दिवाळी काही क्षणाच्या आनंदासाठी थकविणारा प्रवास

* सीमा ठाकूर

मुंबईत दरवर्षी कितीतरी मुलं वेगवेगळया शहरातून शिक्षणासाठी वा नोकरीसाठी येतात. इथे त्यांच्यासाठी सर्वकाही असतं, परंतु त्यांचे कुटुंबिय आणि बालपणीचे मित्र नसतात, ज्यांच्यासोबत ते दरवर्षी दिवाळी साजरी करत आलेले असतात.

दिवाळी आपल्या जिवलगांसोबत साजरा करण्याचा सणउत्सव आहे. साधारणपणे आपल्या कुटुंबीयांसोबत राहणाऱ्या मुलांसाठी दिवाळी म्हणजे महिन्याभरा पूर्वीपासूनच आई-बाबांसोबत मिळून घराची साफसफाई करणं, खरेदीला जाणं, भेटवस्तू खरेदी करणं, घर सजवणं आणि दिवाळीच्यादिवशी खूप मजा करणं.

परंतु, अशी काही मुलं असतात जी होस्टेलमध्ये अनेक मैलाचा प्रवास करून घरी फक्त दिवाळी साजरी करण्यासाठी पोहोचतात. दिवाळी फक्त एक सण नाही तर त्यांच्यासाठी एक आठवण आहे, एक असं प्रेम आहे जे स्वत:च्या कुटुंबियांसाठी या सणाला खास बनवितो.

मुंबई, दिल्लीसारख्या शहरात दरवर्षी अशी कितीतरी मुलं वेगळया शहरातून शिकायला आणि नोकरी करण्यासाठी येतात. तिथे त्यांच्यासाठी सर्वकाही असतं, परंतु त्यांचे कुटुंबिय आणि बालपणीचे मित्र नसतात. ज्यांच्यासोबत ते दरवर्षी दिवाळी साजरी करत आलेले असतात. याचमुळे वर्षभर ते भलेही आपल्या घरी गेले नसले तरी दिवाळीसाठी नक्कीच जातात.

दिल्ली युनिव्हर्सिटीत शिकणारी कशिश सांगते, ‘‘हॉस्टेलमधून घरी जाण्यासाठी मला सर्वात मोठा त्रास असतो तो कपडे पॅक करण्याचा. कपाटातून काढा, कपडयांची निवड करा आणि नंतर पॅक करा, खूपच कटकटीचं असतं. सर्वात जास्त टेन्शनचं काम असतं हॉस्टेलमधून परवानगी घेणं. अगोदर तर दहा प्रकारचे असे फॉर्म सही करून घेतात. त्यानंतर पालकांच्या आयडीवरून मेल पाठवावा लागतो. त्यानंतर हॉस्टेलमधून बाहेर पडताना पालकांशी बोलून द्यावं लागतं. नंतर एक एन्ट्री हॉस्टेलचा गेटवर आणि एक कॉलेजच्या गेटवरती करावी लागते. या सर्वानंतर कॉलेजमधून बाहेर पडल्यावर सुट्टयांमुळे कोणतीही रिक्षा मिळत नाही. एकतर स्वत:च्या सामानसोबत उभे राहा वा रोड क्रॉस करून जा. कसंबसं करून मेट्रोपर्यंत पोहोचताच एवढं भारी सामान उचला आणि स्क्रीनिंगवरती टाका. कधी फोन पडतो व कधी हॅन्ड बॅग आणि चुकून जर फोन बॅगमध्ये टाकून विसरलो तर समजा मिनी हार्ट अटॅक येता येता राहून जातो.

‘‘तसं मी माझ्या घरी फ्लाईटनेच जाते येते, परंतु दिवाळीच्या वेळी फ्लाईट खूपच एक्स्पेन्सिव्ह होतात. दिल्लीवरून लखनौच्या फ्लाईटमुळे तसाही वेळ वाचतो. परंतु सामान अधिक जास्त असेल तर त्रास होतो. ट्रेनने गेल्यास कमीत कमी ९ ते १० तास  लागतात. जेव्हा मी पहिल्या वर्षाला होती तेव्हा मी पहिल्यांदा दिल्लीवरून लखनौला एकटी जात होती, कारण अॅडमिशनच्यावेळी आईसोबत आली होती आणि त्यानंतर मी सरळ दिवाळीला जात होती. माझी ट्रेन पूर्ण ६ तास लेट होती. तिची वेळ होती संध्याकाळी ७ वाजता पोहोचण्याची आणि मी पोहोचली रात्री दीड वाजता. आई बाबा तर खूपच चिंतेत होते. ११ वाजल्यापासून एक वाजेपर्यंत ती ट्रेन जागेवरून हललीच नव्हती आणि स्टेशनला पोहोचण्यासाठी चार किलोमीटर बाकी होते. मला वाटलं की थोडंसं डिस्टन्स मी कव्हर करेन म्हणून मी निघाली. खाणं फक्त मी एक वेळचंच आणलं होतं, तेदेखील मेसवाल्या दादाला प्लीज प्लीज बोलून, जे खूपच अगोदर संपलं होतं. माझी अवस्था खूपच बिकट झाली होती. नंतर स्टेशनवर आई बाबांचा चेहरा पाहिला तेव्हा मी सर्व काही विसरून गेली.’’

व्हिडिओग्राफर म्हणून नोकरी करणारा निलेश आपल्या कॉलेजच्या दिवसांची आठवण काढत दिवाळीच्या दरम्यान केलेला स्वत:चं हॉस्टेल ते घर प्रवासाची आठवण काढत सांगतो, ‘‘कॉलेजचे पहिलं वर्ष होतं. घर नागपूरमध्ये होतं आणि सर्व मित्र तिथेच होते. मला खूपच एकटेपणा वाटत होता. कॉलेज सुरू झाल्यानंतरदेखील दिवाळीची सुट्टी केव्हा पडेल आणि मी केव्हा घरी जाईन याची वाट पाहत होतो. त्यावेळी मला स्वत:च्या सामानसोबत कसं मॅनेज करायचं आणि प्रवास करायचा हे माहीत नव्हतं. मी घरी कोणालाही सांगितलं नव्हतं की मी येतोय. मी आगाऊपणे अगोदर कॉल करून सांगितलं होतं की मी येणार नाही. यावेळी मला अभ्यासाचं प्रेशर खूपच जास्त आहे.

‘‘मी कोल्हापूरला जाण्यासाठी ट्रेनचं तिकीट बूक केलं. मी माझा वेळ मॅनेज करण्यासाठी एक चार्ट बनवला की दोन दिवसात कोणा कोणाला भेटायचं आहे, काय करायचं आणि काय नाही करायचं, एवढं सगळं. मी रेल्वे स्टेशनला जाण्यासाठी होस्टेलवरून निघालो आणि कॅबमध्ये बसलो. कॅबमध्ये बसल्यानंतर पंक्चर झाली. मला अर्ध्या तासाच्या अंतरासाठी दोन तास लागले. कारण जेव्हा मी कॅबमधून उतरलो तेव्हा समोरच रिक्षा मिळाली परंतु नेमकं तिचं सीएनजी संपलं होतं. त्यांनी मला सांगितलं की रस्ता फक्त २ किलोमीटरचा आहे. तू पायी जाऊ शकतोस. पुढे खूपच ट्रॅफिक होतं, त्यामुळे कोणतीही रिक्षा मला मिळत नव्हती.

‘‘मी २ किलोमीटर पायी चाललो आणि जसं स्टेशन वरती पोहोचलो तेव्हा ट्रेन निघणारच होती. हे पाहून मी माझं सामान माझ्या डोक्यावर उचललं आणि धावलो. माझं सामान आतमध्ये फेकलं आणि चढलो. माझा कोच होता बी २ आणि मी चढलो होतो एस १ मध्ये. नंतर हळूहळू आतून निघत मी माझ्या जागेवरती पोहोचलो. मी हॉस्टेलवर रहात असल्यामुळे प्रवासासाठी खाणं पॅक करून देणारं कोणीच नव्हतं. परंतु मी ज्या डब्यामध्ये होतो, त्यामध्ये बसलेल्या काकाकाकूंनी माझ्यासोबत त्यांचा डबा शेअर केला. माझा वेळ ट्रेनमध्ये छान गेला. मी आजूबाजूच्या बसलेल्या लोकांशी गप्पा मारु लागलो. छान झोपलोदेखील आणि दुसऱ्या दिवशी सकाळी घरी पोहोचलो. मी घराचा गेट उघडला आणि जेव्हा आईने मला पाहिलं तेव्हा तिच्या चेहऱ्यावर जो आनंद होता तो माझ्यासाठी सगळा थकवा घालवणारा होता. माझ्यासाठी ही दिवाळी गेल्या दिवाळीपेक्षा खूपच खास होती.’’

कॉलेजच्या सहामाहीच्या ब्रेकमध्ये जिथे परीक्षेच्या टेन्शनमुळे सर्वच मुलं चिंतेत असतात, तिथे हॉस्टेलमधून घरी जाणाऱ्या मुलांच्या डोक्यावर तर जणू संकटांचा डोंगर पडलेला असतो. ईशान दरवर्षीप्रमाणे दिवाळीच्यावेळी हॉस्टेलमधून त्याच्या घरी गोव्याला जातो. तो त्याचा अनुभव शेअर करत सांगतो, ‘‘घरापासून दूर राहिल्यावर घराचं महत्त्व समजतं. दिवाळीत घरी एक वेगळीच रोनक असते. त्यामुळे सतत वाटतं की या सगळया गोष्टींचा भाग बनावा. मला घरी जाण्यापूर्वी कॉलेजची सर्व कामे करावी लागतात. कारण २ ते ३ दिवसाची सुट्टी मिळते. मित्रांसोबत अनेक प्लान्स कॅन्सल करावे लागतात.  परीक्षेसाठी अगोदरच अभ्यास करून ठेवावा लागतो. आई-बाबा फोन करतात तेव्हा सांगतात की तुझ्यासाठी काय काय खरेदी करणार आहे वा काय खरेदी करून ठेवले आहे. आता तर सांगावंदेखील लागत नाही जसं लहानपणी सांगाव लागायचं.

खाणंदेखील माझ्या आवडीचं असतं. घरी जाऊन वाटतं की आपण पुन्हा लहान मुलं झालो आहोत. इथे मुंबईमध्ये वाटत रहातं की आपण खूप मोठे आहोत. परंतु घरी जाऊन एकदम वेगळंच वाटतं. हा, दिवाळीमध्ये फ्लाइटचं तिकीट खूपच महाग असतं आणि विचार करावा लागतो की घरी जाऊ की नको, १०,००० पेक्षा कमी नसतं व परंतु घरी जाण्याचा आनंदापुढे सगळं काही लहान दिसू लागतं. २ दिवस घरी खूपच छान वाटतं. आपल्या गावात पाऊल ठेवताच एक वेगळीच अनुभूती येते. सगळीकडे दिवाळीची खूप धामधूम असते.’’

अशीच काहीशी असते हॉस्टेलवाल्यांची दिवाळी, जिथे त्यांच्यासाठी दिवाळी फक्त दोन दिवसांचा सणवार नसतो, तर १२ ते १५ तासांचा थकविणारा प्रवासदेखील असतो, ज्याचा थकवा आणि त्रास घरातल्यांबरोबर दिवाळी साजरा करण्याच्या आनंदा खाली दबून जातो.

स्वातंत्र्याचा महान सण : उत्सव, आनंद नाही

* शैलेंद्र सिंग

कोणतीही समस्या तणाव निर्माण केल्याने ती सुटत नाही हे खरे आहे. नुसते सेलिब्रेशन करून जीवन सुखी होत नाही हेही खरे. जीवनाच्या आनंदासाठी भक्कम मैदान हवे, तरच उत्सवही छान वाटतो. अलिकडच्या वर्षांत, जीवनाचा पृष्ठभाग कमकुवत होत आहे आणि आपण उत्सवांच्या माध्यमातून आनंद दर्शवत आहोत. जीवन आणि उत्सव यांच्यात समतोल साधण्याची गरज आहे, तरच देश आणि समाजात खरी समृद्धी येईल. इव्हेंटमधून यश दाखवणे सोपे आहे पण दीर्घकालीन धोरण आखून आनंदी भविष्य घडवणे अवघड आहे.

समाधान हाच सर्वात मोठा आनंद मानणारा भारतीय समाज नेहमीच परिस्थितीनुसार स्वत:ला जुळवून घेतो. त्याची इच्छा पूर्ण झाली नाही तरी तो निराश होत नाही. इतरांच्या आनंदातही तो आपला आनंद शोधतो.

स्वातंत्र्यलढ्याच्या काळात जनतेला सांगितले गेले की, देशातील सर्व अशांततेचे मूळ इंग्रज आहे. इंग्रज भारतातून बाहेर पडताच संपूर्ण देशात समृद्धी येईल. जनतेने पूर्ण अपेक्षेने हे काम पूर्ण केले. 75 वर्षांनंतरही देशातील परिस्थिती पूर्वीसारखीच आहे. यानंतरही देशात आनंदाचे वातावरण आहे. दरवर्षी देशातील लोक स्वातंत्र्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. ही उत्साही लोकांची ताकद आहे. ही गोष्ट अगदी छोट्या उदाहरणांवरून समजू शकते.

बंधुभाव दाखवण्यावरील विश्वास कमी होणे : सणाच्या माध्यमातून जीवनात उत्साह निर्माण होण्याचे कारण म्हणजे उत्तर भारतातील लोक दक्षिण भारतातील ओणम देखील साजरे करतात. केवळ ओणमच नाही तर पंजाबची लोहरी आणि आसामची बिहूदेखील देशभरातील लोक साजरी करतात. करवा चौथ, एकेकाळी पंजाबींनी साजरा केला होता, आता देशभरातील महिला साजरी करतात.

बिहारचा छठ सण देशभर साजरा केला जातो. संपूर्ण देश होळी आणि दिवाळी साजरी करतो. या देशाच्या विविधतेतील एकतेचे हे उदाहरण आहे.

25 डिसेंबरला देशाच्या मोठ्या भागात ‘ख्रिसमस’ही साजरा केला जातो. या दिवशी मंडळांची शोभाही वाढते. ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी बिगर मुस्लिम देखील मुस्लिम कुटुंबांमध्ये भेटायला आणि शेवयाचा आनंद घेण्यासाठी येतात.

मतपेढीच्या राजकारणाने समाजात जाती-धर्माच्या नावावर कितीही फूट पाडण्याचा प्रयत्न केला, तरी भारतातील जनता आपल्या शेजाऱ्याच्या आनंदात आनंद मानण्याची एकही संधी सोडू इच्छित नाही. गावात कोणाच्या तरी मुलाच्या लग्नात सून हेलिकॉप्टरमधून निघून गेल्यावर सासरी येते, मग तिला बघायला अख्खा गाव येतो. तो विचार करत नाही की तो माझ्या घरी आला नाही, मी कशाला आनंदी राहू.

भारतातील लोक लॉकडाऊनला सुट्टी मानतात. घरांचे स्वयंपाकघर आणि व्यायामशाळा हे मनोरंजनाचे एकमेव साधन बनवले. संकटकाळात आनंदी कसे राहायचे हे या देशाला माहीत आहे. कोरोनाच्या संकटामुळे संपूर्ण जग तणावात आहे. कोरोना संकटामुळे पगारात कपात झाली तरी तो समाधानी होता आणि कमी पैशातही आनंदी राहायला शिकला. लोकांच्या या गुणवत्तेमुळे सरकारांना जबाबदारी द्यावी लागत नाही.

पेट्रोलचे दर 100 रुपयांपर्यंत वाढले, त्यानंतरही भारतीयांच्या चेहऱ्यावर हास्य आहे. सरकारविरोधात नाराजी नाही. देशाच्या जबाबदार लोकांनी स्वातंत्र्यापूर्वी दिलेले वचन ७५ वर्षांनंतरही पाळले नसेल, हाच जीवन जगण्याचा मान आहे, पण स्वातंत्र्याचा महान सण साजरा करण्यात देशातील जनता पुढे आहे. उत्सवात सहभागी होऊनही स्वातंत्र्यानंतरच्या जीवनात कोणताही बदल जाणवत नाही.

विविधतेत एकता भरणारे सण : पूर्वीच्या काळात लोक आपापल्या भागातील सणांमध्ये आनंद मानत असत. हळूहळू लोक एकमेकांच्या संपर्कात आले आणि एकमेकांच्या आनंदात सामील होऊ लागले. लखनऊच्या हजरतगंज भागात दक्षिण भारतातील 2 कुटुंबे राहायला आली होती. हे लोक डोसा, इडली असे पदार्थ त्यांच्या देशी शैलीने बनवत असत. उत्तर भारतातील मित्रांना खायला घालायचे. हळूहळू त्यांची मैत्री घट्ट होऊ लागली. याची संख्या वाढली. आता ते त्याच ठिकाणी दक्षिण भारतातील सण साजरे करू लागले, विशेषतः ओणमसारखे सण मोठ्या थाटामाटात साजरे करू लागले. दक्षिण भारतातील लोकांप्रमाणे उत्तर भारतातील लोकही या पेहरावात सामील होऊ लागले.

ओणम हा केरळचा प्रमुख सण आहे. ओणम हा केरळचा राष्ट्रीय सण देखील मानला जातो. ओणम हा सण सप्टेंबरमध्ये महाबली राजाचं स्वागत करण्यासाठी आयोजित केला जातो, मुली रांगोळ्यांभोवती वर्तुळे बनवून आनंदाने नाचतात.

बिहूच्या बाबतीतही असेच घडले. आसाममधील काही कुटुंबांनी याची सुरुवात केली. आता सर्व प्रकारचे लोक यात भाग घेऊ लागले. बिहू हा आसाममधील 3 विविध सांस्कृतिक उत्सव म्हणून साजरा केला जातो. काही वर्षांत हा सण सर्वत्र लोकप्रिय झाला आहे. १ एप्रिल रोजी साजऱ्या होणाऱ्या बिहूमध्ये आसामी नववर्षाचाही समावेश आहे.

यामध्ये जात-धर्माचा भेद नाही. एप्रिल व्यतिरिक्त, बिहू आणखी दोन महिन्यांनी साजरा केला जातो. कोंगली बिहू ऑक्टोबरमध्ये आणि भोगाली बिहू जानेवारीमध्ये साजरा केला जातो.

बिहारच्या बाहेर राहणाऱ्या लोकांना बिहारमध्ये साजऱ्या होणाऱ्या छठ उत्सवाची माहिती नव्हती. काही वर्षात त्यांना छठ तर कळू लागली आहेच पण त्यांच्या चालीरीतींचे पालन करून ते साजरे करायलाही सुरुवात केली आहे. बिगर बिहारी लोकांनीही हा उत्सव साजरा करण्यास सुरुवात केली आहे.

ख्रिसमस ट्री, कॅप, सांताक्लॉजचे ड्रेस बाजारात चांगले विकले जातात. बाजारपेठही तशीच सजली आहे. यामध्ये लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत उत्साहाने सहभागी होतात.

उत्सवाने गरजा पूर्ण होत नाहीत : आपल्या समाजातील लोक प्रत्येक सण साजरे करू लागले आहेत. आपण आपल्या गरजा चुकून साजरे करतो, जसे मतदान केल्यानंतर, मते घेताना दिलेली आश्वासने कधी पूर्ण होतील हे विचारत नाही. आम्हालाही निवडणुका एखाद्या उत्सवासारख्या आवडतात. सोशल मीडियावर सेल्फी टाकून देशाच्या विकासात हातभार लावला, असे म्हटले जाते.

त्याचप्रमाणे वर्षानुवर्षे आपणही स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करतो. अलीकडच्या काळात संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट ओढवले आहे. सेलिब्रेट करण्याची ही संधी आम्ही सोडली नाही. टाळ्या, थाळी, मशाल आणि मेणबत्ती लावून आनंद साजरा करण्यात आला, मात्र यामुळे रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण कमी झाले नाही.

पोलिस ठाण्यात आलेल्यांना गुलाबपुष्प दिल्याच्या बातम्या अनेकवेळा वर्तमानपत्रातून प्रसिद्ध होतात. सेलिब्रेशन वेगळे पण पोलिसांनी खरेच त्यांचे काम चोख बजावले का? खटला लिहायला सुरुवात केली? शिफारस बंद? लवकरच न्याय मिळेल का? उत्सवाच्या माध्यमातून सर्व काही सुरळीत झाल्याचे दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला. इव्हेंट आधारित कार्यांमुळे मूलभूत बदल होत नाहीत.

उत्सवाने गोष्टी बदलत नाहीत. थोडावेळ चेहऱ्यावर हसू येते. सोशल मीडियाच्या आगमनाने असे उत्सव वाढले आहेत. आज देशातील प्रत्येक सण प्रत्येक प्रदेशात साजरे केले जात आहेत, परंतु देशात राहणाऱ्या लोकांमध्ये सलोखा आणि बंधुभाव वाढला आहे का?

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें