणून तर अलीकडे हीची वागणूक खूप बदलली     आहे.

हिचं कॅरेक्टरच खराब आहे, म्हणून आपणदेखील तिच्याशी मैत्री करता कामा नये. या मुलांना आकर्षित करण्यासाठी कोणतीही हद्द पार करू शकते. मित्र-मैत्रिणींच्या जिभेवरती जेव्हा हे शब्द स्वत:च्या फ्रेंड्सच्या सेक्सी लुकमुळे मनात निर्माण होतात तेव्हा जळकुटेपणा हेच कारण असतं.

मागून नावं ठेवणं

यार बघ ना ती कसे कपडे घालते, केसांची स्टाईल तर बघ, चालणंदेखील एखाद्या हीरोइन सारखंच आहे, मुलांना स्वत:च्या मागेपुढे फिरविण्यासाठी चेहऱ्यावर नेहमी मेकअप थापलेला असतो. स्वत:च्या सेक्सी लुकने स्वत:चं कौतुक करून बॉयफ्रेंड्स जमा करते. कितीही सेक्सी लुक असला तरी  बोलण्याची जरादेखील अक्कल नाही आहे. काही येत तर नाही म्हणून तर स्वत:च्या सेक्सी लुकने फेमस होण्याचा प्रयत्न करत आहे.

आपल्या फ्रेंडच्या सेक्सी लुकला पाहून मुली इर्षेमुळे मागून तिला कमीपणा दाखविण्यासाठी तिची खोटी बुराई करण्यातदेखील मागे राहत नाही. यामुळे त्यांच्या मनात जो राग असतो तो दूर होतो, उलट असं करून त्या स्वत:च्याच नजरेत खाली पडतात.

चेष्टा करण्यात जरा देखील मागे नाही

स्नेहा खूपच सेक्सी व आकर्षक दिसत होती. तिने तिच्या मित्रमैत्रिणींच्या ग्रुपमध्ये प्रवेश करताचं सगळेजण तिच्याकडे पाहतच राहिले. मुलांच्या तोंडातूनदेखील वाव, वॉट अ लुक, तुझ्यासारखी सेक्सी कोणीच नाही असे शब्द ऐकून प्रियाषाच्या मनात एवढे काटे रुतले की शब्दांमध्ये सांगू शकत नाही. तिला सहनच होत नव्हतं की सर्वांचं लक्ष स्नेहाने आपल्या सेक्सी लुकने आकर्षित केलं आहे. यामुळे प्रियाषाचा जळफळाट झाला आणि थोडयाच वेळात ती विनाकारण स्नेहाची थट्टा करत हसायला लागली की स्नेहाच्या डोळयांमध्ये अश्रू थांबले नाहीत. तिची थट्टा करण्यासाठी प्रियाषाने इतर मैत्रिणींना सामील केलं जे योग्य नव्हतं.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें