अशा बना फॅशन आयकॉन

– गरिमा पंकज

आपण कोणते कपडे घालता, कशा राहता, त्यावरून आपली आवडनिवड कळून येते. आपली पर्सनॅलिटी आकर्षक आणि अपडेट ठेवण्यासाठी आपला वॉर्डरोबसुध्दा अपडेट असणे आवश्यक आहे. याबाबत फॅशन डिझायनर आशिमा शर्माच्या मते, आपल्या वॉर्डरोबमध्ये अशा प्रकारचे कपडे जरूर असले पाहिजेत.

ऑफिससाठी स्टाईल

आपण वेगवेगळ्या फॅशनचा स्वीकार केला पाहिजे आणि आपली स्टाइलही अशाप्रकारे कॅरी केली पाहिजे जी ऑफिसच्या आउटफिटसोबतही पूर्णपणे सूट करेल. मंडे ब्लूज आणि वीकेंड हँगओव्हरचा स्वत:च्या लुकवर प्रभाव पडू देऊ नका. तसेच आपल्या वर्कप्लेसवर फॅशन विचित्र दिसू नये, त्यामुळे फॅशनमध्ये संतुलन राखण्याचीही आवश्यकता असते.

लांब कट असलेल्या कुर्ती

आजकाल मुलींमध्ये लांब कट असलेल्या कुर्ती खूप लोकप्रिय आहेत. दीपिका पदुकोन, नरगिस फाकरी, जॅकलिन, जान्हवी यांसारख्या अनेक बॉलीवूड बाला या कुर्तीमध्ये दिसून येतात.

अनेक प्रकारच्या कट असलेल्या कुर्ती सध्या फॅशनमध्ये आहेत. उदा. मध्येच कंबरेच्या वरपासून खालपर्यंत, साइड कट, कुर्त्याच्या दोन्ही बाजूला लांब कट इ. अशा प्रकारच्या कुर्ती आपण जीन्स आणि अँकल लेंथच्या लेगिंगसह घालू शकता. या कुर्तींसह हुप इअररिंग्ज, फ्लॅट्स, चप्पलचे कॉम्बिनेशन छान दिसते. या आपण कॉलेज, ऑफिस किंवा कुठल्याही प्रसंगी कॅज्युअल वियरच्या रूपात घालू शकता.

लेअरिंग ड्रेसेस

ऑटम सीझनमध्ये गॉर्जियस दिसण्यासाठी आपण लेयरिंगवाले ड्रेस घालू शकता. लेयरिंग ड्रेसचा अर्थ आहे २-३ कपडे एकसाथ घालणे आणि हा आजकाल खूप ट्रेंड आहे. ट्रान्सपरंट शर्ट आणि जॅकेट इ.च्या खाली सॉलिड कलरचा टॉप घाला. हा लुक खूप प्रिटी वाटतो. या ड्रेसच्या खाली शॉर्ट्स आणि जीन्स घाला.

फ्लोरस ड्रेसेस

आपल्या वॉर्डरोबमध्ये फ्लोरस ड्रेसेस जरूर असले पाहिजेत. फ्लोरल फॅशनवाले ड्रेसेस नेहमीच स्प्रिंग आणि समर सीझनमध्ये वापरले जातात. या मोसमात मोठे फ्लोरल प्रिंट फॅशनमध्ये आहेत आणि दिवसा वापरण्यासाठी एकदम परफेक्ट असतात. क्रॉप टॉपसह फ्लोरल प्रिंट पेंसिल आणि प्रिंटेड स्कर्ट घाला. त्यावर हाय हिल्स आणि हुप इअररिंग्ज घालून स्टाइल पूर्ण करा. नाइटी फ्लोरा ड्रेसही घालू शकता. हा प्लेन डार्क कलरच्या श्रगसह कॅरी करा. आपण आपल्या मित्रमंडळींमध्ये खूप स्टायलिश दिसाल. रेग्युलर जीन्स आणि टॉपसह फ्लोरल स्टोल किंवा डेनिम शर्ट व क्रॉप टॉपसह फ्लोरल शर्टही कॅरी करू शकता.

सॅटीन ड्रेस

स्टायलिश दिसण्यासाठी स्मार्ट, शाइनी, ग्लॉसी आणि सुपर सॉफ्ट सॅटीन ड्रेसेस आपल्या वॉर्डरोबमध्ये जरूर असले पाहिजेत. एसिमॅट्रिकल बॉडीकॉन आणि ओव्हर साइज सॅटीन टॉप्स आजकाल ट्रेंडमध्ये आहे. अशा प्रकारे आपण सॅटीन स्पोर्ट रफल स्कर्टसह गोल्ड कलर क्रॉप टॉप घालूनही स्टायलिश दिसू शकता.

प्रिंट जेवढे छोटे तेवढे चांगले

जर आपणास ऑफिसमध्ये नको त्या अटेंशनपासून वाचायचे असेल, तर मोठ्या प्रिंटचे पेहराव घालायचे टाळा. आजकाल फ्लोरल प्रिंटस ट्रेंडमध्ये आहेत. आपल्या ब्लाउजची निवड करताना तुम्ही हे ट्राय करू शकता. आपण सफेद किंवा पिस्ता कलरच्या बेससह छोट्या गुलाबांची प्रिंट असलेला ब्लाउज घालू शकता.

प्रोम ग्लॅम आउटफिट

काही महिला विचार करतात की शाइनी सीक्वेन्स वर्कवाले पेहराव त्याच्या लुक ओव्हर एक्स्पोझर बनवतात, पण आम्ही तुम्हाला सांगतो की हे यापेक्षा खूप वेगळे आहे. कौशल्याने डिझाइन केलेले मोती आणि टिकल्या असलेले ड्रेसेस   आपले वॉर्डरोबला खूप इंटरेस्टिंग बनवतात. सीक्वेन्स वर्कवाले ड्रेस घातल्यानंतर ज्वेलरी घालण्याचीही गरज भासत नाही. डायमंड नेकलेसशिवायही आपण सुंदर दिसाल.

मोंटे कार्लोच्या कार्यकारी निर्देशिका मोनिका ओसवाल काही स्टाइल टीप्स सांगत आहेत, त्यांच्याकडे लक्ष देऊन आपण फॅशन गेममध्ये स्वत:ला अव्वल ठेवू शकता.

रंगांसोबत खेळ

न्यूट्रल कलर उदा. काळा, मरून, सफेद, नेव्ही, क्रीम, चारकोल आणि ग्रे कलरचा वापर करा. यातील बहुतेक रंग पँट, सूट, स्कर्ट आणि शूजसाठी पूर्णपणे फिट बसतात. या रंगांना सॉफ्ट फॅमिनाइन रंग उदा. आइस ब्ल्यू, सॉफ्ट पिंक इ. सोबत मॅच करा.

अशा एक्सेसरीजपासून दूर राहा

लक्षात ठेवा, प्रिंट आपल्या एक्सेसरीजची कमतरता दूर करण्याचे काम करतात. म्हणून प्रिंटवाल्या ब्लाउजसह मोठमोठ्या डँगल इयररिंग्ज, लाउड हेअर बँड, ब्राइट ग्लॉसवाल्या वस्तू टाळा जेणेकरून आपला लुक प्रोफेशनल वाटेल.

सॉलिड कलरच्या कपड्यांमध्ये आपण काही एक्सेसरीज वापरू शकता. उदा. डायमंडचे स्टड्स, पर्ल स्टड्स आणि पर्ल नेकपीस इ. आपल्या एक्सेसरीजमध्ये विविध रंगांचा वापर करण्याचे टाळा. केसांना फ्रेश ब्रँड, साइड वेणी किंवा फ्रेंच रोल ट्राय करा. आजकाल स्लीक हेयर स्टाइलची फॅशन आहे. आपण पूर्णपणे बांधलेल्या केसांचा पोनीटेल ट्राय करू शकता. ज्यांचे केस छोटे असतात, त्यांना केस मोकळे ठेवण्याचाही पर्याय असतो. परंतु ज्यांचे केस मोठे आहेत, त्यांना ते बांधून ठेवण्याचा सल्ला दिला जातो.

मॅटेलिक शेड्स ड्रेसेस

मॅटेलिक विशेषत: गोल्ड आणि सिल्वर कलरचे ड्रेसेसही आपल्या वॉर्डरोबमध्ये जरूर असले पाहिजेत. थोडेसे क्रिएटिव्ह असलेले शाइनी, मॅटेलिक ड्रेस घालूनही आपण पार्टीचे आकर्षण बनू शकता. आपण मेटॅलिक कलरची मिडी घातलेली असो किंवा ऑफ शॉल्डर बॉडीहगिंग ड्रेस, आपली स्टाइल इतरांपेक्षा वेगळी दिसेल.

कट्स आणि कर्व्ज

जेव्हाही प्रोफेशनल वर्क क्लोथ्सबाबत बोलले जाते, तेव्हा आपला ड्रेस नेहमी अशाप्रकारे शिवलेला असला पाहिजे की तो आपल्या शरीरावर योग्य प्रकारे फिट बसेल. नेहमी पारंपरिक कट असलेल्या ड्रेसचीच निवड करा. ज्यांची फिटिंग चांगली नाहीए, असे ड्रेस घालायचे टाळा. बहुतेक भारतीय महिलांचे शरीर गिटार किंवा पीयर शेपमध्ये असते(बॉटम थोडे जास्त हेवी असते.), म्हणून चांगल्या फिटिंगचे ट्राउझर, पँटची निवड करा. पँट फिट जरूर असली पाहिजे, पण ती जास्त टाइटही नसावी. त्यातून पँटीची लाइन दिसू नये. आपला स्कर्ट ढोपर किंवा त्याच्या खालपर्यंत लांब असला पाहिजेत. तो एवढा लूज असला पाहिजे की आपण आरामात बसून काम करू शकाल. कामाच्या ठिकाणी टाइट फिटिंग असलेले कपडे घालू नका.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें