फेस स्टीमने उजळवा सौंदर्य

* पारुल भटनागर

त्वचेला स्वच्छ व नरिश करावंसं प्रत्येक स्त्रीला वाटत असतं कारण यामुळे फक्त त्वचा निरोगी बनण्याबरोबरच उजळदेखील बनते. चमकदार व हायड्रेट त्वचेसाठी साधी व सोपी पद्धत आहे फेस स्टीमिंग, जी तुम्ही घरच्या घरी स्वत: करू शकता वा पार्लरमध्ये जाऊनदेखील करून घेऊ शकता. हे पोर्स ओपन करून त्यामध्ये जमा झालेली धूळमाती व घाण स्वच्छ करून त्वचेला स्वच्छ, क्लियर, उजळ व हायड्रेट करण्यास मदत करते आणि सोबतच त्वचेतील रक्तभिसरण इंप्रूव करुन चेहऱ्यामध्ये नवीन तारुण्यदेखील देते.

कोणकोणते फेस स्ट्रीमिंग

त्वचेला हायड्रेट करणे : जर तुम्हाला त्वचेला हायड्रेट करायचं असेल तर तुम्ही थोडया सुकलेल्या कॅमोमाइलच्या फुलांमध्ये समप्रमाणात सुकलेल्या गुलाबाच्या पाकळया टाकून व त्यामध्ये थोडंसं लेमन जेस्ट टाकून त्याची कमीत कमी दहा मिनिटं स्टीम घ्या. यामुळे तुमची त्वचा हायड्रेट होईल.

कसं काम करते : कॅमोमाइलमध्ये अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज असल्यामुळे हे त्वचेला फ्री रॅडिकल्सपासून वाचविण्याबरोबरच हेल्दी सेल्सला प्रमोट करण्याचं कामदेखील करते. ज्यामुळे त्वचा उजळ दिसू लागते. तर गुलाबाच्या पाकळयांमध्ये विटामिन सी असल्यामुळे हे त्वचेतील नैसर्गिक चमक बनवून ठेवण्यासाठी सेल्समध्ये मॉइश्चरला सील करून त्वचेला नॅचरली हायड्रेट ठेवण्याचे देखील काम करते आणि लेमन जेस्ट अँटीऑक्सिडंट्सने रिच असल्यामुळे त्वचेला डिटॉक्स करण्यात मदत करते.

थंडावा देण्यासाठी : जर त्वचेला थंडावा मिळून आराम द्यायचा असेल तर त्यासाठी तुम्ही गरम पाण्याच्या बाऊलमध्ये काही काकडीचे तुकडे, कॅमोमाइल टी बॅग व त्यासोबतच एसेंन्शियल ऑइलचे काही थेंब टाकून त्याने चेहऱ्याला १० ते १५ मिनिटं स्टीम द्या. मिनिटांमध्ये त्वचेतील फरक दिसून येईल.

कसं काम करते : काकडीमध्ये अँटिऑक्सिडंट प्रॉपर्टीज असल्यामुळे हे त्वचेला थंडावा देण्याचं काम करतं; यामुळे त्वचेतील रेडनेस व पफीनेस हळूहळू कमी होऊ लागतो त्यामुळे माहितीमध्ये अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीज असल्यामुळे हे त्वचेतील इरिटेशन दूर करून हीलिंग प्रोसेस वेगवान करण्याचं काम करतं. एसेंन्शियल ऑइल स्किन टेक्स्चरला इंप्रुव करून त्वचेला थंडावा देण्याचे काम  करतं.

डिटॉक्स युवर स्किन : धूळमाती व प्रदूषणामुळे त्वचेवर धूळ जमा होते, जी त्वचेवर एकने, ब्लॅकहेड्स, व्हाईट हेड्सचं कारण बनते. अशावेळी स्टीममुळे त्वचेला डिटॉक्स करणं गरजेचं असतं. कारण ती नैसर्गिकरित्या उजळू शकेल. यासाठी गरम पाण्यामध्ये थोडसं लेमन जेस्ट व ग्रीन टी बॅग टाकून त्वचेला डिटॉक्स करा. या प्रोसेसमध्ये त्वचेला डिटॉक्स केल्यामुळे ती निरोगी होईल.

कसं काम करते : ग्रीन टीमध्ये टॅनिन असल्यामुळे ते एस्ट्रीजेंटचं काम करतं. जे डोळयाच्या आजूबाजूच्या सुजेला कमी करण्याबरोबरच त्वचेला टाईट करून तिला तरुण लुक देण्याचंदेखील काम करतं. लेमन जेस्ट पिगमेंटेशन कमी करून त्वचेला योग्य प्रकारे डिटॉक्स करतं

स्किन एजिंग रोखण्यासाठी : आज स्त्रिया स्किन एजिंग रोखण्यासाठी महागडया क्रीम्स वापररण्यापासून ते ब्युटी ट्रीटमेंट घेण्याचा प्रयत्न करतात. ज्यामुळे त्वचेतील एजिंग दूर करण्याबरोबरच स्वत:ला कायम तरुण ठेवता येतं. अशावेळी त्वचेतील एजिंग रोखण्यासाठी बेस्ट आहे. काही ड्राय रोजमरी, काही ड्राय कॅमोमाइलच्या फुलांसोबतच काही थेंब एसेन्शिअल ऑइल मिसळून त्वचेला स्टीम देण्याची ही प्रोसेस त्वचेवर मिनिटांमध्ये मॅजिक इफेक्ट देण्याचं काम करते.

कसं काम करते : कॅमोमाइलची फुलं स्वत:च्या ब्लिचिंग प्रॉपर्टीमुळे त्वचेला ब्राईट बनवण्याचं काम करतात. सोबतच डाग फेड करून फाईनलाईन्स कमी करण्याचे कामदेखील करतं. रोजमेरी त्वचेवरचं एजिंग साईन कमी करण्याचेदेखील काम करते. त्वचेला हायड्रेट व फ्रेश लुक देण्याचं काम करते.

कोरडेपणा दूर करण्यासाठी : जर तुमच्या त्वचेच्या कोरडेपणाला तुम्ही कंटाळला असाल तर हे फेस स्टिम तुमच्यासाठीच आहे. नक्की ट्राय करा. यामध्ये आहेत ड्राय रोज पेटल्स व लवेंडर ऑइल. यामुळे तुमच्या त्वचेचे मॉइश्चर लॉक होण्याबरोबरच त्वचेतील त्वचा नैसर्गिकरित्या ग्लोदेखील करू लागते.

कसं काम करतं : गुलाबाच्या पाकळयामध्ये कोलोजनचं उत्पादन वाढविण्याची क्षमता असण्याबरोबरच हेल्दी स्किन सेल्सला प्रमोट करून त्यामध्ये मॉइश्चर लॉक करून त्वचेला हायड्रेट करण्याचं काम करतं. सोबतच त्याच्या अँटीऑक्सिडेंट प्रॉपर्टी चेहऱ्यावरच्या डार्क सर्कल्सना कमी करून त्वचेला क्लीन बनवण्याचं काम करतं.

यासोबतच जेव्हा यामध्ये लेव्हंडर ऑइलचा समावेश केला जातो, ज्यामध्ये अँटिफंगल व हायड्रेट प्रॉपर्टीज असल्यामुळे हे त्वचेतील रेडनेस दूर करण्याबरोबरच त्याला प्रॉपर मोइश्चर प्रदान करण्याचं काम देखील करतं. ज्यामुळे त्वचेतील ड्रायनेस दूर होऊ लागतो.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें