५ उपाय आयब्रोज बनवा दाट

* पारुल भटनागर

प्रत्येक स्त्रीला तिच्या आयब्रोज दाट आणि जाड हव्यात असं वाटत असतं, कारण जाड आयब्रोजमुळे तुमचा चेहरा अधिक ठळक दिसतो. परंतु काही स्त्रियांच्या आयब्रोज नैसर्गिकरित्या पातळ असतात तर काहींच्या आयब्रोज काळाबरोबरच थ्रेडिंग व त्यावर प्लकरचा वापर केल्यामुळे पातळ होण्याबरोबरच आपला आकारदेखील हरवून बसतात, जे त्यांना सूट होत नाहीत.

अशावेळी तुम्ही ग्रोथ वाढवून आयब्रोज करता तेव्हादेखील काही फारसा फरक पडत नाही. आयब्रोज दाट आणि जाड बनविण्यासाठी गरज आहे या टीप्स फॉलो करण्याची. तुमची या समस्येपासून नक्कीच सुटका होऊ शकते.

वॅसलीन

वॅसलीन हे तुमच्या आयलॅशेजना दाट आणि शायनी बनविण्याचं काम करतं. याबरोबरच तुमच्या आयब्रोजनादेखील जाड बनविण्यात मदतनीस ठरतं. कारण हे त्वचेला मॉइश्चर आणि हायड्रेट ठेवण्याचं काम करतं.

यामध्ये मिनरल ऑइल असल्यामुळे हे त्वचेला न्यूट्रिशनदेखील देतं आणि जेव्हा हे तुम्ही आयब्रोजवर अप्लाय करता तेव्हा त्यांना मॉइश्चर मिळाल्यामुळे केसांना दाट बनवून त्यांना हेवी लुक देण्याचादेखील काम करतं.

अंडयाचा पिवळा भाग

केस, मग ते डोक्यावरचे असोत वा आयब्रोजचे, ते कॅरेटिनने बनलेले असतात. परंतु जेव्हा याचं प्रोटीन कमी होऊ लागतं तेव्हा केस गळणे व आयब्रोज पातळ होणं इत्यादी समस्येचा सामना करावा लागतो, तर अंडयाचा पिवळा भाग बायोटीनचा उत्तम स्त्रोत मानला जातो, जो केसांची वाढ आणि त्यांना मॉइश्चर देण्याचं काम करतो. म्हणून दाट आयब्रोजसाठी आठवडयातून याची पेस्ट अर्ध्या तासासाठी लावून ठेवा. तुम्हाला दोन-तीन महिन्यातच बदल दिसून लागेल.

ऑलिव्ह ऑइल

हे नॅचरल आयब्रोजना दाट बनविण्याचं काम करतं. यामधील मॉइश्चरायझिंग प्रॉपर्टीज केसांना गळण्यापासून रोखतात, ज्यामुळे हेअर ग्रोथ व्यवस्थित झाल्यामुळे आयब्रोज दाट दिसू लागतात. अनेक संशोधनात हे सिद्ध झालं आहे की यामधील ओलूओपेन, जे केसांच्या वाढीसाठी मदत करतं.

बदामाचं तेल

बदाममध्ये लोअर फॅट कोलेस्ट्रोल असल्यामुळे हे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर ठरतं. यामध्ये विटामिन ई, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम असल्यामुळे हे न्यूट्रिएंट्स आणि ऑक्सिजनला रक्ताच्या माध्यमातून सहजपणे शरीरात पोहोचविण्याच काम करतं. एवढंच नाही तर यामध्ये ओमेगा थ्री फॅटी अॅसिड असल्यामुळे हे केसांना नरिष करून त्यांना मजबुत करण्याच काम करतं. जर तुम्हाला तुमच्या आयब्रोज दाट बनवायच्या असतील, तर दररोज रात्री झोपतेवेळी बदामाच्या तेलाने मसाज करा. काही दिवसातच तुम्हाला सुधारणा दिसून येईल.

कांद्याचा रस

कांद्याचा रस आपल्या त्वचेवर वा केसांवर लावायला फारसं आवडणार नाही. परंतु जेव्हा तुम्हाला याचे फायदे समजतील तेव्हा तुम्हीदेखील आनंदाने हे आयब्रोजवर लावण्यासाठी तयार व्हाल. सांगायचं म्हणजे यामध्ये सल्फर, विटामिन बी आणि मिनरल्स असल्यामुळे हे आयब्रोजच्या केसांच्या वाढीसाठी खूपच परिणामकारक मानलं जातं. कारण जेव्हा कोलेजनचं प्रमाण खूप कमी होतं, तेव्हा केस क्षीण होऊन तुटू लागतात.

परंतु कांद्याच्या रसात असलेल्या सल्फरमुळे कोलेजनचं पुनर्निर्माण आणि फॉलिकल्सना मजबुती देण्याचं काम करतं. तुम्ही या रसाला कॉटनच्या मदतीने आयब्रोजवर अॅप्लाय करून अर्ध्या तासासाठी सोडून द्या.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें