फॅशन ट्रेंड सेट करण्यासाठी इंटरनेटचा आवडता तेजस्वी प्रकाश सज्ज !

* सोमा घोष

तेजस्वी प्रकाशची ऑन-स्क्रीन व्यक्तिरेखा जितकी लोकांना आवडते त्याहून तिचे ऑफ स्क्रीन सौंदर्य सगळ्यांना भुरळ घालते. अभिनेत्रीचा फॅशन गेम खूप जास्त ट्रेण्डमध्ये आहे आणि हीचे फॅशन गेम जोरदार सुरू आहेत.

अभिनेत्री अनैता श्रॉफ अदजानिया, शालीना नाथानी यांसारख्या इंडस्ट्रीतील काही टॉप स्टायलिस्ट् जे दीपिका पदुकोण, शाहरुख खान यांच्या फॅशनसाठी प्रसिद्ध आहेत तर यांनी तेजस्वीची स्टाइलिंग केली आहे.

तेजस्वी प्रकाशने 2023 चा आणखी एक फॅशन अवॉर्ड जिंकल्यामुळे, तिला अनैता श्रॉफ अदजानिया यांनी या खास अवॉर्ड नाईटसाठी स्टाईल केले आहे.

फॅशन आघाडीवर तेजस्वी प्रकाशच्या अनोखा अंदाज सगळेच बघतात लाखो लोकांच्या नजरा तिच्या वॉर्डरोबवर आहेत. तिच्या सततच्या फॅशनमुळे तिने एक उच्च दर्जाचा फॅशन गेम सेट केला आहे.

व्यावसायिक आघाडीबद्दल बोलायचे तर, अभिनेत्रीची शाळा कॉलेज अनी लाइफ दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या सोबतचा चित्रपट करत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर आला आहे. अनावरण करण्यात आले.

१७ अनोख्या स्टायलिंग टीप्स

– प्रतिनिधी

फेस्टिव्ह गेटटूगेदर असो किंवा कुटुंब किंवा मित्रांसोबत बाहेर जाण्याचा बेत, आपल्या रेग्युलर आऊटफिटलाच स्टाईल आणि या नव्या स्मार्ट टीप्स लक्षात ठेवून तुम्हीही फॅशनेबल बनवू शकता.

१. जर फुलस्लिव्ह कॅज्युअल शर्ट, टीशर्ट किंवा टॉप घालत असाल तर ते २-३ वेळा फोल्ड करून थ्री फोर्थ स्लिव्ह्ज बनवा. ही स्टाईल तुम्हाला फॅशनेबल लुक देईल.

२. शर्टस् आणि टिशर्टच्या स्लिव्हजप्रमाणेच जीन्स, जेगिंग्ज पॅन्ट अशा बॉटम वेअरलाही नेहमीप्रमाणे न वापरता व्यवस्थित फोल्ड करून सिंगल किंवा डबल कफ बनवून घ्या. त्यामुळे रेग्युलर बॉटम वेअरलाही तुम्ही फॅशनेबल लुक देवू शकता.

३. जर तुम्ही टॉप, टिशर्ट, शर्ट किंवा शॉर्ट वा लाँग ड्रेसवर जॅकेट घालणे तुम्हाला आवडत असेल तर पुढच्या वेळी जॅकेट घालण्याऐेवजी दोन्ही खांद्यावरून त्याच्या स्लिव्हज तशाच खाली सोडून द्या. जॅकेट कॅरी करण्याची ही पद्धत लोकांना आकर्षित करेल.

४. ह्यूज साइजसोबत स्मॉल साईजच्या आउटफीटचे कॉम्बीनेशनसुद्धा फॅशनेबल लुक देतात. जसे क्रॉप टॉपसोबत प्लाजो, शॉर्ट शर्टसोबत लेयर्ड स्कर्ट, शॉर्ट्ससोबत ओवरसाइज्ड टॉप, शॉर्ट ड्रेससोबत किंवा अँकल लेंथ जॅकेट किंवा मग श्रग.

५. फुल व्हाईट लुकसुद्धा तुम्हाला फॅशेनबल लुक देवू शकतो जसे की व्हाईट जीन्ससोबत व्हाईट शर्ट घाला. त्यासोबत व्हाईट फुटवेअर व व्हाईट हॅन्डबॅग कॅरी

करा. इतर अॅक्सेसरीज जसे की वॉच, इयररिंग्स, नेकपीस, कफ इ. मात्र रंगीत निवडा.

६. जर तुम्हाला फॅशनेबल दिसायचे असेल तर व्हाईटसोबत ब्लॅक, ग्रीनसोबत रेड असे कॉमन कॉम्बिनेशन घालण्याऐवजी अनकॉमन शेड ट्राय करा. जसे बेबी ब्ल्यूसोबत डीप यलो, ब्ल्यूसोबत इंडिगो, प्लमसोबत मस्टर्ड शेड, पर्पलसोबत रेड, डार्क ब्ल्यूसोबत सी ब्ल्यू, ऑरेंजसोबत यलो इ.

७. प्रिंटेड आऊटफिटसोबत सिंगर शेड वेअरचे कॉम्बिनेशसुद्धा तुम्हाला मिस ब्युटिफुलचा किताब मिळवून देऊ शकतो. जसे प्लेन व्हाइट टॉपसोबत प्रिंटेड स्कर्ट वापरा. प्रिंटेड पॅन्टसोबत प्लेन व्हाईट ऑफ व्हाईट किंवा यलो शर्ट, प्रिंटेड डे्रसवर सिंगल शेड जॅकेट इ.मात्र रंगीत निवडा.

८. डिफरन्ट आऊटफिटसोबत स्कार्फ, स्टोल आणि शाल हे कॉम्बिनेशनसुद्धा सुपर फॅशनेबल लुक मिळवून देते. जसे की वेस्टर्न टॉप किंवा टिशर्टसोबत स्कार्फ गळ्यात

घाला. इंडियन ट्यूनिक आणि कुर्तीसोबत स्टोल एका बाजूने खांद्यावर घ्या आणि साडीवर शाल दोन्ही बाजूंनी घ्या.

९. बेल्ट, नॉट आणि रिबिनसुद्धा तुमच्या व्यक्तिमत्त्वाला स्टायलिश बनवू शकते. जसे स्किनी जीन्ससोबत थीन बेल्ट वापरा. शॉटर्स किंवा लाँग ब्रोच ड्रेसवर असणारा बेल्ट वापरा. स्कर्ट आणि फ्लाझोवर रिबिन बांधा. बेल्टचे शेड्स बोल्ड निवडा. हे तुमच्या पर्सनॅलिटीला हायलाइट करतील.

१०. आपल्या व्यक्तिमत्त्वानुसार फॅशनेबल टच देण्यासठी राऊंडेड हॅटसुद्धा जरूर बाळगा आणि जेव्हा तुम्ही आऊटडोर किंवा प्रवासासाठी बाहेर जाल, तेव्हा ती हॅट घाला. पण हॅट जेव्हा, घालाल तेव्हा केस मोकळे ठेवा आणि जास्त स्टायलिश लुकसाठी हॅट थोडी क्रॉस करून घाला.

११. तुमच्या केसांची स्टायलिंग आणि कटसुद्धा तुम्हाला फॅशनेबल बनवू शकतात. यासाठी स्टेप, लेअर किंवा फ्रंट बँग्स असणारा हेअर कट निवडा. मग केसांची पोनी,

मेस्सी बन बांधा. जर तुमची हेअर स्टाईल तुम्हाला जास्त काळ फॅशनेबल बनवायची असेल तर हेअर कलर करा किंवा स्टे्रट कर्ल करवून घ्या.

१२. आउटफिटशी मॅचिंग असणारे मोठ्या साईजचे कानातले, लाँग नेकपिस, स्टायलिश हँन्ड कफ, डल सिल्वर फिंगर रिंग, हँड हारनेस, हँड गिअरसारख्या ट्रेंडी अ‍ॅक्सेसरीज पैकी कुठल्याही एकाला आपली स्टाईल स्टेटमेंट बनवून तुम्ही फॅशनेबल दिसू शकता.

१३. हेअर अ‍ॅक्सेसरीज जसे हेअर बँन्ड, ह्यूज हेअर क्लिप, क्यूट बकल, स्मार्ट हेअरपिन, हेअर बोसुद्धा तुम्हाला फॅशनेबल लुक देण्यासाठी पुरेसे आहे. पण यांची निवड तुमचे आऊटफिट लक्षात घेऊनच करा.

१४. आऊटफिटची स्टायलिंग आणि अ‍ॅक्सेसरीज च नव्हे मेकअपच्या स्मार्ट ट्रीकसुद्धा तुम्हाला फॅशनेबल बनवू शकतात. जसे स्मोकी आयमेकअप, डस्की आयशॅडो, नॅचुरल शेड ब्लशऑन, ओठांवर लावलेली बोल्ड शेडची मॅट लिपस्टिक इ.

१५. वेगळ्या प्रकारच्या आकर्षक नेल आर्टसोबत लांब नखांवर लावलेली प्लेन ब्लॅक, व्हाईट, सिल्व्हर, गोल्डन किंवा बोल्ड शेड जसे की रेड, पिंक, ऑरेंज, ब्ल्यूमध्ये मॅट फिनिश नेलपॉलिशसुद्धा तुम्हाला फॅशन आयकॉन बनवू शकतात.

१६. फॅशनेबल लुकसाठी आऊटफिटला मॅच न करणारे फुटवेअर वापरा जसे जीन्ससोबत मोजडी, शॉर्ट्ससोबत ग्लॅडिएटर सॅन्डल, लेंगिग्जसोबत पेन्सिल हील सॅन्डल इ. मिस्ड मॅचचे हे कॉम्बिनेशन लोकांना तुमच्याकडे आकर्षित करेल.

१७. नेहमीच्या घड्याळांऐवजी तुम्ही मोठ्या आकाराचे स्पोर्टी, गोल्डन, सिल्व्हर, मेटल किंवा ज्वेल्ड वॉच वापरूनसुद्धा लोकांमध्ये सेंटर ऑफ अटॅ्रक्शन बनू शकता. जेंन्टस वॉचसुद्धा तुम्हाला वेगळा लुक मिळवून देईल.

पण लक्षात ठेवा की ड्रेसपेक्षा जास्त महत्त्वाचे हे आहे की तुम्ही तो कसा कॅरी केला आहे आणि कशा प्रकारच्या अ‍ॅक्सेसरीज निवडल्या आहेत. म्हणून फॅशनेबल स्टाईलसाठी अंगिकारण्यासाठी स्वत:ची फिगर, ड्रेसची निवड आणि मॅचिंगअ‍ॅक्सेसरीजकडे विशेष लक्ष ठेवा.

लेहंग्यात सजलेली नववधू

* भारती तनेजा

जेव्हा सौभाग्याचे तेज हातांवर लावलेल्या मेहेंदीपासून शरीरावर शोभणाऱ्या लेहंग्यापर्यंत पसरते, तेव्हा कुणाचे तरी होणार असल्याच्या भावनेतूनच रूप खुलते. जी बाब लेहंग्यात आहे, ती इतर कुठल्या पेहरावात कशी असेल. विवाह सोहळयात नववधूच्या लेहंग्यासह मेकअपसाठी कोणत्या गोष्टींवर लक्ष देणे गरजेचे आहे, हे ऐल्पस ब्युटी क्लिनिक आणि अकॅडमीच्या संस्थापक भारती तनेजा यांच्याकडून जाणून घेऊया.

स्ट्रेट कट लेहंगा

बर्ड ऑफ पॅराडाईज मेकअप स्ट्रेट कट लेहंग्यावर सूट होतो. ही नवी स्टाईल आहे, जी स्मोकी आय किंवा कॅट आय मेकअपचे सुधारित वर्जन आहे. हा आय मेकअप करण्यासाठी जास्त रंगांचा भरपूर वापर केला जातो. तुम्हाला हा रंग जास्त गडद वाटत असेल तर त्याला काळया रंगासोबत आकर्षक बनवता येईल. असे लुक मिळवण्यासाठी निऑन किंवा गुलाबी रंगाऐवजी मोरपिशीसारख्या रंगाची निवड करा.

मेकअप करताना या गोष्टीकडे लक्ष द्या की हे रंग एकसारखे नसावेत. यासाठी नरिशिंग मॉइश्चरायजरने चेहरा आणि मानेवर मसाज करा. गाल आणि कपाळाच्या वरील भागावर कंटुरिंगसाठी गडद शेड लावा. डोळयांखाली करेक्टर लावा.

चेहऱ्याच्या बहुतांश भागावर फाउंडेशन लावा. ओल्या स्पंजच्या मदतीने ते एकसमान पसरवा. गालांच्या वरील भागावर हायलायटर लावा आणि गालांच्या फुगीर भागावर गुलाबी ब्लश लावा. नॅचरल लुकसाठी ते एकसमान पसरवा. गडद शेडच्या जांभळया रंगाच्या आयशॅडोला पेन्सिल ब्रशच्या मदतीने पंखांच्या आकाराप्रमाणे लावा. याची सुरुवात लॅशलाईनपासून करून ते डोळयांच्या बाहेरील भागापर्यंत लावा आणि त्यानंतर तुमच्या नॅचरल क्रीझ लाईनपर्यंत न्या. पापण्यांच्या मधोमध चमकदार निळी आयशॅडो लावा. निळयातील गडद शेड घ्या आणि जांभळया व चमकदार निळया आयशॅडोला एकजीव करण्यासाठी त्याचा वापर करा. खालच्या लॅशलाईनवर गुलाबी किंवा जांभळी आयशॅडो लावा. तर खालच्या वॉटरलाईनवर काजळ लावा. गुलाबी न्यूड लिप कलरने आपला लुक कम्प्लिट करा.

अनारकली लेहंगा

अनारकली लेहंग्यासोबत पारंपरिक लुकमधील मेकअप खूपच शोभून दिसतो. पारंपरिक मेकअपसाठी काजळ खूप गरजेचे आहे. जर एखाद्या डे इव्हेंटसाठी साधा अनारकली लेहंगा घातला असेल तर बेसिक आयलायनर लावल्यानंतर खालच्या लॅशलाईनवर काजळ लावा.

रात्रीचा इव्हेंट असेल तर स्मोकी आईज मेकअपसाठी डार्क काजळ लावून सौंदर्यात भर घालता येईल. पारंपरिक पेहेरावासोबत जी ज्वेलरी घालणार असाल त्याला अनुसरून मेकअप करणे गरजेचे आहे.

हेवी गोल्ड ज्वेलरीसोबत हायलाइट मेकअप जसे की ग्लिटरी ड्रेमेटिकल मेकअप करणे सौंदर्याच्या पायाभूत नियमांच्या विरुद्ध आहे. पारंपरिक लुकसाठी ब्लश केलेला चेहरा चांगला दिसतो.

यासाठी मेकअप करण्यापूर्वी चेहरा क्लीन करून त्याला फ्रेश लुक द्यायला हवा. पारंपरिक लुकसाठी फिक्या शेडऐवजी उठावदार रंगाची लिपस्टिक खुलून दिसते.

फिश कट लेहंगा

फिश कट लेहंग्यासोबत न्यूड मेकअप करून तुम्ही उजळ आणि आकर्षक लुक मिळवू शकता. न्यूड मेकअप तुमच्या त्वचेला एकसारखा पोत देतो. मेकअप बेस जितका न्यूट्रल असेल तितक्या तुम्ही सुंदर दिसाल. डार्क स्किनच्या न्यूड मेकअपसाठी ब्रोंज गोल्डन कलरची लिपस्टिक तुम्हाला चमकदार लुक देईल. डार्क स्किन टोनवर गोल्डन बाऊन आयशॅडोसोबत पिंक ब्राऊन शेडमधील ब्लशर वापरा. मिडियम स्किनवरील न्यूड मेकअपसाठी मोव कलरची लिपशेड खुलून दिसते. अशा प्रकारच्या त्वचेसाठी पेल गोल्डन ब्राऊन आयशॅडोसह पिंक ब्राऊन कलरचे ब्लश करा. हे तुम्हाला नॅचरल लुक देईल.

फेअर स्किनच्या न्यूड मेकअपसाठी गालांवर हनी अॅप्रिकोट कलरचे ब्लश लावा. कपाळावर लाईट कलरच्या शिमरी आयशॅडोचा वापर करा. ओठांना मॅट लावू नका किंवा ओव्हरग्लॉसी होऊ देऊ नका. तुम्ही क्रीम बेस्ड लिपशेड किंवा लिपबाम वापरू शकता. यामुळे तुमचा चेहरा अधिकच खुलून दिसेल. नॅचरल मेकअपसह मोकळे सोडलेले सिल्की केस, छोटीशी बिंदी आणि मांगात सजवलेली भांगपट्टी हा लग्नाच्या दिवशी तुमचा परफेक्ट लुक ठरेल.

हेवी वर्क लेहेंगा

यासोबतच तुम्ही अरेबिक मेकअप ट्राय करू शकता. अरेबियन लुकमध्ये डोळयांचा मेकअप सर्वात महत्त्वाचा असतो. यात डोळयांचा मेकअप खूपच व्हायब्रंट आणि कलरफूल केला जातो. डोळयांना आकर्षक बनवण्यासाठी त्यांच्या आतील कॉर्नरवर सिल्वर, मध्यभागी गोल्डन व बाहेरील कॉर्नरवर गडद रंगाचे आयशॅडो लावतात. त्यानंतर कट क्रीझ लुक देऊन काळया रंगाने डोळयांच्या आजूबाजूला कंटुरिंग केले जाते. यामुळे डोळे स्मोकी, मोठे व आकर्षक दिसतात. आयब्रोजखाली पर्ल गोल्ड शेडने हायलायटिंग करतात. डोळयात चमक दिसण्यासाठी पापण्यांवर ग्लिटर्स लावतात.

डोळयांना सेन्सुअल लुक देण्यासाठी पापण्यांवर आर्टिफिशिअल लॅशेज नक्की लावा. लॅशेज आयलॅश कर्लरने कर्ल करून मस्काऱ्याचा कोट लावा, जेणेकरून हे नैसर्गिक भासतील. वॉटर लाईनवर ठळकपणे काजळ लावून डोळयांचा मेकअप पूर्ण करा.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें