तर डोळे राहातील आरोग्यदायी व सुंदर

– डॉ. अनामिका प्रकाश श्रीवास्तव

डोळे शरीराचा नाजूक आणि गरजेचा भाग आहे. याबाबत थोडासा निष्काळजीपणा गंभीर रूप घेऊ शकतो. यांच्याकडे दुर्लक्ष केल्यास अनेक रोग होऊ शकतात, कायमचा आंधळेपणा येऊ शकतो. डोळ्यांमध्ये खूपच लहान रक्तवाहिन्या असतात, यांना दुखापत झाल्यास अनेकदा रक्तदेखील येतं आणि डोळे लाल होतात. तसंही डोळे लाल होण्याची अनेक कारणं असू शकतात. कंजक्टिवायटिस, एक्यूट आयराइडोसाक्लायटिस, एक्यूट कंजसटिव्ह ग्लूकोमा, स्क्लेरायटिस रिफ्रेक्टिव्ह दोष, डोळ्यांत काही जाणं वा दुखापत होणं इत्यादी.

डोळ्यात काही गेल्यास

डोळ्यात काही गेल्यास डोळा चोळू नका. सर्वप्रथम स्वच्छ पाण्याने धुवा. डोळ्यात एखादा कण गेल्यास तो स्वच्छ कापूस वा रूमालाने काढा. त्यानंतरदेखील त्रास झाला, तर नेत्रचिकित्सकांचा सल्ला घ्या. डोळ्यातील छोट्याशा दुखापतीकडेदेखील दुर्लक्ष करू नका. परंतु नेत्रचिकित्सकांचा सल्ला घ्या.

डोळ्यांची निगा

संसर्गित व्यक्तिच्या संपर्कात राहू नका. त्याच्याशी हस्तांदोलन करू नका आणि त्याचा टॉवेल, रूमाल यांचा वापर करू नका.

अधिक धूळमातीच्या जागी उन्हाच्या चष्म्याचा वापर करा. स्विमिंग पूल व एखाद्या सार्वजनिक जागी अंघोळीनंतर डोळे स्वच्छ पाण्याने धुवा. झोपून वाचू नका. सूर्य आणि प्रखर प्रकाश इत्यादी सरळ पाहू नका. कारण यामुळे डोळ्यांवर दबाव पडतो.

डोळे आणि आपला आहार

डोळ्यांचं आरोग्य आणि सौंदर्य कायम राखण्यात आहाराची महत्त्वाची भूमिका आहे. जी लोक खूप वेळ, अधिक उशिरापर्यंत खूप अधिक वा कमी प्रकाशात काम करतात, त्यांनी आपल्या डोळ्यांची खास काळजी घ्यायला हवी.

विटामिन ए सतेज डोळ्यांसाठी खूपच गरजेचं आहे आणि आपल्या आहारात त्याचा समावेश करायला हवा. हे सर्व दूध, दही, अंडी, हिरव्या पालेभाज्या, गाजर, आंबा, पपया. संत्र, टरबूज इत्यादीमध्ये आढळतं. डोळ्यांसाठी विटामिन बीदेखील खूपच गरजेचं आहे, जे डाळी, केळी टोमॅटो, हिरव्या भाज्यांमध्ये आढळतं. आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी एका साधारण व्यक्तिमध्ये १० हजार यूनिट विटामिन दररोज घ्यायला हवेत.

डोळ्यांच्या सौंदर्यासाठी व्यायाम

  • तुमचे डोळे उघडा आणि बंद करा. थोडा आराम दिल्यानंतर डोळे पुन्हा उघडा. ही क्रिया कमीत कमी ५ वेळा करा.
  • डोकं न हलवता डोळे डाव्या बाजूने फिरवा आणि जेवढं पाहाता येईल तेवढं पाहा. त्यानंतर डोळे समोर आणा. आता डोळे उजव्या बाजूने फिरवा आणि जेवढं पाहाता येईल तेवढं पाहा. ही क्रिया १० वेळा करा.
  • डोकं स्थिर ठेवून शक्य होईल तेवढं वर पाहा. त्यानंतर खाली पाहा. ही क्रिया १० वेळा करा.
  • एखादं रोपटं समोर ठेवून थोडा वेळ नजर स्थिर ठेवून त्याकडे पाहात राहा. थोड्या वेळानंतर रोपट्याच्या पानांवर नजर फिरवा. ही क्रिया कमीत कमी १० मिनिटं दररोज करा.
अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें